स्वाती Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वाती

स्वाती

अरुण वि. देशपांडे

आई-बाबांची लाडकी स्वाती, नुकतीच एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली होती. शिक्षण संपवून लगेच नोकरी मिळाली कि मुलांच्या आई-बाबांच्या मनावरचे ओझे हलके होऊन जात असते, स्वातीच्या आई-बाबांना असेच छान वाटत होते. स्वातीची ही नवी नोकरी सुरु होऊन आता जवळपास वर्ष होत आलेले - होते, लवकरच तिला या कंपनीत कायम करण्यात आल्याच्या आदेशाची सर्वांना प्रतीक्षा होती.

स्वातीचा पहिला पगार ..झाला त्या महिन्यातली गोष्ट –घरी आलेल्या स्वातीने येतांना आज तिच्या बाबांच्या आवडीची खास मावा –जिलेबी आणली होती आणि आईसाठी तिच्या आवडीची नमकीन कचोरी .., हे पाहून बाबा म्हणाले, स्वाती .. काय विशेष आहे आज ? तसे म्हणावे तर तुझ्या आईचा वाढदिवस नाहीये आणि माझा पण नाही, फिर ये स्पेशल मिठाई किस लिये ?

आणलेल्या वस्तू टेबलावर ठेवीत स्वाती म्हणाली ..आई-बाबा ..आज माझा पहिला पगार झालाय आणि तो, परस्पर आमच्या बँकेच्या खात्यात जमा केला जातो… मी उद्या तुमच्या जवळ आणून देईन माझ्या पगाराचे पैसे.. आता यापुढे तुम्ही तुमचे पैसे नाही काढायचे ..तुमची स्वाती आता एक कमावती मुलगी झाली आहे बाबा ..!

आपल्या पोरीची आपुलकीची भाषा ऐकूनच स्वातीच्या आई-बाबांच्या डोळ्यातून पाणी आले ..हे पाहून स्वाती म्हणाली .अहो हे काय ..किती सेंटी ..होतात तुम्ही ..असे नाही करायचं .

स्वातीचा हात हातात घेत बाबा म्हणाले ..पोरी ..आम्हाला मुलगा नाहीये “ हे तुम्ही पोरींनी कधीच जाणवू दिले नाही.. तुझी मोठी बहिण ..निमा, लग्न होऊन सासरी गेली तरी..तिचे लक्ष कायम आमच्या कडेच असते .काही कमी पडू देत नाही कधी. वर म्हणते ..बाबा ..आपल्या स्वातीच्या लग्नासाठी तुमचे पैसे सांभाळून ठेवा, अजिबात खर्च करू नका, मी आहे ना, तुम्हाला सोज्च्या खर्चाची काही काळजी करायची नाही ..!

बाबांच्या शब्दात शब्द मिसळीत आई म्हणाली ..स्वाती ..तू सुद्धा ..निमाची बहिण शोभ्तेस बरे, बहिणीचे सगळे गुण घेतलेस तू ..खूप छान वाटते पोरी ..तुझा समंजस –स्वभाव पाहून नेहमी वाटत ..देवा- या गुणी पोरीला असाच छान नवरा मिळू दे रे बाबा .

आज स्वातीला आपल्या आई-बाबांचे हे कौतुक-शब्द आठवून खूप छान वाटत होते .आणि त्यांची खूप आठवण होत होती, गेल्याच आठवड्यात तिचे आई-बाबा महिन्याच्या यात्रेसाठी गेले होते, एका मोठ्या नामवंत यात्रा-कंपनीत त्यांच्या यात्रेसाठीचे पैसे..स्वाती आणि निमा दोघींनी भरले होते .आई-बाबा यात्रेला निघाले त्या दिवशी बरेच नातेवाईक निरोप देण्यासाठी आले होते ..त्यावेळी ते आवर्जून कौतुकाने आई-बाबांना म्हणत होते ..

”नशीबवान आहात हो बाळासाहेब ..किती करतात तुमच्या स्वाती आणि निमा, अशा गुणवान मुली नशिबात असाव्या लागतात . आलेले नातेवाईक असे बोलत असतांना, आई-बाबांच्या चेहेर्यावर खूप आनंद उमटलेला आहे हे दोघी बहिणीना दिसत होते .

स्वातीला हे आठवून .वाटले की –आपणच नशीबवान आहोत ..असे साधे.सरळ, निर्मल मनाचे आई-बाबा आपल्याला लाभले आहेत . लौकिक दृष्ट्या ते कधीच श्रीमंत नव्हते, त्यांची नौकरी त्यांनी प्रामाणिकपणे केली, जीवनभर त्यांनी सदाचार सोडला नाही, आईने देखील अगदी टुकीने संसार केला,

त्यांच्या अशा स्वभावाची टिंगल करणारी माणसे जशी भेटली त्यापेक्षा जास्त ..आपल्या आई-बाबांचा आदर करणारी सन्मान करणारी माणसे जास्त भेटली “ त्यामुळे आजकाल स्वाती तिच्या सोबतच्या मैत्रिणींना म्हणायची ..तुम्हाला खरा सांगू का, माझ्या आई-बाबांनी ज्या साधेपणाने, आनंदाने आणि समाधानाने त्याचे आयुष्य जगले “ तसे जगणे मला थोडेफार जरी जमले तर, मी खूप आनंदात माझे पुढील आयुष्य नक्कीच जगेन.

आणि गम्मत म्हजे. स्वातीचे असे सरळ वागणे तिच्या बरोबरीच्या मित्र-मैत्रिणींना फारसे आवडत नसे, त्यांची नाराजी स्वातीला कळत नव्हती असे मुळीच नव्हते. .अशा वेळी स्वाती म्हण्यची ..

हे बघा मित्रांनो .काल्पनिक स्वप्न पाहून त्यात हरवून जाणे ..मला तरी योग्य वाटत नाही, ज्याला आपल्या वास्तवातील जीवनाचा, आयुष्याचा विसर पडत नाही .असाच माणूस आपल्या मर्यादेत राहून ज्या गोष्टी पूर्ण करण्याचे ठरवतो ..आपण त्याला त्याची स्वप्नं पहाणे “ असे का म्हणू नये ?

मी तर असे म्हणेन की आपण ..घाई न करता, उतावळेपणा न करता एकेक गोष्टी साध्य करता आले तर जमणार नाही का ? सांगा बर ?

हे ऐकून स्वातीच्या मैत्रिणी हात जोडून म्हणत- ह.भं.प-स्वातीबाई ..इतक्या जड भाषेत बोलत जाऊ नका हो .. आम्ही आजून या मूड मध्ये नाहीत ...!

.हे बघ स्वाती ..तू ऐक सुंदर आणि, हुशार मुलगी आहेस ..आपल्या वयाला साजेल अशी तू का वागत नाहीस, का रहात नाहीस ? तुला याचे महत्व का कळत नाही ? याचेच आम्हाला नेहमी आश्चर्य वाटत असते

मित्र-मैत्रिणींचे बोल ऐकून .स्वातीला त्यांचा राग येत नसे. ते म्हणे..दोस्तांनो ..मी आहे अशीच आहे ..मला याचे मुळीच वाईट वाटत नाही ..माझ्या फ्रेंड्स न एकच सांगते की बाबानो - तुम्ही आहात तसेच रहा .मी आहे तशीच बरी आहे.

तिच्या मैत्रिणी शेवटी हात जोडून तिला म्हणत, ए आज्जीबाई, काकूबाई .ऐक जरा आमच थोडा तरी ...अजून तुझं लग्न व्हायचे आहे, तुझी नोकरी छान आहे, तुझ्यावर घरची जबाबदारी नाहीये .पण .तुझे असे दिसणे आणि वागणे पाहून ..आजकालची स्मार्ट पोरं फारशी उत्सुक नसतात तुझ्या सारख्या मुलींच्या प्रपोजलसाठी ..हे तरी लक्षात घे स्वाती,

थोडी तरी इम्प्रेसिव्ह वाटावं अशी हो ग तू ...बदल स्वतःला ..मेक-ओव्हर कर तुझ्यात

स्वातीने नेहमी प्रमाणे मैत्रिणींचे हे असे बोलणे कानाआड केले आणि ती आपल्या कामात गुंतून गेली .

त्या दिवशी ऑफिस मधून आलेल्या स्वातीला ..घरात आई-बाबा नसल्यामुळे एकटे एकटे –वाटू लागले “, मग, चला, आज निमाताई कडे जाऊन येऊ ..असे ठरवत स्वाती आपल्या ताईकडे आली.

बरेच दिवसांनी आपल्याकडे आलेल्या स्वातीला पाहून निमाताईला आनंदच झाला, तिचे मिस्टर-अजय, स्वातीचे अजय –जीजू, देखील नुकतेच आलेले होते . गप्पा सुरु झाल्या, त्यावेळी अजय म्हणाले ..स्वाती ..नोकरी सुरु होऊन आता बरेच महिने झालेत तुला, तुझ्या आई-बाबांनी माझ्यावर ऐक जबाबदारी सोपवलीय ..ते म्हणाले ..स्वाती साठी छान मुलगा शोधा “ आता तिचे लग्न करू या “, म्हणजे आम्ही मोकळे . बघ .आता तू तुझ्या अपेक्षा सांग..म्हणजे ..मी शोध-मोहीम सुरु करतो.

त्या अगोदर ऐक अगदी मोकळेपणाने सांग स्वाती- तू स्वतहा साठी असा एखादा मुलगा शोधला नाहीस ना कुणी ? आजकाल लव्ह-म्यारेज ..सहज सोप्पा आहे.

अजयचे बोलणे ऐकून निमाताई म्हणाली- अजय, निदान स्वातीला तरी असे काही विचारू नका कधी, मला माझ्या सध्या स्वभावाच्या स्वातीची बद्दल खात्री आहे ..ती असे काही करणार नाही..

यावर हसत हसत- अजय म्हणाले – निमा तुझे बरोबर आहे..या स्वाती सारखी मुलगी कोणाच्या नजरेत भरायला तर पाहिजे, .हिच्याकडे तशा नजरेने कुणी पाहिले असेल का कधी ? हाच प्रश्न पडतो मला .

अजयचे हे असे बोलणे निमाताईला अजिबात आवडले नाही..कठोर आवाजात ती म्हणाली ..

अजय ..काही पण बोलू नये माणसाने, ती उलटून काही बोलत नाही, हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे,

तुम्ही मोठे आहात तिच्याहून, तुमचा अपमान होईल असे कधीच बोलणार नाही ही स्वाती नावाची मुलगी.

निमाताईने असे स्पष्ट सुनावल्यावर अजय म्हणाले ..स्वाती ..माझ्या बोलण्याचा राग नको वाटू देऊस,

पण तू थोडेतरी बदलायला हवे आहेस, ऐक सिनियर फ्रेंड म्हणून माझ्या या सूचनेचा विचार कर.

आज ताईकडे आलोत म्हणजे ..या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागणार ..याची कल्पना स्वातीला होती.

ती अजयला म्हणाली- जीजू ..तुमच्या बोलण्याचा मला राग आला नाही, तुम्ही जे म्हणताय, ते चूक नाहीये, माझे मित्र-मैत्रिणी देखील नेहमी म्हणतात .स्वाती ..तू काकूबाई –दिसू नकोस ग. जरा यंग –स्वाती आहेस असे वाटू दे आम्हाला .

हे ऐकून निमाताई आणि अजय दोघे म्हणाले .. स्वाती ..तू कशी आहेस .आम्हाला माहिती आहे, तुझ्या स्वभावात वावगे वाटावे असे काहीच नाही .तरी पण हे नक्की की -.तुझ्या सहवासात जो येतो त्याला हे लगेच जाणवते. इतर मुलींच्या तुलनेत तू अतिशय सामान्य पद्धतीने राहतेस आणि वागतेस .

ऐक लक्षात ठेव स्वाती.. माणसाचे अंतरंग सुन्देरच असायला पाहिजे हे जितके खरे आहे.. तसेच माणसाचे बाह्य-रूप, दर्शनी रूप ..ते देखील नीट-नेटके, आकर्षक असले पाहिजे, तरच त्याचे व्यक्तिमत्व प्रसन्ना वाटणारे असे असेल.

स्वाती..तू बावळट नाहीस, वेंधळी आणि गबाळी पण नाहीस ..हे किती छान आहेस..पण..आता तूच ठरव

तू वापरतेस ते ड्रेस, साडी ..किती बेरंगी असतात, तुझ्या उजळ रंगला शोभतील अशाच रंग-संगतीचे कपडे तू वापरीत जा, ऐक नूर आदमी- दस नूर कपडा “ ही म्हण माहिती करून घे, पाहता क्षणी आपले व्यक्तिमत्व समोरच्या माणसावर प्रभाव पडेल असे आकर्षक असलेच पाहिजे, ही झाली ऐक गोष्ट, दुसरी गोष्ट ..महत्वाची असते .आपला स्वभाव आणि स्वभावातले गुण “ .

दोन्ही गोष्टी म्हणजे बाह्य-रूप आणि अन्तर –रूप यांचा सुरेख समन्वय आपल्यात असला की .समोरचा माणूस आपली दखल घेतोच घेतो.

निमाताई कडून आल्यावर स्वातीला झोप येत नव्हती ..ती विचार करू लागली ..इतके दिवस आपण आपल्या दिसण्याबद्दल, लोकांना काय वाटतंय याचा कधीच विचार केला नव्हता, मुळात या गोष्टीला महत्व दिले नव्हते ..म्हणून त्याची गरज पण कधी वाटली नाही. आणि आपले मित्र-मैत्रिणी, निमाताई,

अजय-जीजू ..इतक्या कळकळीने सांगत आहेत म्हणजे .आपल्याच विचार करण्याच्या पद्धतीत दोष आहे.

स्वातीने समोरच्या आरशात स्वतःला पाहिले ..तिचे प्रतिबिंब ..निरखून पाहिले ..आणि..

तिला न शोभणार्या रंगाच्या ढिल्या –ढिल्या ड्रेस मध्ये ती अजिबात छान दिसत नाहीये नाहीये ..हे तिच्या मनाने सांगितले, घालायचे म्हणून घालायचे कपडे, त्यात विचार करण्यासारखे काय असते ? हे आपले चूकच आहे..हे स्वाती स्वतःशी कबूल करू लागली .

बाकीच्या मैत्रिणी पर्स मध्ये मेक-अप समान ठेवतात हे ती पाहत असायची ..तिच्या पर्स मध्ये या गोष्टी कधीच ठेवल्या नव्हत्या ..अरेच्या, असे केलेच पाहिजे ..असे सुचले पण नव्हते .

आई-बाबांनी तिला – “स्वाती तू बद्दल, असे कधीच काही सुचवले नाही, ना सांगितले नाही..तिला जे योग्य वाटेल तेच ठीक “असा त्यांचा सरळ विचार होता “. निमाताई कधी कधी म्हणत असे, पण ती आग्रही नव्हती, मैत्रिणीनी सांगून पाहिले .आपण कधी प्रतिसाद दिला नाही..असे काही झाले ..सगळे बरोबर होते .चूक कुणी नव्हते ..

याचा अर्थ इतकाच की “ आपण तर बोलून-चालून .एका अर्थाने .बावळटपणाच “करीत होतो.

नो..नो..ये सब बदलना पडेगा ...!

आई-बाबा गावाला गेले आहेत, एकटीला सोबत हवी म्हणून स्वातीने तिच्या मैत्रिणीला रोज येण्यास सांगितले होते . या मैत्रिणीचे नाव दीपा . जुनी आणि छान घट्ट मैत्री असलेली ही मैत्रीण ..स्वाती सारखीच एका कंपनीत नोकरी करीत असे.

काळी-सावली दीपा ..तिचे व्यक्तिमत्व खूप प्रसन्न वाटणारे होते ..बोलण्यात गोडवा, वागण्यात सफाईदारपणा, तिला भेटणारा आणि बोलणारा प्रभावित होत असे .

अशी ही दीपा .स्वातीकडे सोबतीसाठी आली ..आणि स्वातीने तिच्या निमाताई कडे झालेल्या चर्चे बद्दल सांगत म्हटले ..दीपा – निमाताई आणि जीजू, माझे सारे मित्र-मैत्रिणी ..यांना माझ्या बद्दल वाटणारी काळजी मी समजू शकते ..म्हणून मी माझ्यात बदल करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि, या कामात तू मला मदत करायची आहेस दीपा .

स्वातीचे हे ऐकून – दीपाला खूप आनंद झाला ..स्वातीचा हात आपल्या हातात घेत ..दीपा सांगू लागली ..

स्वाती ..तुझे तुला हे उमजले ..हे फार छान झाले . तुझ्या अशा बावळट लुकिंग “बद्दल, अनाकर्षक बोलण्याबद्दल .सगळे काय काय बोलत असतात हे मला माहिती आहे .मला पण खूप वाटते ..की तू याचा विचार करावास ..उशिरा का होईना तुला जाणवले ..हे जास्त महत्वाचे आहे.

स्वाती म्हणाली – दीपा ..तू म्हणतेस ते बरोबर आहे..मी या बाबतीत खरेच खूप उदासीन आहे, दिसणे इतके महत्वाचे असू नये .असे मला वाटते ..पण ते तसे नाही ...आजच्या स्मार्ट कल्चर मध्ये, ऑफिस –

कल्चर मध्ये आपण सतत अनेकांच्या संपर्कात येत असतो . एखाद्या टीपटोप व्यक्तीसमोर माझ्या सारख्या बेंगरूळ दिसणाऱ्या व्यक्तीला उभे केलेतर त्या समोरच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा किती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो ..याची कल्पना मला आता करता येते आहे.

दीपा म्हणाली ..मी तर म्हणेन ..ही गोष्ट महत्वाची आहेच ..त्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे तुझ्यासाठी ..ती म्हणजे ..आपल्या यंग लोकांच्या पार्टीमध्ये ..तू आकर्षणाचे केंद्र असायला हवे ..पण ते होत नाही, जे सुंदर, छान, आकर्षक, आल्हाददायक असते –दिसते ..त्यांच्या भोवती सारेजण जमा होतात

तू आठवून बघ .गेल्या सीझन मधली लग्न-समारंभ, आणि लग्नाचे रिसेप्शनस ..पोर-पोरींचे हसणारे –धमाल –मस्ती करणारे ग्रुप .आणि त्यातील पोरा-पोरी ..तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट दाखवत नव्हते . कुणी ओळख करून दिली तरी ..नंतर त्यांचा तुला काहीच प्रतिसाद नव्हता .

एखद्या तरुण-मुलीसाठी खूप मनाला लागणारी गोष्ट आहे ही ..पण..तू .वेगळीच आहेस ..तुला यात काहीच वावगे वाटले नाही, ती मुलं दूर दूर राहिली काय, तुझ्याकडे पाहत नव्हती काय..तुला काहीच फरक पडत नाहीये ..हे त्यांना कुठे माहिती होते .

दीपाचे हे बोलणे ऐकून घेत स्वाती म्हणाली ..दीपा ..तू मदत कर मला ..माझ्या या “मेक-ओव्हर “ साठी, माझ्या मनाला या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आहे, बाकी गोष्टी हळू हळू कळू लागतील . पण, दीपा तू मात्र माझ्यासाठी हे कर.

स्वातीला धीर देत दीपा म्हणाली – तू बिलकुल काळजी करू नको . - सुंदर दिसण्यासाठी भडक राहावे लागते “असे नाही, ओव्हर –मेकअप “म्हणजे ब्युटी “ असे नाही, साधेपणातही सुंदर दिसणार्या मुली .मुलांना आवडत असतात . माय डियर –स्वाती ..तू अगदी अशीच गोड मुलगी आहेस .

दुसरे दिवशी ..दीपाने सांगितल्या प्रमाणे ..स्वाती ऑफिस साठी तयार झाली . तिच्या रूप-रंगला साजेसा

परफेक्ट रंग-संगतीच्या ड्रेस मध्ये आलेल्या स्वातीला पाहून ..अनेकजणांनी तिला ओळखले नाही, ज्याने ओळखले तो तिच्याकडे पाहतच राहिला .

लंच-टाईम मध्ये स्वातीने दीपाला फोन करून सांगितले .दीपाला हसू आले ..स्वाती ..ये तो होना ही था .

बोलू-भेटू रात्री ..तुझ्याकडे आल्यावर .

ऑफिस मधून बाहेर पडल्यावर ..स्वाती घराकडे न जाता ..सरळ ..निमाताईकडे आली..बेल वाजवल्यावर निमाताईने दरवाजा उघडला ..समोर उभ्या असलेल्या स्वातीकडे ती पहातच राहिली ...

स्वाती ..तू...!

..थांब ग ..तुझी दृष्टच काढते ..

स्वाती .तिच्याकडे पाहून हसू लागली ..

आज तिला मनाला या नव्या बदलामुळे खूप छान वाटत आहे..हे ती अनुभवत होती.