प्रसन्ना..
त्याला मी प्रथम पहिले ते कोल्हापूर बस स्थानका वर.
मध्यम उंची. बेताचा बांधा.. डोक्यावरचे केस कुरळे भरपुर तेल लावुन मागे वळवलेले. चेहरा अगदी हसतमुख.आणी चटपटीत हालचाली.. तो एक पेपर विकणारा होता पाहता क्षणी डोळ्यात भरत होते ते त्याचे पांढरे शुभ्र कपडे आणी सुंदर हास्य !!त्यावेळी कोल्हापूर सांगली रोज चकरा सुरु झाल्या होत्या माझ्या कामासाठी रोजच सांगलीला जावे लागे.. मग रोज बसचा प्रवास आलाच. तो रोज पेपर घेवून एस टी त चढत असे विकायला. मी काही रोज पेपर घेत नसे, पण तरीही रोज जाणारी येणारी असल्या मुळे हळू हळू ओळख झाली काहीतरी रोज आमचे बोलणे होत असेच …मला दीदी म्हणु लागला तो हळूहळू.. खुप बोलका होता स्वभाव त्याचा गाडीतील नेहेमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाशी त्याची अशी खास ओळख होती प्रत्येकाशी तो रोज वेगवेगळ्या गोष्टी वर बोलत असे. बोलता बोलता त्याचे स्वतचे पण एक वेगळे व्यक्तिमत्व दिसत असे एसटी स्थानका वर त्याच ठेला पण होता पेपर चा.. एकदा सहज मी पाहत होते बाहेर तेव्हा दिसले तो स्टाल लावत होता..प्रथम त्याने तिथली पुर्ण जागा झाडून काढली , मग एक टी पॉय सारखे टेबले तिथे मांडले.. टेबला वर एक स्वच्छः टेबल क्लोथ अंथरला.. मग त्या वर गुलाबाच्या कृत्रिम फुलांनी सजलेली एक फुलदाणी ठेवली वेगवेगळे पेपर मग तिथे त्याने अगदी कलात्मकतेने रचुन ठेवले जवळच एका खुर्ची वर बहुधा त्याचा छोटा भाऊ बसत असावा मग तो एक पेपर चा गठ्ठा घेऊन गाड्या गाड्या तुन विकायला निघत असे त्याच्या सौंदर्य दृष्टीचे मला कौतुक वाटले.. !!!बस स्थानका वरचा एक पेपर स्टाल तो काय पण त्यात पण त्याचा नीट नेटके पणा दिसुन येत होता.. एकदा त्याच्या भावाला पण पेपर घेऊन गाडीत आलेले पहिले माझी ओळख करून देताना तो म्हणाला.“.दीदी हा प्रज्योत.. माझा धाकटा भाऊ ““अरे वा छान आहे की नाव.. मी म्हणाले हुबेहूब प्रसन्ना ची कॉपी होता तो !!“ हो ना दीदी आमच्या आई बाबांनी आमची नावे अशीच खास ठेवलीत.. “काय रें कितवीत आहेस तु.. ? .. ”मी शाळेत नाही जात चौथी नंतर.. तो म्हणाला.. “बघा ना दीदी आम्हाला शिकायला नाही मिळाले.. .याला संधी देतोय शिकायची तर हा शिकत नाही “.. प्रसन्ना नाराजी ने म्हणला “ मला नाही आवडत शाळा.. अजिबात” प्रज्योत म्हणाला.. मग मी पण हसले.. आणी त्याला एक चोकलेट दिले माझ्या कडले.. अशीच ओळख वाढत होती.. .. . आता माझ्या बद्दलच्या बऱ्याच गोष्टी त्याला पण माहीत झाल्या होत्या.. मग मी ज्या गाडीला असेन त्या वेळी.त्या माझी जागा धरून ठेवणे हे त्याचे कामच झाले तसा तो इतर अनेकांना मदत करीत असे, कुणाला त्याची गाडी गेली का याविषयी माहिती देणे. कुणाला त्याच्या मैत्रिणीचा अथवा मित्राचा निरोप पोचवणे, काही जणांना उशीर झाला आणी गाडी निघून गेली त्याबद्दल कौतुकाने रागावणे , आणी पुन्हा पुढील गाडीच माहिती देणे काहींचे डबे घेऊन ठेवणे व त्यांना देणे ,.. .. अशी अनेक कामे चालुअसत त्याची अगदी “जगमित्र “होता.. तो आणी सारे काही हसतमुखाने.. बर का !! खरेच नावा प्रमाणेच “प्रसन्न “व्यक्तिमत्व होते त्याचे. अशावेळी मला त्याच्या आई वडिलांचे हे नाव ठेवल्या बद्दल कौतुक वाटत असे ! एक दिवस मला ही अशीच गडबड झाली आणी रोजच्या गाडीच्या वेळेत मी पोचु शकले नाही.. अगदी स्थानकाच्या कोपर्या वर गाडी माझ्या समोरून निघुन गेली मी ड्रायवर ला हात पण केला.. पण त्यांनी गाडीत जागा असुन थांबवली नाही प्रसन्ना ला हे समजले तेव्हा तो थोडा रागावला “दीदी त्याने असे कसे केले ?तुम्ही तर रोज जाणाऱ्या. जरा थांबुन तुम्हाला घ्यायला हवे होते त्याला रागावलेले आणी ते सुद्धा माझ्या साठी हे मी पहिल्यांदा च पाहिले “आता पुढील सोमवारी परत येईल त्याची ड्यूटी.. तेव्हा पाहतो त्याला “ असे त्याने म्हणल्यावर मीच त्याला म्हणाले “जाऊ दे रें.. मलाच उशीर झाला होता ना ! कोणत्या गाडीला कोणता चालक अथवा वाहक आहे याची त्याला खास बातमी असे कदाचित त्याचा सारा वेळ च बस स्थानका वर असेल म्हणुन पण असेल बस भरली असली तरीही एखादी सीट त्याच्या विनंती साठी म्हणुन घ्यायची त्या लोकांची पण तयारी असे त्या लोकांशी पण त्याचे मैत्री पुर्ण संबंध असत.. काही गाड्या वर वाहक म्हणुन महिला पण असते त्यातील काही माझ्या मैत्रिणी पण झाल्या होत्या.. त्यांना मी कधी गेले हे सांगणे आणी दीदी आज तुमची मैत्रीण तुमच्याच गाडीवर आहे बर का.. असा निरोप मला देणे हे पण त्याचेच काम असायचे.. ! प्रसन्ना च्या वैयक्तिक आयुष्या विषयी माझ्या मनात नेहेमी विचार असत.. .पण एखाद्या चे खाजगी आयुष्य आपण थोडेच एकदम विचारू शकतो.. ?पण मग एकदा अचानकच ती संधी मला मिळाली एकदा गावात दंगा झाल्या मुळे सर्व गाड्या बंद करण्यात आल्या.. . जे स्थानका वर होते ते लोक तिथेच अडकून पडले मग प्रसन्ना मला म्हणाला चला दीदी आपण हॉटेलात बसु गाड्या लवकर सुटण्याची शक्यता खुप कमी वाट्ते.. मला पण सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बरे वाटले मग चहा पिता पिता हलके हलके उलगडले त्याचे आयुष्य.. “दीदी पेपर टाकणे हा खरे तर माझ्या वडिलांचा व्यवसाय., तसे मी तर बारावी पर्यंत शिक्षण घेतले आहे.पण वडिलांना अचानक अपंगत्व आले मग हा धंदा हातात घ्यायची पाळी आली.. त्या वेळेस् दुसरे काहीच करू शकत नव्हतो ना !!त्यात धाकट्या दोन बहिणी व या छोट्या भावाची जबाबदारी पण होती.. .मग ठरवले हाच धंदा करायचा..आणी तसेही व्यवसाय कुठला पण असो त्यात लाज कसली असते ? तसे तर आमची कित्येक एकर जमीन आहे.. त्यात काम केले अथवा ती विकली तर आता आम्ही करोडो चे मालक आहोत पण मला कष्ट करून कमवायला आवडते तसे मी पण शिकलेला आहेच.,,,पण मला हाच धंदा आवडतो.. आणी आता तर बहिणींची पण लग्ने करून दिली आहेत त्या आपल्या घरी सुखी आहेत आणी मीही निवांत.. . शिवाय रोज मी जवळ जवळ तीनशे गाड्यात तरी चढतो . प्रत्येकी तीन तीन पायऱ्या.. म्हणले तरीभरपुर व्यायाम होतो मस्त.वाट्ते !!! रोज वेगवेगळी माणसे भेटतात .. तुमच्या सारखी रोज भेटणारी माणसे जवळची होतात आणखी काय हवे ना ?.. मी तर खुप खुष आहे या आयुष्यात !!!! त्याच्या सारख्या इतक्या सध्या माणसाचे हे वेगळे विचार पाहून खुप नवल वाटले आणी कौतुक पण !! त्यानंतर त्याचे लग्न झाले साधी गरीब घरची मुलगी केली होती त्याने एक दिवस तो दिसलाच नाही.. मला पण नवल वाटले कारण तो नाही असे आता पर्यंत तरी घडले नव्हते मग दुसऱ्या दिवशी दिसल्या वर मी विचारले” अरे कुठे होतास् काल ?.. “दीदी लग्न झाले काल माझे तो हसुनम्हणला “का रें बोलावले नाहीस मला.. ?मी विचारले “ अहो यादी पे शादी केलीय.. खर्च नव्हता करायचा मला लग्नावर म्हणुन मुलगी पण गरीब आहे दीदी.तीला कुणीच नाहीये मग म्हणले आपल्या घरातुन तीला प्रेम मिळेल ना.. ! मला पण खुप बरे वाटले कीती चांगले विचार आणी आचार पण ! असे बरेच दिवस चालले होते. पण नंतर मात्र माझ्या सांगली फेऱ्या संपल्या आणी बस स्थानकाला जाणे पण थांबले कसे काय कोण जाणे पण निरोप घेण्याच्या दिवशी मला प्रसन्न नाही भेटला आणी निरोप पण नाही घेता आला त्याचा.. त्यांनतर मात्र जेव्हा जेव्हा बस स्थानका वर जायचा प्रसंग आला त्याला शोधले पण तो कुठेच नाही सापडला.. जसा अचानक भेटला तसाच अचानक गायब पण झाला.प्रसन्न मनाचा असा प्रसन्ना !!