दंगल... Vrishali Gotkhindikar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दंगल...

दंगल

सकाळ नुकतीच होत होती .

एका छोट्या तालुक्याच्या गावातली ती बाजार पेठ

आज बाजारचा दिवस होता तिथला ..

दुकाने उघडायला सुरवात करण्यापूर्वी गाडीवर नाश्ता करण्यासाठी लोक जमू लागले होते

आणी अचानक एकदम दहा बारा मोटार सायकलींचा घेवून जमाव आला

एकेका गाडीवर चार चार मुले बसलेली .

सोबत साऱ्यांच्या हातात लाकडी दांडकी ..

फरा फरा साऱ्या गाड्या आल्या आणी सगळीकडे त्यांनी दांडपट्टा

फिरवल्या प्रमाणे काठ्या चालवायला सुरवात केली .

पोह्याचे एक मोठे भरलेले ताट क्षणार्धात मातीला मिळाले

क्षण भर हात गाडीवाल्याला काय झाले समजलेच नाही

समजले तेव्हा चहाचे भरलेले पातेले पण उपडे झाले होते ..

सगळीकडे एकदम घबराट पसरली

ज्यांनी अद्याप दुकाने उघडली नव्हती ते चटकन बाजूला झाले

जास्त काही समजत नव्हते पण काही लोकांना मोबाईल वरून कुणीतरी

सांगितले म्हणे की ..कुठेतरी कुठल्या तरी पुतळ्यांची कुणीतरी विटंबना केली . होती

त्याचा निषेध करायचा होता .!

तो असा करायचे ठरले होते .

या आठवड्यातला त्या गावातला हा “तिसरा बंद “होता

मागील रविवारी पण अशीच कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना अशी बातमी सोशल नेटवर्क वर आली होती म्हणे ..म्हणून बंद पुकारला होता

खरे तर त्या गावात सोशल नेटवर्क वगैरे फारसे लोकांना समजत नव्हते

साधे शेतकरी लोक राहत असत तेथे ..

उगाच आता “मोबाईल क्रांती “मुळे या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असत

त्यानंतर एका महान नेत्याचे निधन झाले .

मग दुखवटा पाळण्या साठी बंद ..

आणी आता पुन्हा आज बाजाराचा तीसरा दिवस बंद पाळावा लागत होता ..

सर्वांची हातावरची पोटे.

काही विकले गेले तरच विकत घेवू शकतील अशी परिस्थिती ..

आणी इथे तर ..व्यवहार सुरु व्हायची मारामार

एकजण फोन वर सांगत होता पाहुण्याला ..

इकडे यायचे काही कारण नाही उगाच जीवावर बेतेल घरीच बसा

दुकानातून दुध घालणार दुध विक्रेते इकडे येवूच शकणार नव्हते

मग इतके दुध संकलन केलेले काय करणार ?

शिवाय हवा इतकी गरम की टिकायचे पण अवघड ..

गुरांना पाजावे तर गुरे खुप लांब .....घरात राहिली होती

मग काय रस्त्यावर ओतून टाकण्या शिवाय काही पर्याय च नव्हता ..

भाजी बाजारात भाजीच्या टोपल्या घेवून आलेल्या बायकांना . काय करावे समजेना.

परतीचा मार्ग बंद .,.भाजी विकली जाणार नव्हती

उपाशी पोटी बिचाऱ्या दुकानांच्या आडोशाला लपून बसून राहिल्या

एक म्हातारा घरचे आंबे घेवून आला होता ..

ते .विकून नातवाची फी भरायला पैसे द्यायचे होते

पण डोळ्या देखत रस्त्या वर आंब्यांचे शिकरण झाले ..!!

म्हातारा खुप हळहळला ..पण मनातच ..!!

बाहेर शब्द काढण्याची सोय च नव्हती ...

फोडाफोड करणाऱ्या लोकांच्या अंगात कली संचारला होता ..!

त्यांना समजत च नव्हते आपण आपल्याच माणसांचे नुकसान करीत आहोत

कारण काही झाले तरी त्या गावात प्रत्येक जण एकमेकावरच अवलंबून होता

शीत पेये विकणाऱ्या एका दुकानाचे रस्त्यावर ठेवलेले रिकाम्या बाटल्यांचे

क्रेट पळवून त्याचा वापर फोडाफोडी करायला केला जात होता

तो बिचारा हवाल दिल झाला होता ..

आयुष्याची कमाई क्षणार्धात रस्त्यावर आली होती

लोकांनी येवू जावु नये म्हणुन रस्त्यात रिकाम्या खाटा पसरून ठेवल्या होत्या

दिवसभर अशी रस्तोरस्ती “सामसूम “होती

दुपारी अशाच लोका कडून ऐकीव बातम्या येत होत्या

त्या अमक्याच्या घरावर दगड पडले

त्या ..च्या गाडीच्या काचा फोडलयात

जवळून जाणाऱ्या हायवे वर पण बरीच जण उभी होती ...

बाहेर गावा हुन येणाऱ्या लोकांच्या गाड्यांचे नुकसान करायला

त्या बिचाऱ्या प्रवाशाना काही समजण्या पूर्वीच गाड्यांच्या काचा फुटत होत्या

गाडीतल्या बाया बापड्या ..मुले भीतीने ..अर्धमेली झाली होती

कधी एकदा हायवे ओलांडतो असे झाले होते त्यांना

एस टी आगारात तर सर्व सामसूम .

इकडून तिकडून येणारी वाहतूक नव्हतीच

पण नुसत्या उभ्या असलेल्या गाड्या पण फोडून ठेवल्या होत्या

शहरात येणार्या नाक्या नाक्या वर टायर जाळून ठेवली होती

त्या आगीतून गाड्या घालणे धोक्याचेच होते

असा सारा दिवस संपला ..कसा तरी .......

आता उद्या पासून तरी सारे मार्गाला लागेल असे लोकांना वाटले

दुसऱ्या दिवशी सकाळीच लोक नाक्या नाक्या वर जमले

काल काय काय झाले याच्या चर्चा “खऱ्या आणी खोट्या “अगदी रंगात आल्या होत्या

आणी मग समजले एका व्यापारी समुहाचे फार नुकसान झाले होते

शहरातला प्रतिष्ठित समाज होता तो

आमची काहीही चूक नसताना हे नुकसान होते म्हणजे काय ..

समाज खुप “बिथरला “होता .

ज्यांनी हे नुकसान केले त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे

प्रशासनाला पण समजेना कारण गर्दीत कुणी नुकसान केले आहे याचा पत्ता लागणे अशक्य होते

आणी ..मग लगेच निर्णय झाला आज पासून बेमुदत “अघोषित “बंद !

जोवर त्यांना पकडत नाहीत तोवर सर्व गोष्टी बंद म्हणजे बंद

त्यानंतर लगेच मोठा मोर्चा निघाला नवीन “बंद “पाळण्या साठी !!

आता परत “दंगल ..पेटणार होती .!!!

***