अमुल्य भेट .. Vrishali Gotkhindikar द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अमुल्य भेट ..

अमुल्य भेट..

दुपारची तीन ची वेळ.बाहेर कडक उन पडले होतेरस्त्यावर अक्षरशः चिटपाखरू दिसत नव्हते गरम वार्याने धूळ उडत होती नेहा मात्र नेहेमी सारखी वाट पाहत खिडकीत बसली होती.थोड्या वेळाने आपली खुर्ची आणखी खिडकी जवळ आणुन वाकून बाहेर पाहू लागली.आतून आई बाहेर आली आणि नेहाला पाहून म्हणाली..“अग नेहा पडशील ना खुर्चीतून इतकी कसली गडबड झालेली असते ग तुला ?”“बघ न आई तीन वाजून गेले तरी मोहन मामा चा पत्ता नाहीये..म्हणुन....सॉरी आई “आईच्या चेहेर्या कडे पाहताच नेहा थोडी वरमली..आईचा राग जाणवला तिला..!नेहा आता पाचव्या इयत्तेत होती गोड गोबर्या गालाची एखादी बाहुली सारखी दिसणारी नेहा लिमयेंच्या घराची “शान “होती घरात लहान शेंडे फळ असणारी नेहा खुप लाडकी होती..,आई, बाबा, आजी ,आजोबा ,काका काकु,दादा ताई सगळेच्या सगळे तिच्या वर खुप प्रेम करीत अगदी शेजार पाजार चे लोक पण अपवाद नव्हते याला..आणि साहजिक च होते ते..गोड हसरी मनमिळावू ही मुलगी सर्वांचे मन सहज जिंकून जात असे !!नेहा वर्गात पण अव्वल असायची.अगदी नंबरात नसली तरी चांगले मार्क नक्कीच मिळत तिलावाचनाची खुप आवड होती तिला.गावच्या लहान लायब्ररीतून आजोबा तिच्या आवडीची पुस्तके आणुन देत तिलासांबारपुर सारख्या छोट्या गावात लेखन वाचन आवड खुप कमी होतीआणि आता तर गेल्या वर्षा पासून तिला लिखाणाचा छंद लागला होता वेगवेगळ्या विषया वर कविता करणे... छोट्या छोट्या कथा लिहिणे हे तिला चांगले जमू लागले होते अख्या “लिमये “च्या घरात सर्वाना खुप कौतुक वाटायचे तिचेकारण घरी आजोबांचे किराणा दुकान होते.तिचे काका आणि बाबा तेच पिढीजात दुकान सांभाळत होते दादा..तिचा मोठा चुलत भाऊ ,त्याला खेळात मध्ये रुची होती त्यात चम्पियन व्हायचे स्वप्न तो पाहत होता...आणि ताई..ती तर खुप सुंदर होती दिवस भर फक्त आणि फक्त “सुंदर “दिसायचं इतकेच काम होते तिचे..!बाकी अभ्यास वगैरे गोष्टी मध्ये दोघाना अजिबात रुची नव्हती .आणि काकु आणि आई तर पूर्ण वेळ गृहिणी होत्या..आजीच्या हाताखाली काम करणाऱ्या.एकूण काय “साहित्य “..या गोष्टीशी घरातल्या कुणाचाही “तसू” भर पण संबंध नव्हता.म्हणुन तर नेहा चे जास्तीचे “लाड “होत असत आणि मग ताई आणि दादा ला पण तिच्याबद्दल थोड “जेलस “ फील व्हायचं !अशी ही नेहा ज्या मोहन मामा ची वाट पाहत होती ते तीचे खरे मामा नव्हते तर ते रोज येणारे एक पोस्टमन होते.!तिची आणि त्यांची एक खास गट्टी होती याला कारण ही तसेच होते बर कां..शहरात छापल्या जाणार्या..वेगवेगळ्या मासिकांना कथा कविता पाठवणे तिला आवडायचे आणि मग मासिकाकडून येणारी उत्तरे..त्यांची वाट पाहणे हा एकच ध्यास लागला होता आजकाल तिला !कधी तिचे साहित्य परत यायचे तर कधी ते छापून यायचे.जे काही असेल ते असो.....पण उत्सुकता मात्र कायमच असे तिला.. अशात गेले तीन चार महिने मोहन हवालदार नावाच्या पोस्टमन ची ड्युटी त्यांच्या भागात सुरु झाली..नुकतीच त्यांची जवळच्या एका गावातुन बदली झाली होती..तसे गाव लहान होते..दुपारी तीन चार पर्यंत काम आटोपत असे.दुपारी एकतर उन्हाने जीव कासावीस झालेला असे त्यात गावा बाहेर असलेल्या या भागात घरे पण कमी आणि घरातली बहुतेक माणसे दुपारी शेतात असत.कुणाकडे पाणी पण मागता येत नसे या शेवटच्या घरात मात्र एक दोन दिवस आड एखादे टपाल असे हे एक लांब चे घर मात्र त्याला त्याला “” वाटे कारण एक गोड मुलगी त्याची वाट पहात

रोज त्या घराच्या ठराविक खिडकीत बसलेली असे.

पोस्टमन आला की ती आईला सांगत असे

आई त्याना गार पाणी दे ग..मग तिची आई गार वाळा घातलेले पाणी नक्षीदार ग्लासातून घेवून येत असे कधी कधी लिंबा चे सरबत पण असे..जीवाला कसा थंडावा वाटे ....!!आणि ही गोड बोलणारी छोटी मुलगी आपली वाट पाहत असते हे पाहून त्याला आनंद होत असे !मग तो अगदी संतोषाने तिचे टपाल तिच्या हातात देत असे कधी मासिकात तिचे काहीतरी छापून आले तर तिला होणारा आनंद पाहुन त्याला समाधान वाटत असे..आणि असेच हळूहळू तो तिचा मोहन मामा कधी झाला हे समजलेच नाही मग त्या खास “खिडकी बाहेर अधून मधून त्यांच्या गप्पा रंगू लागल्या कधी तो आपल्या नोकरी मधील गमती जमती तिला सांगत असे तर कधी ती आपल्या शाळेतले किस्से त्याला ऐकवत असे दोघा मधले हे नाते घरच्या लोकाना पण “अजब “ वाटे पण एक तर नेहाचा स्वभाव लाघवी होताच आणि मोहन हवालदार ला तिच्या विषयी वाटणारी आपुलकी त्याना पण जाणवत असे....“असतात काही काही पूर्व जन्मीचे रुणानुबंध..”असे आजी पण म्हणत असेमग बोलतां बोलता नेहा ला समजले मोहन मामाच्या घरी खुप जबाबदार्या आहेत.स्वताची दोन मुले ,आणि मागील वर्षी मृत झालेल्या भावाचे तीन मुले आणि त्याची बायको..हे सर्व कमी म्हणुन की काय आई बिछान्याला खिळून अर्धांग वायू ने आजारी..आणि वडिलांच्या हार्ट च्या आजारा मुळे होणारे औषध पाणी..कसा पुरा पडणार होता हा पोस्टमन चा पगार ?होती तशी गावाकडे थोडी शेती..पण असे किती मिळणार त्यातून उत्पन्न ..?कधी तरी सहज म्हणुन घरच्या गोष्टी ऐकताना नेहाला खुप सहानुभूती वाटत असे त्याच्या बद्दल संवेदनाक्षमतेची देणगी पण दिली होती तिला देवाने !!!मोहन मामा ला कोणतीही मदत करायची तयारी होती तिची तिच्या पिगी बँक मधून थोडे पैसे द्यावे असे वाटे तिलापण आजोबांनी सांगितले होते तीला की..“ प्रत्येक माणसाला आपला म्हणुन”स्वाभिमान “असतो..तो दुखावला जाता कामा नये “त्यामुळे असे काही नाही करता येणार हेही तिला समजत होते...!ह्या त्यांच्या गप्पा गोष्टी फक्त त्या खिडकीत चालत असत

खिडकी खुप मोठी होती..

कदाचित तिला ही खिडकी खुप आवडत असावी

म्हणुन ती सतत खिडकीत बसत असावी..

असे मोहन मामाला वाटे

कित्येक वेळेस नेहाची आई त्याला आत बोलावीत असे

पण कधीच संकोचा मुळे तो आत गेला नाही

मात्र नेहा खिडकीत बसुन घरच्या लोकाना कायम हुकुम सोडते

हे त्याला थोडे “अजब “ वाटत असे

आता मागल्या आठवड्यात तर त्याच्या पायाला ठेच लागली होती चप्पल आधीच जुने झाले होते त्यात ते तुटले ठेच लागल्याने पाय सुजला होता त्याचा तसेच बिचारा अनवाणी फिरत होता ड्युटी तर करायलाच हवी होती..न !नेहाने पण त्याच्या साठी पायाला लावायची मलम डबी दिली होती त्याला तिच्या आजोबाना आयुर्वेदिक औषधांची माहिती होती म्हणुन त्यांनीच सुचवले हे मलम जखम पण लवकर भरून येईल म्हणते होते ते..थोडी अंगात कंणकण पण वाटत होती.. तो एकटाच या गावी राहत असल्याने त्याची काळजी कोण घेणार ?म्हणुन मग दोन दिवस नेहाच्या आईने गरम गरम कॉफी सोबत तापा वरच्या गोळ्या पण दिल्या..

मग मात्र तीन चार दिवसात खुप हुशारी वाटली त्याला नेहा मुळे लिमयांच्या सगळ्या घराला त्याच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली होती काहीतरी पूर्व जन्मीचे पुण्य असावे म्हणूनच अशी माणसे आपल्याला भेटली आहेत अशी मोहन मामाची समजूत झाली होती. आता दिवाळी जवळ आली होती.दिवाळीत पण सुट्टी मिळणार नव्हती मोहन मामाला कारण स्टाफ कमी असल्याने बदली काम करणारे कोणीच मिळत नव्हते.तसा मागील आठवड्यात तो घरी जाऊन घरच्या लोकाना दिवाळी खरेदी साठी पैसे देऊन आला होता..मुले लहान होती त्याची त्याना दिवाळीचा आनंद मिळायला होता.!!मात्र या जाण्या येण्यात जवळचे पैसे पार संपून गेले होते.या वेळी आपली काय दिवाळी होणार हा विचार होताच मनात त्याच्या त्यात हा आठवडा सगळा दुखण्यात गेला त्यामुळे मन थोडे नाराज होते त्याचे..विचार करता करता त्या दुपारी तो नेहाच्या घरापाशी कधी पोचला त्याला समजलेच नाही.. आणि खिडकीत नेहेमीचा प्रफुल्ल चेहेरा त्याला दिसला “मामा किती उशीर ?मी केव्हा पासुन वाट पहातेय तुमची..”नेहा लटक्या रागाने बोलती मामाना..काय करणार पोरी ? खरेच उशीर झाला ग...पण तुझ टपाल पाहुन माझ्या वरचा राग पळून जाईल बर तुझा..आता नेहा उत्सुकतेने मामांच्या पिशवी कडे पाहु लागली..आई पण हा संवाद ऐकुन खिडकीत आली..मग मोहन मामा नी एक मासिक बाहेर काढले..“हे पाहिलेस का या मासिकात तुझी गोष्ट छापुन आलीय आणि ह्या गोष्टीला पहिले बक्षीस पण मिळाले आहे हे बघ बक्षिसाचे पाकीट “...आता मात्र नेहाचा आनंद गगनात मावेना..आईने आणि काकुने पण पटकन तीचा एक गोड पापा घेतला..आजीने आतून येऊन “अलाबला “ काढली.. “ आजी दुपारी केलेला मुगाचा लाडू दे ना मामाना ““अग हो ग बाई आणते आणते...आजी हसत आत गेली मग काय त्या दिवशी मामांचा मस्त पाहुणचार झाला..“या हो आज तरी आत..आई बोलली पण मग मोठे साहेब नेमके आजच पोस्ट तपासणी साठी आले होते जास्त वेळ थांबून चालणार नव्हते.. तेवढ्या वेळात सर्वाना समजले मामांना दिवाळी ची सुट्टी नाही मिळणार उद्या पासुन “देव दिवाळी सुरु होणार..मग आजीच म्हणाली उद्या या घरी फराळाला..थोडे निवांत पणे “हो मामां नक्की या..मी तुम्हाला एक मस्त भेट पण देणार आहे तुम्हाला..”नेहा बोलली..अग पोरी तुला भेटणे तुमच्या घरच्या बरोबर छान आनंदाचे क्षण घालवणे हीच तर माझ्या साठी मोठी भेट आहे.“नाही हं मामा यायचं नक्की आणि भेट पण घ्यायची..”बर बाई येईन नक्की...”मामाचां होकार मिळाला आणि नेहा खुश झाली दुसर्या दिवशी दिवाळीची सकाळ..मोहन मामा लवकर उठले, चहा घेऊन आंघोळ करून नेहाच्या घरी जायला निघाले.घरा घरातुन फराळाच्या पदार्थांचा वास येत होता.कोरे कपडे घालून बायका माणसे आपल्या कुटुंबां सोबत देवाला निघाली होती लहान मोठी मुले रस्त्यात फटाके उडवत होती.काही ठिकाणी मुलांनी छान किल्ले केले होते.साहजिकच मामाना घराची आणि मुलांची खुप आठवण आली नेहाच्या घरी पोचताच नेहेमी सारखी नेहा छान कपडे घालून खिडकीत बसली होती मामाना पाहून खुश झाली. आजोबा काका आणि नेहाचे बाबा त्यांच्या स्वागता साठी दारात आले मग आत जाताच सर्वांच्या निवांत गप्पा सुरु झाल्या दिवाळी मुळे सगळीच निवांत होती यथावकाश घरातून ताजे चविष्ट फराळाचे पदार्थ बाहेर आले.मामानी पण अगदी खुशीने त्यांचा आस्वाद घेतला..सोबत गरम गरम चहा पण झाला..हे सगळे पार पडल्या वर आजोबा म्हणाले “मामा आता आत जा नेहा आणि नेहाची “भेट “तुमची वाट पाहते आहे.मामाना नवल वाटले ,इतका वेळ आपण बाहेर आहे पण नेहा कशी नाही आली बाहेर ?मग मामाच आत गेले आतल्या खोलीत नेहेमीच्या ठिकाणी नेहा खिडकीतल्या खुर्चीवर बसली होती हवेत थोडा गारवा होता म्हणुन बहुधा तिने पायावर शाल पांघरली होती आई काकू पण उभ्या होत्या तिथे “मामा घेतला का फराळ आमचा..कसा वाटला ?..”“हे काय विचारतेस बाळा अगदी छान पाहुणचार झाला बर का “मग नेहा म्हणाली आईला “आई त्या कपाटातील मामांची भेट वस्तु दे ना “आईने कपाट उघडून एक खोके नेहाच्या हातात दिले..“मामा हे घ्या माझ्या कडून दिवाळीची भेट “नेहाचे बोलणे ऐकून मामाना संकोच वाटला..पण हो नाही म्हणायला काही वाव नव्हता मामांनी खोक हातात घेतले “बघा न उघडून काय आहे ते..नेहा बोलली हळू हळू मामानी त्या खोक्याचे वेष्टन सोडवले आणि पाहतात तर काय...आत एक नवा कोरा चप्पल जोड मामांच्या डोळ्यात पाणी आले..खरेच अनवाणी पत्रे वाटताना खुप त्रास होत होता पण इतर अनेक खर्चा मुळे सध्या दोन तीनशे रुपये चप्पल साठी खर्च करणे केवळ अशक्य होते..मामाना काय बोलावे सुचेना..ते फक्त नेहा कडे डोळ्यात पाणी आणुन पाहत राहिले आईच म्हणाली मग “आवडले का चप्पल ?नेहा रोज तुम्हाला अनवाणी पहायची ,म्हणायची आई मामांचे पाय पोळत नसतील का ग ?मग तीचे तिनेच ठरवले तुमच्या साठी चप्पल आणायचे आणि तिच्या बाबांनी शहरातून जाऊन हा जोड आणला आता काय बोलावे हे मामाना समजेना..मग विषय बदलावा म्हणुन तेच म्हणाले छान आहे भेट तुझी बेटा..खुप आवडली मला नेहाला पण आनंद वाटला..आणि अचानक शेजारच्या खिडकीतून वार्याचा मोठा झोत आला आणि नेहाच्या पायावरची शाल उडून दूर पडली आता चकित व्हायची पाळी मामांची होती कारण ज्या नेहाला ते खिडकीतून पाहत होते ती दोन्ही पायांनी अपंग होती “हे काय.......? मामांच्या तोंडून शब्द फुटेना..नेहाच्या आईने डोळ्याला पदर लावला “हो तुम्ही नेहेमी तिला बाहेरून पाहत होता त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट नाही समजली कधी..ती जन्मापासून अपंग आहे त्यामुळे बाहेर कुठे फारशी पडत नाही आमच्या गाडीतून शाळेत जाणे आणि येणे वाचन, लिखाण आणि दुपारच्या वेळी तुमची वाट पाहणे हेच तिचे “आयुष्य “ आहे “तुम्ही या गावात नवीन असल्या मुळे तुम्हाला ही गोष्ट ठाऊक नाहीये मग मामांच्या मनात आले आपण हिला लोकाना हुकुम सोडताना पाहत होतो त्यामुळे आपल्याला ती “लाडावलेली” वाटत होती..पण खरी गोष्ट अशी होती तर..स्वताचे पाय नसताना पण दुसर्याच्या पायाची वेदना समजून घेणारी एक लहान मुलगी नेहा खरोखर “अजब ’होती मामांचे मन सुन्न होऊन गेले पण नेहाच्या तोंडावर मात्र तेच चिरपरिचित हसू होते.“ मामा घाला चप्पल जाताना ते..हो ग पोरी तुझ्या समोरच घालतो..मग खुश ?आणि मग बाहेर पडताना ते नवीन चप्पल मामांनी पायात चढवलेआणि हसर्या नेहाचा आनंदाने निरोप घेतला घरातून बाहेर पडतांच मागे पाहून त्यांनी भरलेल्या मनाने “बिनपाया च्या नेहाला हात केला आणि मनातल्या मनात ‘सलाम “पण…

***