कथा - अमृता Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथा - अमृता

अमृता

अरुण वि. देशपांडे

मन अस्वथ असले की सगळा दिनक्रम बिघडून गेल्यासारखा वाटत असतो, एक काम धड होत नाही, करायला गेलो एक आणि होऊन जाते दुसरेच, असे काहीसे होत असते, त्यामुळे चिडचिड वाढू लागते, स्वतःवर नाराज आणि इतरांचा राग येतो ", पण त्यावर काही उपाय नाहीये " ही जाणीव आलेल्या रागात अधिक तेल ओतणारी असते ", अगदी असेच काहीसे अमृता अनुभवत होती.

बरं हे असे काही तिच्या स्वतःच्या वागण्यामुळे होत होते असे मुळीच नव्हते, तर गेल्या काही महिन्या पासून घरात वातावरण असे होऊन बसलेले होते की. त्याचा परिणाम घरातील सगळ्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून जाणवत होता..

गिरीशच्या आईचे आजारपण, हे अचानक आजारपण एका छोट्याश्या अपघातातून उद्भवले होते, घरातल्या घरात झालेलेला हा अपघात होता.. कामाच्या घाईत ओल्या फारशी वरून पाय घसरून पडणे " एरव्ही खुपदा कामच्या घाईत ओल्या निसरड्या फरशीवरून पाय घसरतो, आणि त्यावेळी सावरले जाते, पण, या वेळी तसे झाले नाही… गिरीशच्या आई -अमृताच्या सासूबाई.. पाणी सांडलेल्या ओल्या फारशी वरून पाय घसरून पडल्या. आणि वयोमाना प्रमाणे या आजारातून लवकर बर्या होऊ शकणार नाहीत "हे सर्वांना कळून चुकले.

आणि इथूनच सगळे हवामान बिघडून गेले... एरव्ही प्रत्येकाला वाटत असते की "मलाच खूप काम आहे, एकट्याने किती करायचं ?" पण, आता या पुढे असे नसून. खरोखरीच सर्व कामं.. अमृताला करावी लागणार होती ", तिची इच्छा आहे की नाही ?, तिला वेळ आहे की नाही ? हे असे प्रश्न आणि त्याचा विचार दोन्ही गोष्टी बाद झाल्या होत्या.

वर्तमानातील जीवनमना प्रमाणे. नोकरी करणारे जोडपे आणि त्यांच्या घरातील वातावरण.. म्हणजे "कुलुपबंद- दरवाजा -संस्कृतीचे " प्रातिनिधिक उदाहरण असते.. अमृताचे घर याला अपवाद नव्हते.. अमृता आणि गिरीश.. मोठ्या आणि नामवंत कंपनीतील कर्मचारी होते.. त्यांची नोकरी कंपनीच्या नाव इतकी मोठी नव्हती.. पण.. कंपनीच्या नावाचा मोठेपणा " ते सगळीकडे मोठ्या अभिमानाने मिरवत असत.. " खूप काम असतं, सुट्टीच मिळत नाही, "कंपनीच्या गाडीतून ये-जा " करण्याने सुद्धा त्यांना खूप त्रास होत असे.. शनिवार - रविवार " म्हणजे फक्त आराम " हे व्याख्या. "काही काम न करता ". ते सिध्द करून दाखवत असत.

परिस्थिती पाहून वागणे " अशा स्वभावाचा माणूस "हुशार समजला जातो " असे असेल तर.. गिरीश नक्कीच खूप हुशार होता.. "कुणाला न दुखावता.. त्याच्याशी गोड बोलून स्वतःचे काम साधून घेणे " हे कला त्याला चांगलीच अवगत होती ", घरात आणि ऑफिसात तो त्याच्या या " सक्सेसफुल फौर्म्युल्याचा उपयोग करीत असे ", . आणि आपले हे वागणे मुळीच गैर नाहीये असा त्याने सोयीस्कर समज करून घेतलेला होता.. त्यामुळे. स्वतः काहीच न करता.. इतरांना राबवून घेणाऱ्या त्याच्या या वागण्याचा इतरांना त्रास होतो ", हे समजून घेण्याच्या भानगडीत तो पडत नसायचा.. "माझं ठीक चाललाय न ", यापलीकडे तो जात नसे.

समोरचे मोठ्या मनाने सांभाळून घेतात " हे खरे तर या भिडस्त लोकांची चूक असते, म्हणून गिरीश सारख्या माणसांचे नेहमीच फावते, वादविवाद न करणे, कुणाला न दुखावणे.. हे खूप चांगले असले तरी, लोकांना उल्लू बनवणे चांगले नसते " हे गिरीशला ठाऊक नव्हते असे कसे म्हणता येईल ?

पण, जाऊ द्या कुठे डोकं लावा गिरीश बरोबर, असे म्हणून हातातले काम करून मोकळे होणे बरे होईल " असा विचार समोरचा माणूस करीत असे.

गिरीशची आई आणि त्याची बायको -अमृता.. या दोघींना तर गिरीशचे हे वागणे रोजचेच आणि तिनी -त्रिकाळचे होते, सुरुवातीला अमृता वैतागून जायची, खूप राग राग करायची, अबोला करण्या पर्यंत वेळ येत असायची, तिचा हा त्रागा कमी होण्या साठी तिच्या मदतीला गिरीश येणार नाहीये " हे गिरीशच्या आईला पक्के माहिती होते, त्यामुळे, त्या अमृताच्या मदतीला येत आणि तिच्या कामाचा भार हलका करीत...

पण या मुळे झाले उलटेच.. अमृताला गिरीशच्या आईच्या या मदतीची इतकी सवय लागत गेली की.. ती एखाद्या कामाची सुरुवात केल्या सारखी करून. लगेच दुसर्या कामाला लागायची. ते मध्येच सोडून. आणखी एखादे काम.. त्यात ऑफिसची वेळ.. ते तर टाळता येत नाही ना, मग. दिवसभर अशा अनेक अर्धवट राहिलेल्या कामाचा डोंगर उपसून गिरीशच्या आई थकून दमून जायच्या.

सहजतेने वागणे आणि वावरणे हे जसे जाणवत असते, तसेच "ठरवून वागणे सुद्धा जाणवत असते " अशा मुद्दामपणे वागतांना त्यामागचा हेतू कधी कळतो, कधी तो समजून येण्यास बराच वेळ लागतो. कारण.. मुद्दामपणे ठरवून वागणे यात " उपद्रवशक्ती असते - काही एक हेतू नक्कीच असतो ", किती गम्मत आहे नाही.. आपल्याच माणसा बरोबर बुद्धिबळातील डाव खेळत असतो "..

माझे सुख, माझ्या आनंदासाठी, माझ्या समाधानासाठी " हे असे "स्व-सुखाचे " विचार मनाला खूप सुखद वाटणारे असतात.. पण, त्यासाठी इतरांना त्रास देऊन, त्यांच्या भावना दुखावून जर हा आनंद मिळवणे असेल तर ? नक्कीच हा मार्ग चुकीचा असतो ", गिरीशच्या आईला तिच्या अनुभवातून हे ज्ञान नक्कीच मिळाले होते, पण, तिच्या मुलाला हे सांगून काही एक उपयोग नाही " याचा सुद्धा साक्षात्कार झालेला होता. मग, यातून निष्पन्न काय ? तर "जे चालू आहे ते तसेच चालू द्यावे... दिवस तर शांतपणे पार पाडतोय ना !

पण हे समाधान आणि मनाच्या ठायी असणारा शांतपणा.. एकाएकी नाहीसा झाला होता.. तो गिरीशच्या आईला अपघातामुळे एका जागी पडून राहावे लागणार आहे ", यामुळे. कारण कुणाची कितीही इच्छा असुदे, या पुढे आईला काहीच कामं करता येणार नव्हती.. एका जागी पडून राहून. सगळं पहात रहाणे.. या पेक्षा त्या काही करू शकणार नाहीत.

गिरीश आणि अमृता.. दोघांना आता यापुढे घरातील सर्वच गोष्टी स्वतः कराव्या लागणार होत्या.. ऑफिसच्या वेळा पुरते बाहेर असणे " यात नवे काहीच नव्हते... पण, या वेळेत घरातील एकूण एक कामं. कशा पद्धतीने.. आई करीत असेल.. हे गेल्या काही दिवसात जाणवू लागले.... जबाबदारी अंगावर पडते.. त्यातून सुटका नसते " त्यावेळी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली तर तिचे ओझे न वाटता. कामाचा बोझा वाटत नाही.. उलट परिस्थिती समजून घेत तिच्याशी जुळवून घायचे असते " याची शिकवण जणू अमृताला मिळाली.. , शांतपणे तिने हे बदल स्वीकारून स्वतःला जुळवून घेत घरातील सूत्रं स्वतःकडे घेतली...

तिच्यातील हा समंजस बदल गिरीशच्या आईला खूप दिलासा देणारा होता, गिरीशच्या मदतीची वाट न पाहता, त्याच्या कडून तशी अपेक्षा न करता अमृता घरातील सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते आहे.. ही गोष्ट आश्चर्य करण्यापेक्षा. आनंद वाटावा अशीच आहे.. कारण अमृता.. गिरीश काही करेल " या अपेक्षा करण्यात अडकली असती तर तिच्या पदरी फक्त निराशा आली असती ", तिने हे असे केले नाही हे फार छान झाले.

अमृताच्या घरातील "घरकामासाठी कामवाली बाई होतीच " पण बाकीच्या खूप कामाला "घरातील बाईचाच हात लागायला पाहिजे असतो " ही महत्वाची गोष्ट अमृताला माहिती आहे... !

गिरीशच्या आई अमृताच्या या रूपाने खूप सुखावून गेल्या होत्या, इतके दिवस तिच्या कडे आपण एक.. नोकरी एके -नोकरी करणारी, घराबद्दल काळजी नसणारी म्हणून पहात होतो ", जे दिसत होते त्यावरून हे मत बनवले असे चुकीचे वागलो आपण, खरे तर.. आपल्या अपघातामुळे, आजारपणामुळे घरातील वातावरण बिघडणे, सगळा कारभार गोंधळाचा होणे " हेच होईल असे वाटत होते.. तसे झाले नाही.. याचे क्रेडीट.. आपण अमृताला दिलेच पाहिजे.. आपल्या बोलण्यातून या भावना तिच्या पर्यंत पोन्च्ल्या पाहिजेत. आपला शारीरिक आजार बरा होईल तेंव्हा होईल,. त्यापेक्षा " आता घराचे कसे होईल ? हा मनाला काळजी आणि चिंताग्रस्त करणारा आजार दूर दूर पाळला आहे हे मात्र नक्की.

ऑफिस मध्ये काम करतांना अमृताच्या मनात आणि डोक्यात घराचे आणि घरातील माणसांचेच विचार येत होते, हे असे या अगोदर कधीच होत नव्हते, गिरीशच्या आई घरातल्या घरात पाय घसरून पडल्या. हे निमित्त खूप परिणाम करून गेले, पलंगावर पडून रहाणे ' या शिवाय त्या काही करू शकणार नाहीत, मग ? आता. कसे होणार ? बाप रे, मी एकटीने करायचे आता ?. आईंच्या मदतीचा एक प्रकारे गैरफायदाच घेतलाय आपण, इतके दिवस. पण, आता तसे नाही करता येणार.. चलो, सुखाचे दिवस संपले.. कामाला लागू या.. शेवटी हे घर आणि माणसे. माझीच तर आहेत.. जबाबदारी स्वीकारण्यात शहाणपण आहे... आपण अगोदर स्वतःला बदलू या, मग गिरीश बदलेल अशी अपेक्षा करू या. गेलेल्या दिवसात कसे वागलो ? याचा विचार करण्यापेक्षा.. यापुढे योग्य तसे करण्याची उपरती "होते आहे.. हे किती छान झाले.

सासूबाई आज आजारी आहेत. लवकरच बर्या होतील.

ले-अरुण वि. देशपांडे –पुणे.

मो- 985177342