Katha - Kaay tharavlay tu books and stories free download online pdf in Marathi

कथा - काय ठरवलंय तू

काय ठरवलयं तू ?

अरुण वि. देशपांडे

काय ठरवलंय तू ?गेले काही दिवसांपासुन शैलेशला त्याच्या घरच्यांनी हा प्रश्न शेकडो वेळा विचारला होता,

आणि दर वेळी या प्रश्नाचे ऊत्तर देण्याचे त्याने टाळले होते.खरेच आपण निर्णय का घेऊ शकत नाही आहोत ?स्वतःच तो प्रश्नाच्या वर्तुळात भिरभिरत होता,निर्णय घ्यायचा असे ठरवुनही काही ऊपयोग नव्हता, कारण त्याच्या मनात असुन काय ?तिच्यामनात तसेच असायला हवे, आणि नेमके याच गोष्टीचा अंदाजा नव्हता, आपण भले तिला लाईक करीत असुत, तिला असे काही वाटत असेलच हे कशावरून ?नुसत्या माेकळ्या वागण्यातुन " सोयीस्कर अर्थ काढणे बरोबर ठरणार नाही,थोडी वाट पाहु, थोडा अंदाज घेऊ, मनाचा थांगपत्ता लागु न देणारी ही मुलगी..कशी रिअँक्ट होईल..जाऊदे, अजुन थोडी वाट पाहु..मगच, काय ठरलं तुझे ? या प्रश्नाचे ऊत्तर देऊ,

ऑफिसला जाता जाता घाई गडबडीत शैलेश ने आई- बाबांना सांगीतले, आई- बाबा असे हात धुऊन माझ्या मागे लागु नका, माझ्या मनाची तयारी नाहीये, ती झाली की मी सांगेन,तोपर्यंत तरी मला - हा फोटो पहा, ही मुलगी पाहुन तर घे! असे अजिबात म्हणू नका,प्लीज असे असे करू नका..!, शैलेशच्या अशा बोलण्यामुळे सांगण्यामुळे निदान पुढचे काही दिवस तरी त्यांच्यासाठीची वधु- संशोधन मोहिम" थांबणार हे नक्की .

ऑफिस मध्ये आल्यावर त्याने शोध घेतला,कॉमन फ्रेंड म्हणता येईल अशा मैत्रीणीला फोन केला व तिला विचारले,काय ग, कशी नाही आली तुझी मैत्रीण ?रजा घेतली की काय न सांगता ?ही मैत्रीण मोठी बेरकी नि मिस्कील होती-ती म्हणाली- यू आर बॉस, तुलाच माहिती असली पाहिजे तिच्या बद्दल,

मला काय विचारतोस दरवेळी ?

एकदा तरी तू विचार की रे तू स्वतहा तिला, मैत्रीनीने आज त्यालाच सुनावले,

ती आली की नाही ? न येण्याचे कारण काय असेल ? लक्ष न देता आयती माहिती कशी रे मिळेल तुला दरवेळी ?पण तुझे नुस्तेच दुरून लक्ष असते तिच्यावर,

तिला जाणवुन दे ना ...की तिचा बॉसच खास लक्ष ठेवुन आहे तिच्यावर, त्याशिवाय कसे कळणार तुला शैलेश ?

ती मैत्रीण म्हणाली- शैलेश मी काय सांगते नीट ऐक, लक्षात ठेव..ही मुलगी - जी तुला आवडायला लागली आहे,ती फार साधी असली तरी भोळी नाहीये, स्पष्ट व स्वच्छ मताची आणि नितळ मनाची आहे,

अशा सेंटीमेंटल मुलीच्या मनाला, तिला जाणुन घे, मगच पुढचं ठरवं..

तुला भुलुन, तुझ्या पाेझिशन ला भुलुन तिचेमन वळेल " या भ्रमात राहु नकोस.

स्वप्नाळु तू आहेस, ती वास्तवात जगणारी आहे,तू प्रत्येक गोष्ट हुशारीने, हिशोबाने मिळवता येते अशा समजुतीत तू वावरणारा,ती अव्यवहारी नसली तरी, पैशात सगळ्या गोष्टी मोजणारी पण नाही.

ती दिसायला देखणी नाहीये पण मनाने खुप सुंदर आहे.शैलेशने मैत्रीणीला थांबत म्हणाला -

बाई ग आता हे गुणगान थांबवतेस का ? मला ती खरेच आवडली आहे, प्रेम नसेल कदाचित, सहवासाने होईल की प्रेम.हे बघ, मी तिला सरळ प्रपोज करीन, विचारून पाहीन एकदाच..फार फार तर काय होईल ..नाही म्हणेल, नकार देईल, देऊ दे ना नकार,नकार दिल्याने माझा देवदास " होणार नाही,प्रेम नाही म्हणून प्रेमभंगाचे दुखः नाही,एक मात्र होईल - आवडलेल्या मुलीने नाकारले ",याचे वाईट वाटेल.वा - क्या बात है शैलेशबाबु, तुझा हा अँटीट्यूड अनपेक्षीत वाटला रे मला,

रियली, आय एम ईम्प्रेस्ड..!ए बाई- तू ईम्प्रेस्ड हाेऊन काय ऊपयोग ?तिला वाटले तर काही उपयोग,माझ्या दृष्टीने .

शैलेश, विचार रे लवकर, नाही तर ऊशीर व्हयचा आणि तू तसाच किनारेपर खामोश.आता असे होणार नाही, ती आली की मी विचारेन तिला.ऑल दि बेस्ट शैलेश.

त्या दिवशी ती आलीच नाही, नंतर अजुन सुटी हवी म्हणून अर्ज त्याच्या टेबलावर दिसला.तो कागद हातात धरून तो विचार करू लागला-लग्न ठरलयं की काय हिचं ? हिला नकार कोण देईल,जो पाहील तो होकारच देणार, पहाता क्षणी पसंत पडेल अशीच आहे ही गोड मुलगी.आपण ही पहाता क्षणी हिला पसंत केलीच की.आता आली की ..सरळ - स्पष्ट शब्दांत मागणीच घालायची ",घोळ घोळ नकोच.दोन- चार दिवसांनी नेहमी प्रमाणे तिच्या सेक्शन मध्ये ती दिसली,चला..आली बाबा एकदाची, किती वाट पहायला लागली,बाप रे ..!म्हणतात ना- ईन्तजार और सब्र का फल मिठा होता है !

संध्याकाळी- ऑफिसच्या बाहेर तिच्याशी सामोरा समोर भेट होईल या हिशोबाने शैलेश बाहेर पडला.आणि तसेच झाले- दोघे एकाच वेळी बाहेर पडले, शैलेश म्हणाला,

चला, कॉफी घेऊया की,ती लगेच तयार झाली,अरे वा-, छानच सुचिन्ह आहे म्हणायचे,दोन चार दिवस सुटीवर होतात काय विशेष ?विशेष काही नाही हो- तेच नेहमीचे लग्नाची मुलगी,तिच्या लग्नाची गडबड करणारे आई - बाबा,मग काय, पहायला आलेल्या मुलांच्या समोर बसुन ईंटरव्ह्यू देणे,तेच केलं या दोन- चार दिवसांत.ती सांगत होती,

तो म्हणालामग, होकार आला असेल, एकदम सगळ्या स्थळांकडुन,तुम्हाला कोण नापसंत करील.ती हसत म्हणाली- नाही हो, इतकं सोपा थोडाच आहे हे, ते विचार करतील,मग कळवतील, इतके सहजासहजी नाही होत असे काही

तुम्हाला आवडले असेल ना यातलं कुणीतरी,?त्याने विचारले.तसं नक्की विचार केला नाही, पण आला कुणाचा होकार तर मी नकार द्यावा " असे यातले एक ही स्थळ नाहीये.बघु, काय होतय ते.ती मुकाट्याने कॉफी घेऊ लागली..

धीर एकवटुन शैलेश म्हणाला,मला तुम्ही आवडता, पण सांगायचा धीरच झाला नाही, पण, आज प्रपोजच करतोय,माझ्याशी लग्न करणे आवडेल ना ?विचार करा, मग ठरवा,तुमच्या हातावर प्रपाेजल आहेतच की,आता माझ्या प्रपोजलचा पण नक्की विचार करा,हे तुमच्या बॉसचं प्रपोजल नाहीये, पण, तुम्हाला माहिती असलेल्या मित्राचे प्रपोजल आहे एवढे लक्षातअसुद्या. टेक युवर टाईम.निर्णय निगेटीव्ह असला तरी स्पष्ट सांगा,ओके, मी जरूर सांगेन तुम्हाला..तिच्या आश्वासक शब्दांनी मनाला धीर आला .

पुढचे काही दिवस अधीरतेने प्रतिक्षेत घालवतो आहोत असे शैलेशला वाटत होते.मध्येच एक दिवस ती दिसली नाही, शैलेश अस्वस्थ झाला.काहीच निरोप न देता ती आली नाहीये म्हणजे तिने दुसर्या स्थळास होकार दिलाय हे नक्की.जाने दो, आपणच ईतका ऊशिरा सांगितले, त्याचे असे फळ आपल्यालामिळाले.तरी पण मनातुन खुप निराश झालो आहोत " हे त्याला जाणवत होते.

मोबाईल वर कॉमन फ्रेंड चा कॉल दिसला,हं- बोल,शैलेश, सॉरी दोस्त, मलाच ऊशिरा माहिती झाले.ती अशीच आहे रे, बघ ना, ईतका ऊशीर करण्याचे काहीच कारण नव्हते ना रे तिला,तू तर स्पष्ट म्हणून दाखवल होत की तिला की निगेटीव्ह रिझल्टचे काही वाटणार नाही. मग आता रे...! तिने विचारले .

हं..शैलेशचा सुर निराशेचा आहे हे जाणवत होते,तो म्हणाला-जाऊ दे ना आता हा विषय, मीच ऊशिरा लावला मनातले सांगायला, तिकडुन खळखळुन हसतं मैत्रीण म्हणाली-वेडा रे वेडा आमचा शैलेश,अरे, तिने तुझे प्रपोजल स्विकारले आहे,मला म्हणाली- अनोळखी प्रपोजल चांगलेच होती, पण हे महाशय ओळखीचे, पहाण्यातले आहेत,

मला म्हणाली मुलगा तसा चांगला आहे, आवडला मला., म्हणून पसंत केलयं तुला बाईसाहेबांनी.बघ आता माझ्या समोर बसुन लाजते आहे.शैलेश ये रे बाबा पटकन् ईकडे..सेलीब्रेट वुईथ कॉफी।

ले- अरुण वि.देशपांडे पुणे.

मो-९८५०१७७३४२

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED