Vel nidhun gelyavar books and stories free download online pdf in Marathi

वेळ निघून गेल्यावर ( कथा )

वेळ निघून गेल्यावर

अरुण वि. देशपांडे

मयुरी आणि ओंकार.. यांच्यातील शीतुद्ध सुरु होऊन बरेच दिवस झाले होते, पण, नेहमी प्रमाणे त्यांच्यात समेत होण्याची चिन्हे दिसत नव्हती. कारण पडती बाजू घेणाऱ्या मयुरीने माघार घ्यायचीच नाही असे मनाशी पक्के ठरवले होते. ओंकारचा स्वभाव गंभीरतेने न घेण्याचा आणि मयुरी झाल्या गोष्टी मनाला लावून घेणारी. असा विरुध्द स्वभाव्च्या माणसाचा मामला होता

त्यामुळे हे सारे दिवस दोघांच्या मौन-व्रतामुळे- मुके-आणि अबोल होऊन गेले होते. घरभर एक दमटपणा आल्यासारखा जाणवत होता. मुलांना समजत यातले काही समजत नाही " हे असे समजणे आपली चूक आहे " " हे जाणवून सुद्धा ओंकार आणि मयुरी. यांच्यातील तणाव निवळत नव्हता.

नोकरी करणारे हे जोडपे तसे दिवसभर ऑफिसातच असणारे.. थकून भागून घरी आल्यावर.. झोपेपर्यंतचा वेळ आणि सकाळी ऑफिसला निघे पर्यंतचा वेळ -. या रोजच्या चार-पास तासच्या मिळणार्या वेळेत.. नवरा-बायको म्हणून.. बोलण्यासाठी, दोन व्यक्ती म्हणून संवाद करण्यासाठी, आणि मुलां संबंधी आई-बाबा म्हणून बोलण्यासाठी. कसा आणि किती वेळ द्यावा हेच वेळापत्रक जुळत नव्हते.. त्यामुळे सु-संवाद कमी- वितंडवाद जास्त होऊ लागला

त्यांच्यातील या तणावाचे कारण होते.. घरासाठी वेळ कुणी दायाचा ?. ओंकारच्या मते.. हे काम मायुरीचे आहे. ते तिने केले पाहिजे, कारण ओंकार ची नोकरी -त्याची मोठी पोस्ट व. जबाबदारी पाहता.. मयुरीने त्याच्याकडून अपेक्षा ठेवून. उगीचच दोघातले टेन्शन वाढवू नये,

तर मयुरी म्हणत होती की.. घर आणि कामाची जबाबदारी टाळण्याची हे ओंकारची युक्ती आहे, त्याला घरातल्या कामाचा कंटाळा आहे, स्वतःच्या आरामाची त्याला जास्त काळजी असते.. पण.. एकटी मयुरी सर्व गोष्टी कशा काय करणार ?, तिला हे करतांना त्रास होतोय हे त्याला दिसत असून, कळत असून.. तो या गोष्टी महत्वाच्या आहेत हे मानीत नाही.

तू माझा विचार का करीत नाहीस ओंकार ?,

मयुरीच्या या प्रश्नाला ओंकार उत्तर न देता हातात असलेला मोबाईल कानाला लावीत. रूमचा दरवाजा बंद करून आत बसायचा.. आपले "बाबा ऑफिसच्या कामासाठी कॉलवर असे खूप -खूप वेळ बोलत बसतात " मग, त्यावेळी आपण कुणी आवाज न करता घरात वावरायचे असते".. हा लेसन " त्याच्या मुलांना परफेक्ट पाठ झालेला होता.

मयुरीला हे पाहून अधिक राग आला तरी तो मुलांच्या समोर व्यक्त करणे बरे दिसणार नाही. कारण.. बाबांची इमेज ", आईनेच सांभाळी पाहिजे.

ओंकारचे आई-बाबा अधून मधून त्यांच्या कडे येत असत.. थोडे दिवस राहायचे.. मुलाच्या घरी काही दिवस राहून, सुनेच्या आणि नातवंडांच्या सोबत छान दिवस घालवायचे म्हणून ते येत आणि काही महीन्याच परत जायचे.

मागच्या त्यांच्या मुक्कामात त्या दोघांना जाणवले होते की - एकट्या मयुरीला सगळे करावे लागते.. तिलाही ओंकार सारखी नोकरी आहे, घर आणि ऑफिस सांभाळून हे सारे करणे मानसिक आणि शारीरिक असा दोन्ही थकवा देणारे आहे, तिचा कामाचा भार, होणारे श्रम.. ओंकारने आपणहून.. कमी करण्याचे प्रयत्न ओंकारने आपणहून करावे, हे मयुरी ची अपेक्षा मुळीच चुकीची नाहीये.

आपल्या मुलाचे वागणे चुकीचे आहे " त्याने त्याची चूक सुधारली पाहिजे " यावर त्या दोघांची सहमती झाली, एक दिवस या विषयवार बोलू या असे त्यांनी ठरवले सुद्धा.. पण अचानक. त्यांना गावाकडे परतावे लागे होते. या वेळी एक गोष्ट मात्र झाली होती.. ओंकारच्या आईने.. मयुरीशी बोलतांना तिच्या एकटीवर किती जबादारी आहे, ते करतांना तिला त्रास होतो आहे.. हे आम्हाला जाणवले.. दिसले, या बद्दल आम्ही ओंकारला नक्कीच समजावून सांगू असे म्हटले होते.

त्यवर मयुरी म्हणाली. आई-बाबा.. तुम्हाला जाणवले.. दिसले, तुम्ही धीराचे चार शब्द बोलून माझा त्रास खरोखरच कमी केलात, पण याच गोष्टी. ओंकार ला कधी दिसत नाही की जाणवत नाहीत.. आणि समजा मी. रोज घरात त्याच्याशी भांडण करीत बसले, कामं तशीच राहून दिली, आहे तसाच घर -न आवरता मी-माझी नोकरी इतकेच केले तर कसे होईल ?

आई-बाबा -, अहो, मला ही भरपूर पगार मिळतो.. मी त्याचे भांडवल नाही करीत कधी, उलट घराला हातभार लागतोय 'या समाधानात असते मी.

आम्ही नवरा-बायकोच जर असे ताळ-तंत्र सोडून वागू लागलो -तर मुलांना त्याचा त्रास का होऊ द्यायचा ? त्यांना याची झळ बसू नये या भावने पोटी. ओंकारचे वागणे मी सहन करते आहे. दोन्ही मुलांच्या मनात आमच्या बद्दल जे प्रेम आहे,आपलेपणा आहे त्याला धक्का लागणे मला सहन होणार नाही ? केवळ या मुळे मी मुलांच्या समोर कधीच उघडपणे ओंकार बरोबर वाद सुरु होणार नाहीत याची काळजी घेत असते.

ओंकारची आई म्हणाली -- मयुरी - तुझे अजिबात चुकत नाहीये, आम्हाला ओंकारच्या वागण्याची तर्हा पाहून नेहमीच वाईट वाटते, त्याचा राग येतो, त्याच्याशी बोलू या असे ठरवतो.. पण, मनात विचार येतो.. आपण एरव्ही इथे येतो पाहुण्या सारखे.. मग आहे तितके दिवस राहायचे तर उगीच अप्रिय गोष्टी बोलून वातावरण अधिक कशाला खराब करायचे.. मग, हे राहून जाते.

घरी निघालेल्या मयुरीला बस मध्ये बसल्या बसल्या हे सगळे आठवले.. घरातील सर्वांना हे कळते.. एकट्या ओंकारला हे कळू नये.. किती कम्माल आहे नाही ?, ओंकारला -स्वार्थी माणूस म्हणावे का "? तो तर नेहमीच फक्त आणि फक्त "मी आणि माझा -या सेफ झोन मध्ये वावरतो ". "ऑफिसमध्ये सर्वांना स्वतःच्या शब्दावर झुलवत ठेवणे त्याचे हाथखंडा- प्रयोगाचे एक काम होते. घरी आल्यावर सुद्धा.. खुर्चीवरून न उठता.. मयुरीला घरभर फिरवत ठेवणे " त्याचे चालू असायचे.. आता मुलं,मोठी होत होती त्यांना कळत असेल ना हे असे वागणे. पण त्याच्यात काहीच फरक पडला नव्हता.

मन निरस आणि निराश होऊ लागले की शारीरिक दुखणे आणि व्याधी डोकं वर काढतात, आलीकडे काही दिवसापासून मयुरीला थकल्यासारखे वाटत होते, घरी आले की.. मनात उत्साह नाहीये, अंगात शक्ती नाहीये " असे होणे ही काही आजार असण्याची लक्षण तर नाही ना ? हा प्रश्न तिची काळजी वाढवणारा होता.

ओंकारला अशा शंका विचारणे आवडत नसायचे.. निरसन करणे तर दूरच.. मयुरीला काही त्रास होतोय " हे त्याला मन्यचं नव्हते.. तो म्हणयचा.. तू फालतू विचार फार करतेस,म्हणून त्याचे साईड-इफेक्ट "आहे हे सर्व.

माझ्याकडे बघ.. कसा मस्त खुश आणि फ्रेश असतो.. शिक माझ्याकडून काही तरी.

मयुरी मनात म्हण्यची.. देवा -या माणसाला थोडी तरी बुद्धी दे... हा स्वतः-पलीकडे कुणाचाच विचार कसा करू शकत नाही. नेहमी मी असा, मी तसा. याच्या दृष्टीने बाकी सगळे काहीच नाही..

ओंकारच्या या अशा वागण्याची चीड तिच्या मनातला राग जास्तच वाढवत असे, हे असे राग राग करीत घरी गेले की, त्याच मूड मध्ये काम करतांना वैताग यायचा.. चिडचिड व्ह्यची.. मुलंवर राग निघेल म्हणून.. आलेला राग निमूटपणेगिळून टाकणे " हा पर्याय मयुरी निवडत होती.

ज्याच्या मुळे हे सगळं होत होतं.. त्याला तर याची हवा पण लागत नव्हती.. तो त्याच्यात मस्त होता.. त्यांच्यातील अबोल्याचा त्रास त्याला होईल तरी कसा ? त्याच्या मनात त्याच्या शिवाय इतर कुणा बद्दल काहीच नसे,

मयुरी मनाशी ठरवत होती. ओंकारला शब्दात बोलून मोकळे व्हायचे.., नवरा आहेस न. मग, बायकोला तिच्या कामात मदत कर, तिला आजार होणार नाही याची काळजी कर..

आणि यातच मला काही झाले तर ? मयुरी घाबरून जायची..

अरे ओंकार.. वेळ निघून गेल्यावर.. काय उपयोग ?

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED