नवे युग - नवी आव्हाने Manish Gode द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

नवे युग - नवी आव्हाने

निबंध :“ नवे युग – नवी आव्हाने ”लेखक : मनीष गोडे

प्रस्तावना :नवा युग हा नवचैतन्यानी परीपूर्ण असा आहे..! आपल्या सभोवताल एक नजर फिरवा... सगळी कडे आपल्याला तारुण्य लखलखत्या परिधानात विद्यमान दिसेल. कुठलीही फिकीर न करता, आवडेल तसं करायला ही तरुण मंडळी, आपल्यापेक्षा कित्येक पाऊल पुढे आहे. आश्चर्य वाटते या नव्या युगांच्या नवीन पिढीचे..! एकीकडे आपला भारतवर्ष महासत्तेकडे वाटचाल करीत आहे तर दुसरीकडे ह्या नवीन पिढीचे मुलं, मुलींचे महाभक्त बनण्याकडे वाटचाल करित आहे..! भोग विलास हा एक भयाण शत्रू आपल्या मागे नकळत लागला आहे. नैतिकतेचे हनन सर्वोत्परी होत आहे. भ्रष्टाचार आपल्या चरमवर येउन थबकला आहे. ‘माणूसकी’ आता जनावरात अवतरली आहे आणि ‘जनावर’ माणसात खुप खोलवर रुजला आहे. संसद-भवन ही बालवाडी सारखी वागायला लागली आहे आणि शाळा-महाविद्यालये, राजनीतीचे गड बनत चालले आहे. कृषीभुमी आता अकृषक होत आहे. शहराला लागुन शेतजमीन, पीक घेण्यासाठी नव्हे तर उँच इमारती बांधण्यासाठी वापरली जात आहे. रात्रभरात फळभाज्या पीकून तैयार ह्वावे म्हणुन बेकायदेशीररित्या रसायनांचे उपयोग सुरू आहे. आंतर्राष्ट्रिय खेळांसाठी जाणार्या खेळाडुंपेक्षा, सोबत जाणार्या अधिकारीवर्ग, हे जास्त संख्येत असतात. कधी न खेळणारे, ज्यांना खेळाबद्दल काहीच कळत नाही आहे, अशे व्यक्ती खेळ संचालनालयचे अधिपती बनून बसले आहे. अशे एक-ना-अनेक मुद्दे आहे, जे नवे आव्हाने घेऊन डोकावत आहे. या नव्या युगात गरज़ आहे एका अश्या राष्ट्रनायकाची कि जो अनोभवी आणि नवीन, दोघांचे सांगडे घालून आणू शकतो. तेव्हांकुठे भारत हा खर्याअर्थाने महासत्ता गाजवू शकेल..!

मुख्य आलेख : येणारा नवा युग हा युवाशक्तिचाच आहे, यात काहीही शंका नाही. भारतात खूप मोठ्या प्रमाणात युवकांचे समावेश आहे. तरुण-तरुणी ह्या आपल्या देशाच्या पाठीचा कणा आहे. जर यांना योग्य मार्गदर्शन मिळाला तर आपला देश खूप उन्नती करेल, यात काहीच शंका नाही. पण आज आपल्याला असे काही बघायला मिळते, ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा केली नसेल.

मुली मुलानंसोबत सर्रासपणे पान-टपरीवर धुम्रपान करताना आढळतात. मुलांसोबत एकट्या कुठेही, कधीही जायला तैयार असतात. काही वर्षापुर्वीच्या निर्भयाकांडचा सकोल अभ्यासकेल्या, आपल्याला असं कळेल कि ती मुलगी रात्री सिनेमा बघुन आपल्या मित्राबरोबर परत येत असते आणि रिकाम्या बस मधे तिच्यासोबत दुर्व्यवहार होतो. आपण शाळा-कॉलेज मधे असताना कधी परक्या मुलीबरोबर नाईट-शो बघायला जात होतो का..? अहो, शाळेत १२ वर्ग सोबत शिकूणसुद्धा कधी बोललो नाही कि कधी वाक्ड्या नजरेनीही बघितलेले नाही..! आजच्या राहणीमानात का बरं इतका फरक पडला? आजच्या या नव्यायुगाची एक फेसबुक-आई आपल्या बोबड्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव विचारते, किंबहुना त्याला शिकविते, अपेक्षा करते कि तो केव्हां केव्हां म्हणेल, “आल्ची..!” मग विचारणार - कुठल्या सिनेमातली...? “फैलातची आल्ची.., तुला माहित नाही का गं मम्मी..” हे वाक्य ऐकल्याशिवाय त्या माऊलीला चैन पडत नाही..! आणि तोच परश्या... एक दिवस आपल्या आर्ची सोबत निघुन जातो... दूर खुप दूर... कधी न परतण्यासाठी.., आणि त्याची भाबडी आई फक्त वाट पाहत बसते. ‘आई माझा गुरु – आई माझे कल्पतरु’ असे म्हणनारे साने-गुरूजी आईचे वर्णन ‘श्यामची आई’ या पुस्तकातून करतात, तेव्हा आईचा खरा मह्त्व कळतं; ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत होवो,’ असे म्हणत साने गुरुजी एका महाशक्तिशाली भारताची कल्पना करतात.

कुठे गेलीहो नैतिकता..? आईकडून बाळाला जो संस्कार, नैतिकशिक्षा लहानपणी मिळाली पाहिजे ते किती लोकं देतात..? अशे अनैतिक तरुण-तरुणी नशेच्या आहारी जात आहे आणि मग आपल्या गरजापुर्ण करण्यासाठी, भ्रष्ट आचरण करायला सुद्धा भाग पडत आहे. त्यासाठी वाट्टेल त्या अशोभनीय कृत्य करायला, जराही मागे-पुढे पाहत नाही हे मुलं. युवाशक्तिला योग्यतो सर्वोतपरी मार्गदर्शन देणे हा एक मोठ्ठा आव्हान आपल्यासमोर उभा आहे आणि त्याची सुरुवात घरातुनच व्हायला हवी. बरेचदा असंही होतो कि ज्या सोयी आपल्याला लहानपणी मिळालेले नसतात, त्या सगळ्या हौशी आपण आपल्या मुलांन कडून पूरवून घेतो. उदा. चांगले कपडे, चांगलं पोषक आहार, चांगल्या शाळेत, महाविद्यालयात उच्चशिक्षण, महागड्या वस्तु – जशे की, मोबाईल फोन, मोटर-बाईक्स इत्यादी घेऊन देणे, मुलाला त्याची मैत्रीणी साठी काहिही आक्षेप न घेणे, मुलीलासुद्धा मुलांनसोबत ट्रिपवर फिरायला जाऊ देणे.., ह्या सगळ्या नकळत होत जाणार्या चूका, कालांतराने पालकांना एकाद्या भयानक परिस्थितीच्या समोर नेउन उभं करते. मध्यंतरी अभिनेत्री ‘प्रियंका चोपडानी’ एका वक्तव्यात असे म्हटले होते कि, “आई जशी आपल्या मुलींवर बंधनं घालते, तशीच ती आपल्या मुलाला का बरं आवरत नाही..? त्याला सुद्धा नैतिकतेचा धडा द्याला नको का..?”राजनेता, हा आपल्याकडुन निवडून आलेला, आपला प्रतिनिधी असतो, पण एकदा का तो विधान-भवनात किव्हां संसद-भवनात शिरला कि तो आपला नसतो. मग तो आपला राजा होवुन आपल्यावर राज करतो. वोट मागण्यासाठी तो आपल्या दारावर एकदाच येतो आणि नंतरचे पाच वर्षे आपल्याला त्याच्या दारावर चप्पल झिजवावी लागते. असं का बरं..? ही पद्धत एका परंपरे प्रमाणे पिढी-दर-पिढी चालत येत आहे. का बरं तो आपला नसतो, आपण त्याला निवडून काही चूक करतो का..? नव्या युगामधे त्याला जनते बरोबर रहायला, काम करायला बंधनकारक कसे करता येईल, हा एक मोठा आव्हान आपल्या सगळ्या समोर आहे. सर्वप्रथम राजनेतांसाठी सुद्धा शैक्षणिक योग्यतेचे मापदण्ड ठरवायला हवे. तो संविधानाचा ज्ञाता असायला हवा. निवडणुक लडण्याआधी त्याला एक चाचणी परिक्षा उत्तीर्ण करायला द्या. दोन कार्यकाळापेक्षा जास्त त्याला संसदेत जाता कामा नये. त्याला सुद्धा काम करण्यासाठी एक वयोमर्यादा हवी. हा सुद्धा आपल्यासमोर एक आव्हानच आहे, नाही का..?

शाळा, महाविद्यालये हे फक्त शिक्षणदेण्याचे स्थळ असायला हवे, नेतेगीरी, गुण्ड प्रवृत्तीचे मुलांना योग्य ती शिक्षा दिली गेली पाहिजे. अलीकडेच जे.एन.यु. मधे झालेले कृत्याने, आपल्या देशाची प्रतिमा, जगासमोर मलीन झाली आहे. देशद्रोह हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तुम्ही ज्या मातीत जन्माला आले आहात, त्याच मातेचा तिरस्कार करता..!?! म्हणुनच विद्यादान देणारे संस्थेंनी अश्या परंपरेला पूर्णविराम लावायला हवा. राजनीती आणि शिक्षण हे दोन वेगळे केंद्र असायला हवे आणि त्यादिशेने हा एक नवा आव्हान आपल्या समोर उभा झाला आहे.

आज देशात सत्तर टक्के लोकसंख्या, कृषीवर अवलंबुन आहे. कृषी हा व्यवसाय आता तांत्रिकदृष्ट्या खूप विकसीत झाला आहे. त्यामुळे कास्तकार सुद्धा समृद्ध झालेले आढळ्तात. पण शहरालगतची सुपीक जमीनीचा उपयोग, बाँधकाम-व्यावसायीक, उँच इमारती बांधण्यासाठी करित आहे. याला आळा घालने आवश्यक आहे. एका निश्चित सीमेनंतर ‘हरीत-पट्टा’ म्हणुन शहराची बाँधणी केल्या गेली पाहिजे. त्या ‘ठराविक’ कृषीभूमी नंतर परत उप-शहराचा विकास व्हायला पाहिजे, ही अशी एक पद्धत, द्वितीय विश्वयुद्धात आगीत भस्मसात झालेल्या लंडन शहराचा विकासाचा आराखडा - ‘ग्रेटर लंडन प्लान’ या नावाने ‘सर पैट्रिक एबरक्रोम्बे’ ह्या इंग्रजानी दिलेला होता. आणि तो आराखडा आजवर सुरळीतरित्या काम करीत आहे. भारतात ज्याप्रमाणे कामं होतात, राजनेत्यांना हे मोठे व्यावसायीक आपल्या मनाप्रमाणे चालवतात, हे सुद्धा एक मोठं आव्हान आपल्या समोर उँचावत आहे. त्या साठी नव्यापिढीचे तरुणानी तंत्रज्ञानाचा वापर करुन, अश्या व्यावसायीकांविना सत्ता गाजवुन दाखवली पाहीजे, तरच बदल संभव आहे.

याच प्रकारे सेन्द्रिय खतांचा उपयोग करुन, झाडांवरचे फळं-भाज्या पिकवावे. लौकर पैशे कमविण्यामागे जहरी रसायनांचा उपयोगकरुन, लोकांच्या जीवाशी खेळने बंद करावे. कदाचित त्यांचे मुलं-बाळं सुद्धा ‘त्या’ रसायनाचे आहारी जाऊ शकतात.

एकशेतीस करोड लोकसंख्या असलेल्या भारताला, ऑलंपिकमधे एकाचवेळी कधी तेरा पदकं सुद्धा मिळालेले नाही आहे. दुसरीकडे अमेरिका, रशीया, चीनसार्ख्या बलाढ्य संघाला, नेहमी शंभरहुन जास्त पदकं मिळतात. कारण काय..? कारण एकच आहे... सरकारकडुन मिळणार्या निधीचं अभाव. शाळेत एखाद्या मुलाला जर राष्ट्रिय किव्हा आंतर्राष्ट्रिय खेळांसाठी जायचं असेल तर स्वतःच्या खिश्यातुन संपूर्ण खर्च करावं लागतं..! ही एक शोकांतिकाच आहे. जे पालक धनाढ्य असतात, ते आपल्या पाल्यांना तायक्वॉडो खेळासाठी कोरियाला सुद्धा पाठवायला मागे-पुढे पाहत नाही. पण जे निर्धन आहेत, त्यांच्यासाठी आपल्या देशात ठोस अशी योजना नाही आहे. हा सुद्धा एक नवा अव्हान आपल्या समोर उभे आहे.

समारोप :

मी, भारतदेशाचा एक संवेदनशील नागरीक या नात्याने, हा माझा कर्तव्य समझतो कि जे काही माझ्या सभोवताल बरं-वाईट दिसतं किव्हां घडतं, त्या बद्दल जमेल तेवढे आवाज उठवेल, बोलून, लिहून लोकांना जागृत करेल, सर्वांना आप-आपल्या समाजाला ‘देणे’ याची जाणीव करुन देईल. तरचं ह्या नव्या युगाच्या नवे आव्हाने, पुर्णत्वाला येईल, असा हा माझा ठाम मत आहे.

_____________________________________________________________