मालक Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मालक

मालक

ले- अरुण वि.देशपांडे

मालकाच्या वाड्यावरून- गण्या " नुकताच परतला होता, सकाळी आठ वाजता गेलं की त्याला परतायला दुपारच होत असे.मग आल्यावर अंगुळ करायची, जेवण करायचे,आणि घंटाभर झोप काढून झाली की, शेताकडे चक्कर टाकून याची..असा नेम होता. त्याच्या लहानपणी शेताकडे जायाची काट्या -कुट्याची पाउलवाट आता छान रस्ता झाला होता, या रस्त्यावर खड्डे जास्त होते..त्यामुळे मोटार -सायकलीवर जाण्यासाठी पूर्वी इतकाच वेळ लागत असायचा.बैलगाडीने जाणेच मस्त होते. पंक्च्रची भीती नव्हती..की पेट्रोल संपेल ही भीती नव्हती. जितक्या सोयी झाल्या त्यापेक्षा गैरसोयीच जास्त झाल्यात " बाबा एकदम करेट बोलत होते " हे गण्याला जाणावयाचे.

गण्याच्या पणजोबा -आजोबापासून ते आता गण्यापर्यंत वाड्यावर चाकरी करण्याची परंपरा चालत आलेली होती, तसे पाहिले तर..बाहेर जरी सगळे त्याला "गण्या असे म्हणत असले तरी ' घरातल्या लोकांन्साठी, नातेवाईक या साठी तर "गणेशराव होता.

हे गणेशराव आता पन्नासाच्या पुढे आलेला मोठा करता-सरता गडी माणूस,..त्याची पोरं..म्हणत असत..बाप्पा बस करा की आता. कुणाची चाकरी करायचे राहिले नाहीत.आता तुमचे.. घरात .हरी हरी करीत बसा.,आल्या गेल्या पाहुण्याशी बोलत बसा, चार घास खाऊन आरामशीर पडून राहायचे, ते देले सोडून..आणि

वाड्यावरून बोलावण आलं -की, लगेच निघता. आता तर मोबाईल आल्याय तुमच्या हातात, फोन वाजला की सुधरत नाही तुम्हाला. धावत जाता वाड्याकडे..पुरे करा की आता.

पोरांच्या बोलण्यावर त्यांची आई - मान डोलवायची..माझ काही ऐकणार नाही,पोरांनो. आता तुम्हीच बघा..काही फरक पडला तर पडला. यांना त्यांचेशिवाय करमत नाही अन माल्कालंना तर यांच्याशिवाय कुणी हुंगत बी नाही.

हे असे संवाद आणि बोलणे गणेशराव दर दोन-तीन दिवसाला ऐकीत असत, कानावर पडलेले हे असे बोलणे त्यांच्या मनात जात नसे. असते बोलायची सवय..म्हणून मनावर थोडाच घायचं, असे म्हणून ते थंडपणाने बसून रहात

थोडा वेळ जाऊ दिल्यावर ..मालकाच्या बोलवण्याची आठवण झाली की..गण्या तडक उठून वाड्याकडे निघायचा.

घरातली माणसं पाठमोर्या गाण्याकडे पहात राहायची..त्यांना समजत नसे की.ते मालक म्हणणारे - एव्हढ मान का बरे देतात ही आपल्या गणेशरावला,? एक साधा गडीमाणूस " इतकीच गण्याची सगळीकडे किंमत, मग असे असतांना.वाड्यावर असलेल्या मालकाला साध्या - सुध्या गण्याची जरुरत का पडत असलं बाबा ?

रस्त्याने जातांना गण्याच्या मनात नेमके हेच विचार चालू होते..मालकाचा टोलेजंग वाडा आणि गण्याचे घर गावात दोन टोकाला होते, मध्ये इतके अंतर होते की..तितके अंतर मालक आणि गण्यात कधीच नव्हते.. हे मालक आणि गण्या एकाच वयाचे, एकत्र शाळेत शिकलेली..पुढे ते मालक झाले आणि गण्या त्यांच्या मदतीस असणारा विश्वासू माणूस झाला. पण शेवटी गडी-माणूस..आपली पायरी सोडून कधी वागू नये ".हे सांगायची पण गरज नाही पडली गण्याला कधी

.दुनियादारी प्रमाणे तर आता यावाड्याशी त्याचा काही एक संबंध नव्हता..गेल्या पाच दहा वर्षात.वाडयाशी असलेले त्याचे संबंध नव्या पिढीतील पोरांनी संपवले होते.,.त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांच्या हातात वाड्याचा सारा कारभार दिला होता..नवा गडी -नवा राज " सुरु झाला, आणि पिढ्या न पिढ्या राबलेले गण्याचे घर वाड्याला दुरावले.....

गण्या वाड्यात आला..खाली कुणीच दिसले नाही..दिसेल तरी कसे.. दोन महिने झाले.सगळे शहरातल्या बंगल्यात मजेत रहात होते. गण्या पायर्या चढून माडीवर आला.. मालकाच्या खोलीत गेला..मालक एकटेच गुंगीत पडलेले होते.बाजूला मोबाईल फोन असायचा..कुणाशी बोलावे अशी इच्छा झाली कि नंबर लावायचे..पण पलीकडून कुणीच फोन घेत नसे..बोलणे तर दूरच. मग..गण्याला फोन करून बोलावून घेतले की तास दोन तास तरी समोर एक माणूस आहे याचे समाधान मालकाला मिळते " म्हणून गण्या लगेच येऊन बसायचा.

संध्याकाळ झाली की थोडेफार नोकर माणसे.जे मालकाला आणि वाड्याला सोडून गेले नव्हते..ते रोज येत दिवाबत्ती करीत.दिवसभर अंधारात रहाणारा वाडा संध्याकाळी प्रकाश पडून थोडा उजळून जायचा

मालकाची झोपमोड होऊ नये म्हणून गण्या समोरच्या खुर्चीवर बसून राहिला.. पलंगावर पडून राहिलेल्या जयवंतराव ची हालत आज बघवत नव्हती..एव्हढा कर्तबगार माणूस..ज्याच्या शब्दाने कित्येक माणसे मोठी झाली, आज लुळ्या पांगल्या शरीरांनी जगत होता..वेळीच सावरलं असता त्यने स्वतःला तर त्याची आजची अवस्था आली नसती..

बुद्धीने वेळेवर निर्णय घेणे सुचले असते तर ? पण जयवंतराव मनाप्रमाणे वागत होते..स्वतःवर प्रचंड प्रेम आहे या माणसाचे, आत्मविश्वास प्रचंड..पण..तो फाजील आणि आत्मघातकी आहे..हेच कळाले नाहीये आपल्या दोस्ताला,

काय म्हणावे अशा माणसाला.. चांगले नशीब घेऊन आलेला.. दुर्दैवी कमनशिबी माणूस.असेच म्हणावे.

निराशेचा एक मोठा सुस्कारा सोडीत गण्या तसाच बसून होता..आज त्याला ते गेलेले दिवस पुन्हा आठवत होते...

माणसाची गाडी एकदा उताराला लागली की ती कुठं आणि कशी जाईल आणि थांबलं याचा काई भरवसा नसतो हेच खरं रे बाबा ! गण्याला याची चांगलीच प्रचीती येत होती.

तरुणपणीच्या मस्तीखोर दिवसात तरण्याबांड पोरांना बिघडायला काई वेळ लागत नसतो.. गण्या आणि मालक यांचा दोस्ताना कमी न होता ते एकमेकांचे जानी -दोस्त बनत गेले, मालक आणि गण्या याची जोडी सगळीकडे फेमस होती. मालकांना सगळे जयवंतराव म्हणयचे.

.राजबिंडे रूप-गुण लाभलेले जयवंतराव खूप मोठी स्वप्न पाहू लागले.. त्यांना राजकारणात यायचे होते..सगळा इलाखा आपल्या हातात आला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती,त्यांना किंग-मेकर व्हायचे होते

या इच्छेला खतपाणी घालणारी चतुर माणसे जयवंतराव भवती लगेच घोटाळू लागली, गण्याने जमेल तेंव्हा अनेक वेळा सांगून पाहिले.." मालक - हे तुम्हाला झेपणार काम नाहीये..तुम्ही यात पडू नका,लई बेकार असतंय हे सगळं पोलिटिक.-बिलीतिक.

जयवंतराव त्यांच्याभवती जमलेल्या लबाड माणसांच्या गोड बोल्यानाला पुरते भुलून गेलेले, गण्याचे समजावणे त्यांना त्या वेळी रुचणे शक्य नव्हते..त्यांनी सुनावले.

.गण्या -दोस्ता.ऐक मी काय म्हणतो ते..आपला दोस्तांना तू माझ्या या कामात आणू नको..दूर राहून गोडीत रहा. मला तुझ्या पेक्षा जास्त समजतंय.

स्वतःचा अधिक अपमान करून घेण्य पेक्षा गण्याने काहीच न बोलणे बरे असे ठरवले.पण जयंतरावची सावली सारखी सोबत करणे त्याने सोडले नाही.

जयवंतराव जिद्दी होते, अहंकारी होते, स्वतःच्या कल्पना शक्तीवर त्यांचे अतिशय प्रेम होते.. "माझ्या आयडिया फेल ? होऊच शकणार नाही. एक दिवस हा जयवंतराव..जे ठरवील तसे तसे होणार..बघा..किंग मेकर व्हायचं या जयवंतरावला.

इच्छेला पैश्याचे भरपूर पाठबळ होते, " पैश्याच्या जोरावर दुनिया झुकती है " हे ओळखून असलेल्या जयवंतराव यांचा उमेदीचा आणि बहारीचा जमाना सुरु झाला..कसलेल्या राजकारण्य प्रमाणे..बघता बघता अख्या इलाख्यात त्यांचा शब्द प्रमाण झाला. भाषणबाजी नाही, आश्वासने नाही की लोकांच्या समोर स्वतहाला मिरवून घेणे नाही ".. ते म्हणत - जायला हौस आहे त्याने घ्यावी पुरवून..आज आहे उद्या काय सांगावा ?

त्यांच्या वाड्यातील बैठकीतून सगळी सूत्र सगळ्या योजना..जयवंतराव त्यांच्या मना प्रमाणे चालवू लागले.त्यांच्या.कीर्तीचा कर्तबगारीचा पतंग आकाशात उंच उंच झेपावत होता, मना प्रमाणे भरार्या मारू लागला..जो तो कौतुकाने म्हणू लागला.. जयवंतराव मालकाला मानलं पाहिजे बाबा,कसं काय जमत की बाबा यांना सगळं बघा की कशात नसून बी ते सगळ्यात असतात..

जयवंतराव भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ कायम घोंगावत असे, मान्यवर नेत्यांच्या गाड्या वाड्या समोर मुक्कामाला थंबू लागल्या..

जयवंतरावचा दोस्त गण्या -..या सगळ्या गोष्टी पाहण्यापलीकडे काही करू शकत नव्हता.जयवंतराव त्याला म्हणत - दोस्ता - तू फक्त माझ्या सोबत पाहिजेस नेहमी , मुक्या बाहुल्या सारखा.तू फक्त फक्त पहायचा, आणि ऐकायचं..तुला बोलता येतं हे विसरून जायचं.

इतक्यावर जयवंतराव थांबले नाही..त्यांच्या सगल्या लोकांना समजेल अशा भाषेत त्यांना सांगितले..हा माझा माणूस..माझा विश्वासू सोबती आहे, त्याचा कुणी अपमान केला तर याद राखा, अशा माणसाला माझ्या येणे बंद होईल.

निरुपद्रवी गण्याला बोलून काही साध्य होणारे नाही " हे त्या हुशार लोकांनी ओळखून घेत..सगळे लक्ष जयवंतराव भवती देण्यास सुरुवात केली..

स्वतःच्या या नव्या राज्यात जयवंतराव मना पासून रमले होते..रोज नवे यश, रोज नव्या जबाबदार्या स्वीकारत त्यांचा विजयरथ चौफेर फिरू लागला.जयवंतराव ठरवतील तो माणूस..खुर्चीवर,हे गणित पक्के झाले..किंग-मेकर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते..

" मी राजा होणार नाही..पण कुणाला राजा बनवायचे, कुणाचा बाजा वाजवायचा..हे मी ठरवणार आणि तसे करून दाखवितो कि नाही हे पाहाल तुम्ही..' अगदी असेच होत गेले..जयवंतराव बोलतात ते खरं करून दाखवतात " हे ऐकून स्वखुशीत मग्न झालेले जयवंतराव.आपल्या दोस्ताला -गण्याला कधी सोडीत नव्हते हे मोठेच आश्चर्य होते.

वाड्याबाहेरची दुनिया जयवंतरावच्या शब्दावर झुलायची..त्या नादात वाड्यात आलबेल आहे ना " हे पाहण्यास त्यांना वेळच नव्हता याचा अचूक फायदा त्यांच्या शत्रूंनी अखेर घेतला..घरातल्या माणसात बेबनाव करा तो एकदा का झाला की मघ मजा बघा... " मजबूत किल्ला जमीनदोस्त व्हायला काय बी वेळ लागत नसतो. जयवंतरावची नशा कशी एका झटक्यात उतरती ते " दुनिया बघेल., दुखावलेल्या एक जाणत्या अनुभवी शत्रूने सल्ला दिला,आणि त्यांच्या छुप्या कारवाईला यश मिळत गेले.

संकटे आणि समस्या चाहु बाजूंनी अंगावर येत गेल्या..घरातल्या काही प्रश्नांनी नाजूक वळण घेतले..ते मिटवण्यात वेळ-शक्ती -पैसा..हे सगळं होतं म्हणून निभावल.पण मनस्ताप किती झाला..आपली म्हणवणारी जवळची माणसं इतक्या हलक्या मनाची असावीत " याची जाणीव जयवंतरावच्या मनाला वेदना देत होती.. पण या गोष्टी बाहेर कळू नये यासाठी किती आटापिटा,खटपटी कराव्या लागत होत्या..ते फक्तगण्याला दिसत होते.. जयवंतराव आतून खचून जात आहेत हे त्याला जाणवले तशी त्याला मालकाची- आपल्या दोस्ताची काळजी वाटू लागली

त्याने सांगण्याचा कितीदा तरी प्रयत्न केला..त्यावर जयवंतराव म्हणत- दोस्ता..आता याच्या शिवाय आम्ही, म्हणजे शक्य नाही रे.. हे मी उभारलेले जग आहे..माझे स्वप्न आहे.कसे सोडून देऊ हे ! नाही जमणार दोस्ता

उगवत्या सूर्याला नमस्कार करणे "जगाची -लोकांची सवय असते..नवा असलेला जुना होणे..पुन्हा कुणी नव्याने येणे..या चक्राचा भागच आहे " याचा विसर जयवंतरावला पडला..आणि सगळा मामला बिघडला.."..त्यांच्या पार्टीमध्ये फेरफार झाले..नेतृत्व बदल मागणी झाली..जयवंतरावला पहिल्यांदा विरोधाचा झटका बसला..आक्रमक नव्या पिढीने जयवंतराव आणि त्यांचे समवयस्क यांना सन्मानपूर्वक बाजूला होण्याचे सुचवले..अधिक शोभा करून घेणे जयवंतराव व त्यांच्या मित्रांनी टाळले..आणि पाहता पाहता जयवंतराव..माजी नेते होऊन आपल्या वाडयात एकांतवासात गेले.

हे सहन होणे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडले होते..उध्वस्त झालेल्या मनाला.आतून खंगून गेलेल्या शरीराने त्यांना साथ देणे सोडले.. आणि एकदिवस - लकवा झालेले जयवंतराव..गण्याच्या आधारणे वाड्यावर दिवस काढू लागले.. इतके विपरीत झालेले पाहून घरातील लोकांनी वाडा सोडून शहरातल्या बंगल्यात रहाणे पसंत केले हे करतांना..,जयवंतरावचे कोण करेल ? त्यांच्या सोबत कोण राहील ? हे प्रश्न कुणालाच पडले नाही.

जयवंतराव जागे झाले - समोर त्यांना दोस्त -गण्या बसलेला पाहून खूप बरे वाटले,ते म्हणाले -

अरे दोस्ता - आवाज देऊन उठाव्यचे की गड्या, तेव्हड्याच गप्पा केल्या असत्या रे, आजकाल बोलायलाच मिळत नाही रे मला, कधी काळी माणसात असणारा मी..आज माणूस शिवाय जगतोय.. अशी हलत का झाली असेल रे माझी. मला अक्कल नव्हती..तुमचं डोकं तर ताळ्यावर होत न गणेशराव,? का नाही बोललात तुम्ही ?

मालक..तुम्हीच सगळ्या समोर मला बोलून दाखवलात..गण्या, तू फक्त पहायचं आणि ऐकायचे, बोलायचे नाही.

तुमचा शब्द मोडण्याची कुणाची बी टाप नसायची त्या वेळी.

गण्या - खरेच रे..काय दिवस होते..मी किंग-मेकर होतो..मी ठरवेल तेच आणि तसेच होणार..हे फायनल...

किती मस्ती होती रे, घमेंड होती माझी मला... जाऊ दे आज काही उपयोग नाही बोलून.. झालं ते झालं आणि गेलं ते गेल.

बोल, तुझे ठीक ठाक चालू आहे ना ? हे काय विचारतोय तुला, तू नशीबवान आहेस रे दोस्ता..तुला तुझी माणसं आहेत.सांभाळणारी,माया करणारी..

इकडं मी बघ लकवा काय झाला मला आणि..सगळे पळून गेले..सोडून गेले..अंगातली शक्ती गेली,मनातले बळ गेले माझ्या,पार शक्तिहीन,दुर्बल करून टाकलाय रे माझ्या नशिबाने.मला.

गण्या..इथे कुणी नाही माझ्याजवळ, पण या सगळ्यांचे लक्ष मात्र माझ्या पैशावर -मालमत्तेवर आहे. माझ्या जाण्याची वाट पहात आहेत, मला काय समजत नाही की काय हे सगळं.?

मी कुणाला काय काय, किती किती देणार ? याकडे लक्ष आहे सगळ्यांचे.

गण्या दोस्ता -- या लोकांनी मला किती लुटलाय, लुबाद्लाय, हे कसे आणि कोणत्या तोंडाने सांगणार..तुला सुद्धा मी सांगू शकत नाही काही काही गोष्टी. आतली दुक्ख नाही रे सांगता येत.

या अव्स्थ्तेत जयवंतरावला पहाणे गण्यासाठी अशक्य होते..आपल्या मित्राची ही हालत झाली..पण ती कुणामुळे ? लोकांच्या वागण्यामुळे ? हे थोडे थोडे खरे ..पण याला सर्वस्वी जबाबदार आहेत आपले मालक -स्वतहा जयवंतराव.

पण असे वाटून, बोलून काही उपयोग नाही हेच खरे.

मालकाच्या बाजूला असलेल्या फोनची रिंग वाजली..आणि मालकांनी डोळे उघडून पाहिले.

.फोन हातात घेत त्यांनी विचारले..कोण बोलताय ?

तिकडून बोलणार्याने सांगितलेले ऐकत मालक म्हणाले..हो हो, या या, आठवणीने सगळ घेऊन या,विसरू नका, माझा दोस्त गण्या -

हो आज आलाय तो सुद्धा. तुम्ही या लवकर....

थोड्यावेळाने लगेच ---

मालक येऊ का आत ?

कुणी आल्याची चाहूल लागली असे दोघांनी दरवाज्याकडे पाहिले..

दारात वकीलसाहेब होते..सोबत या वाड्याच्या -वहिनीसाहेब, आणि मुले आलेली दिसत होती.त्यांना आलेले पाहून

आज इतकं महत्वाचं काम आहे,यात आपली हजेरी कशाला ?.या विचाराने गण्या उठून म्हणाला..

मालक -येतो मी..घरगुती मामला आहे, मी यात नको. पुन्हा फोन करा..येईन मी.

त्याला हातांना "थांब " अशी खुण करीत जयवंतराव म्हणाले. गणेशराव जाऊ नका,.तू सुद्धा मला घरातलाच माणूस वाटतोस रे दोस्ता.

मालक उठून बसले होते, वहिनीसाहेब घरच्या असून..परक्या पाहुण्या सारख्या बसलेल्या होत्या,मुलांना तर वडिलांच्या बद्दल ना आदर ना आपुलकी. मनात नाते शिल्लक नसले तरी..व्यावहारिक दृष्ट्या.लौकिक दृष्ट्या तर जे नाते जगजाहीर होते..ते सोडून देता येणार नाही..याची जाणीव या सर्वांना पैश्याच्या मोहाने का होईना होती.

सर्वांना उद्देशून वकीलसाहेब म्हणाले.मालकांनी केलेल्या सूचनेप्रमाणे.मी आज त्यांचे इच्छा पत्र व त्यातील सूचना.वाचून दाखवणार आहे..ज्या तुम्न्हाला आम्हाला बंधनकाराक असणार आहेत.

किती पानांचे इच्छा -पत्र आहे हे कुणास ठाकुक ?..इतकी संपत्ती, वैभव, जमीन जुमला,शहरातील बंगले..बँकेतील रक्कम..मालकांच्या लक्षात तरी असेल काय हे सगळं. ?

वकील साहेबांनी..बंद लिफाफा मालकांच्या हातात देत म्हटले..आपणच यातला मजकूर वाचून दाखवणे बरे होईल.

मालकांनी लिफाफा फोडला ..आत पाहिले..फक्त एकच कागद..हे पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटले..

मालकांनी तो कागद हातात घेत वाचण्यास सुरुवात केली..

मी जयवंतराव - या द्वारे सांगू इच्छितो की.. मी गेल्यावार,माझ्या माघारी असे नाही.तर.. आज पासून माझ्या सर्व संपत्ती,रोख रक्कम, स्थावर मालमत्ता.इत्यादीची काळजी घेण्याची जबाबदारी.मी माझे मित्र.श्री गणेशराव यांचेकडे सोपवीत आहे.. या पुढे मी असे पर्यंत..माझ्या संमतीने..माझे सर्व व्यवहार ते पहातील -करतील .या साठीचे विस्वताचे अधिकार मी त्यांना देतो आहे.यापुढे त्यांच्याकडे सर्वांनी आपले मागणे मांडायचे आहे.

मजकूर वाचून झाल्याक्षणी सगळे निघून गेले..वकीलसाहेबही त्यांच्या पाठोपाठ निघाले.

जयवंतराव म्हणाले..दोस्ता..तुझ्या साठी मी कधीच काही केले नाही रे, पुन्हा तुझ्याकडेच मागणे मागतोय..

माझासहित सगळ्यांचा तू सांभाळ कर....मी जिवंत असे पर्यंत.

गणेशराव --.आता आज पासून आमचे मालक- तुम्हीच.

जयवंतराव एका हाताने डोळे पुसत होते.आणि गण्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत होता.

-कथा - मालक

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- 9850177342