लग जा गले...२

लग जा गले...२

अमोल आणि नेहा त्या दिवसानंतर एकमेकांना भेटले सुद्धा नाहीत. एकमेकांसमोर न यायचा त्या दोघांचा निर्णय होता पण देवाची योजना काही वेगळीच होती. एके दिवशी अमोल आणि नेहा ह्यांची भेट झाली. अनपेक्षित भेट होती ती!! त्या रात्रीनंतर दोघ एकमेकांना भेटले नव्हते. कोणत्याच पद्धतीचा संपर्क दोघांना टाळला होता. पण २ वर्षानंतर आपल प्रेम समोर पाहून दोघ स्तब्ध झाले. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि दोघांचा श्वास जणू पुन्हा चालू झाला. दोघांच भान हरपल. मनावरचा सय्यम सुटला आणि ते एकमेकांना मिठी मारायला पुढे सरसावले पण तिथेच थांबले. आणि भानावर आले.

"सॉरी.." दोघांच्या तोंडातून एकच शब्द आला..त्यांना माहिती होत, आता दोघांना एक होता येणार नाही त्यामुळे आपल्या मर्यादा दोघांनाही माहिती होत्या. आणि दोघेही एकमेकांपासून दूर झाले. काही वेळ शांततेत गेला पण शांतता भंग करत अमोल बोलायला लागला,

"कशी आहेस नेहा? आपण एकमेकांसमोर यायचं नाही अस आपल ठरलं होत पण आपली भेट झालीच...कस आहे न विचित्र आयुष्य?"

"मी ठीक.. तू सांग! आणि हो, आपण एकमेकांसमोर येणार नव्हतो पण नशिबापुढे आपल काही चालत नाही रे.. पुन्हा जुन्या खपल्या निघाल्याची जाणीव झाली मला.. ही भेट मला पुन्हा रक्तबंबाळ करणार.."

"मला सुद्धा तसच काही वाटतंय ग नेहा.. आपल प्रेम आपल्यापासून दूर गेल आणि पुन्हा नव्या रुपात समोर आल की कस वाटत.. हृदय पिळवटून गेल्यासारख!"

"कसा आहेस सांगितलं नाहीस अमोल? काय करतोस सध्या? संसार कसा चालूये?"

"मी पण ठीक ग.. आणि वेडे! मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करू शकलो असतो का? मी लग्न केलंच नाही..आणि सध्या आंनदी राहायचा प्रयत्न करतो. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही हे मला माहिती होत. कधी आयुष्य संपवायचा विचार सुद्धा आला. पण मी तसं काही केल नाही.. आणि मला माहिती होत,आपण लग्न केल असत तर मात्र तुला जीव गमवावा लागला असता. ते मला नको होत! आणि तुला समोर बघून छान वाटतंय!"

नेहा अमोलच बोलण ऐकत होती. आणि तिला अश्रू अनावर झाले आणि तिने अमोल ला मिठी मारली..अमोल ने तिला बाजूला सारल,

"काय करतीयेस नेहा? सय्यम ठेव भावनांवर!"

"मी काय करतीये? चुकीच तर काहीच नाही.."

"चुकीच आहे नेहा लग्न झाल्यावर मला मिठी मारण.." अमोल बोलत होता पण नेहाने अमोल च्या तोंडावर हात ठेवला आणि बोलायला लागली,

"काहीही चुकीच नाही रे अमोल.. आणि अमोल, आधी का नाही भेटलास? आयुष्यातली २ वर्ष वाया गेली नसती..आणि आयुष्य सुंदर झाल असत माझ..."

"कसा भेटणार नेहा? आपल ठरलं होत, लग्नानंतर एकमेकांना भेटणार नव्हतो ना? आणि नको अडकुस नेहा परत माझ्यात... तू तुझ्या संसारात सुखी राहा..मला तुझ्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम पाहायचे नव्हते त्यामुळे मी तुझ्यापासून लांब राहाण प्रेफर केल.. अर्थात माझ आयुष्य फार काही सुखकर नव्हत. सारखा तुझाच विचार.. वादळात अडकल्यासारख झाल होत मला.. आणि हे वादळ कधी शमेल ह्याची वाट पाहत होतो."

"काय बोलतोयस अमोल? कसला संसार आणि काय? तू मला नाही ओळखू शकलास.. तुझ्याशिवाय कोणीच नाही. मी पण लग्न केल नाही. आय नो, गिरीशने माझी साथ दिली आणि त्याने सुद्धा मला लग्नाला फोर्स नाही केल त्यामुळे तुझी नेहा तुझ्यासमोर जिवंत आहे. मी झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला आणि त्याला माझ म्हणण पटल आणि शेवटी त्यानेच माघार घेतली मंडपात.. मनाविरुद्ध लग्न करून मी जिवंत राहू शकलेच नसते रे.. आयुष्याची उलथापालथ झाली!"

"काय?" अमोल नेहाच बोलण ऐकत होता आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा नकळत पाणी आल. पण चेहरा मात्र आनंदाने भरून गेला होता.. आता दोघ एकही शब्द बोलणार नव्हते. दोघांचा संवद चालू राहणार होता पण तो फक्त डोळ्यातून!! आणि त्याक्षणी मात्र तो नेहा ला कवेत घेतल्याशिवाय राहणार नव्हता. आणि त्यानी नेहाला घट्ट मिठी मारली. तिला आय लव यु म्हणाला आणि परत नेहाला कवेत सामावून घेतलं!! समाधान दोघांच्या चेहऱ्यावर दिसायला लागल!! इतक्या विरहानंतर मात्र दोघ एकमेकांपासून दूर कधीच जाणार नव्हते. आणि त्यांची लव स्टोरी पुन्हा नव्याने चालू झाली..

A happy and new beginning after a storm!!!

अनुजा कुलकर्णी.

***

रेट करा आणि तुमची मतं मांडा.

Kanchan Mahajan 8 महिना पूर्वी

Swaranjali S Patil 8 महिना पूर्वी

Pallavi Maid 8 महिना पूर्वी

Vaish 8 महिना पूर्वी

Vasanti Uday Dhamal 8 महिना पूर्वी

chan