P palicha books and stories free download online pdf in Marathi

प पाळीचा

नवव्या वर्गात परिक्षा हाॅल मध्ये शेवटच्या पेपराच्या दिवशी आयुष्याचा सर्वात मोठा बदल अनुभवला. पुरवणी घेण्यासाठी उभी राहिले तशी मागच्या बाकावर बसलेली शुभांगी हळुच पुटपटली, अगं ए सोनल! मी समोर मॅडमच लक्ष कुठे आहे याचा अंदाज पाहून काय गं शुभांगी?
ती पुन्हा हळूच, अगं तुझ्या ड्रेस वर बघ लाल लाल डाग पडलाय. मी समोर मॅडम कडे पाहिले मग ड्रेस कडे पाहिले न् जोरात ओरडले, म्म्म्म्मॅडडमम्! हे पाहा शुभांगीने माझा ड्रेस खराब केला. शुभांगी घाबरत उभी राहिली. नाsssनाही मॅडम! मी काही केलेलं नाही. मॅडम जवळ आल्या. ड्रेसवर चा डाग बघून त्यांच्या गळ्यात अडकवलेला रुमाल माझ्या कंबरेला बांधून माझा पेपर जमा करून घेतला. वर्गात कुजबुज सुरू झाली. शुभांगीला खाली बसायला सांगून मॅडमनी मला जवळ घेतल. अगं वेडाबाई, तो तीने लावलेला डाग नाही. तो तुझ्या कडूनच लागला. जा घरी जा आणि काळजी घे. मला सुट्टी दिली. मी स्कूल बॅग उचलून घेणार तेवढ्यात समोरच्या बाकावर बसलेली मीराने विचारले,  काय गं? तुला नाही माहित तो डाग कसला आलाय? या अगोदर!!! मी माझे डोळे पुसत हुंदके देत नाही म्हटले तशी ती हसली आणि म्हटली की, तुझ्या आईने तुला नाही सांगितल का कधी? मी पुन्हा डोळे पुसत हुंदके देत नाही.... आणि शाळेच्या गेट वर आल्यावर मावशी म्हणाल्या, अगं लवकर जा घरी पुर्ण ड्रेस खराब होईल. तिथून जे धावले ते घरातच थांबले. हुंदके देत रागारागाने दुसरे कपडे घातले. आई जवळ आले. काय गं? का रडतेय? काय झाल?  आणि पेपर इतक्या लवकर कसा सुटला?? तिच्या प्रश्नांची बरसात अन् माझे रडू थांबण्याचे नाव घेत नव्हते. कसबस आईने मला शांत केले. मी आपली रडत ती शुभांगी आहे ना तीला मी आता कधीच बोलणार नाही. का गं? काय केल तीने? माझ्या कपड्यावर लाल शाही फेकली आणि मॅडमनी मला घरी पाठवलं तीला काहीच बोलल्या नाहीत. कट्टी सगळ्यांची!!
काय? लाल शाही!  नाही अगं तीने तुझ्या कपड्यावर शाही नाही फेकली. मग मग हे डाग कसले? अगं माझं वेडं बाळ, कधी शहाणपण येणार तुला! आईsss! ते तुझ्या पोटातून आलय गं. तुला सांगु? हे ना एक गुपीत आहे. जेव्हा आपण मोठ्ठ मोठ्ठ होत असतो ना तेव्हा आपल्या शरीरात बदल होतात ना! बघ बरं तु तुझे जुने फोटो किती बदल झालेला आहे ना! अगोदर तु किती लहान होतीस न् आता बघ बरं?  आपल्या पोटात ना आतडी असतात खूप सार्‍या हे माहितीये ना तुला? त्या आतडीची एक भिंत तुटते त्यामुळे शरीरात असलेल दुषित रक्त बाहेर पडत. आता हे प्रत्येक महिन्यात दर चार दिवस असच होईल. तेव्हा रडायचं नसतं. आणि हो पोट, पाया, डोक ही दुखते अशावेळी. अशक्तपणा ही येतो. त्वचा नाजूक होते.? आईssss!  मग माझ्या पोटातून पण?? हो गं....  आई, हे तुला पण होत? होs! आई हे बाबांना पण? गप गं, काहीतरीच. हे फक्त बायांच्या जातीला. पुरूषांना नाही.
का गं आई अस? कारण मुली शूर असतात त्यांना सहनशक्ती खूप जास्त असते. समजल??? आता तुझ जेवण, अंथरून, या कोपर्‍यातच बरं! तु घरभर फिरायच नाही चार दिवस, देवघरात जायचे नाही, कोणाला स्पर्श करायचा नाही, आज पासून तुझ खेळणं बंद. आईsss! ?? अगं रानी, मोठी झालीस आता तु. माझी जागा फिक्स करत आईने घरभर गोमूत्र सिंपडले. अभ्यास आणि घर इतकच. पाचव्या दिवशी डोक्यावरून अंघोळ घातली. चार दिवसाचे अंथरूनाचे कपडे धुवून घेतले. आणि माझ्या बौद्धिक वाढी पेक्षा शारीरिक वाढीचा सोहळा झाला. त्या दिवसानंतर मोठ्याने हसायचे नाही हं, धावायचे नाही. खेळायचे नाही. मुलांशी बोलायचे नाही. सातच्या आत घरात असे अनेक नियम अटी सह लागु केले.
हा माझ्या पहिल्या पाळीचा किस्सा. . ! 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED