का रे दुरावा Sonal Sunanda Shreedhar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

का रे दुरावा

घरी एकटी असल्याने जरा उशीराच उठले. फ्रेश होऊन गरमागरम काॅफी घेऊन मोबाईल उचलला. युट्यूब वर माझ फेवरेट साँग (मन शहारे काहूरे, दुर देशी मी चालले) प्ले करून काॅफी संपवली. मोबाईल चार्ज होईपर्यंत नाश्ता, घर स्वच्छता, अंघोळ सर्व किरकोळ कामे आवरून पुन्हा मोबाईल घेतला. जुने फोटो बघून हसु येत होते. फोटो, मॅडनेसवाल्या सेल्फीज पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.   त्यात त्याच्या सोबत घेतलेला फोटो समोर आला तसे डोळे भरून आले. पहिल्या भेटीपासून सर्व एक एक करून डोळ्यासमोर चित्रवाणी सुरू झाली. एक दिवस माझ्या पोस्ट्स वाचून मला मॅसेज केला होता त्याने ('तुम्हाला राग नका येऊ देऊ प्लीज, पण खरंच तुमच्या कविता वाचून मला तुमच्या वर प्रेम झालयं. माफ करा पण आपण भेटू शकतो का?') त्याचा मॅसेज बघून मी खूप हसले होते. कारण माझ्या कविता वाचून तो माझ्या लेखणीच्या प्रेमात पडला होता माझ्या प्रेमात नाही. धन्यवाद शिवाय मी दुसरा मॅसेज करायचं टाळलं. नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट्स वर त्याचे अभिप्राय येत होता. मी ही जाम खुश होते, कारण साहित्याची जाण असलेला रसिक वाचक भेटला होता. जवळजवळ महीना भरा नंतर त्याचा मॅसेज आला. Hi ma'am! How are you? तुम्ही संवेदनशील लेखन खुप सुंदर लिहिता. मी तुमच्या लेखणीचा खुप मोठ्ठा फॅन आहे. कोणी तुमच्या कामाबद्दल, छंदाबद्दल इतक्या गोड शब्दांची रास पुढ्यात ठेवत असेल तर नक्कीच तुम्ही आनंदाने मोहरून त्या कौतुकपावतीचा स्विकार कराल. आणि तसे ही एखाद्या लेखकाला, कवियत्रीला अजून काय हवयं? मी ही धन्यवादासोबत बाकी रिप्लाय केले. Hey, I'm fine, what about you? तुमच्या सारख्या रसिक वाचकांसाठीच तर आमची लेखणी धार धरते. हळुहळू आमचे मेसेजेस वाढत गेले. आता तर मी काही नवीन लेखन केल्या केल्या त्याला पाठवून द्यायचे. त्याला आवडले तर पोस्ट करायचे. कधी आम्ही जवळ आलो समजलेच नाही. आम्ही तुम्ही करून बोलणारे आम्ही कधी एकेरी नावाने उल्लेख करायला लागलो आठवत नाही. त्याने भेटायला बोलावले मी ही गेले. एकाच शहरात असल्याने काही ही समस्या नव्हती. पहिल्या भेटीत दोघेही एकमेकांच्या नजरा चोरत होतो. लाजून जीवाचं पाणी झालेल. आजही तो दिवस आठवला की चेहर्‍यावर गुलाबी रंग चढतो. हो, फोटोतल्या पेक्षा जास्त handsome दिसायचा तो. वीस मिनिटाच्या भेटीनंतर घरी आले. घरातील कामे आटोपून हातात मोबाईल घेतला data on केला. त्याचा whatsapp वर मॅसेज होता. Hey listen, I love you. माझ्या हृदयाचे ठोके जरा जास्त जोरात धडधडायला लागले. चेहर्‍यावर स्मित फुलले होते आणि प्रश्नांचे काहूर ही माजले होते मनात. काय रिप्लाय देऊ याला? धाडस करून मॅसेज टाईप केला I love you too. मग Backspace घेतला. अस कस होकार देऊ? मग टाईप केल, hello! आज आपली पहिलीच भेट होती ती ही वीस मिनिटांची त्यात कुठे प्रेम होतयं व्हयं? उगाच काही ही आपल! तसा त्याचा रिप्लाय प्रेम नाहीये का? मग भेटायला कशी काय आली? आणि लाजत का होतीस? मी ही Reply केला... Oye hero, गप्प!!! तोंड दिलय देवाने मग काही ही बोलत सुटायचे का?
त्याचा Reply मला ते काही एक माहिती नाही. मी, मला वेळ पाहिजे. अस कस होकार देऊ? मला खात्री तरी होऊ देत की, तुझ खरंच माझ्यावर प्रेम आहे. तो, अच्छा! तुला पाहिजे तितका वेळ घे पण आज रात्री दहा वाजेपर्यंत तुझा होकार कळवं. आणि तो ऑफलाईन. शीsss! बाई, असा कसा हट्ट तुझा. जा मी नाही देत होकार.  दिवसभर त्याचे मॅसेज वाचून वाचून नाचत होते, हसत होते, वेडी झाले होते. रात्री त्याचा काॅल आला मी कट केला. त्याने मॅसेज केला काय झाल? काॅल कट केला? असचं, माझी मर्जी, माझा मोबाईल आहे काॅल कट करेल नाही करणार. मला हवं ते करणार! तुला काय त्याचं. Oye नकटे, पुरे तुझे नखरे. मला तुझा आवाज ऐकायचा आहे काॅल receive कर. आत्ताच!  
तो:- hello,  anybody there?
मी:- nooo, nobody here!
तो:- मग काय तुझ भूत बोलतयं
मी:- ammmm ना! माझच भूत बोलतयं.
तो:- बरं तु काही सांगणार होतीस रात्रीचे दहा वाजण्या अगोदर... मी ऐकतोय.
मी:- काय? कधी? Sorry
त्याने रागाने काॅल कट केला. मी त्याला काॅलबॅक केला, मॅसेज केला पण एकाचा ही त्याने Reply केला नाही.
शेवटी voice मॅसेज पाठवला. Oye hero, किती रुसतो आत्तापासून. ऐक ना! I love you!
तसा त्याने reply केला I love you too.
माझी झोप उडाली होती. दिवसभर त्याच्या सोबत बोललेले आठवून आठवून हसायचे आणि त्याचे मॅसेज दहा दहा वेळा वाचून काढायचे. त्याच्या पोस्ट बघत बसायचे. झोपेतून उठल्यावर अगोदर मोबाईल शोधायचे. त्याच्या मॅसेजचे Reply करत करत कामे आवरून घ्यायचे. रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी बोलायचे. आमची भेट खूप कमी व्हायची. त्याच्या घरी ये-जा करण्यासाठी त्याच्या बहिणीशी मैत्री केली. त्याच्या आईबाबा सोबत ही चांगले संबंध जोडले गेले. आता त्याच्या घरी माझे नेहमीचे येणे-जाणे होऊ लागले.  त्याच्या परिवारासोबत नातेवाईक ही मला ओळखत होते.
बाहेर कुठे भेटायला जमायचे नाही.
म्हणून त्याच्या घरच्यांशी जवळीक केली. सर्व कसे सुरळीत सुरू होते. जवळपास वर्ष झाले होतं आमच्या प्रेम प्रकरणाला. एक दिवस काकूंचा काॅल आला. बाळा! अगं आम्ही गावी जातोय दोन दिवसासाठी तु घरी येऊन रोहित साठी दोन दिवस स्वयंपाक बनवून देशील का? काकु, आहो त्यात विचारताय काय? हक्काने सांगायचं. हो मी देईन बनवून जेवण आणि तसे ही फक्त दोन दिवसाची बात आहे. काकूंनी काॅल कट केला. माझी कामे आटोपून त्याच्या घरी गेले. बघते तर काय साहेबांनी सर्व किचन भरवून ठेवलेलं. घरभर कपडे, ओला टाॅवेल, वासाने बरबटलेले मोजे आणि पुस्तके पसरलेला टेबल, त्यावर चहाचा कप काळ्या मुंग्यासह. अरे काय हे? आज काकू घरी नाही तर कबाड़खाना करून ठेवलय घर. बाजूला हो. काय हवयं ते सांग मी शोधून देते.
त्याला बाजूला सारून कपाट व्यवस्थित लावून ठेवलं. मी घरातली कामेच आवरत होते तसा तो अंघोळ करून समोर आला. सर्व सामान जिथल्या तिथे व्यवस्थित बघून तो स्मित करत 'या घरची सून शोभते हो!' मी ही हलकेच हसले न् स्वयंपाक घरात आले. दुपारच्या जेवणाची तयारी केली. सर्व घर आता स्वच्छ आणि सुरेख दिसत होतं. आम्ही जेवण झाल्यावर गप्पा करत TV समोर बसलो होतो. त्याने हळु गालावर ओठ ठेवले न् thank you future wife. तशी मी लाजले. तो जरा जवळ येऊन बसला. माझ्या हृदयाचे ठोके धडधड करीत वाढले. त्याने हळूच हाताला स्पर्श केला. मी शहारले. त्याने हातात हात घेतला न् मला मिठी मारली. त्याच्या मिठीत गेल्यावर डोळे आपोआप ओंघळले. दोन मिनिटाची घट्ट मिठी सैल झाली. दोघेही भानावर आलो.
मी स्वतःला सावरत घरी जातेय म्हटल्यावर त्याने अगं थांब मी सोडतो तुला घरी तस ही ऑफिसला उशीरच झालाय. तुला घरी सोडतो न् तसाच ऑफिसला जातो. आज घरी जायला उशीर झाला तरी काही समस्या नाही.
त्याने मला घरी सोडून तो ऑफिसला गेला. त्याला मॅसेज करावा म्हणून मोबाईल घेतला तितक्यात त्याचा मॅसेज होता. जेवण छान होत. मला आवडेल रोज रोज तु बनवलेलं जेवायला. मी खूप खूप खुश होते. तितक्यात दारावरची बेल वाजली. डोळे पुसत चेहर्‍यावर खोटं हसु आणून दार उघडले.  आईबाबा, भाऊ सर्व जण घरी आले होते. कसा झाला प्रवास? अस तस विचारपूस करतच होते तेव्हा छोट्या भावाने ताई, उशी ओली कशी गं? आईचे ही प्रश्न! त्यांना कसे  आणि काय सांगणार होते मी. मला रडूच फुटले. मला एकटीला करमत नाही घरी तुम्ही कोणी घरी नव्हते ना म्हणून खूप रडू येत होत. आई ही रडायला लागली. बाबानी समजूत काढली. आणि कसबस स्वतःला सावरले. रात्री झोपताना त्याचे सर्व मॅसेज, फोटो डिलीट केले. त्याचा नंबर ही डिलीट केला. तरी ही त्याची आठवण येतच होती. पुन्हा पुन्हा तेच आठवत होतं... त्याच घर जे कधी माझ स्वप्न होतं, त्याचे आईबाबा ज्यांना मी माझ भविष्यात पाहिलं होतं, त्याची पहिली मिठी आणि. . . . .  आणि ते सजवलेल किचन, सोबत घालवलेले क्षण. त्याच्या तो मॅसेज आयुष्यभर तुझ्या हाताने बनवलेलं जेवण आवडेल. सर्व डोळ्यासमोर फिरत होतं. दुसर्‍या दिवशी जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा सर्वजण माझ कौतुक करत होते. काका काकूंनी माझे आभार मानले तेव्हा खूप चिडले होते मी. काय काकू अस कुठे असतं हे सर्व मी तुमच्या आभारासाठी नाही केलेलं हं. मी पुढे बोलणार तितक्यात माझ बोलणं थांबवून त्यांनी विचारलं 'सून होशील या घराची?'..... मी पार गोंधळून गेले होते. मनोमनी देवाचे धन्यवाद करत होते न् चोरट्या नजरेने त्याला बघत होते. त्याच्या आईबाबांना त्याने आमच्या बद्दल काही ही सांगितले नव्हते. काका काकूंनी स्वखुशीने मला सून म्हणून स्वीकारले होते. ते बोलणी करायला घरी येणार होते पण त्याने आईबाबांना जाॅब permanent झाल्यावर लग्न करायचय. सध्यातरी मी लग्नासाठी तयार नाही.  मी ही काही घाई नाही म्हणून सांगितले. पुढे माझ येणे-जाणे जरा कमी होत गेले. त्याचा मोबाईल सतत कवरेज क्षेत्रा बाहेर यायचा. आजच्या मॅसेज चे Reply उद्या, परवा असे यायला लागले. मी खूप मागे लागले त्याच्या पण तो सतत कामात व्यस्त असायचा. त्यानेच रंग भरले होते माझ्या आयुष्यात. तोच तर प्रेम कसे असते शिकवत होता. अचानक असे काय वाटले असेल त्याला? प्रत्येक क्षणाला I love you म्हण ना ! असा हट्ट धरून बसणारा अचानक का दुरावा करून गेला? काही कळायला मार्ग नाही. सहा महिने झाले होते. दिवाळी च्या शुभेच्छा देताना सहज काकूंनी काॅल केला मी खूप खुश झाले. घरी गेले. काकाच्या पाया पडले काकूंच्या पाया पडणार तशी त्यांनी मिठी मारली. काय सूनबाई, सहा महिने झाले भेट नाही. कुठे आहेस? देवाची कृपा आज तुझा काॅल लागला. रोज काॅल करते मॅसेज करते एक रिंग जाते न् व्यस्त येतो. सासूवर नाराज आहेस? त्यांनी गंमतीने विचारले. मी हसले आणि हसता हसता अश्रू अनावर झाले. काय गं? खराब झालीस?  कसलं टेन्शन घेतलयं का? बोलत ही नाहीस. काकूंचे प्रश्न मध्ये च थांबवून काका बोलले ही मला धाकात ठेवतेच ठेवते आता होणाऱ्या सुनेवर ही प्रश्नांचे डोंगर!
मग आम्ही तिघे ही हसलो.
काकू, माझं त्यांच्या वर खूप प्रेम आहे. मनोमनी नवरा मानते मी त्यांना पण जेव्हा तुम्ही माझ्या घरी बोलणी करणार होत्या तेव्हा पासून त्यांनी बोलणंच सोडलय माझ्याशी. मी खूप प्रयत्न केला पण..... आणि कंठ दाटून आला. मी रडायला लागले. तशीच मी माझ्या घराकडे धाव घेतली. या घटनेला सात वर्षे झालीत. सर्व काही बदलत आहे. बदललेल आहे. मी मात्र तशीच. रोज ठरवते get up sweetheart, grow up, बास्स झालं आता move on... सर्व आयुष्य पडलयं.  जगायला शिक. पण नाही! मन अजून ही तिथेच गुंतलयं. त्याची वाट पाहत दिवस काळा होतो. डोळे मिटले तरी अश्रूंनी  पदर ओला होतो.
 काय चुकले असेल माझे? का सोडून गेला असेल तो? का? का? आणि का? यातच रोज होरपळून निघतेय. 
सावरण्याचा प्रत्येक प्रयत्न वायफळ ठरतोय.