प्रवास. Sonal Sunanda Shreedhar द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रवास.

त्याला ना पाऊस भारीच आवडायचा. पाऊस आला की त्याची भटकंती सुरू व्हायची. सगळी कामे सोडून तो भटकंतीला निघायचा. कॅमेरा, एक बॅग, आणि त्याची डॅशिंग डार्लिंग सायकल... उफ्फ! उफ्फ! उफ्फ! पावसाळलेल्या रस्त्यावर वाफाळलेली काॅफी घेऊन भटकंतीचा श्रीगणेशा व्हायचा. पावसात चिंब भिजत फोटोग्राफी करत इकडे तिकडे भटकायचं, चेहर्‍यावर पावसाचे थेंब थेंब कसे स्पर्शून जातात यावर तो एकाग्र व्हायचा. धुंद होऊन पावसाच्या थेंबा थेंबाला छेलायचा, अनुभवायचा आणि फोटो फोटो फोटो.... पण कोणाला ही जास्त बोलायचा नाही. एकटा एकटा राहायचा. मीत्र कधी बनले नाही. बनले नाही काय? त्याने मीत्र बनवलेच नाही. एक्कलकोंडा होता तो. असेच पावसाळ्याचे दिवस होते. योगायोगाने  काॅलेजला चार दिवसांची सुट्टी ही. आभाळ भरून आले होते, वारा बेभान होऊन वाहत होता. सगळी कडे तुफानी वातावरण होते. जुनी गाणी ऐकत असताना मनात सहज विचार डोकावला, चार दिवस सुट्टी आहे. या सुट्टीत नव तुफान अनुभवायला मिळाले तर!!! तितक्या किचन मधुन आईचा आवाज आला, मयंक चार दिवस सुट्टी आहेच तर म्हणते ताई कडे जाऊन येऊ. भेट ही होईल अन् वातावरण ही बदलता येईल. चालेल आई, उद्या निघुयात. ताईच्या भेटीला जाण्यापेक्षा ताईच्या शहराची ओढ होती मयंकला. शहर ही ओढ लावणारचं......
 "पाचगणी"! 
उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लँड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. मयंक आणि आई सकाळी सर्व तयारी करून पाचगणीला ताईच्या भेटीला निघाले. ट्रेन मधुन सुसाट पळणारा वारा, त्यावर डोलणारी झाडे, आणि तो रस्ता सर्व दृष्ये  कॅमेर्‍यात टिपत मन शांत झाल होत. ताईची भेट घेतली, चहापाणी झाली. संध्याकाळी मी जरा फिरून येतो आई.  अस्स बोलुन मयंक भटकंतीला निघणार तितक्यात भाऊ जी ही सोबत यायला तयार होते. दोघेही गप्पा करत करत भटकंती करत होते. मयंक फोटो टिपत होता कधी कुतूहलाने पाहत होता. हा नवा अनुभव त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. भाऊजी आता फक्त भाऊजी नव्हते आता त्यांची चांगली मैत्री झाली होती. सार्‍या जगाची भ्रमंती हे मयंकच स्वप्न होत. पाचगणी, ताईचं सासर, निसर्गप्रधान शहर, चार दिवसांची सुट्टी अन् भाऊजी सारखा मीत्र! त्या चार दिवसात मयंकला "King of the world" काय ते अनुभवायला मिळाल होत. मयंक आणि आई सुट्टीनंतर घरी आले. वातावरण स्वच्छ झाल होतं, मुलीचा संसार पाहून आई मनोमनी देवाचे आभार मानत होती. सगळी कडे आनंद उसळून वाहत होता. मयंकला ही त्याचा नवा आत्मविश्वास मिळाला होता. एकही मीत्र नसलेला मयंकला ही मैत्री करता येते हे माहित झाले होते. त्याचा शांत स्वभावात आता नवा छंद जन्म घेत होता तो म्हणजे 'व्यक्त होण्याचा, मैत्री करण्याचा!' 



मैत्री, छंद, आणि आपल्याला आवडणारी गोष्ट आपण जपली पााहिजे, जोपसली पाहिजे. 
आजकाल आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की
जगायचे विसरतो. शिक्षण, नोकरी, संसार हे सर्व 
करताना मागे वळून पाहिले तर म्हातारपण आलेेल
असत. तेव्हा कळत माझ्या कडे सर्व काही आहेे फक्त
वय मात्र हरवलं.


 आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो की आयुष्य म्हणजे काय?  आणि आयुष्य किती सुंदर असत हे कळायला लागतं.
आपण स्वतःला ओळखायला लागतो. स्वतःहा बरोबर इतरांच्या ही मनात आपली जागा निर्माण करू शकतो. 
आत्मविश्वासाने आयुुुष्य आणखी सुुंदर बनवू शकतो. काही अनुभव आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे ही असतात.

चला आज तरी जगून पाहु मुक्तपणे. 
Have a nice day!