अरेंज मॅरेज Sonal Sunanda Shreedhar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अरेंज मॅरेज

आम्ही दोघे ही खूप वेगळे होतो एकमेकांपासून. अगदी मी पुर्व तर ती पश्चिम पण मला आवडली होती गीतांजली. मी घराकडे निघालो तसा प्रश्नांचा भडिमार मनात गोंधळ घालत होता. तीला मी आवडलो असेल का? गीतांजली ही होकार देईल ना! "सकारात्मक विचार कर विजय, आपण जसा विचार करतो न् अगदी तसच घडत असत आपल्या आयुष्यात मी माझ्या मनाची समजूत काढत होतो." तिचे बोलणे आठवून आठवून चेहर्‍यावर गोड हसू उमटत होतं. आईने थट्टा करत विचारले, काय मग विजयराव? बसणार का बोहल्यावर? ? आईssss!!! माझा होकार आहे. गीतांजलीच काय म्हणण आहे ते विचारुन घे तु....
तीचा ही होकार आहे विजू तिच्या आईबाबांनी बोलावलंय पुढची बोलणी करायला आम्ही तुझ्या होकाराची वाट पाहत होतो. 
आईने देवाचे आभार मानले आणि देवापुढे काहीतरी पुटपुटत हात जोडले. कुंडली जुळवून साखरपुड्याची तयारी सुरू झाली होती. पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. गीतांजली अगदी मराठमोळ्या रुपात नटली होती. माझी नजर तिच्या वरून हटत नव्हती. साखरपुडा उरकला. दुसर्‍या दिवशी पहाटे मी साखरपुडा फोटो पाहताना असताना गीतांजलीचा मॅसेज आला. आपले फोटो हवे आहेत, मिळतील का? मी जरा मस्करीत हो मिळतील की! पण किंमत द्यावी लागेल. ?Okk चालेल! किती पैसे??? ?छे! पैसे? पैसे नको. काॅफी घेऊयात म्हणतो होणाऱ्या बायकोसोबत. मग बराच वेळ तीचा मॅसेज नाही आला. मी बँकेत जायला तयार झालो. तितक्यात तिचा रिप्लाय आला. . .  चालेल. बँकेतून सुटल्यावर भेटू. संध्याकाळ मस्त होती आजची. तीला घरी सोडून मी माझ्या घरी आलो. घरात वातावरण मस्त होत. लग्नाच घर म्हटल्यावर वातावरण मस्त च असणार. नाही का? 
 पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख पक्की झाली. खरेदी, लग्नाची तयारी, पत्रिका वाटप, मित्र मंडळी, सजावट, आईबाबांच्या चेहर्‍यावर आनंद सर्व एखाद्या चित्रपटासारख भासत होतं. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या पाहुण्यांच्या गप्पा, दिवसभर मस्ती करून थकलेले चिमुकले पाहुणे पाहून आमच्या पुढच्या आयुष्यासाठी बक्कळ शुभेच्छा, आशिर्वाद देण्यासाठी आलेले हे सर्व माझ्या मनाला सुखावून जाणारा एक स्वप्नाळू प्रवास वाटत होता. लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे उत्सुकता, आनंद, नाचगान सुरू होते. लग्न लागले, पाठवणी च्या घटकाला माझे ही डोळे पाणावले होते. घरी आल्यावर आमचे स्वागत झाले. देवदर्शन, मांडवपरतणी नंतर मग सुरू झाला संसाराचा गाडा. गीतांजलीला सर्वांना आपलस करायला जास्त वेळ नाही लागला. हळुहळू पाहुणे आपापल्या मार्गाने लागली. आईबाबा गावी गेले. अधुन मधुन येत असतात भेटी साठी. चिन्मयला मी आमच्या जवळ राहून शिक्षण पूर्ण करायला सुचवलं गीतांजलीने ही समंजसपणा दाखवला. तिच्या सवयीप्रमाणे दवाखाना आणि घर छान सांभाळून घेतल. माझी बायको माझी चांगली मैत्रीण आहे, चिन्मय सोबत ती वहिनी पेक्षा मोठ्या बहिणी सारखी वाटते. आईबाबांची पहिली सुन मनासारखी आलीय म्हणून आनंदी आहेत. डाॅक्टर बायको घरात ही डाॅक्टर सारखीच वागते हं...... खाण्यापिण्यापासून झोपेच्या सवयी पर्यंत rules and regulations follow कराव लागत. ??? हेहे डाॅक्टर बायको कडे प्रत्येक गोष्टीवर औषध असते. हो पण प्रेमळ आहे हो माझी बायको. आणि जबाबदार ही तसे पाहता अशी शक्ती फक्त बायकांजवळ असते. घरातली कामे,  लहानमोठ्या ची मने जपणं, करिअर सर्व सर्व व्यवस्थित सांभाळणे. प्रत्येकाच्या मनात जोडीदाराच्या त्यांच्या स्वप्नानुसार कल्पकता असते. माझ्या मनात ही होती.
असो.....
आमच मस्त चाललय. 

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपल्या नेहमीच्या आयुष्यात नेहमीच दुखाचे सावट असावे असे कोणाला ही वाटत नाही. ही कथा वास्तविक पाहता सकारात्मक विचार करून लिहिली आहे. माझ्या मते, आज ही आपली कुटुंब संस्था ही अरेंज मॅरेज वर टिकून आहे. 
ही कथा काल्पनिक आहे. कथा वाचून नक्की कळवा कथा कशी आहे. कथेविषयी काही सुधारणा असतील त्याही कळवा.