बँकेतून निघालो, पार्किंग मध्ये गेलो नजर भर बाईक कडे बघितलं. काय दिमाखात उभी होती माझी वाट पहात. गालातल्या गालात हसलो आणि बाईक स्टार्ट केली. तितक्यात आईसाहेबांचा काॅल थोड्या वेळाने काॅल करतो म्हणत काॅल काटला. घरी पोहचलो तितक्यात आईचा काॅल?. आई पाच मिनिट थांब मी करतो अग काॅलबॅक, मी काॅल कट करणार तितक्यात आई रागाने बोलाली सकाळी ही तसच अन् आत्ता ही तसच! काॅलबॅक करतो. अस म्हणत आईने काॅल कट केला. मी घराचा दरवाजा उघडला आत गेलो हेल्मेट, मोबाईल टेबल वर ठेवून फ्रेश झालो. गरमागरम काॅफी घेऊन मोबाईल उचलला. बघतो तर काय ???? 37 मेसेजेस आणि 59 काॅलस्?? आईचेच होते. काॅफीचा कप टेबलावर ठेवला न् पहिले आईला काॅल केला. "हॅलो आई! अग तब्येत बरी नाहीये का? काही झालय का? आई, बाबा आणि चिन्मय तर ठीक आहेत ना?" गप्प! श्वास घे अन् शांत हो. किती काॅल केले सकाळ पासून एक तरी काॅल घ्यायचा ना. आणि किती प्रश्न विचारतोस....मी आईच बोलण मध्येच थांबवत, आई काय झालयं? इतके काॅल, मॅसेज??? अरे हा, तुझ्यासाठी मागण आलयं मुलगी डाॅक्टर आहे म्हणे अन् ती ही तुझ्या बँकेच्या आसपासच भेटून घे म्हणत होते. भेटून ठरवा आपसात मग घरी कळव. तिचा पत्ता, मोबाईल नंबर पाठवलाय चेक करशील! आई बोलत होती न् मी ऐकत होतो." आईने बोलून झाल्यावर काॅल कट केला. मी शांत होतो, मनात तस काहीच नव्हतं कारण दिवसभर कामाचा व्यापाने थकलो होतोच.
काॅफी ही थंडावली होती. ती तशीच फेकली फ्रिज मधून आईस्क्रीम घेतली खाल्ली अन् तसाच झोपलो. दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजेच्या सुमारास डोळा उघडला. मस्त झोप झाली होती पण भूक खूप लागली होती. फ्रेश झालो, पोहे बनवले बेडवर येऊन बसलो. एका हातात मोबाईल, एका हातात चमचा अन् लक्ष कधी खाण्यात तर कधी मोबाईल मध्ये. इनबॉक्स मध्ये आईचे 37 मेसेजेस होते. मुलीच नाव गीतांजली आहे, तीचा पत्ता, मोबाईल नंबर आणि अजून काहीसे होते त्यात. गीतांजली! सुंदर नाव आहे. तस ही लग्न कधी ना कधी करावच लागत आणि लग्नाच वय ही झालय अस मनातच विचार सुरू होता. हरवलो ही होतो मी लग्नासाठी मुलीकडून मागणी! माझ्यासाठी!! तसही शनिवार असल्याने मला सुट्टी होतीच. मी तीला भेटणार म्हणून आईला कळवलं. मी तयारी करत होतो तितक्यात घराची बेल वाजली. एक मिनिटsss!!! आता कोण आल असेल? मी दरवाजा कडे जाताना घड्याळात बघितलं, सकाळचे आठ वाजले होते. दरवाजा उघडला तर समोर आईबाबा उभे होते. मी आश्चर्यचकित झालो होतो. काल काॅल करून करून थकलेली आई सकाळी सकाळी इथे आणि ते ही नकळवता? तसा मी खूप खुश होतो पण उगाच आईला चिडवायला भारी मज्जा येते! तीचा लटका राग अन् ते रुसवे कसे मला बांधून ठेवतात आणि ते आई-मुलाच नातं अजून ही लडिवाळ वाटतं. आल्यावर घरभर नजर फिरवली. अरे कसा राहतोस? ओला टॉवेल बेड वर ठेवायचा नसतो विजू! किती वेळा सांगीतल्यावर ही लक्षात येत नाही आजकालच्या मुलांच्या. आईची रागवारागव सुरूच होती. (कधी काॅफीचा कप, कधी बेडवर सांडलेले पोहे, तो ओला टॉवेल आणि कालचे तिचे काॅल अन् मॅसेज!!!) मुलगी मला बघण्याअगोदर आईबाबांना भेटायची म्हटली म्हणून ते इथे सकाळीच हजर झाले हे बाबांनी मला सांगितले. तसा लग्नाच्या विचार हातभर दुर असताना ही गीतांजलीचा आईबाबांना भेटण्याची इच्छा म्हणजे माझ्या मनाचा दरवाजा ठोठावल्या सारख वाटलं. आईबाबा मुलगी बघायला गेले होते. ???पहिल्यांदा मी लग्नासाठी नाही म्हटलो नाही. मनोमनी खूप खूश होतो, खूप खूप! आईबाबा घरी आले तेव्हा त्यांनी काय झाल काय नाही काही बोलालेच नाही.... मग मीच इकडच्या तिकडच्या गप्पा काढल्या, आणि गोल गोल फिरत विषयाकडे वळलो. आईने बाबा कडे पाहिले मग माझ्याकडे न् आईबाबा दोघेही खूप हसले. (मी ही न राहून लाजत हसलो न् बोललो!) नका सांगू तस ही गीतांजली डाॅक्टर आहे न् मी एक बँक मॅनेजर. खूप अंतर आहे आमच्यात, तसही तीला माझ्यात काही इंटरेस्ट नसेल म्हणून तर तुम्हाला बोलावलं तीने; मला नाही. आई म्हणाली, विजू , मुलगी खूप सुंदर आहे. आम्हाला पसंत आहे आणि तीच्या आईबाबांना ही तु पसंत आहे त्यासर्वांना त्यांनी होकार कळवलाय.
मला पुन्हा धक्का बसला.... ??? अरे आईsss!!!!! अस कस होऊ शकतं? मी तीला पाहिलं नाही, तिने मला पाहिलं नाही. तुम्ही सर्व एकमेकांना भेटलात मात्र मी अजून ही कोणाला भेटलो नाहीये ना ते कोणी मला भेटले... मग? आई बाबा दोघेही माझ्यावर हसत होते. अच्छा ऐक विजू , उद्या तु भेटून घे सर्वांना. चालेल बाबा पण तुम्ही का हसताय. आई पुन्हा माझा कान पिळवून बाबांना म्हटली, बघा कसा एकापायावर तयार झाला लग्नाला आणि तुम्ही आपले उगाच टेन्शन घेत होते. रात्री आईच्या हातचं जेवण खूप दिवसानंतर झाल होतं. गरजे पेक्षा जास्त खाऊन घेतल्याने झोप ही लवकरच लागली होती. आज रविवार! आज बँकेला सुट्टी! झोपेतून उठल्यावर ईकडे तिकडे पाहिलं मला दुसर्याच्या घरात असल्याचा भास झाला. आई पण ना! काम काम काम!!! थकत कसी नाही. सकाळी सकाळी सर्व नवनव भासत होतं. बेडवर पडल्या पडल्या मोबाईल घेतला, मॅसेज होता नवीन नंबर होता. Hello! Geetanjali here.?
Can we meet today?? If you don't mind so text me and come at 9:00 a.m sharp in city hospital. I'll send you correct location on what's app.
मी जरा गोंधळलो. 8:30 वाजले तरी मी बेडवरच होतो न् ही बाई दवाखान्यात हजर? तिच्या मॅसेज चा Reply ही करायचा होता. Okkk टाईप करून पुन्हा backspace घेतला. फक्त okk! कस वाटेल तीला? Hey Geetanjali, yes of course! we will meet today. See you soon. Have a nice day! इतका मॅसेज टाईप केला पण काही तरीच? पुन्हा backspace घेतला. तीला काॅल करून सांगतो विचार केला पण तीही काॅल करून सांगू शकली असती ना? तीने तरीही टेक्स्ट केला. आता 8:45 झाले होते. बापरे! 8:45??. मी घाईघाईत आवरलं. 9:5 झाले होते. मी तीला काॅल केला. "Hello! गीता, विजय बोलतोय. दहा मिनिटे उशीर होईल. I know तु समजून घेशील.
Okk चालेल अरे. Btw मी गीतांजली आहे, गीता नाही. Ohh sorry. भेटूयात लवकर!" काॅल कट झाला. आईबाबाना सांगून मी बाईक स्टार्ट केली न् city hospital कडे निघालो. Hospital मध्ये आल्यावर तिला काॅल केला. ती समोरच होती. तीने तोंडावरचं मास्क काढलं अन् आम्ही एकमेकांना परिचय देत कॅन्टीन मध्ये गेलो. आम्ही दोघेही खूप वेगळे होतो.