१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३ Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३

१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३

२. मनाली-

मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर. मनाली पर्यटकांच आवडत हील स्टेशन आहे. लोकसंख्या 2,254 (1981). हे सिमल्याच्या उत्तरेस सुमारे 250 कि.मी. समुद्रसपाटीपासून 1,798 मी. उंचीवर वसलेले आहे. हिमाचल हे राज्यच मुळी निसर्गाने अतिशय समृद्ध राज्य आहे. कोंदणात हिरा बसवावा तसे मनाली हे नितांतसुंदर पर्यटनस्थळ. हिमाचलमधील ही सर्वात सुपीक व्हॅली समजली जाते. अतिशय सुंदर असा हा प्रदेश आहे. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा.. त्याचबरोबर, ‘ट्रेकर्स पॅराडाईझ’ म्हणून ओळखल्या जाणा-या मनालीहून १२ कि.मी. वरील कोठी हे निसर्गरम्य गाव म्हणजे रोहतांग पासमधील ब-याचशा ट्रेक्सचं सुरुवातीचं ठिकाण. ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांच अतिशय आवडत ठिकाण.. मनाली मध्ये गेल्यावर जंगली फुलांचा सुगंध मन प्रसन्न करतो. मनाली वरून बर्फाच्छादित शिखरे आणि ब्यास नदीच दर्शन होत तर दुसऱ्या बाजूला देवदार, पाईनचे वृक्ष, शेत जमीन आणि फळबागांच दर्शन होत. मनालीपासून ५१ कि.मी. वर ३९७८ मीटर्स उंचीवरील रोहतांग पास म्हणजे लडाखमधील लाहुल भागाचं प्रवेशद्वारच.. इथल मनोहारी दृश्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. त्याच्या जवळच असलेलं ‘बियास कुंड’ म्हणजे बियास नदीचं उगमस्थान. मनालीच्या आसपास अनेक अजिंक्य अशी शिखरं आहेत. मनालीची माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट पदभ्रमण/पर्वतारोहण मोहिमांसाठी साहित्य, शेरपा, मार्गदर्शक इत्यादींचा पुरवठा करते. घनदाट जंगले, वेगाने वाहणार्‍या नद्या, हिमाच्छादित पर्वतशिखरे, सुंदर बाजार, खाण्यापिण्याची अगदी चंगळ आणि वास्तव्यासाठी सुंदर हॉटेल्स, साहसी क्रीडा प्रकारांची सोय असे पर्यटकांना जे जे हवे ते पुरविणारे मनाली कोणत्याही हंगामात जाण्यासाठी अतिशय योग्य असे स्थळ आहे. पर्यटक इथे येऊन नवीन उर्जा घेऊन जातो. पर्यटकांचे लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही त्याची ख्याती. प्रत्यक्षातले गांव अगदी छोटे असले तरी हिमालयातील अनेक ट्रेकसाठीचा हा बेस कॅम्प आहे. येथे गेलात की क्लब हाऊसची भेट अजिबात चुकवायची नाही हे लक्षात ठेवण गरजेच आहे. येथे टेबलटेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश, स्केटिंग, बोटिंग अशा विविध क्रीडाप्रकारांचा आनंद आपण घेऊ शकतो व त्यामुळे तरूणांतही मनाली फेव्हरिट डेस्टीनेशन आहे. मनाप्रमाणे हवा तो गेम शोधून त्याचा पुरेपूर आनंद इथे घेता येतो. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. महाभारतकार व्यासांची तपोभूमी, तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्यस्थान म्हणून मनाली भोवती अनेक पौराणिक आख्यायिका, गुंफलेल्या आढळतात. येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. इथले हिडींबा मंदिर किंवा डुंगरी मंदिर फार प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलातील नैसर्गिक गुहेत हिडींबेच्या पायाचा ठसा दगडात उठला आहे. ही हिडींबा राक्षसी होती आणि तिने पांडवांतील तिसरा पांडव भीम याच्याशी लग्न केले होते अशी आख्यायिका आहे. मंदिराची रचना पॅगोडाटाइप असून हे मंदिर १६ व्या शतकातले आहे. मंदिराच्या दरवाज्यावर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. १९६० सालात बांधलेल्या नव्या मॉनेन्स्त्रीलाही भेट द्यायलाच हवी. हे बौद्धमंदिर हिमाचलमधील लाहौल स्पिती, किनौर, लडाख, नेपाळ आणि तिबेटमधील बौद्ध लोंकांचे श्रद्धास्थान आहे. येथील भितींवरची पेंटींग, चॉर्टन्स, आणि गौतमबुद्धाची महाप्रचंड मूर्ती पाहण्यासारखी.मनालीपासून 3 कि.मी. वर वसिष्ठ कुंड असून गंधकयुक्त गरम पाण्यासाठी ते प्रसिध्द आहे. वसिष्ठ ऋषींनी तेथेच तप केल्याचे सांगितले जाते. हिमालयातील एक पुण्यक्षेत्र म्हणूनही ते विख्यात आहे. जगातील एक उंच रस्ता मनाली येथून निघून लडाखमधील लेह येथे जातो. इथे अंदाजे २५ लाख पर्यटक वर्षाला भेट देतात. म्हणजेच पर्यटकांचे अत्यंत आवडीचे असे हे ठिकाण आहे. मनाली मध्ये सोलांग व्हॅली ला सगळ्यात जास्ती पर्यटक भेट देतात. मनोरम्य दृश्य इथे पाहायला मिळतात आणि ही जागा स्कीईंग साठी पर्यटकांची आवडती जागा आहे. निसर्ग प्रेमींना रोहतांग पास ही जागा नेहमीच खुणावत असते. मनाली पासून लद्दाख रोडवर पाच-सात किलोमिटर दूरवर असलेले ठिकाण.... एकदम सुंदर...ज्याबद्दल तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही असा निसर्ग पाहावयास मिळतो. येथे तुम्हाला असे वाटते की आपण बर्फाच्या समुद्रात उभे आहोत... अत्यंत सुंदर... मनाली जावे तर रोहतांग पास जरूर पहावा. येथे वर्ष भर बर्फ जमलेलेच असते... त्यामुळे कधी ही जा...! तसेच मनाली पासून दर्या पर्यंत चालतच जावे लागते खेचर/घोडी मिळतात पण चालत जाण्याची मजा काही औरच असते. निसर्ग न्ह्याहालात चालण्यात अधिकच मजा येते. ह्या मार्गात जो आनंद मिळतो तो कुठेच मिळणार नाही.... मनाली रोहतांग पास रोडवर असलेले नेहरू कुंडही पाहण्यासारखे. त्याच्यावर असलेले भृगू लेक ट्रेकर्ससाठी आवडते ठिकाण... ४२७० मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. सुंदर दरी, हिमशिखरे, देवदारची उंचच उंच झाडे आणि साहसी क्रीडा प्रकार जेथे होतात ते सोलंग नल्लाही भेट द्यायला अतिशय उत्तम आहे. येथे हिवाळ्यात राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा होतात. याच मार्गावर कोठी ही सुंदर दरी आहे. बियास नदीचा उगम येथे आहे. खोल दरीतून ही नदी वाहते. मनालीची भेट रोहतांग पासला गेल्याशिवाय अपूर्णच म्हणावी लागेल. त्यामुळे इथे आवर्जून भेट देण गरजेच आहे. सुमारे ५१ किमीचा हा रस्ता आपल्याला थेट ३९७० मीटर उंचीवर घेऊन जातो. प्रत्येक वर्षी २० सप्टेंबरला मनालीतील सर्व ग्रामस्थ दशीर लेक येथे पवित्र स्थानासाठी जातात. या काळात येथे यात्रा भरतात.

मनालीतील सर्व पर्यटनस्थळे बघून झाली की निवांतपणे बघायचा तेथला बाजार. खरेदी आपल्या सगळ्यांना आवडते आणि हिमाचल मध्ये हस्तकलेच्या खास हिमाचलच्या वस्तू, तसेच अन्य राज्यातील हस्तकलेच्या वस्तूही मिळतात. शाली, स्वेटर्स, जर्किन, टोप्या, लाकडी कोरीवकामाच्या वस्तू ,रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, चांदीचे दागिने असे वेग्व्गेले पर्याय इथे आहेत. आणि खरेदीचा मोह आवरता येणार नाही त्यामुळे तिबेटी मार्केटला भेट द्यायलाच हवी. येथे चाकू सुर्‍यांपासून ब्लँकेटस पर्यंत सारे कांही मिळते. बार्गेनिंग ची आवड असणाऱ्या लोकांना त्याची सुद्धा मजा येते घेता येते. खरेदी बरोबर, मनालीत खाण्याजेवण्यासाठीही चांगली व्यवस्था आहेच. पण येथे अगदी दाक्षिणात्य इडली डोसा सुद्धा मिळतो. खवय्यांसाठी इथे खाण्याची कमतरता नाही. राहण्यासाठी सुद्ध अनेक सुंदर पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या बजेट प्रमाणे हॉटेल्स तुम्हाला मिळू शकतात. स्वस्तापासून अगदी महाग हॉटेल्सपर्यंत सार्‍या सोयी आहेत. आणि चॉईसही खूप आहे. मात्र गर्दीच्या काळात जाणार असाल तर बुकींग करून जाणे केव्हाही श्रेयकर म्हणजे आयत्यावेळी धावपळ होणार नाही.

३. धरमशाला-

धर्मशाळा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याही दुसरी हिवाळी राजधानी असलेले एक शहर आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ही जागा नेहमीच पसंतीस उतरत. हे शहर कांग्रा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर चौदावे दलाई लामा यांचे निवासस्थान आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा ला हजारो पर्यटक भेट देतात. धरमशालाच्या आसपास बरीच ठिकाण आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो-

१. धौलाधरच्या हिमशिखर डोंगर उतरणीवरील गर्द पाइन्सच्या गालिचात दडलेलं धरमशाला पठाणकोटहून सुमारे ९० कि.मी. वर येतं. मनालीहून धरमशालेला (१० कि.मी.) जाणारी थेट बस असली, तरी या थोडया दगदगीच्या प्रवासाला सुमारे १२ तास लागतात. पण हा प्रवास नक्कीच अप्रतिम असतो.

२. सध्या धरमशाला आपल्याला जास्त परिचित झालंय ते चिनी आक्रमणामुळे तिबेटमधून हद्दपार केले गेलेले दलाई लामा यांच्या वास्तव्यामुळे. ही ह्या जागेची खासियत आहे. या जुळ्या गावच्या ब्रिटीशकालीन खुणा असलेल्या मॅकलिऑडगंज या वरच्या भागातील (अप्पर टाउन) बौद्ध विहाराशेजारीच दलाई लामांचं निवासस्थान आहे. तिबेटी अभ्यास केंद्र असलेल्या या भागातील तिबेटीयन इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस आणि तिब्बेटियन हँडीक्राफ्ट सेंटर आहेत. मॅकलिऑड गंजवरून खालच्या धरमशाला गावचं सुरेख विहंगम दृष्य दिसतं. ते अजिबात चुकवू नये असच आहे.

३. धरमशाला क्रिकेट स्टेडीयम हे पर्यटकांच खास आकर्षण आहे. समुद्रापासून १४५७ मीटर उंचीवर असलेले हे स्टेडीयम जगताल सगळ्यात उंचीवरच स्टेडीयम आहे. ह्या स्टेडीयम ची खासियत ही आहे की इथे मैदानाच्या बाजूला बसायची व्यवस्था असते तिथे कुंपण नाहीये. इथे २३००० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे. जेव्हा मॅच चालू नसतात तेव्हा पर्यटकांना इथे भेट देता येते. त्यामुळे शक्य असल्यास इथे भेट देऊन मजा अनुभवता येऊ शकते.

४. भारताच्या विविध स्वातंत्र्यलढ्यात कामी आलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘धरमशाळा वॉर मेमोरियल’ बांधण्यात आलं. याशिवाय दल आणि कारेरी लेक्स, छोटा पण सुंदर प्रपात व पाण्याचा झरा असलेलं भागसूनाचं पुरातन मंदिर, चामुंडादेवी मंदिर, नटवाणी येथील गरम पाण्याचे झरे, धौलाधरच्या पायथ्याच्या दाट जंगलातील रम्य त्रिऊंड-या धरमशालेच्या आसमंतातील काही भेट देण्याच्या जागा. जिथे भेट देऊन आपण मस्त अनुभव घेऊ शकतो. धरमशाळेजवळच (१० कि.मी.) स्वामी चिन्मयानंद यांनी स्थापलेला चिन्मय तपोवन हा निसर्गरम्य आधुनिक आश्रम आहे. त्यांची समाधी येथेच आहे. आणि इथे आल्यावर एक प्रकारची शांतता नक्की अनुभवायला मिळते.

५. पाईन आणि ओक जंगलातून जाणारा रस्ता धरमशालेपासून ४७ की.मी. वरील १२४५ मीटर्स उंचीवरील तजेलदार चहाच्या मळ्यांनी रमणीय झालेल्या पालमपूर या आणखी एका चित्ताकर्षक गावाला घेऊन येतो. आणि अजून एका सुंदर जागेला भेट दिल्याचा आनंद आपल्याला होतो.

६. धरमशालेपासून १७ कि.मी. वर अद्भुत सृष्टीसौंदर्य लाभलेलं, प्राचीन किल्ला आणि हिंदू देवालयांसाठी ख्यातनाम असं ‘कांग्रा’ येतं. हे हिमाचल मधील अत्यंत प्रसिद्ध आहे. कांग्रातील पुरातन वज्रेश्वरी पार्वती मंदिर विशेष अतिशय सुंदर आहे. कांग्रा म्हणजे सुप्रसिद्ध राजपूत आणि कांग्रा लघुचित्रकला शैलीच्या विकासाचं माहेरघरच. त्यामुळे हिमाचल मध्ये फिरायला गेलात तर ह्या जागेला निश्चित भेट द्या.

७. धरमशालेहून हिमाच्छादित पहाडांबरोबर ‘स्लेट’ दगडांच्या खाणी असलेल्या रस्त्यावरून सुमारे ५६ कि.मी. गेल्यावर झळाळत्या सुवर्णांकित कळसाचं ज्वालामुखी मंदिर लागतं. मन प्रसन्न करणारी ही जागा आहे. उत्तर भारतातील पवित्र अशा या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा मोगल सम्राट अकबरांनी चढवला. ज्वालामुखीच्या मंदिरात मूर्ती नसून नैसर्गिक खडकातून येणारी निळीशार अखेर अखंड तेवती ज्योत आहे. जी पाहून काही वेगळीच अनुभूती येते. दर एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये येथे यात्रा भरते.

८. पालमपूरपासून १५ कि.मी. वर दगडावरील सुरेख कोरीव कामाचं बैजनाथचं प्राचीन शिवमंदिर असून याच्या मुलातील मंदिराचं बांधकाम पांडवांनी केल्याचं मानलं जातं. इथे अत्यंत सुंदर असे शिवलिंग आहे. मंदिराच्या भिंतीवर बऱ्याच प्रतिमा आहेत. कांग्रा जिह्यातील वैजनाथला दर शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. आणि ही जागा मिस करू नये अशी आहे.

अस धरमशाळा हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच खुणावत असत.