19. Rajasthan - land of king - 1 books and stories free download online pdf in Marathi

१९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १

१९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १

राजस्थान ही भारतातील अतिशय प्रसिद्ध जागा आहे. लॅंड ऑफ किंग्स म्हणून राजस्थान ओळ्खल जात. इथला इतिहास, किल्ले, इथले राजे, राजवाडे, उंट सगळच जगभर प्रसिद्ध आहे. राजस्थान इथल्या विविश रंगांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच लाखो पर्यटक इथे भेट देतात. राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे उत्तरी भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणार्‍या भाषा आहेत.राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे. इथे उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गर व चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दोन विभाग आहेत.

* राजस्थान राज्यात ३३ जिल्हे आहेत जे सात विभागात विभागले आहेत

· अजमेर विभाग: अजमेर , भिलवाडा , टोंक , नागौर

· भरतपूर विभाग: भरतपुर , धोलपुर , करौली , सवाई माधोपुर

· बिकानेर विभाग: बिकानेर , चुरू , गंगानगर , हनुमानगढ,

· जयपूर विभाग: जयपुर , अलवार , झुनझुनुन , दौसा , सिकर

· जोधपूर विभाग: जोधपुर , जालोर , जेसलमेर , पाली , सिरोही , बारमेर

· कोटा विभाग:बरान , बुंदी , कोटा , झालावाड

· उदयपूर विभाग: उदयपुर , चित्तोडगढ , डुंगरपुर , बांसवाडा , रजसामंड

राजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्यामुळेच पर्यटकांच हे अत्यंत आवडत ठिकाण आहे. थरचे वाळवंट व अरवली पर्वत हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य. अरवली पर्वत राज्याच्या आग्नेय ते नैर्ऋत्य दिशांना पसरलेला आहे आणि त्याची एकूण लांबी ८५० किमी इतकी आहे. अबू डोंगरावर गुरु शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत. राजस्थान म्हणजे वाळवंटी प्रदेश हीच ओळख आपल्याला माहित आहे. राजस्थानला मरूभूमी म्हणजे वाळवंटांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. मात्र या वाळवंटातही हिरवाईने तसेच धबधब्याने नटलेले अशी निसर्गसंपन्न पर्यटनस्थळे आहेत. जी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. इथली अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. असंख्य भारतीय आणि विदेशी पर्यटक इथे भेट देण्यासाठी उत्सुक असतात.

राजस्थानातील गोंदवाड आणि मारवाड या प्रांतांत मुख्यतः शुष्क काटेरी वने आहेत. जोधपूर शहर याच प्रांतात आहे. इथली प्रमुख नदी ही लुनी नदी आहे. आणि ही नदी अरवलीच्या पश्चिम उतारावरून कच्छच्या दिशेने वाहते. ही नदी खारी नदी आहे आणि फक्त बारमेर जिल्ह्यातील बालाटोरा इथवरच गोडी आहे. ही निसर्गाची किमयाच आहे. हरियाणात उगम पावणारी घग्गर नदी ही हरियाणातील शुष्क भागातून येते आणि थरच्या वाळवंटात लुप्त पावते. अरवलीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण उत्तर भारताच्या सरासरी इतके असल्याने हा भाग बऱ्यापैकी सुपीक आणि सिंचित आहे. ह्या भागात काठेवाडी प्रकारची शुष्क वने आढळतात. ह्या प्रकारच्या वनांमध्ये अतिशय वैशिष्टपूर्ण जैववैविविधता आढळते. तसेच या भागातील जनमानसांत असलेल्या पशुपक्ष्यांविषयी असलेल्या आस्थेमुळे वन्यजीवन सहज पहावयास मिळते. मेवाड प्रांतात राजस्थानची सर्वाधिक जंगले आहेत. येथे केवळ शुष्क जंगले नसून मध्य भारतात आढळणार्‍या मोठ्या पानांची सागाची वनेदेखील या भागात आढळतात. राजस्थानचा सर्वात पूर्वेकडचा भाग मेवाड म्हणून ओळखला जातो. हा भाग उत्तरप्रदेश व हरियाणा या राज्यांच्या सीमेलगत आहे. बिनास व चंबळ ह्या गंगेच्या प्रसिद्ध उपनद्या या भागातून वाहतात. चंबळचे खोरे हे एक भौगोलिक आश्चर्य मानले जाते. आणि इथे एकदातरी भेट दिली पाहिजे.

* जैववैविध्य-

राजस्थानात शुष्क हवामानाचे प्रमाण जास्त आहे तसेच दाट जंगले अतिशय कमी आहे तरीपण राजस्थानमध्ये जैववैविध्य जबरदस्त आहे. जैववैविध्य हे प्रामुख्याने भौगोलिक वैविध्यतेमुळे आहे. कोरडे वाळवंट, शुष्क काटेरी जंगल, गवताळ वाखर, शुष्क जंगल अशी विविध प्रकारची वने येथे आढळतात. जैववैविध्य असल्यामुळे राजस्थान पर्यटकांची आवडती जागा आहे. राजस्थानमध्ये सामान्य लोकांमध्ये वने व वन्यजीवां बद्द्ल आस्था आहे. त्यामुळे इथे वन्यप्राण्यांची काळजी घेतली जाते. राजस्थानमध्ये शुष्क वातावरण असल्याने नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे आणि त्यामुळेच येथे निसर्ग संवर्धनाला जास्त महत्त्व देतात आणि त्याच योग्य रीतीने जतन करतात. राजस्थानमध्ये प्रामुख्याने शुष्क वातावरणात राहणारे वन्यजीव दिसून येतात. त्यात चिंकारा, काळवीट, रानगाढव आणि भारतीय लांडगा हे प्राणी आहेत. माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी आहे आणि हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे. रानगाढव हे फक्त राजस्थानच्या वाळवंटी भागात व कच्छच्या रणात दिसून येते. जैसलमेर मधील मरु राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे व वाळवंटी हॅबिटॅट चे एक उत्कृष्ट उदाहरण. इतर प्राण्यांमध्ये वाळवंटी मांजर, वाळवंटी खोकड, हे प्राणी येथे आढळतात. या राष्ट्रीय उद्यानात लाखो वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत जे एक पर्यटन आकर्षण बनले आहे. राजस्थान मध्ये २० अभयारण्य आहेत. अरवलीच्या सानिध्यात अनेक अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. तिथे निसर्गप्रेमी आवर्जून भेट देतात. सारिस्का हे अजून एक व्याघ्रप्रकल्प अल्वार जिल्ह्यात आहे. ताल छप्पर अभयराण हे सुजनगढ जवळील अभयारण्य काळवीटांसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य हे भरतपूर मधील केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि इतर प्राणी पाहायला मिळतात. हिवाळ्यातील महिन्यात येथे येणारे स्थलांतरित पक्षी हे प्रमुख आकर्षण आहे. इथे पक्षीनिरीक्षणाला येणाऱ्या लोकांची गर्दी पाहायला मिळते. आणि ह्या जागेला जागतिक वारसा स्थान म्हणूण दर्जा मिळालेला आहे. उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

* पर्यटन-

भौगोलिक विविधता, रोमांचक इतिहास व ऐतिहासिक स्थळे, किल्ले, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थानात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांमध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश असतो. विदेशी पर्यटकांना राजस्थानच विशेष आकर्षण असलेल दिसून येत. इथले किल्ले आणि त्यामागचा इतिहास जाणून घेणे हा त्यांचा हेतू दिसून येतो. भारतात येणार्‍या दर तीन विदेशी पर्यटकांपैकी एक पर्यटक हा राजस्थानात जाण्यास उत्सुक असतो. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. पिंक सिटी म्हणून ओळखले जाणारे जयपूर अतिशय सुंदर जागा आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला अतिशय सुंदर आहे. किल्लांची रचना त्याचे बांधकाम पाहून मन अचंबित नक्कीच होईल. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. तिथे पर्यटक न चुकता भेट देतात. जोधपूर जवळील मंढोर येथे पूर्व मध्ययुगीन देवळे आहेत. जेसलमेर हे वाळवंटातील एक ऐतिहासिक शहर आहे. तिहे जेसलमेरचा किल्ला, थरचे वाळवंट व येथील मध्ययुगीन हवेल्या पर्यटकांना आकर्षित करतात. राजस्थानमध्ये जैन धर्मीयांची अनेक भक्तिस्थळे आहेत. राणकपूर, भिलवाडा, जेसलमेर, जोधपूर, माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर तसेच सिरोही जिल्ह्यातील अनेक मंदिरांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. माउंट अबू हे थंड हवेच ठिकाण पर्यटकांच विशेष आवडीच आहे. अजमेर येथील दर्ग्यास भेट देण्यास केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदू धर्मीयही येतात. तसेच अजमेरजवळील पुष्कर या ठिकाणचा पुष्कर मेळा पाहण्यास देश-विदेशातून अनेक लोक येतात. पुष्करमधील ब्रह्मामंदिर हे जगप्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये जैववैविध्य तर आहेच व स्थानिकांच्या सहकार्याने अजूनही वन्यजीवन टिकून आहे. रणथंबोर, सारिस्का, चित्तोडगड, ह्या अरवलीच्या सानिध्यातील अभयारण्यांना भेट देण्यास पर्यटक उत्सुक असतात. भरतपूर येथील राष्ट्रीय उद्यान हे जागतिक दर्जाचे पक्षी अभयारण्य आहे.

राजस्थान मध्ये बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे राजस्थान ही पर्यटकांची नेहमीच आवडती जागा आहे. आणि या प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती पुढील भागात..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED