,, राजे
बँकेत काम करीत असताना नेहेमीच वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात
असेच कधी तरी दिसणारे ..एक व्यक्तिमत्व ..!
धारदार नाक ,चेहेरे पट्टी अगदी शिवाजी महाराजा सारखी
चेहेऱ्यावर मेकअप चा हलका सा थर
डोळ्याच्या कडे पर्यंत ओढलेली काजळाची बारीक धार
कपाळावर दुबोटी गंध मध्ये ओम .
केस माने पर्यंत पोचलेले आणी पुर्ण मागे वळवलेले
कानावर पण बारीक रेखीव कल्ले काढलेले
कानात मधोमध मोठा मोती असलेली भिकबाळी ..
फक्त अंगात कपडे मात्र आजच्या “आम “आदमी सारखे
असे वाटत होते आपण एखाद्या राजाला पाहत आहोत की काय ..
आज अचानक माझ्या कौटर वर त्यांचे आगमन झाले पैसे भरण्या साठी
एक कटाक्ष टाकून त्यांच्या कडे पाहुन मी हसले
आणी म्हणाले एखाद्या जुन्या राजा सारखे दिसता तुम्ही
मी नेहेमी पाहते तुम्हाला ..
असा गेट अप रोज करण्याचा कंटाळा येत नाही का तुम्हाला ?
ते पण हसले आणी म्हणाले मी रोज असाच राहतो ..
मला अगदी कौतुक वाटले ..
कित्येक वर्षे जुन्या पठडीतला एकाच बेअरिंग चा मेकअप न कंटाळता करणे
आणी त्याच भूमिकेत दिवस भर राहणे ...सोपे नाही
मग त्याच उत्सुकतेने मी त्यांना विचारले
काय करता व्यवसाय तुम्ही “
आपला जवळच दारूचा गुत्ता आहे म्याडम
उत्तर ऐकून मी अवाक ..!!!!!
----बिट्टू
दोन दिवसाच्या सलग सुटी नंतरचा दिवस
बँकेत तुफान गर्दी ..
अगदी मान वर करायला सुध्धा वेळ नाही ..
माझ्यापुढे चौकशी साठी ही भली मोठी लाईन ..
न् थांबता हसत मुखाने उत्तर देण्याचा माझा चाललेंला प्रयत्न ,
तेवढ्यात चहा वाल्याचे आगमन ...
आता एक पाच मिनिटे तरी मिळेल उठायला
माझे एक आश्वासन स्वताच्या च मनाला !!
तरीपण परत मी पुढील कामात ‘गर्क..च .
पाच दहा मिनिटात अचानक .एक गोड गोंडस चार पांच वर्षाची बाल मूर्ती सगळ्या लोकांना बाजूला सारून .माझ्या टेबलापाशी येते .. “..काकी काकी ,.तुम्ही चहा नाही घेतलात ??
उठा ना तो चहावाला..तुम्हाला बोलावतोय पहा “
त्याचे आग्रहाने मला ..सांगणे ..
त्याचे “निरागस रूपडे “..आणी बोलण्यातले “आर्जव “..पाहून मी अगदी “थक्क होते ..
“अरे हे पहा उठते रे ..चहा साठी “ असे म्हणून मी मनोमन त्या गोंडस बाळाचे आभार मानते ..
“ए ..ये ना इकडे ..नाव काय तुझे ..?
चहा घेऊनआल्यावर मी त्याला हाक मारते
हे घे चोकलेट ‘”.. असे ..म्हणून मी पर्स मधले चोकलेट त्याच्या हातात ठेवते .
. छोटू ..अगदी खुष होवून जातो ...
माझे नाव पंकज आहे पण “मला ना माझी ममी ..”बिट्टू .म्हणते ..
असे म्हणून स्वारी चोकलेट हस्तगत करून .पार पसार होते ..
मनात विचार येतो खरेच मी चहा घेतला का नाही याची चौकशी तर ..माझ्या कुठल्या सहकार्याने ..पण नाही केली आणी ..याला पहा माझी कीती काळजी ..!!
खरेच बालपण कीती निरागस आणी ..निर्मळ असते ना ..!!
हरपाल ..
एक चहा बँकेत पोचवणारा मुलगा ..
रोज दोन तीनदा तरी भेट ..
मग जवळीक आलीच ..
गप्पा चेष्टा मस्करी रोजच असते
कीती तरी वर्षे या सांगोल्या सारख्या गावात मध्य प्रदेशातून आलेल्या
लोकांची पिढी वाढत आहे
एक आला की बरोबर नातेवाईक पण असतातच
त्यांच्या गावी काहीच पोट भरण्याचे साधन नसल्याने
महाराष्ट्र त्यांचे साठी सर्वोत्तम आहे
आता तो जिथे काम करतो ते हॉटेल बंद होणार काही दिवसात
मालकाचा तिथला करार संपला आहे
फिर क्या करोगे हरपाल .,.
माझा प्रश्न ,.
कुछ् नही गाव चला जावूंगा ..
वहाँ खेती है हमारी खेती करेंगे और क्या
(त्या खेतीत काहीच उगवत नाही हे मला पण माहीत आहे आणी त्याला पण )
जाते वक्त सारा पगार लेके जायेंगे ,
म्हणजे ..आता पगार घेत नाहीस का तु ..
नही पगार तो मालिक के पास रेहेती है
मेरा रेहेन सेहेन खाना पिना कपडे रेहेना सब तो मालिक ही खर्च करता है
फिर मुझे काहे चाहिये पगार वगार ..?
अरे वा फिर तो अच्छा है ..
हा और अगर छुट्टी के दिन धाबे पर भी खाना खाओ
तो भी बिल मालिक ही भरता है ..
ये बात है तो फिर क्यो छोड जाते हो सांगोला ?
माझा ,..प्रश्न ..
कही दुसरे होटल मे काम धुंडो ना हरपाल ..
अरे म्याडम काम तो कही भी मिल सकता है .,
मगर ऐसा "मालिक "नही मिलेगा ना ,,
मी मनोमन त्या "मालकाला "वंदन केले ..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमचे एक खातेदार श्री पाटील
पेन्शनर आहेत .इथे आल्यावर प्रथम माझी त्यांची ओळख झाली
नाव गाव विचारपूस झाल्यावर त्यांनी दोन पेढ्याच्या पेट्या माझ्या हातात ठेवल्या
मी चकित ..विचारले काय कारण ,,?
“मग मला समजले आमच्या शाखेतील रोखपाल निशांत याला मध्यंतरी श्री पाटील यांचेकडून काही पैसे
भरणा करताना चुकून जास्त आले होते
दुपारी रोकड जमवताना त्याच्या लक्षात आले
तेव्हा त्याने श्री पाटील यांना फोन करून बोलावून घेतले व ते पैसे परत दिले
या गोष्टीवर श्री पाटील इतके खुष झाले की त्यानी दोन पेट्या पेढे आणले
एक बँकेत वाटायला ..व एक निशांतच्या घरी द्यायला
जेणे करून त्याच्या घरी पण त्यांच्या मुलाच्या प्रामाणिक पणा विषयी समजेल .
पेढे वाटल्या वर मी सहज विचारले कीती पैसे जास्त आले होते तुमच्या कडून ?
त्यावर श्री पाटील म्हाणाले एक रुपया जरी जास्त आलेला परत केला तरी तो “प्रामाणिक” पणा आहे
आणी माझ्या लेखी त्याला जास्त महत्व आहे
यानंतर माझी त्यांची अनेकदा गाठ पडली .
ओळख चांगली पक्की झाली ..
त्यांनी त्यांच्या नातींची माझी ओळख करून दिली ..
त्या पण येवून माझ्याशी गप्पा करू लागल्या
आणी काल अचानक श्री पाटील परत दोन पेट्या पेढे घेऊन हजर
बरोबर आलेल्या नाती कडून पेटी माझ्या हातात दिली त्यांनी
आता हे कशासाठी ?.मी विचारले
हे तुमच्या साठी म्याडम ते म्हणाले
मी काय केले असे ?....मी विचारले .
मी दोन तीन महिने तुम्हाला पाहतो आहे
तुमची सर्विस व एकंदर तुमचे वागणे मला खुप आवडले म्हणुन हे तुमच्या साठी
मी चकितच झाले .
पण हे दोन कशा साठी ?मी विचारले
एक तुमच्या घरी न्यायला तुमच्या घरच्या लोकांना पण समजू दे ना तुमचे काम .
मी हसले आणी म्हणाले का हो नेहेमी असे दोन दोन पेट्या पेढे वाटता
कायम जवळच ठेवुन हिंडता की काय .
यावर ते म्हणाले नाही हं ..फक्त काही विशेष लोकांसाठीच मी असे पेढे देतो
त्यांची नात पण म्हणाली म्याडम आजोबा खुप चिकित्सक आहेत !!!
त्यांच्या पसंतीला उतरायचे सोपे काम नाही ..
असा हा प्रसंग...
नक्कीच मनाला सुखाविणारा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------माहेरची साडी
बँकेत काम करताना जसे काम जबाबदारीचे असते तसेच रुटीन मध्ये काही गमती जमती पण घडत
असतात .कामे तर चालूच असतात पण आपण पण त्या गमतींचा आनंद घ्यायचा असतो
असाच एक गर्दीचा वार “सोमवार “
बँकेत पाय टाकताच क्षणी समजते
आज अगदी धुवाधार काम आहे ते ..
हळू हळू कामाला सुरवात झाली ..अचानक गर्दी आणखीन वाढू लागली
आता अगदी मुंगी पण शिरायला जागा नव्हती
मी प्रत्येक पैसे काढणाऱ्या स्लीप वरचे नाव वाचून पुकारा करीत होते
कित्येक वेळा सही अभावी ती व्यक्ती खरेच आली आहे की नाही याची खात्री करावी लागत असे
त्यात इथे बरेच से “अंगठे “वाले ..
मग तर नक्कीच व्यक्ती तीच आहे का ..
ती पैसे कीती काढते आहे वगैरे त्याच व्यक्ती कडून वदवून घ्यावे लागते
आमच्या कामाचा तो एक भाग असतो आणी बिनचूक पणां पण सांभाळावा लागतो
अशीच एक मोठ्या रकमेची स्लीप समोर आली
मी पुकारा केला ..मावशी कुठे आहेत ..
अंगठा केलाय ना ...आल्या आहेत का त्या ..?
मावशींचा मुलगा समोर आला .म्याडम आई आली आहे ती पहा
मी समोर पाहिले तर माणसांच्या गर्दीतून काहीच दिसत नव्हते
सावधगिरी म्हणुन मी त्यांना म्हणले अहो पण मावशी ..तर दिसत नाहीयेत
मावशींच्या मुलाचा नाईलाज झाला ..त्यांना पहिल्या शिवाय माझी सही होणार नव्हती
खचाखच भरलेल्या गर्दीतून तो मागे गेला त्याच्या आईला आणायला ..
त्याच गर्दीतून वाट काढत मग मावशी पुढे आल्या .
इतक्या गर्दीतून समोर बोलावल्या मुळे त्या थोड्या वैतागल्या होत्या
मी आलोय की मीच तर अंगठा केलाय न्हव ..?
त्या थोड्या रागाने म्हणाल्या
मी शांत पणे विचारले ठीक आहे पण पैसे कीती काढणार आहात ?
ते पण लिवलाय ना स्लीप वर
मुलगा आईला दटावत म्हणाला ..
आई दोन लाख रुपये काढायचे म्हणुन सांग ना ..
अपुन लिहून दिलय ना ..आणखी कशाला सांगायला हव ..?
आता मात्र मावशी खरेच वैतागल्या होत्या !!
मला पण थोडे वाईट वाटले त्यांना खरेच त्रास झाला होता
मग मीच हसून म्हणाले ..अहो मावशी मी काय फक्त तुम्हाला पैसे कीती काढले
विचारायला नाही काही बोलावले ..
आणखी एका कामा साठी बोलावले ..
माझे हास्य पाहून मावशी थोड्या नरमल्या ..
मग कशासाठी बुलवत होता मला ?
अहो मला आज तुम्ही साडी कोणत्या रंगाची नेसलिये ते पहायचे होते
मस्त रंग आहे हो साडीचा ..!आवडला मला
माझे बोलणे ऐकून मात्र मावशी खरेच खुष झाल्या ..
आवडली तुम्हाला ..अहो ही साडी मला माझ्या भावाने पाठवली बगा
भाऊबीज झाली न्हव ..भाऊ पुण्यात असतो बगा ..
इतकी मोठी मोठी दुकाने आहेत तिथ ..मी गेलो होतो तवा पायली व्हती
त्यातल्याच यका दुकानातून घेतली म्हण त्याने !
नंतर फोन बी आला हुता त्येचा आवडली का म्हणुन श्यान..
मावशी भावाच्या प्रेमात हरवून गेल्या ..
तोवर त्यांचा नंबर आला आणी क्याशियर ने त्यांना पैसे घ्यायला बोलावले
त्यानंतर त्या गर्दीत त्या कधी गेल्या समजले नाही ..
माझ्या मनात आले खरेच साडी म्हणजे अगदी बायकांचा जिव्हाळ्याचा विषय
त्यात “माहेरची साडी “..मग काय विचारता ..
कुणाचाही राग पळून जाईल असाच नाजूक विषय होता तो !!
बँक बँक ग्राहक
मी या शाखेत जवळ जवळ चार वर्षे काम करते आहे ..
त्यामुळे खूप खातेदार माझ्या अगदी खास परिचयाचे झाले आहेत
तसे बँकेचे काम हा एक धागा आमच्यात असला तरी ..त्याही पेक्षा काही अनामिक नात्यांनी पण आम्ही
बांधले गेलो आहोत
शिवाय इथून जवळच्या गल्लीत माझे माहेर असल्याने ओळखी पण खूप आहेत
माझे बालपण ते कोलेज जीवन हा प्रवास ही येथेच पार पडला आहे
माझे इथून प्रमोशन झाले तेव्हा आता मी येथून जाणार या नुसत्या कल्पनेने
खूप लोकाना ..वाईट वाटले
आता कशाला इथून जाता ,?
तुम्ही गेलात तर आमचे कसे ..
तुमच्या प्रमोशन चा आनंद आहे ..पण हे काय इथून जाणार ?
या व अशा अनेक प्रतिक्रिया ऐकून .मला ही आनंद आणी दुक्ख या दोन्ही होत होते
खरे तर या सर्व माणसा साठी “स्पेशल “असे मी काहीच करीत नव्हते
पण मी फक्त तिथे आहे ..याचाच त्यांना आधार वाटत असे ..
या सर्वामध्ये तीन प्रसंग मात्र माझ्या मनात पक्के बसले आहेत
एक वयस्क खातेदार असेच ..इथे ओळख झालेले ..पण बँकेत आले की माझ्या कडे
काम असो नसो ..भेटून जाणारच !!
हळू हळू घरचे काही प्रोब्लेम सांगून मन हलके करीत
मी तर त्यांच्या कोणत्याच अडचणी वर मार्ग काढू शकत नसे
पण माझ्या जवळ व्यक्त झाले की त्यांना हलके हलके वाटत असे ..असे ते म्हणत .
माझ्या बदली विषयी त्यांना पण वाईट वाटले होते
असेच एक दिवस ते आले आणी मला पेढे देवून म्हणाले ..
हा घ्या प्रसाद .,..
कसला हो प्रसाद ..मी विचारले ..
अहो नरसोबा वाडीला गेलो होतो ..
तुमच्या साठी एक छोटा “होम केला .तुमची बदली होवू नये म्हणून ..
मला काय बोलावे सुचेना ...डोळे भरून आले माझे !!
दुसरे असेच एक पेन्शनर ..आहेत
तसे जुन्या ओळखीतले आहेत .यांची मुले,परदेशात असतात .
इथे एकटेच रहातात ..नातेवाईकांच्या सोबतीने .
मला स्वतची मुलगी मानतात ..
मी कधी त्यांच्या घरी गेले नाही ..ते पण कधी आमच्या कडे नाही आले
मी त्यांच्या साठी कधी काही करीत नाही
ते आजारी पडले तरी बरे झाले की मग ते .मला फोन करतात
त्यांची माझ्या कडून कोणतीच अपेक्षा नसते ..
फक्त बँकेत आले की माझी मुलगी भेटली की मला बरे वाटते असे म्हणतात
मी एकदा रजेवर असताना त्यांना कुणी तरी सांगितले माझी बदली होणार
लगेच त्यांचा फोन .
.फोन वर रडू लागले ..
माझी मुलगी मला सोडून गेली तर आता मी कसे करणार ..
कशी बशी फोन वर समजूत घातली त्यांची ..
माझाच “बांध ..फुटेल की काय असे वाटू लागले ..
तिसरी घटना माझ्या मानलेल्या मुली बाबत आहे
रुपाली एक हुशार मुलगी
..तिच्या चांगल्या करिअर साठी मी तीला थोडे मार्ग दर्शन करीत असते
तिचा ही फोन आला .
म्याडम माझी आई बोलणार आहे तुमच्याशी
मला काही समजेना ..का बोलणार असेल ..
तोवर तिच्या आईचा आवाज ..म्याडम कुट वो चालला माझ्या लेकीला सोडून
अहो कुठे गेलेय मी ..इथेच तर आहे ..माझे उत्तर
तुमी नसला तर माज्या पोरीच काय हुईल याचा तरी इच्यार करा
मग काढली कशी तरी त्यांची पण समजूत ..!
मग रुपालीच म्हणाली म्याडम ती कधी कुणाशी फोन वर बोलत नाही
पण तुम्ही जाणार असे तीला वाटले ..म्हणून मलाच म्हणाली फोन लाव त्यांना ..
असे हे सारे ऋणानुबंध ...!
नवीन ठिकाणी नवे ऋणानुबंध तयार होतील ..
पण यांचे विस्मरण केवळ “अशक्य ..