इश्क – (भाग १२) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग १२)

राधा त्या प्रकाराने क्षणभर गांगरुन गेली.. पण क्षणभरच, तिने लगेच स्वतःला सावरले, चार्लीला बाजुला ढकलण्यासाठी तिने आपले हात त्याच्या मिठीतुन सोडवण्याचा प्रयत्न केला, पण चार्लीची तिच्याभोवती मजबुत पकड होती.

राधाने तो प्रयत्न सोडुन दिला. तिने विचार केला “काय हरकत आहे? काय हरकत आहे जर एखाद्याने तिला किस्स केले?” अनुरागच्या त्या खोट्या, क्षणभराच्या खोट्या किस्सपेक्षा, चार्लीचा राकट किस तिला अधीक भावला. त्याच्या मर्दानी, नॉन-कल्चर्ड, वाईल्ड मिठीमध्ये तिने स्वतःला झोकुन दिले. तिच्या त्या कृतीला योग्य-अयोग्याच्या तराजुत तोलणारे इथे कोणी नव्हते, उंचावणार्‍या भुवया नव्हत्या की पाठीमागे होणारी कुजबुज नव्हती. होते फक्त आणि फक्त स्वातंत्र्य.

एका स्पिडब्रेकरवरुन ट्रक खाड्कन गेला आणि राधा व चार्ली काही अंतर एकमेकांपासून दूर झाले. चार्लीने राधाला पुन्हा आपल्या मिठीत ओढले. राधाने आपले हात चार्लीच्या मानेभोवती गुंफले आणि ती हळू आवाजात म्हणाली, “आय लव्ह यु कबिर!!”

“कबिर? कोण कबिर?”, राधाला बाजूला सारत चार्ली म्हणाला तशी राधा भानावर आली. तिने हलकेच स्वतःला चार्लीपासुन अलग केले.

असं, नकळत आपल्या तोंडून कबिरच नाव कसं निघालं ह्याच तिला आश्चर्य वाटलं.

“आपणं कबिरच्या प्रेमात तर नाही ना पडलोय?”, असा विचार तिच्या मनात येउन गेला, पण क्षणभरच. लगेच तिने स्वतःला सावरले. आता तो विचार करून काही उपयोगही नव्हता. कबिर बद्दल काही असेलच तर ते निव्वळ एक आकर्षण होते आणि आज नाहीतर उद्या ते निघून जाईलच असा विचार तिने केला.

७०-८० कि.मी. प्रवास केल्यानंतर हायवेपासुन अलग होऊन ट्रक गोकर्णकडे वळला. गाव जवळ येऊ लागले तसे पर्यटकांचे जथे दिसु लागले. अर्थात परदेशी पर्यटकांचा सहभाग लक्षणीय होता. कुणी चालत, कुणी सायकलींवरुन तर कित्तेकजण बुलेटवरुन मनसोक्त भटकंती करत होते. ओम, हरे-कृष्ण, किंवा तत्सम प्रिंट्सचे आणि रंगेबीरंगी कपडे, डोक्याला बंडाना, गळ्यात कसल्या कसल्या माळा, अंगा-खांद्यावर टॅटु… राधाबरोबरची मंडळी अगदी त्यांतलीच वाटत होती.

मार्केटकडे न वळता ट्रक समुद्रकिनार्‍याला लागुन असलेल्या खडबडीत रस्त्याने धावु लागला. बर्‍याच वेळानंतर समुद्रावरुन येणारा खारा वारा नाकात शिरला तसा सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले. ड्रायव्हरच्या केबीनला लागुन असलेल्या छोट्या खिडकीतुन चार्ली ड्रायव्हरला रस्ता सांगत होता. एक उंच टेकडी चढुन ट्रक उंचावर आला, तसा दुरवर, अथांग पसरलेला निळाशार समुद्र दृष्टीस पडला. चार्लीने खुण केली, तसे आपले इतरत्र पसरलेले सामान मंडळी गोळा करु लागली.

छोटा घाट उतरुन ट्रक एका आडवळणाला येऊन थांबला तसे सगळे आपलं सामान घेऊन खाली उतरले. ट्रक आल्या मार्गाने निघुन गेला आणि सगळे आपलं सामान उचलुन चार्लीच्या मागुन चालु लागले. उन्हं वर आल्याने थंडी पळुन गेली होती. समुद्राची उबदार वाळु पायाला सुखावत होती. थोड्यावेळ समुद्रकिनार्‍यावरुन चालल्यावर चार्ली पुन्हा पायवाट पकडुन चालु लागला. काही अंतर चालल्यावर एक टेकडी आली आणि मग दुसरी आणि मग तिसरी.

राधाला ह्या सगळ्याची खुप मज्जा वाटत होती. कॉलेजच्या दिवसांत केलेल्या ट्रेकींग्जची तिला आठवण झाली. दोन्ही हात पसरुन तिने आनंदाने एक स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि ती परत इतरांबरोबर चालु लागली.

साधारण तासभर सर्वजण चालत होते. बरोबर नेहमीच्या सामानाबरोबरच घेतलेले खाण्यापिण्याचे सामान, टेन्ट्स सारखे अवजड साहीत्यही होते. पण कुणाच्याही चेहर्‍यावर थकावट नव्हती. होता फक्त आनंद. अखेर एका उंच टेकडीच्या टोकावर पोहोचायच्या काही अंतर आधी चार्लीने सगळ्यांना थांबवले.

“तुम्हा सर्वांचे स्वर्गात स्वागत आहे..”, चार्ली सगळ्यांना म्हणाला.. “आपण इतके अंतर चाललो त्याचे फळ आता आपल्याला मिळणार आहे… तुम्ही आता जे काही बघणार आहात तशी जागा, ती प्रायव्हसी तुम्ही आधी बघीतलीच नसेल. आय बेट, इथे राहील्यावर तुम्हाला इथुन कुठे जावेसेच वाटनार नाही…” असं म्हणुन चार्लीने सगळ्यांना पुढे बोलावले.

उत्सुकतेने सगळे टेकडीच्या टोकावर पोहोचले आणि विस्फारलेल्या नजरेने खाली दिसणारे दृष्य पाहु लागले.
दोन उंच टेकड्या समुद्रात थोड्या आतपर्यंत गेल्या होत्या आणि त्यामुळे खाली एक इंग्रजी अक्षर ‘C’ प्रमाणे बीच तयार झाले होते. जणु त्या दोन टेकड्यांची टोकं म्हणजे ‘C’ अक्षराची दोन टोकं, आणि मधली रिकामी जागा म्हणजे ते प्रायव्हेट बीच. दुरुन कुणालाही तेथे काही असेल असे वाटले नसते. कारण लांबुन कुणालाही ती एक अखंड टेकडीच वाटली असती. परंतु त्या दोन्ही टेकड्या एकमेकांना जोडलेल्या नसल्याने मध्ये एक जणु खाजगी बीचच तयार झाला होता.

ती सुंदर जागा बघून अनेकांनी आनंदाने किंकाळ्या फोडल्या आणि सामान उचलुन टेकडीच्या उतारावरून सगळेजण धावत सुटले. राधा खाली पोहोचेपर्यंत बहुतांश मंडळींनी आपले सामान वाळूत फेकून दिले होते आणि कपडे काढून समुद्राच्या पाण्यात धाव घेतली होती. राधाने सुध्द्दा आपले सामान ठेवले आणि ती इतरांबरोबर सामील झाली.

तासभर सगळेजण पाण्यात मनसोक्त डुंबत होते. एकमेकांवर पाणी उडव, वेगाने येणाऱ्या लाटेवर उड्या मार असे प्रकार चालु होते. सकाळपासूनचा प्रवास आणि त्यानंतरचा काही किलोमीटरचा वॉक ह्यामुळे आलेला थकवा निघून गेला होता, पण आता पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते. हळू हळू सगळेजण पाण्यातून बाहेर पडले आणि स्वतःला वाळून झोकून दिले. काही कर्तव्यदक्ष मंडळींनी टेण्ट्स उभारायला सुरुवात केली, तर काहींनी स्वयंपाकासाठी लागणारी आग पेटवायला लाकडं गोळा करायला धाव घेतली

जोपर्यंत लाकडं जमुन स्वयंपाक सुरु होत होता तोपर्यंत काहींनी बारीक बारीक खेकडे आणि काही मासे पकडून आणले होते, तर काहीनी ताट म्हणून वापरता येतील अशी मोठ्ठी झाडाची पान गोळा करून आणली होती.

राधाने सुध्दा स्वयंपाक करण्यात हातभार लावला. वेगवेगळे पदार्थ तयार करायला, किचेनमध्ये काम करायला राधाला नेहमीच आवडायचे. परंतु अनुरागशी लग्न झाल्यावर ते अचानक आउट-ऑफ-स्टेटस असल्याने बंद झाले. घरात नोकर-चाकर कामाला असताना राधाने किचेन मध्ये असणे अनुरागला आवडायचे नाही, आणि त्यामुळे इच्छा असूनही राधाला काही करता यायचे नाही.

पण इथे, इथे अनुराग नव्हता आणि हे त्याचे घरही नव्हते.

आपण जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला ह्या निर्णयावर पुन्हा एकदा राधाने शिक्कामोर्तब केले आणि शिनाबरोबर फिश करी करण्यात ती मग्न झाली. तयार झालेले जेवण अगदीच बेचव होते. कश्यात मीठ जास्त, तर कश्यात मसाला, काही कच्च तर काही अजून काही. पण कुणाला त्याची फिकिरच नव्हती. सगळे त्यावर तुटून पडले. राधाला मात्र त्या खाण्याची सवय नसल्याने तिने जमेल तितपत खाण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ती एका खडकावर बसून केसांमध्ये अडकलेली वाळू काढण्यात मग्न होऊन गेली.

जेवणं उरकल्यावर शिना राधा शेजारी येउन बसली.

“केसांची पूर्ण वाट लागलीय”, केसांचा गुंता सोडवत राधा म्हणाली.
“मस्त केस आहे तुझे राधा”, राधाच्या केसांमधून हात फिरवत शिना म्हणाली, “पण तुला त्याची निगा राखण कठीण होणारे”
“हो ना, आपण मार्केट मध्ये गेलो कि घेईन मी शाम्पू”, राधा
“ओ मैडम, आपण पिकनिकला नाही आलोय आणि किती दिवस तुला तुझे पैसे पुरणारेत?”, शिना
……..
“व्हाय डोन्ट यु कट इट?”, अचानक शिना ने विचारले
“आर यु मैड?”
“हे बघ राधा, इथे रोजच्या आंघोळीचे वांदे, शाम्पू आणि कंडीशनर तर फार लांबची गोष्ट. तुला माहिते आणि मला हि माहिते केसांची निगा राखायला काय काय करायला लागते.”
“अग हो पण…. ”

एव्हाना बाकीचे सगळे पण त्यांच्याभोवती जमले होते.

“कट इट..”
“कट इट..”
“कमॉन राधा…. डू इट …… ”

“यु शुअर चांगले दिसेल?”, राधाने शिनाला विचारले
“ऑफकोर्स’
“आय हेव समथिंग फॉर यु”, रीटाने आपल्या पर्समध्ये हात घालून काहीतरी बाहेर काढले आणि तो हात राधासमोर धरला
“बीड्स!! वॉव !!, मला केंव्हापासून बीड्स घालायचे होते केसांमध्ये”, राधा आनंदाने उडी मारून म्हणाली
“इट्स युअर्स नाऊ”

राधाने एकदा सर्वांकडे बघितले आणि कुणीतरी पुढे केलेली कात्री घेतली आणि आपले लांबसडक केस कापायला सुरुवात केली.


काही दिवसांतच राधा त्या ग्रुपचा एक हिस्सा होऊन गेली. काही नियम नाहीत, काही बंधन नाहीत, ज्याला जसे वाटेल त्याने तसे वागावे. ह्या दिवसांमध्ये राधा स्वतःला नव्याने ओळखत होती.

सर्व काही राधासाठी जणू स्वप्नवत चालले होते, पण ती संध्याकाळ मात्र अपवाद ठरली.

सूर्य मावळतीला झुकला होता. शेकोटी पेटवून सगळेजण गप्पा मारत बसले होते तेंव्हा सकाळपासून गायब असलेला चार्ली हसत हसत त्यांच्यात सामील झाला.

“चार्ली यार किधर था सुभसे?”
“कोई लडकी का चक्कर चला रहा क्या?”
“व्हाय आर यु स्मायलिंग सो मच?”

एक ना दोन, त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार होत होता.

“सांगतो, सांगतो, बसा सगळे”, एका खडकावर बसत चार्ली म्हणाला

सगळेजण बसल्यावर चार्लीने आपल्या जैकेटच्या खिश्यात हात घालून, काही पुड्या बाहेर काढल्या आणि हवेत नाचवत तो ओरडला “गाइज इट्स विड्स…..”

त्याचबरोबर सगळ्यांनी एकच आरोळी ठोकली.

“काय आहे ते?”, राधा
“ड्रग्ज बेबी ड्रग्ज”, चार्ली हसत हसत म्हणाला
“ओह माय गॉड, इज इट लीगल?”, राधा
“चार्ली कुठलीच गोष्ट लिगली करत नाही, आणि कुणाच्या बापाला भीत नाही”, शर्टाची कॉलर ताठ करत चार्ली म्हणाला
“पण, पण ह्याने व्यसन वगैरे लागते ना?”, राधा डोळे मोठे करत प्रश्न विचारात होती
“डोन्ट-वरी, आम्ही खूप वेळा वापरलेय, काही होणार नाही, ट्राय कर… “, चार्ली
“शिना, इज इट ओके ?”, राधाने शिनाला विचारले
“ऑफकोर्स, बिनधास्त घे”

चार्लीने आणि ग्रुप मधल्या काहींनी सगळ्यांसाठी चिलीम बनवल्या, त्यात चार्लीने आणलेल्या पुड्यांमधील पूड भरली आणि प्रत्येकाला दिली. रीटाने राधाला काय आणि कसे करायचे ते समजावून सांगितले आणि थोड्याच वेळात सगळेजण त्या स्वर्ग-सुखात बुडून गेले.

काही वेळातच सगळ्यांवर त्याची झिंग चढु लागली होती. राधाला तर अगदी पिसासारखे हलके झाल्यासारखे वाटत होते. जगातली सगळी दुःख नाहीशी झाली आहेत आणि सर्वत्र फक्त आणि फक्त आनंदच भरला आहे असे तिला वाटत होते. कुठलेसे हिंदी गाणे ती स्वतःशीच गुणगुणत होती. गाणं म्हणता म्हणता मध्येच ती उठुन स्वतःभोवती नाचु लागली.

“यु नो चार्ली.. आय एम गोईंग टू डु द नेक्स्ट डान्स..”, गुंगीतच ती बोलत होती.
“हे चार्ली.. यार अजुन पाहीजे रे हे..”
“गपा रे.. काय फुकट मिळते का विड्स.. किती महाग आहे ठाऊक आहे ना?”
“हाऊ मच मनी यु वॉंन्ट.. राधा हॅव लॉट्स ऑफ़ मनी…”, पेंगुळलेल्या अवस्थेत शिना म्हणाली..
“येस्स.. आय हॅव लॉट्स ऑफ़ मनी.. हाऊ मच यु वॉंन्ट?”, असं म्हणुन राधाने पर्समधुन आपली पैश्याची गड्डी काढली आणि चार्लीकडे फ़ेकली.

त्या ड्रग्जच्या नशेत आपण काय करतोय ह्याचं तिला भानच नव्हतं. पण इतके सारे पैसे बघताच चार्ली भानावर आला.

“शिना… राधा कोण आहे? इतके पैसे कसे आले तिच्याकडे?”
पण शिना अजुनही गुंगीतच होती… “आय डोन्ट नो…”

“शिना.. जागी हो…”, तिच्या दंडाला धरुन गदागदा हलवत चार्ली म्हणाला..
“आऊच.. चार्ली.. यु आर हर्टींग मी..”, शिना

चार्लीने तिला बाजुला ढकलले आणि तो राधाकडे गेला.

“”राधा.. हे बघ.. आपल्याला एव्हढे पैसे पुरणार नाहीत.. थोडे अजुन लागतील.. अं.. तुझे आई-बाबा.. कोण आहेत? देतील ते पैसे?”, गोड आवाजात चार्ली म्हणाला..

“आई-बाबा? हॅ.. उलट मी पळुन आलीय.. त्यांना कळता कामा नये ओके? नाही तर ते मला परत माझ्या नवर्‍याकडे पाठवतील.. पण हं.. त्याच्याकडे आहेत खुप पैसे..”, राधा वाळुवर चित्र काढत म्हणाली..
“छानच की मग.. कोण? कोण आहे तुझा नवरा…”, चार्ली..
“अनुराग दिक्षीत..”
“कोण अनुराग दिक्षीत?”, चार्ली..

पण राधा पुन्हा गाणं म्हणण्यात गुंग होऊन गेली.

चार्लीने आपला फोन उचलला आणि एक नंबर फिरवला..

“हॅल्लो.. मित्रा.. एक काम कर ना.. अरे जरा नेट वर अनुराग दीक्षीत कोण आहे बघुन सांगतोस का?”

“अबे तुला काय करायचेय.. मी होल्ड करतोय.. मला सांग लगेच…”

“ओके ओके.. नेक्स्ट टाईम एक विड्स तुला नक्की देऊन.. पण आत्ता सांग…”

काही क्षण शांततेत गेली..
“आर यु शुअर?”
..
“अं.. त्याच्या बायकोची काही माहीती मिळतेय का बघ…”

“… राधा म्हणालास का? ओके.. थॅंक्स ड्युड..”

चार्लीच्या डोक्यातील चक्र वेगाने धावु लागली होती. त्याने शिनाला ओढत कडेला घेतले आणि तिच्या दोन-चार मुस्काडात लगावल्या..
“वेक-अप शिना… वेक-अप…”, पण शिना अजुनही ग्लानीत होती.

चार्लीने तिला फरफटत समुद्र-किनारी न्हेले आणि लाटांमध्ये ढकलुन दिले. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच.. शिना चरफडुन जागी झाली..
“व्हॉट द हेल चार्ली.. काय करतोयेस..”

“शिना.. तुला माहीते ही राधा कोण आहे?”
“नाही.. आणि माहीती असण्याचं कारणच नाही.. का? काय झालं?”
“शिना, राधा एका करोडपतीची बायको आहे…”
“असेल.. मग?”
“ओह गॉड.. शिना.. थिंक.. ती आत्ता घरातुन पळुन आलीय.. ती कुठे आहे, कुणाबरोबर आहे.. कुणालाच ठाऊक नाही.. शी इज अ सिटींग डक..”
“काय बोलतो आहेस तु चार्ली..”

“आपण जर तिला किडनॅप केले तर?”
“आर यु मॅड?”, शिना अचानक किंचाळत म्हणाली..
“श्श…. ओरडु नकोस..”, चार्लीने मागे वळुन बघीतले.. पण लाटांच्या आवाजात शिनाचा आवाज दबला गेला होता..

“हे बघ शिना.. आपण कित्तीतरी पैसे लाटू शकतो.. थिंक.. इथे इतक्या लांब कुणाला माहीती पण नसेल ती इथे आहे ते.. इट्स इझी जॉब फ़ॉर अस… विचार कर.. इतके सारे पैसे.. आपण हा ग्रुप सोडुन पळुन जाऊ.. लांब कुठेतरी.. नव्याने सुरुवात करु.. व्हॉट्स से…?”

“पण किडनॅप करायचं म्हणजे नक्की काय करायचं?”, शिना
“दॅट्स द बेस्ट पार्ट. राधाला कळनार पण नाही की आपण तिला किडनॅप केलंय. तिला रोजच्यासारखंच राहु द्यायचं आपल्या बरोबर.. फक्त कुठे नजरेआड नाही होऊ द्यायचं. मी अनुरागला फोन करुन सांगणार की त्याची बायको आपल्या ताब्यात आहे, इतके इतके पैसे दे.. आणि बायकोला घेऊन जा.. पैसे दिले.. की राधा त्याच्या ताब्यात.. जोपर्यंत त्याला कळेल की राधाला किडनॅप केल नव्हतंच.. आपण खुप कुठेतरी लांब गेलो असु.. सॉल्लीड प्लॅन आहे की नाही?”

“माय गॉड चार्ली.. यु आर ब्रिलियंट…”, चार्लीला मिठी मारत शिना म्हणाली.

दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये भविष्याची स्वप्न बघण्यात बुडुन गेले होते इतक्यात त्यांना लांबुन राधाच्या ओरडण्याचा आवाज आला.
लांब, शेकोटीभोवती काहीतरी ओरडाआरडा चालु होता.

दोघे पळत पळत तिकडे गेले.. जवळ गेले तेंव्हा त्यांना दिसलं.. की रॉकीने राधाला खाली पाडले होते आणि पॅंन्टची बटण काढत तो तिच्याकडे जात होता..

“स्टॉप इट रॉकी..” चार्ली रॉकीला थांबवत म्हणाला
पण रॉकीने त्याला बाजुला ढकलले आणि तो राधावर ओणवा झाला..

राधा एव्हाना अर्धवट शुध्दीवर आली होती.

“रॉकी.. डोन्ट डू दॅट.. ऐक माझं…”, चार्ली
“डोन्ट ट्राय टु स्टॉप मी चार्ली..” असं म्हणुन रॉकी ने पॅन्टच्या खिश्यातुन एक लांबसडक सुरा काढुन चार्लीला दाखवला..”यु नो.. आय एम गुड अ‍ॅट इट.. डोन्ट यु..”

“रॉकी ऐक.. डोन्ट हर्ट हर.. शी मिन्स करोड रुपीज टु अस..”, राधाला काहीही होणं चार्लीला परवडण्यासारखं नव्हतं, आणि रॉकीला थांबवण, विशेषतः त्याच्या जवळ त्याचा लाडका सुरा असताना अशक्य होतं. रॉकीला विश्वासात घेणं महत्वाचं होतं आणि म्हणुनच चार्लीने त्याला सगळं एका दमात सांगुन टाकलं..

अर्धवट शुध्दीत आलेली राधा हे सगळं ऐकत होती. अर्थात तिला निटसं काही कळालं नाही, पण समहाऊ जे काही चालु होते ते योग्य नव्हते आणि त्याचा अनुरागशी काहीतरी संबंध येणार होता हे तिला कळुन चुकलं.

रॉकी आणि चार्ली बोलत असताना तिने हळुच इकडे तिकडे नजर टाकली. तिच्या हातापासुन काही अंतरावरच एक दगड पडलेला तिला दिसला. सावकाश-सावकाश पुढे सरकत तिने तो दगड घेतला आणि घट्ट पकडुन ती संधीची वाट बघु लागली.

“ऑलराईट चार्ली.. यु बेटर गेट दॅट मनी फास्ट.. मी फ़ार दिवस राधापासुन लांब राहु शकणार नाही..”, असं म्हणुन रॉकी राधाला निदान किस्स करावं म्हणुन खाली वाकला आणि राधाने संधी साधली. हातात पकडलेला दगड तिने थाड्कन रॉकीच्या तोंडावर मारला.

रॉकीच्या नाकातुन रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि राधाचा चेहरा रक्ताने माखला गेला..

तळमळत रॉकी मागे सरकला. त्याच्या कानातुनही रक्त वाहात होते.

“यु बिच!”, असं म्हणुन त्याने त्याचा सुरा उचलला आणि तो पुन्हा राधाकडे धावला. परंतु राधा आधीच उठुन बसली होती आणि रॉकीला सुरा घेउन येताना बघताच तिने मागे धुम ठोकली.

काय होतेय हे लक्षात येताच चार्लीसुध्दा राधाला पकडायला धावला.

राधा जिवाच्या आकांताने धावत होती. अंधार पडायला लागल्यामुळे आधीच निट दिसत नव्हते, त्यात अनोलखा प्रदेश. परंतु कश्याचीही पर्वा न करता राधा धावत होती आणि तिच्यामागोमाग चार्ली आणि रॉकी…


येतानाचा मार्ग आठवुन राधा धावत होती. एक टेकडी, मग दुसरी, मग पायवाट.. जे आठवेल तसे ती पळत होती. त्या ड्र्ग्जची नश्या अजुनही तिच्या अंगात भिनलेली होती. पण म्हणतात ना, मारणार्‍यापेक्षा मरणारा अधीक वेगाने धावतो, तसंच राधाचं झालं होतं.

तास-दोन तास कधी लपुन दम खात, तर कधी धावत राधा एकदाची गोकर्णच्या रस्त्याला येऊन लागली. पायात चपला नसल्याने असंख्य काटे-कुटे पायात घुसुन, पाय रक्तबंबाळ झाला होता. झाडा-फांद्यांमध्ये अडकुन अंगातले कपडे ठिकठिकाणी फाटले होते. तिच्या अंगातली सगळी ताकद संपली होती.

राधाने रस्त्याच्या मधोमद बसकण मारली. चार्ली आणि रॉकी सुध्दा काही वेळातच तेथे येऊन पोहोचले. असाहाय्य स्थितीतील राधाला बघुन त्यांच्या जिवात जीव आला. आणि ते एकमेकांना टाळ्या देत राधाच्या जवळ येऊन पोहोचले. पण राधाला पकडणे त्यांच्या नशीबात नव्हते कारण त्याच वेळी तेथुन एक पेट्रोलिंगची पोलिस-जीप जात होती.

तिघं-जण आयतेच पोलिसांच्या ताब्यात सापडले होते. ड्रग्जच्या नशेत झुलणारी राधा, त्यात कपडे फाटलेले, चेहर्‍यावर वाळलेल्या रक्ताचे डाग, रॉकीच्या हातातला सुरा पाहुन त्यांना फारसा विचार करावा लागला नाही. हिप्पी लोकं आणि त्यांचे राडे त्या पोलिसांना नविन नव्हते. तिघांनाही त्यांनी जिपमध्ये बसवले आणि ते पोलिस-स्टेशनला घेऊन आले.


“चला, बोला पटा-पटा, काय झालं…”
“दॅट बिच, शी ट्राईड टु किल मी व्हाईल ड्रंक..”, रॉकी आधी राधाकडे आणि मग स्वतःच्या फुटलेल्या चेहर्‍याकडे बोट दाखवत म्हणाला..
“नो सर, आय वॉज जस्ट ट्राईंग टु सेव्ह मायसेल्फ़, ही वॉज ट्राईंग टु रेप मी..”, राधा त्याचं वाक्य अर्धवट तोडत म्हणाली..

“शट-अप.. एकेकाने बोला…”
“सर.. मी खरंच सांगतेय.. आय वॉज नॉट ट्राईंग टु किल हीम.. वॉज जस्ट ट्राईंग टु सेव्ह मायसेल्फ़.. आणि तो दुसरा.. चार्ली.. तो मला किडनॅप करणार होता..”
“करणार ‘होता’? म्हणजे, असं ठरतं वगैरे का? चला आता आपण किडनॅप किडनॅप खेळू..”

“एनिवेज.. इन्स्पेक्टर… सगळ्यांचे ब्लड सॅंम्पल्स घ्या आणि टेस्टला पाठवा.. बघा ड्रींक्स आहेत का ड्रग्ज्स..”

“ईट्स ड्रग्ज्स सर.. मी पहील्यांदाच ट्राय केले.. आय एम नॉट अ जंकी सर..”, स्वतःच्या गळ्याची शप्पथ वगैरे घेत रडकुंडीला आलेली राधा म्हणाली.

“इन्स्पेक्टर.. कस्टडीत घ्या तिघांनाही.. आणि ह्यांची बाकीची पलटण पण कुठेतरी असणार.. बघा कुठल्या बिळात लपलेत आणि घेऊन या सगळ्यांना…”

“सर प्लिज.. आय डोन्ट वॉंन्ट टु गो इन कस्टडी..”, हात जोडत राधा म्हणाली… “मी एक फोन करु शकते का?”
“फोन? कुणाला कमीशनरना करायचाय की काय?”, हसत हसत सिनीयर इ. म्हणाले.
“काय सांगता येत नाही सर.. ओळखत असेल कमिशनरला..”, डोळे मिचकावत दुसरा इन्स्पेक्टर म्हणाला
“नो सर.. मी माझ्या नवर्‍याला फोन करतेय.. पण तो ओळखतो कमीशनरना..”
“अरे व्वा.. तुमचा नवरा पण असतो की काय? हं? काय नाव काय नवर्‍याचं..?”
“मिडीया टायकुन अनुराग दिक्षीत…”, असं म्हणुन राधाने टेबलावरचा फोन पुढे ओढला आणि नंबर फिरवायला सुरुवात केली.

दोन्ही इन्स्पेक्टरची ‘अनुराग दिक्षीतचे’ नाव ऐकताच नजरानजर झाली. राधा फोनवर काय बोलते आहे ते काही क्षण कान देऊन ऐकु लागले आणि मग राधा खरं बोलते आहे असं लक्षात येताच ते एका कोपर्‍यात गेले.

“इन्स्पेक्टर.. टीव्ही.वर यायचंय का?”, सिनीयर इन्स्पेक्टर दुसर्‍याला म्हणाला..
“हो सर.. पण कसं..?”
“कसं म्हणजे..? मिडीयाला जर बातमी मिळाली की ‘अनुराग दिक्षितची’ बायको ड्रग्ज्स च्या अंमलाखाली ‘अ‍ॅटेंप्टेड टु मर्डर’ च्या केसमध्ये आपल्या ताब्यात आहे तर…”
“पण सर, मला वाटतं ती खरं सांगतेय.. तिने स्वतःला वाचवण्यासाठीच..”
“च..च.. अहो ते कोर्टाला ठरवुद्या.. आपण जरा हवा देऊ की.. ड्रग्ज्स आणि ‘अ‍ॅटेंप्टेड टु मर्डर’ दोन्ही चार्जेस द्या टाकुन तिच्यावर, म्हणजे जरा जास्त बाईट्स देता येतील.. त्या अनुरागचे बिझीनेस-रायव्हल्स असतीलच की.. त्यांना पण मिळेल काहीतरी चघळायला, आणि आपल्याला प्रसिध्दी.. काय?”
“ओके सर.. मी लगेच चॅनल-९ ला फोन करतो…”

“पण एक मिनीट, बातमी आपण दिली हे उघड करु नका म्हणावं.. नाही तर नस्तं अंगाशी येऊल आपल्या…”
“ओके सर..”
“आणि जरा त्या फाईली आवरा टेबलावरच्या, कसं दिसेल ते टीव्हीवर.. हं?” असं म्हणुन एकमेकांना टाळ्या देत हसत हसते दोघंजण एकमेकांच्या कामाला निघुन गेले.


दुसर्‍या दिवशी, पोलिस-स्टेशनचा परिसर न्युज-रिपोर्टर्स, कॅमेरामॅन.. ओबि-व्हॅन्सने भरुन गेला होता.. आणि नॅशनल टी.व्ही.वर ब्रेकींग-न्युज झळकत होती..

“गोकर्ण पोलिस-स्टेशनमै राधा दिक्षीत नशे-के-हालत मे धुत…विथ अ‍ॅटेंप्टेड मर्डर अंडर हर नेम…..”

[क्रमशः]