ISHQ - 13 books and stories free download online pdf in Marathi

इश्क – (भाग १३)

राधाचा फोन येऊन गेल्यावर अनुरागने चक्र वेगाने फिरवली. राधाच्या जामीनीची पुर्तता त्याने काही फोन-कॉल्सवरच करुन टाकली आणि तो स्वतःचे हेलिकॉप्टर घेउनच गोकर्णला गेला. गोकर्णचे एक बिझीनेसमन त्याच्या ओळखीचे होते,त्यांच्या फार्म-हाउसवरच्या हेलीपॅडवर उतरुन त्यांच्याच कारने तो पोलिस-स्टेशनला पोहोचला. पोलिस-स्टेशनवर जणु जगातले सगळे पत्रकार, सगळे टीव्ही चॅनल्स आपापल्या ओबी-व्हॅन्ससहीत जमले होते. अनुरागने आधीच फोनवरुन तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे त्याची कार पोलिस-स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला गराडा घातला आणि त्याला सुरक्षीत आत घेऊन गेले.

अनुरागकडुन बाईट्स मिळवण्यासाठी सगळ्यांची चढाओढ चालली होती, पण पोलिसांपुढे कुणाचाच निभाव लागत नव्हता..

“आता कळेल साल्याला मिडीया मागे लागली की काय होते ते…”

पोलिस-स्टेशनच्या पायर्‍या चढताना कुणाचेतरी वाक्य अनुरागला ऐकु आले, त्याने चिडुन मागे वळुन बघीतले, पण त्या प्रचंड गर्दीत तो आवाज कुणाचा होता शोधणं अवघड होते.

कमीशनरचा फोन येऊन गेल्यामुळे जामीनाची सगळी कागदपत्र टेबलावर तयारच होती. काही कागदपत्रांवर सह्या ठोकुन, राधाला घेउन अनुराग गाडीतुन हेलिकॉप्टरपाशी आला आणि लगेचच परतीला निघाला.

घरी पोहोचेपर्यंतचा तो दीड-तास राधासाठी अत्यंत विचीत्र होता. हेलिकॉप्टरमध्ये अनुराग तिच्याशी एका शब्दाने बोलला नाही. बंगल्यावर परतल्यावर अनुरागने त्याच्या पर्सनल सेक्रेटरीला फोन लावला.

“रौनक.. सॉरी लेट कॉल करतोय.. माझं बिझीनेस-क्लासचं ‘एअर-फ़्रान्सचं’ बुकींग कर, रात्रीच्या फ्लाईटचं, एक बिझीनेस कॉन्फरंन्स आहे तिकडे, ती करेन अ‍ॅटेंन्ड..”
….
“हो.. मी जाणार नव्हतो.. पण तु बघीतलं असशीलच टी.व्ही.वर.. हम्म..इथे थांबलो तर उगाच मिडीयाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल.. ७ दिवसांनी रिटर्नचं करं ओके? कन्फर्म झालं की फोन करं.. थॅक्स..”

अनुराग फोनवर बोलत असताना राधाच्या मनात विचारांच कल्लोळ माजला होता. ‘सॉरी’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. जे काही घडलं ते तिच्या आयुष्याचा भाग होता.. तिचे निर्णय होते.. पण निदान ’थॅंक्स’ म्हणण आवश्यक होतं. तिच्या एका फोन-कॉलवर अनुराग लगेच आला नसता तर ती आत्ता तुरुंगात असती.

अनुरागचा फोन संपला तशी ती अनुरागच्या समोर गेली.

“अनुराग….”

अनुरागने पहील्यांदा तिला निट बघीतलं. विचीत्र शोल्डर-कट, मध्येच हायलाईट्स, तर मध्येच बिड्स.. फाटलेले कपडे, मळकटलेला चेहरा, नोजरिंग, थिक-आयलाईनरने काळवंडवलेल्या डोळ्यांच्या कडा, हातापायावर, चेहर्‍यावर ओरखडण्याच्या खुणा…

कधीकाळी त्याला आवडलेली राधा ही नक्कीच नव्हती.

इतका-वेळ दाबुन धरलेला राग त्याला असह्य झाला आणि त्याने कसलाही विचार न करता उलट्या तळहाताने राधाच्या कानफाडात लगावली आणि तो ताडताड पावलं टाकत तेथुन निघुन गेला.

राधाला त्याच्या ह्या कृतीचे काहीच दुःख, किंवा आश्चर्य वाटले नाही. काही क्षण ती तेथेच एकटी उभी राहीली आणि मग चेहर्‍यावर आलेले केस बाजुला सारुन ती आपल्या बेडरुममध्ये आली. बराच दिवस खोली बंद असल्याने खोलीचे दार उघडताच एक कुबट वास तिच्या नाकात शिरला.

खोलीत आल्यावर तिने दार लावुन घेतले आणि बेडच्या कोपर्‍याशी ती बसुन राहीली.. किती वेळ झाला असेल कुणास-ठाऊक. जणु एखाद्या ब्लॅक-होल मध्ये असल्यासारखे तिला वाटत होते. डोक्यात कसलेच विचार नाहीत, मनामध्ये कसल्याही भावना नाहीत, आजुबाजुच्या परिस्थीतीचे भान नाही. कदाचीत कित्तेक तास उलटुन गेले असतील. पायाला मुंग्या आणि पाठीला रग लागल्यावर शेवटी ती उठुन उभी राहीली आणि तिने खोलीतला दिवा लावला. समोरच्याच ६ फुटी मोठ्या आरश्यात तिने इतक्या दिवसांनंतर प्रथमच स्वतःला पाहीले. काही क्षण तिने स्वतःला ओळखलेच नाही. शेजारच्याच भिंतीवर तिचं एक तैलरंगातलं मोठ्ठ पोश्टर लटकलं होतं. त्यातली राधा आणि आरश्यातली राधा मध्ये जमीन-आस्मानाचा फरक होता.

का कुणास ठाऊक पण तिला पहिल्यांदाच स्वतःची शिसारी आली. उद्वीग्न अवस्थेत तिने केसांमध्ये अडकवलेले ते रंगीत मणी काढुन जमीनीवर फेकुन दिले. नाकातली ती नोजरिंग काढुन भिरकावुन दिली. डोळ्यांचे ते आयलायनर मनगटाने पुसुन टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अर्धवट पसरले आणि राधाचं रुप अधीकच भयावय दिसु लागलं.

तिने कपाट उघडलं, घरातले कपडे, टॉवेल घेतला आणि ती बाथरुममध्ये गेली.

अंगावर गरम पाण्याचा शॉवर घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. अनेक उंची शॅम्पु, महागडे साबण वापरुन तिने दहादा अंग घासुन घासुन धुतले. अर्धा-एक तास आंघोळ केल्यावर तिला थोडं हलकं वाटलं. बाहेर येऊन तिने आपला नेहमीच्या वापरातला पिंक-किटीचा पायजमा आणि रंगेबिरंगी हार्टसची चित्र असलेला पांढरा टी-शर्ट अंगात चढवला आणि ए/सी चालु करुन ती आपल्या बेडमध्ये शिरली. नकळत कधीतरी तिच्या डोळ्यांतुन वाहणा‌र्‍या उष्ण अश्रुंच्या धारांनी उशी भिजुन गेली, आणि त्या अश्रुंच्या सोबतीनेच राधा झोपुन गेली.


अनुराग गोकर्णच्या पोलिस-स्टेशनवर पोहोचल्याचं आणि नंतर राधाला घेऊन गाडीतुन गेल्याचं लाईव्ह-फुटेज त्या ब्रेकिंग न्युजमध्ये चालु होते. शॉक-बसल्यासारखा कबिर अजुनही त्या टीव्हीपुढे बातम्या वाचण्यात मग्न होता. कबिरचा मॅनेजर.. रोहनही एव्हाना तेथे येऊन पोहोचला होता.

“तुला राधाचा फोटो बघायचा होता ना.. आता लाईव्हच बघ तिला…”, अनुराग राधाच्या दंडाला धरुन ओढत जात होता तेंव्हा हताश होत कबिर रोहनला म्हणाला..
“मी त्या दिवशीच तिला थांबवायला पाहीजे होते.. माझीच चुक आहे सगळी, त्या दिवशी मी तिला थांबवले असते, तर कदाचीत ही वेळ आज तिच्यावर आली नसती..”

“लुक कबिर.. तु उगाच स्वतःला दोष देऊ नकोस..”, रोहन कबिरला समजावत होता. आणि दोघांच्या बोलण्याचा काहीच कॉन्टेक्स्ट माहीत नसल्याने मोनिका दोघांकडे स्तंभीत होऊन आळीपाळीने बघत होती.

बर्‍याच वेळानंतर बातम्या बदलल्या आणि तिघंजणं पुन्हा आपल्या टेबलावर परतले.

“कोण आहे ही राधा? आणि कबिर तु कसं ओळखतोस तिला?”, शेवटी न रहावुन मोनिकाने विचारले.
“मोनिका प्लिज.. आय रिअली डोन्ट वॉन्ट टु टॉक अबाऊट इट..”, थोडंस इरिटेट होत कबिर म्हणाला
कबिरचे ते इरिटेटेड एस्क्प्रेशन्स मोनिकाला नविन नव्हते. इतक्या प्रयत्नांनंतर ती कबिरच्या थोडी जवळ गेली होती. तिला ते परत बॅक-टु-झिरो करायचे नव्हते.

“ऑलराईट…व्हेनएव्हर यु फिल लाईक… मी निघते मग.. मला थोड्या फोटोच्या प्रिंट्स कलेक्ट करायच्या आहेत.. कॉल मी..”, असं म्हणुन मोनिका तेथुन निघुन गेली.


“मला अजुनही विश्वास बसत नाहीए ती ‘राधाच’ होती..”, बर्‍याच वेळानंतर कबिर म्हणाला
“सोड ना.. हे बघ.. मला वाटतं दॅट्स व्हॉट राधा ऑलवेज वॉन्टेड.. आय मीन.. नॉट द पोलिस स्टेशन.. पण बिईंग-हिप्पी वगैरे.. कदाचीत तिला त्यातले चांगले वाईट आता समजले असेल..”, रोहन म्हणाला.
“रोहन मला भेटायचंय तिला.. आत्ता…”, अचानक टेबलावरुन उठत कबिर म्हणाला
“हे बघ कबिर.. मला वाटतं ही वेळ योग्य नाही. तिची काय मानसीक परिस्थीती असेल, तिच्या घरी काय वातावरण असेल आपल्याला माहीत नाही. तु असा अचानक तिच्या समोर गेलास तर.. त्यापेक्षा लेट्स वेट.. ती पण ह्याच शहरात आहे.. आणि तु पण.. आज नाही तर नंतर भेटशीलच…
“हो रे.. पण तो पर्यंत ती परत पळुन गेली तर…??”, कसनुसे हसत कबिर म्हणाला..

रोहनला मात्र त्याच्या त्या बालीश प्रश्नामुळे हसु आवरणे खरंच कठीण होतं होते.

“सो हाऊ वॉज द डेट विथ मोनिका?”, विषय बदलत रोहन म्हणाला
“ए प्लिज.. डेट वगैरे काही नव्हती ही.. आम्ही आपलं कॅज्युअली भेटलो..”, कबिर
“तु असशील कॅज्युअली, ती नव्हती. तु बघीतलं नाहीस किती मस्त आवरुन, तयार होऊन आली होती ती?”, रोहन
“बुल्शीट, मोनिका नेहमीच अशी झकपक असते…”, कबिर म्हणाला..
….
“रिअल्ली?” काही वेळ विचार केल्यावर तोच पुन्हा म्हणाला
“आय थिंक देअर इज समथींग कुकींग कबिर.. मी सुध्दा चांगलं ओळखतो मोनिकाला… मला अजुनही वाटतं, मोनिका इज युअर फ्युचर… मान्य आहे राधा तुला आवडते अ‍ॅन्ड ऑल.. बट आय गेस इट्स टु लेट.. ती परत घरी आलीय तिच्या..” टीव्हीकडे बोट दाखवत रोहन म्हणाला…

टीव्हीवर अनुराग-राधा एअर-पोर्टवरुन घरी परतत असतानाचे फुटेज चालु होते. कबिर पुन्हा टीव्हीला चिकटला आहे हे पहाताच रोहन उठुन उभा रहात म्हणाला..
“बरं चल, तुझं हे गर्ली कॉफी-कुकिज वगैरे खाऊन झालं असेल तर जरा मॅनली ड्रींक्स घेऊया? ते नविन बार्बेक्यु-नेशन सुरु झालेय तेथे कॉम्लीमेंट्री टकीला शॉट्स आहेत.. व्हॉट्स से?”

“नो यार.. बार्बेक्यु इतकी भुक नाहीये…”, कबिर
“ऑलराईट्स, जस्ट ड्रिंक्स देन? कॅफे-इस्टवुडस?”, रोहन झोमॅटोवर जवळपासची लोकेशन्स बघत म्हणाला..
“साउंड्स गुड… पण मी थोडा चेंज करुन येतो पट्कन.. गाडी आहे ना तुझी?”, कबिर..
“यप्प.. ये पट्कन, मी थांबतो”, रोहन

काऊंटवर बिलाचे पैसे देऊन कबिर शेजारच्या बिल्डींगमधील त्याच्या घरी कपडे बदलायला गेला.


कबिर गेल्यावर इतका वेळ व्हायब्रेट-मोड्वर वाजणारा फोन शेवटी रोहनने उचलला.

मोनिका इतका वेळ आपल्याला फोन का करत आहे हे त्याला कळत नव्हते, पण तो फोन नक्कीच कबिर संबंधी आहे हे त्याला ठाऊक होते आणि समहाऊ कबिरसमोर तो फोन घेणे त्याला शक्य नव्हते म्हणुन तो फोन उचलत नव्हता. पण कबिर नजरेआड होताच रोहनने फोन उचलला.

“हम्म मोनिका.. बोल..”
“कबिर नाहीए ना तेथे…?”, अधीरतेने मोनिकाने विचारले
“नाहिए..”
“हे बघ रोहन.. तु आम्हा दोघांचा जवळचा मित्र आहेस.. म्हणुन विश्वासाने मी तुला काही सांगु आणि तुझ्याकडुन काही मागु शकते?”, मोनिका
“ऑफकोर्स.. गो अहेड..”
“रोहन.. ती राधा कोण आहे… तिला बघुन कबिर असा हायपर का झाला ह्याच्याशी खरं तर मला काही घेणं देणं नाही. मी आणि तो मध्ये काही काळासाठी एकत्र नसताना ती किंवा दुसरं कोणी त्याच्या आयुष्यात होतं का ह्याबद्दलही मला काही माहीती नकोय. पण एक गोष्ट नक्की आहे की.. आय वॉन्ट टु विन बॅक कबिर…”
….
“माझ्याकडुन काही चुका झाल्या मला मान्य आहे, आणि मला त्या सुधारायच्या आहेत.. विल यु हेल्प मी?”, मोनिका
“आय डोन्ट वॉन्ट टु कमीट एनीथींग मोनिका..,कबिरच्या मनात काय आहे, हे मलासुध्दा ठाऊक नाही. तो सध्या तरी एका वेगळ्याच मनस्थीतीत आहे.. सो मला त्याला प्रेशराईज नाही करायचंय, पण एक नक्की, शक्य ती सगळी मदत मी तुम्हा दोघांनाही करीन…”, रोहन

“थॅंक्स रोहन.. आय कुडंट आस्क यु मोर दॅन धिस.. बाय…” असं म्हणुन मोनिकाने फोन ठेवुन दिला.

तेव्हढ्यात समोरुन कबिर रस्ता क्रॉस करुन येताना त्याला दिसला..
“देवदास रे.. खरंच देवदास.. दोन-दोन मुली हाताशी असुनही हा मात्र एकटाच..”, स्वतःशीच हसत रोहन म्हणाला..


त्या घटनेला एक आठवडा उलटुन गेला होता, पण एक दिवसही राधा कबिरच्या मनातुन गेली नव्हती. आणि दोघंही एकाच शहरात म्हणल्यावर कबिर कधीही, कुठेही जाताना सतत राधा कुठे दिसते का हेच पहात होता. परंतु राधा त्याला ह्या दिवसांत तरी कधीच दिसली नाही. राधाने ते ७-८ दिवस स्वतःला घरातच, किंबहुना खोलीतच कोंडुन घेतले होते. अनुराग फ्रांन्सला निघुन गेल्यावर त्या मोठ्या व्हिलामध्ये ती एकटीच पडली होती. गरजेपुरतीच ती खोलीतुन बाहेर पडे. घरातल्या नोकर-चाकरांसमोरही जायची तिला इच्छा होत नव्हती. अनुराग आणि त्याच्या फॅमीलीबरोबर कित्तेक वर्ष काम केल्याने, त्याच्याशी लॉयल असलेले ते राधाचा द्वेष करु लागले होते.

“रोहन…”
“कबिर..राधाविषयी बोलणार नसलास तरंच बोल..”, संगणकावर काम करता करता रोहन म्हणाला, तसं तोंड बारीक करुन कबिर पुन्हा आपल्या केबिनकडे निघाला..

“ओके.. सॉरी.. बोलं..”, कबिरला थांबवत रोहन म्हणाला..
“रोहन.. मला भेटायचंच आहे राधाला.. एकदाच.. मग भले तिने मला ओळख नाही दाखवली तरी चालेल, किंवा मला तुला भेटायचं नाही किंवा अजुन काहीही म्हणाली तरी चालेल.. पण एकदाच…”
“अरे हो.. हो.. इतका हायपर का होतो आहेस… करु काही तरी आपण ओके…?”

इतक्यात कबिरचा फोन वाजला.. कबिरने वैतागुन स्क्रिनवरचा नंबर बघीतला आणि फोन बंद करुन टाकला…

“काय रे? घेतला का नाहीस फोन?”, रोहन
“ह्या मोनिकाने एक वैताग आणलाय.. दिवसांतुन ४-५दा फोन करते..”, कबिर
“का?”
“काही नाही.. असंच..”
“हे बघ कबिर…”, रोहन खुर्चीतुन उठत म्हणाला..
“आता तु मोनिकाची बाजु घेऊन मला समजावण्याचा प्रयत्न करणार असशील तर बोलु नकोस..”, हसत हसत कबिर म्हणाला..

“बरं.. सॉरी.. हे बघ.. तु म्हणतोस ना.. तसंच कदाचीत मोनिकाच माझं फ्युचर असेल.. पण जोपर्यंत मी राधाला भेटत नाही, तिच्याशी बोलत नाही तो पर्यंत मी मोनिकाबद्दल विचारच करु शकत नाही.. आय वॉंन्ट टु सी दॅट डोअर क्लोज्ड रोहन.. मला राधाने सरळ सरळ सांगावं.. मगच मी राधाला विसरायचा प्रयत्न करेन. माझी आणि राधाची शेवटची भेट..ती काहीही बोलत नसतानाही तिची खुप काही बोलणारी नजर मी विसरु शकत नाही रोहन.. आय नो जशी मला ती आवडते तसाच मी सुध्दा तिला आवडतो…”

“असेल ना.. पण त्यावेळची परिस्थीती वेगळी होती कबिर.. तेंव्हा राधा एकटी होती, स्वतंत्र होती…”
“अ‍ॅग्रीड.. म्हणुनच तिला एकदा का होईना मला भेटणं महत्वाचं आहे.. पण कसं हेच कळत नाहीए…”

“ओके हे बघ.. तुला राधा म्हणाली होती ना की तुझं पुस्तक पब्लिश झालं की ती नक्की वाचेल?”, थोडावेळ विचार करुन रोहन म्हणाला.
“हो.. म्हणाली होती…”, कबिर..
“बरं, मग एक काम कर.. तुझ्या पुस्तकाच्या शेवटी एक नोट टाक.. लिही की हा पुस्तकाचा शेवट नाही, पण पुस्तकाचा शेवट जाणण्यासाठी कथेचा नायक अजुनही ‘मिरा’ची वाट बघतोय.. तुझा फोन नंबर तर असतोच पुस्तकावर… म्हणजे बघ.. आशय असा लिही, बाकी शब्द काय वापरायचे तुच जास्त जाणतोस.. पण राधाने हे पुस्तक वाचलं तर तिला नक्कीच कळेल की हे पुस्तक तुम्हा दोघांच्या गोष्टीचं आहे.. नशिबात असेल तर ती नक्की फोन करेल..”

“वॉव्व.. दॅट्स ग्रेट आयडीया रोहन.. जर राधाने फोन केला ना मला.. तर तुला काय वाट्टेल ते देईन मी…”
“बाकी आपण पुस्तकाची पब्लिसीटी दणकुन करु.. तुझं पुस्तक लॉंच झालंय हे राधापर्यंत पोहोचलं पाहीजेच.. आणि आपण ते पोहोचवुच..”, रोहन कबिरच्या दंडावर थोपटत म्हणाला..


कबिरचं पुस्तक रोहन म्हणाला तसं खरंच दणक्यात लॉंच झालं. क्रॉसवर्डमध्येही ह्यावेळेस चांगली गर्दी झाली होती. रिडींगच्या वेळेस कबिरची नजर सतत राधाचाच शोध घेत होती..
“कुठे आहेस तु राधा?…प्लिज एकदा.. फक्त एकदा भेट…”, कबिरचे मन आक्रंदत होते..

पब्लिसीटीमध्ये कोणतीही कसर ठेवण्यात आली नव्हती. होर्डींग्ज, लिडींग न्युजपेपर्समध्ये जाहीरात, इव्हन रोहनने कबिरची एक छोटी मुलाखत पण लोकल रेडीओ-एफ-एम वर आयोजीत केली. रेडीओवर पुस्तकाबद्दल बोलताना कबिर प्रचंड नर्व्हस झाला होता. कदाचीत.. कदाचीत त्याचं बोलणं कुठेतरी राधा ऐकत असेल…..

“द हिरो ऑफ द स्टोरी इज स्टील वेटींग फ़ॉर मिरा.. होपींग टु गेट ए कॉल फ़्रॉम हर वन डे…”, शो संपताना सुचक शब्दात कबिर म्हणाला होता.

जे काही शक्य होतं ते दोघांनी मिळुन केलं होतं. आता सर्वकाही नशीबाच्या हातात होतं.


पुस्तक लॉंच झाल्यापासुन साधारण दोन आठवड्यांनी रोहन आनंदाने काही पेपर्स घेऊन कबिरच्या केबिनमध्ये आला..
“कबिर गुड न्युज.. आपली फर्स्ट एडीशन विकली गेली आहेस कुठे?? यु रॉक मॅन.. दुसरी एडीशन ऑन इट्स वे….”

पण कबिरच्या चेहर्‍यावर फारशी उत्सुकता नव्हती…

“तु का असा तेराव्याला आल्यासारखा तोंड करुन बसला आहेस…”, कबिरचा मख्ख चेहरा बघुन रोहन म्हणाला
“मग काय करु.. दोन आठवडे होऊन गेले….”
“तरीही राधाचा फोन नाही.. असंच ना? अरे पुस्तक वाचुन पुर्ण व्हायला तरी वेळ देशील की नाही तिला. असं काय लहान मुलासारखं करतोएस. तुला काय वाटतं, पहिल्याच दिवशी जाऊन तिने तुझं पुस्तक विकत घेतलं असेल आणि एका दिवसांत संपवुन लगेच तुला फोन करायला हवा का?”
“पण मग बाकिच्या लोकांचे कसे फोन येतात मला.. आतापर्यंत शेकडो ‘मिरा’ मला फोन करुन गेल्या.. ऑल फ़ेक.. म्हणे मी मिरा बोलतेय.. तुझ्या पुस्तकातली तुझी मिरा.. ओळखलंस का? एका प्रश्नाचं उत्तर कुणाला देता आलं नाही पण.. काय टाईम-पास वाटतो का लोकांना हा..”

“हा हा हा हा.. हे मात्र फार भारी हं.. लेका सेलेब्रेटी झालास तु…” असं म्हणुन रोहन निघुन गेला.

दिवसांमागुन दिवस जात होते. प्रत्येक दिवसांगणिक कबिरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन वाढत चालले होते आणि एका दिवशी दुपारी त्याचा फोन किणकीणला…

तो आधीच प्रचंड वैतागलेल्या मुड मध्ये होता.. मोनिकाला प्रत्येक वेळी भेटायला नाही म्हणणं त्याला अवघड होतं होतं आणि शेवटी कंटाळुन त्या संध्याकाळी हॉटेलमध्ये भेटायचं त्याने मनाविरुध्द कबुल केलं होतं.

“आता हा फोन जर कुणा खोट्या मिराचा असेल तर तिचं काही खरं नाही..”, मनोमन कबिर म्हणाला आणि त्याने फोन उचलला..

“हॅल्लो…..कोण बोलतंय?”
“मिरा…”, पलिकडुन आवाज आला…

का कुणास ठाऊक, पण कबिरच्या सर्वांगावर शहारा आला. अचानक त्याचे स्नायु आखडले गेले, ह्रुदय दुप्पट वेगाने ब्लड पंप करु लागले, कानाच्या पाळ्या गरम झाल्या….

काहीश्या साशंक स्वरात तो म्हणाला… “राधा?”
पलिकडुन काही क्षण शांततेत गेली आणि मग आवाज आला… “हम्म.. राधा बोलतेय..”

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED