इश्क – (भाग १४) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग १४)

कबिरला पुढे काय बोलावं तेच सुचेना. तो नुसताच फोन कानाला लावुन बसुन राहीला..
“हॅल्लो.. आहेस का?”
“हो.. आहे आहे..”, राधाच्या आवाजाने तो भानावर आला

बहुदा राधाला सुध्दा पुढे काय बोलायचे हे सुचेना, त्यामुळे काही क्षण शांततेत गेले.

“कशी आहेस?”, कबिरने विचारले
“टी.व्ही. बघतोस ना? मग माहीती असेलच की मी काय काय दिवे लावलेत ते..!”, काहीसं हसुन राधा म्हणाली..
“तुझीच चुक आहे.. काय गरज होती त्या दिवशी असं अचानक निघुन जायची. मला थोडा वेळ दिला असतास तर….”
“हे बघ कबिर.. जुन्या गोष्टींबद्दल बोलुन काय उपयोग.. जे झालं ते झालं.. लेट्स मुव्ह ऑन…”
“राधा, मला भेटायचंय तुला.. प्लिज नाही म्हणु नकोस.. तु म्हणशील तेथे, म्हणशील त्या हॉटेलमध्ये…”
“मला पब्लिक-अटेंन्शन नकोय कबिर.. भेटुयात.. पण हॉटेलमध्ये नको…”
“ऑलराईट.. मग कुठे?”
“अं.. तुझ्या घरी? चालेल?”
“येस चालेल.. कधी?”
“आज संध्याकाळी? साधारण ७ वाजता?”
“डन.. मी वाट बघेन..”
“ठिके मग.. व्हॉट्स-अ‍ॅपवर मॅप पाठव.. भेटु संध्याकाळी..”
“ओके.. बाय..”
“बाय….”

फोन बंद झाला तरीही कबिर बर्‍याच वेळ फोन कानाला लावुन बसला. त्याने घड्याळात पाहीले. ३.३० वाजुन गेले होते. कबिरला त्याची लिव्हींग रुम आठवली. प्रचंड पसारा, अस्ताव्यस्त पसरलेले कपडे, पुस्तक, चार्जर्स.. पूर्ण घर एक कचराकुंडी झाली होती.

कबिरने लॅपटॉप बंद केला आणि तो तडक घरी पोहोचला. बाहेरचे कपडे बदलुन त्याने घरातले कपडे घातले आणि घर आवरायला सुरुवात केली. घरातल्या प्रत्येक वस्तुचा त्याला अचानक राग येऊ लागला होता..

“ही.. ही खुर्ची.. ही काय खुर्ची आहे.. गेल्या महीन्यात त्या प्रदर्शनात काय मस्त रिक्लायनर्स होत्या.. त्या घेतल्या असत्या तर..”
“बिन-बॅगमधले थर्माकॉलचे बॉल्स चेपुन ती पुर्ण चपटी झाली होती..”
“कधीकाळी मोनिकाच्या आवडीने घेतलेले सोफा आणि कुशन कव्हर्स फारच भडक आणि ऑड वाटत होते”
“भिंतींवरच्या मॉडर्न-आर्ट्स पेंन्टींग्सच्या फ्रेम्स अगदीच थिल्लर वाटत होत्या..”
“सेंटर-टेबलाचे टवके उडल्याने ते अधीकच जुनाट वाटत होते..”

कबिरला सगळे सामान फेकुन द्यावेसे वाटत होते, पण हे सगळं करायला आज्जीबात वेळ नव्हता. जेव्हढं शक्य होईल तेव्हढं करत त्याने लिव्हींग रुम साफ़ केलं. कोपर्‍यावरच्या फ्लोरीस्टकडुन केशरी आणि पिवळ्या रंगाच्या जर्बेराच्या फुलांचा एक गुच्छ आणलाआणि सेंटर-टेबलावरच्या फुलदाणीत सजवला. अनेक दिवस वापराविना पडुन राहीलेलं रुम-फ्रेशनरचा फवारा मारला. सिडी-प्लेयरवर ‘जगजीतच्या’ गाण्यांची एक सिडी लावली आणि बर्‍यापैकी कपडे करुन तो तयार झाला.

वेळ कसा गेला ते कबिरला कळालेच नाही. घड्याळात ७ वाजुन गेले होते. वातावरणात जणु एक प्रकारचा दबाव असल्यासारखं त्याला वाटत होतं. घड्याळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज सुध्दा स्पष्ट ऐकु येत होता.

“हाथ छूटे भी तो.. रिश्ते नहीं छूटा करते… वक़्त की शाख से… लम्हे नहीं टूटा करते…”

जगजीतसिंगच्या मॅजीकल आवाजाने तो पुरता सुखावला गेला. रेलींगचेअरवर आरामात बसुन डोळे मिटून तो त्या गाण्याचा आनंद घेत होता.

साधारणपणे ७.२०च्या सुमारास त्याच्या दारावरची बेल वाजली तसा तो खाड्कन खुर्चीतुन उठला. बुलेट-ट्रेनपेक्षाही अधीक वेगाने त्याच्या छातीचे ठोके पडत होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. समोर राधा उभी होती. लाल-पांढर्‍या चेक्सचा शर्ट आणि फिक्कट निळ्या रंगाची जिन्स असा साधाच पेहराव तिने केला होता. पण कबिरला ती तितकीच सुंदर भासली जशी त्याला त्या दिवशी हॉटेलमध्ये वाटली होती.

पाठीमागे धरलेल्या हातातल्या फुलांचा गुच्छ कबिरला देत ती म्हणाली.. “तुझ्या पुस्तकाच्या सस्केसबद्दल अभिनंदन…”
त्या फुलांकडे हसुन बघत कबिर म्हणाला… “जर्बेरा…!!”
“हो ! का? हसायला काय झालं?”

दारातुन बाजुला होत, कबिरने सेंटर टेबलाकडे बोट दाखवले..

“छान आहे की रे घर तुझं..” लिव्हींग रुम न्याहाळत राधा म्हणाली.. “मला वाटलं लेखकाचं घरं म्हणजे असं उगाचंच साहीत्य संबंधीचे म्युरर्ल्स, विवीध मान्यवर लेखकांची किंवा त्यांच्या कोट्सच्या फ्रेम्स वगैरे असेल…”

“बस.. काय घेणार?”, कबिरने विचारलं
“काय आहे? स्कॉच?”, राधा
“आहे.. सोडा चालेल?”
“नको, एकच सिक्स्टी कर, ऑन द रॉक्स…”

कबिरने फ्रिजमधुन बर्फ काढला आणि दोन ग्लास आणि स्कॉचची बॉटल घेऊन तो राधाच्या समोरच्या खुर्चीत बसला.

“कसं वाटलं पुस्तक?”, पेग भरुन राधाकडे देत कबिर म्हणाला
“खुप छान. खरंच आवडलं मला, मस्त लिहीलं आहेस. म्हणजे असं उगाच काय म्हणतात ते.. शब्दबंबाळ लेखन न करता नेहमीच्याच, ओघवत्या भाषेत लिहीलंस त्यामुळे वाचायला छान वाटलं…”
“आणि मीरा? आवडली??”
“खुपच लक्ष ठेवुन होतास की तु माझ्यावर.. अगदी माझ्या बारीक-सारीक सवयी पण छान टिपल्या आहेस.. म्हणजे असं मी मला स्वतःला एक त्रयस्थ म्हणुन अनुभवत होते…”
“मग..लेखक म्हणल्यावर ते करावंच लागतं…”
“जे घडलं ते तर तु व्यवस्थीत उतरवलं आहेसच, पण जे नाही घडलं ते पण.. म्हणजे तो किसिंग सिन खरचं इंटेन्स होता बरं का…”

कबिर थोडासा शरमला.. “आय मीन.. कथेसाठी थोडं फार रोमॅन्टीक काही तरी हवंच ना! नाहीतर तेंव्हा तसा रोमांन्स काही नव्हताच तेथे…”

“अहं. अहं.. हा टॉन्ट होता का?”, हसत हसत राधा म्हणाली..

रेकॉर्डरवर ’झुकी झुकी सी नजर’ चालु होते..

राधाने डोळे मिटुन मान मागे करुन काही क्षण त्या गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतला…
“काय आवाज होता यार.. अ‍ॅबस्युलेटली मॅजीकल.. खरंच रोमांच येतात कधी कधी अंगावर…”
..
“इफ़ यु डोन्ट माईंड, थोडा मोठा करु आवाज…”
“कर की.. विचारायचं काय त्यात..”

राधाने गाण्याचा आवाज थोडा मोठा केला..

“यु नो व्हॉट.. माझ्या काही मेमोरीज आहेत ह्या गाण्याच्या.. कॉलेजला असताना ना, रंगपंचमीला, रंग खेळुन झाल्यावर मी, माझा मित्र.. आमच्या दोघांच्या गर्ल-फ्रेंड्स आणि इतर काही मित्र-मैत्रीणी.. आम्ही बाईकवरुन डॅमवर गेलो होतो पाण्यात खेळायला… माझ्या मित्राची गर्लफ्रेंड सॉलीड हॉट होती आणि तिचा आवाजपण इतका मस्त गोड होता. मस्त गाणी म्हणायची..

तर तेथे पाण्यात खेळुन झाल्यावर, सगळे तिला गाणं म्हण, गाणं म्हण म्हणुन मागे लागले होते. मी तेंव्हा ना जरा शाय टाईप्स होतो. जास्ती बोलायचो नाही. मी आपला मान खाली घालुन उभा होतो.

तर ती एकदम माझ्याकडे बघुन म्हणाली.. “ठिके ह्याच्यासाठी मी एक गाणं म्हणते..” आणि तिने तेंव्हा ’झुकी-झुकी सी नजर..’ म्हणलं होतं.

“व्वा.. एक तर एखाद्या हॉट मुलीनं गाणं म्हणावं आणि ते पण.. मित्राच्या गर्लफ्रेंडने.. तु तर एकदम सातवें आसमॉं पर वगैरे असशील की…”

“हो ना… अजुनही हे गाणं लागलं की तो प्रसंग जश्याच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा रहातो..”
“सो त्या दिवशी….”, कबिर पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला.. कबिरने कुणाचा फोन आहे बघीतला आणि कट करुन ठेवुन दिला..

“का रे? घे की फोन…”, राधा म्हणाली
“नथिंग इंम्पॉर्टंट..”
“बघ बघं.. कुठल्यातरी मीराचा असेल फोन…”, राधा हसत म्हणाली..
“खरंच अगं, इतके फोन येत होते नंतर.. त्या दिवशी तुझा फोन आला.. आय वॉज लाइक.. आता हा फोन तुझा नसेल आणि दुसरीच कोणी असेल.. तर तीचं काही खरं नव्हतं…”

“हम्म.. बरं तु काही तरी म्हणत होतास…..”
“हो.. तर त्या दिवशी….”, इतक्यात कबिरचा फोन पुन्हा वाजला..
“अरे खरंच घे फोन.. महत्वाचा असेल…”, राधा..

कबिरने वैतागुन फोन कट केला आणि फोन बंदच करुन टाकला..
“नाही गं.. हेच नेहमीचे स्पॅम कॉल्स.. तर मी म्हणत होतो की त्या दिवशी.. तु गेल्याचं लक्षात आल्यावर.. तुला खुप शोधलं.. बस स्टॅंडपर्यंत जाऊन आलो….”, कबिर

“तु गेला होतास बस स्टॅंडवर…ओह गॉड.. आय वॉज सो राईट..”, राधा
“म्हणजे?”, गोंधळुन कबिर म्हणाला..
“मला माहीती होतं.. तु मला शोधायचा प्रयत्न करशील.. म्हणुन मी मुद्दामच आधी बस-स्टॅंडला गेले आणि तेथुन टॅक्सी बदलुन दुसरीकडे…”, स्वतःवरच खुश होत राधा म्हणाली..
“व्हेरी स्मार्ट..”, काहीसा चिडुन कबिर म्हणाला..

“ए बाय द वे.. सोफी ऑन्टी कश्या आहेत.. त्यांना लिहीलेल पत्र दिलेस का त्यांना? कश्या आहेत त्या? बर्‍या आहेत का आता? तेंव्हा अ‍ॅक्सीडेंट झाला होता…”
“हम्म.. दिलं मी पत्र.. पण त्या ओके होत्या.. बहुतेक त्यांना माहीती होतं तु कधी ना कधी अशी अचानक जाणार म्हणुन..”
“हम्म.. मी फोन करेन त्यांना उद्या..”

“एनिवेज.. बाकी? अनुराग काही म्हणला का भेटल्यावर..?”
“हो.. म्हणाला ना.. बरंच काही म्हणाला.. म्हणजे डायरेक्ट नाही काही बोलला पण..”
“पण? पण काय?”
“तो फ्रांन्सला आहे सध्या.. इथे त्याला माझ्यामुळे फ़ार एम्बॅरस झालं असतं.. सो तो काहीतरी कारण काढुन फ्रान्सला गेला.. आणि वकिलाबरोबर नोटीस पाठवली…”
“कसली?”, खुर्चीच्या काठावर सरकत कबिर म्हणाला..
“डीव्होर्स…”

काही क्षण शांततेत गेले..
“आय डोंन्ट नो व्हॉट टु से? पण आत्ता खरं त्याने तुझ्या पाठीशी रहायला हवं होतं.. म्हणजे त्याचा राग स्वाभावीक आहे.. पण असं एकदम एक्स्ट्रीम होण…”
“कबिर.. अ‍ॅक्च्युअली डीव्होर्सचं कारण वेगळंच आहे..” काहीसं अस्वस्थ होत राधा म्हणाली
“तु त्याला सोडुन गेलीस.. असं पोलिस केस वगैरे हेच ना?”, कबिर
“नाही.. आय मीन तो एक त्याला बहाणा मिळाला, पण.. सोड ना.. सांगीन कधीतरी.. इट्स बिट मोअर पर्सनल…”

“मग? आता?”
“म्हणजे तो आत्ता लगेच केस फाईल करणार नाहीए.. कदाचीत हे प्रकरण निवळलं की.. नाहीतर आत्ता ही डिव्होर्स केस त्याच्या विरोधात जाईल.. रागाच्या भरात घेतलेला निर्णय न्यायालयात मान्य नाही होणार… पण मी आता त्या घरात नाही राहु शकत…”
“तु परत गायब होणार की काय मग?”
“आय विश कबिर.. पण ते शक्य नाहीए.. माझ्यावर ’अ‍ॅटेम्प्ट ऑफ़ मर्डरची’ केस आहे, मला पोलिस-स्टेशनला दोन आठवड्यातुन एकदा रिपोर्ट करायला सांगीतलं आहे.. शिवाय.. पोलिसांच्या परवानगीशिवाय मला शहर सोडता येणार नाहिए.. सो आय एम रिअली स्टक…”
“दॅट्स सॅड राधा.. पण हे नक्की झालं कश्यामुळे…?”

कबिरला सोडुन बाहेर पडल्यानंतरपासुन ते आत्तापर्यंतचा सगळा प्रवास राधाने कबिरला ऐकवला. कधी आनंद, कधी एस्काईटमेंट, कधी भिती, कधी चिंता.. राधाच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते.. आणि कबिर??..

कबिर अधीकाधीक तिच्या प्रेमात बुडत चालला होता.

अनुरागच्या घरी आल्यानंतर तिला किती एकटं वाटत होतं आणि घरातले नोकर-चाकर कसं तिला हिडीस-फिडीस करत होते हे ऐकल्यावर कबिरला राहावलंच नाही, त्याने आतातला ग्लास खाली ठेवला, उठुन राधाच्या जवळ गेला आणि आवेगाने तिला मिठीत घेतलं…

“स्टॉप राधा.. प्लिज स्टॉप.. मी अधीक नाही ऐकु शकत.. प्लिज स्टॉप…”

महीन्यानंतर राधाला पहिल्यांदा कुणी जवळ घेतलं होतं. तिचा नवरा.. तिचे आई-वडील.. तिचे सो-कॉल्ड हाय-सोसायटीमधले मित्र-मैत्रीणी, सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. राधा खरोखरंच एकटी पडली होती. कबिरची ती उबदार मिठी ती झिडकारु शकली नाही. तिच्या डोळ्यांतुन अश्रु वाहु लागले आणि त्याच वेळी लिव्हींग रुमचं दार उघडल्याचा आवाज आला.

दोघांनीही मागे वळुन बघीतलं.. दारामध्ये ऑलीव्ह रंगाचा पार्टी-वेअर घातलेली एक छोट्या चणीची मुलगी उभी होती…
“मोनिका???”, कबिर आश्चर्याने म्हणाला..


मोनिकाने एकवार राधाकडे बघीतलं आणि मग ती कबिरला म्हणाली.. “ओह सॉरी.. मी डिस्टर्ब केलं का?”

कबिर काहीच बोलला नाही..
“सांगायचंस ना मग तसं.. मी निदान वाट तरी नसते बघत बसले…”, मोनिका
“तु माझी वाट बघत होतीस?”
“कुल.. सो आज आपली डेट होती हे पण तु विसरलास का? आणि ते पण हिच्यासाठी…” राधाकडे बोट दाखवत मोनिका म्हणाली.. “ब्लडी जंकी आणि क्रिमीनल बिच…”

“स्टॉप इट मोनिका.. यु ओन्ली नो हाफ़ ट्रुथ…”, कबिर चवताळुन म्हणाला..
“तरीच म्हणलं हा फोन का बंद करुन बसलाय…. यु रिअली डोन्ट डिझर्व्ह मी कबिर.. गुड बाय.. आणि हो.. ही तुझ्या फ्लॅटची किल्ली जी इतकी वर्ष मी जपुन ठेवली होती.. आय गेस.. मला आता त्याची गरज नाही..”

कबिर काही बोलायच्या आधीच मोनिका दार आपटुन निघुन गेली….

“तुझी गर्लफ्रेंड?”, राधा
“होती.. आम्ही लिव्ह-इन मध्ये होतो काही वर्षांपुर्वी, देन वुई ब्रोक-अप..”, कबिर
“पण आत्ता तुमची डेट होती ना..”
“मला तसंही जायची इच्छा नव्हतीच.. पण खरं तर मी विसरुन गेलो होतो..”
“दॅट्स नॉट गुड कबिर.. जा थांबव तिला.. मी.. जातेय… बाय…”
“थांब राधा..मोनिका गेली तर जाऊ देत, तसंही आमच्यात आता काही नाहीए, आणि भविष्यात काही होईल असेही वाटत नाही.. इट्स गुड फ़ॉर हर खरं तर….”

“हे बघ कबिर.. विषय निघालाच आहे तर बोलते.. आपल्या दोघांतही तसं काही नाहीए, आणि भविष्यात काही होईल असेही वाटत नाही.. सो.. इट्स गुड फ़ॉर यु अलसो टु नो इट…”
“पण का राधा? आता तर तु आणि अनुराग सुध्दा वेगळे होताय.. मग काय प्रॉब्लेम आहे..”

“कबिर, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही, मला असं वाटतंय की तु मोनिकाला थांबव.. निदान तिची माफ़ी माग. इट्स नॉट गुड टु किप अ गर्ल वेटींग अ‍ॅन्ड देन कॅन्सल द डेट.. बी अ जेंटलमन.. मे बी ती माफ़ करेल.. मे बी तुम्ही एकत्र याल.. माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नकोत.. आपण नंतर बोलु… ” असं म्हणुन कबिरला पुढे काही बोलु न देता राधा बाहेर पडली..

कबिरला काय करावं तेच कळेना.. मोनिकाच्या मागे जाऊन तिला थांबवावं का राधाच्या?

कोपर्‍यातल्या बारवर ठेवलेली स्कॉचची बॉटल कबिरला अधीक खुणावत होती..
“कम टु मी डिअर.. यु निड मी मोर दॅन एनीथींग एल्स…”

कबिरने हताशपणे हवेत हात हलवले आणि त्याने स्कॉचची बॉटल तोंडाला लावली.
स्ट्रॉंग स्कॉच कबिरचा घसा जाळत पोटामध्ये उतरत होती..

बट देअर वॉज समथींग एल्स दॅट वॉज बर्निंग मोर दॅन हीज थ्रोट.. इट वॉज हीज हार्ट…

[क्रमशः]