24. Rajasthan - land of king - 6 books and stories free download online pdf in Marathi

२४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६

२४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६

* राजस्थान प्रेक्षणीय स्थळे-

५. जोधपुर- "द ब्लू सिटी"

जोधपुर ह्या जागेला "गेटवे टू थर" सुद्धा म्हणले जाते. जोधपुर निळ्या इमारतींसाठी, तिथल्या मिठाई, किल्ले, शानदार महाल आणि मंदिरे ह्यांसाठी पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. इथे बरीच घरे निळ्या रंगात आहेत त्यामुळे जोधपूरला ब्लू सिटी सुद्धा म्हणले जाते. इथे सूर्य नेहमीच तळपत असतो त्यामुळे जोधपुर ला "सूर्य नगरी" सुद्धा म्हणले जाते. जोधपुर राजस्थान मधले दुसरे मोठे शहर आहे. आणि इथली लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे त्यामुळे जोधपुरला महानगर म्हणून घोषित केले गेले. २०१४ मध्ये जोधपुर ला "मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेसेस ऑफ़ द वर्ल्ड" मध्ये प्रथम स्थान मिळाले होते. जोधपुर मध्ये पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बऱ्याच जागा आहेत.

*मेहरानगड किल्ला- मेहरानगड किल्ला जोधपुर शहरच प्रमुख आकर्षण आहे. हा खूप जुना किल्ला इतका विशाल आणि भव्य आहे की पूर्ण किल्ला नीट पाहण्यासाठी खूप दिवस लागू शकतात. ह्या किल्ल्यामध्ये पर्यटकांसाठी खास इमारती आहेत. त्यात मोती महाल, फुलमहाल, सुख महाल, शीश महाल, दौलत खाना , सिलेह खाना ह्यांचा समावेश आहे. हा किल्ला भारताच्या समृद्धशाली इतिहास दर्शवतो. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी हे ह्या किल्ल्याच वैशिष्ट आहे. ह्या किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहेत. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. ह्या किल्ल्यावरून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरुन शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेस पडतात आणि ब्लू सिटी हे नाव योग्य वाटते. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे आणि आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली पार पडत अस सांगितलं जात. महालातील संग्रहालयात पुरातन पालख्या, हौदे, पाळणे, शस्त्र, कपडे, लघु चित्रे यांचे संग्रह आकर्षकपणे मांडलेले आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच किरात सिंह सोडा या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पावलेल्या सैनिकाची छत्री आहे. प्रवेश करून आत गेल्यावर जयपूरच्या सैन्याने हल्ला करताना बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भिंतीवरील भोके तसेच एक निखळून पडलेला दरवाजा अजूनही दिसतो. असा हा विशाल किल्ला दिमाखाने जोधपुर मध्ये उभा आहे.

* जसवंत थडा- जोधपुर मध्ये मेहरानगड किल्ल्या जवळ पांढऱ्या संगमरवराचे स्मारक आहे ज्याला जसवंत थडा म्हणतात. हे इतके सुंदर आहे की ह्याला जोधपूरचा ताज महाल म्हणून ओळखले जाते. ही जागा पर्यटकांची आवडती जागा बनते आहे. महाराजा सरदार सिंह यांनी १८९९ मध्ये जोधपुर चे राजा जसवंत सिंह द्वितीय (1888-1895) यांच्या आठवणी साठी बांधले होते. हे स्थान राजपरिवारातील लोकांच्या अंत्यविधी साठी सुरक्षित ठेवले आहे. ह्या विशाल स्मारकात भिंती मध्ये अश्या संगमरवरी शीला आहेत ज्यातून सूर्यप्रकाश आर पार जातो. ह्या स्मारकासाठी जोधपुर पासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या मकराना मधून संगमरवर आणले होते. ह्या स्मारकाच्या जवळ झील आहे ज्यामुळे जसवंत थडाच सौंदर्य अधिकच खुलून येते. ह्या झील च निर्माण महाराजा अभय सिंह यांनी १७२४-१७४९ ई मध्ये केल होत. स्मारकाच्या आत सुंदर नक्षीकाम आहे. संगमरावराच्या ह्या स्मारकात राजस्थानी शैलीचा वापर केला गेला आहे. पण काही भगर मुघल शैलीचा सुद्धा वापर झालेला आढळून येईल. ह्या परिसरात हिरवळ सुद्धा आहे. जेथे बसून हे अद्भुत स्मारक पाहता येते. स्मारका जवळ स्मशान सुद्धा आहे जिथे राज परिवारातील सदस्यांचा अंत्या संस्कार केला जायचा. "ताज महाल ऑफ मारवार" म्हणून ओळखले जाणारे हे स्मारक पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतांना दिसते.

* उम्मेद भवन पॅलेस- मेहरानगड किल्ल्या नंतर उम्मेद भवन जोधपुर मधला सगळ्यात मोठा महाल आहे. ह्या महालाच नाव राजा उम्मेद सिंह ह्यांच्या नावावरून पडले आहे. हा महाल चित्तर पर्वतावर असल्यामुळे जेव्हा हा महाल बांधला जात होता तेव्हा 'चित्तर महाल' म्हणून ओळखला जात होता. ह्या महालात एक संग्रहालय पण आहे. हा महाल बनवण्यासाठी १६ वर्षांचा काळ गेला होता. दुष्काळात लोकांना रोजगार मिळावा म्हणून हा महाल बांधला गेला. इथे ताज ग्रुप च हॉटेल आहे जे जगातल उत्कृष्ट हॉटेल म्हणून ओळखले जाते. ह्या हॉटेल ला "बेस्ट हॉटेल इन द वर्ल्ड" असा ट्रॅव्हलर चॉइस अवार्ड मिळाल आहे. हा महाल १९४३ मध्ये बांधला गेला आणि आजही इथे इथे शाही लग्न सुद्धा पार पडतात. आताच्या घडीला उम्मेद भवन मध्ये ३४७ खोल्या आहेत ज्या ३ भागात विभागल्या आहेत. एका भागात राजा गज सिंग यांचा शाही परिवार राहतो. तिथे पर्यटकांना जाता येत नाही. दुसऱ्या भागात संग्रहालय आहे. जिथे फोटोग्राफ्स, घड्याळ, युद्ध सामुग्री, स्टफ्ड प्राणी आणि शाही परिवाराच्या इतर वस्तू आहेत. आणि तिसऱ्या भागात ५ स्टार हॉटेल आहे. जे जोधपुर मधले अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे. हा महाल तर सुंदर आहेच पण महालाच्या बाजूला बाग आहे जी हिरवीगार असते आणि तिथे बऱ्याच प्रकारची फुलं झाडे सुद्धा आहेत. ही बाग महालाचे सौंदर्य अधिकच खुलवते. ऑक्टोबर ते मार्च इथे भेट देण्यासाठी उत्तम वेळ असते. अतिशय सुंदर असे उम्मेद भवन पाहण्याची इच्छा प्रत्येक पर्यटकाची असते.

* मंडोर गार्डन- जोधपुर मधले प्रसिद्ध उद्यान अशी ओळख असलेले मंडोर गार्डन. अतिशय सुंदर असे हे गार्डन आहे. त्यामुळे ही जागा पर्यटकांची आवडती जागा आहे. मंडोर चा इतिहास ६वी शताब्दी च्या वेळेचा आहे जो जोधपुर निर्माण होण्याच्या आधीचा आहे. इथली वास्तुकला वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे गार्डन जोधपुरच्या उत्तर दिशेला फक्त ९ किलोमीटर अंतरावर स्थित आहे जी मारवाड च्या राजांची पूर्व राजधानी होती. मंडोर गार्डन हा मेहरानगड चा हिस्सा आहे आणि ३०० दशलक्ष देवांना समर्पित मंदिर सुद्धा इथे आहे. ह्या उद्यानात एक सरकारी संग्रहालय सुद्धा आहे ज्यात कलाकृती आणि जुन्या अवशेषांचा समावेश आहे. आणि हेच देश विदेशी पर्यटकांच विशेष आकर्षण आहे. हे उद्यान वाळवंटा जवळ असल्यामुळे उन्हाळ्यात इथे उन्हाची तीव्रता अधिक असते जी सहन होत नाही. त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हा काळ इथे भेट देण्यासाठी उत्तम असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात मंडोर गार्डनला भेट देण्यासाठी योग्य काळ आहे.

* फ्लाईंग फॉक्स- जोधपुर मध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवता येतात. राजवाडे, गार्डन, स्मारके, विशाल किल्ला पण त्याच बरोबर जोधपुर ला फ्लाईंग फॉक्स चा अनुभव सुद्धा घेता येतो. फ्लाईंग फॉक्स मध्ये पक्ष्याप्रमाणे उडत पूर्ण शहर आकाशातून अनुभवता येते. म्हणजेच झिपलाइन सफारीचा आनंद इथे घेता येतो. अत्यंत रोमांचकारी असा हा अनुभव जोधपुर मधले वास्तव्य वेगळे करतो. उन्हाळ्यात मात्र १ महिना हे बंद असते. ह्या सफारीचा आनंद देशी आणि विदेशी पर्यटक नेहमीच घेतांना दिसतात. ज्यांना साहसी खेळ आवडतात असे पर्यटक इथे आकर्षित होतात. इथे पर्यटकांच्या सुरक्षेची नीट काळजी घेतली जाते. ही टूर २०१० पासून चालू झाली आणि आजपर्यंत अनेक समाधानी पर्यटकांनी फ्लाईंग फॉक्सचा आनंद घेतला आहे. ह्या फ्लाईंग फॉक्स मधून शहराचे आणि मेहरानगड किल्ल्याचे नयनरम्य दर्शन होते. असा हा वेगळाच अनुभव इथे घेता येतो. ऑनलाईन बुकिंग केले तर मोठ्यांना १७०० आणि लहानांना १५०० रुपये भरावे लागतात. जर तिथे जाऊन बुकिंग केले तर १८९९ रुपये भरावे लागतात. ह्या जागेत फ्लाईंग फॉक्स काही वेगळाच अनुभव देऊन जातो हे मात्र नक्की!

* राव जोधा डेजर्ट रॉक पार्क- हे पार्क २००६ मध्ये मेहरानगड किलल्याच्या बाजूला बनवले गेले होते. हे पार्क बनवण्याचा मुख्य हेतू नैसर्गिक पर्यावरण जपणे हा होता. आणि हे पार्क आजच्या घडीला पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. ह्या खडकाळ भागात सुमारे २०० झाड आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान इथे रोपे लावली जातात. इथे झाडांची माहिती देण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. जोधपुर ची हवा आणि हा परिसर सुंदर ठेवण्यात तिथल्या स्थानिकांचे कष्ट आणि इच्छा येते दिसून येते.

जोधपुर हे सर्वागांनी पर्यटनासाठी एक उत्तम जागा आहे. इथे वेगवेगळे अनुभव घेता येतात. इथला पतंग उत्सव विशेष प्रसिद्ध आहे. ह्या पतंग उत्सवाची मजा घेण्यासाठी देश विदेशातून पर्यटक उत्सुक असतात. जोधपुर मधले मारवार फेस्टिवल आणि फ्लेमोको आणि गीप्सी फेस्टिवल सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. जोधपुर मधले अनेक किल्ले, रोहट किल्ला, लुनी किल्ला इत्यादी सुद्धा प्रसिद्ध आहेत. इथेले घंटाघर जवळ असलेले सरदार मार्केट खरेदीसाठी उत्तम आहे. इथे विविध प्रकारच्या वस्तू, चामडी बूट, दागिने, बांगड्या, पर्स इत्यादी सुंदर वस्तू मिळतात. असे हे जोधपुर पर्यटकांच्या पसंतीस नेहमीच उतरते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED