Anand milvayche panchvish tips books and stories free download online pdf in Marathi

आनंद मिळवायचे पंचवीस टिप्स

माणूसाला आनंद फार फार महत्वाचा आहे. माणूस आनंद मिळावायला जन्म भर प्रयत्न करत असतो. खाली लिहिलेले टिप्स उपयोगी पडतील.

हे करा.

१.सरळ, साधे ,प्रामाणिकपणाने जगा.

सरळ,साधे माणसाला लोक फसवण्याची शक्यता आहे. आपण शक्यतो तेवढे काळजी घेतली तर कुठल्याही समस्या उद्भवणार नाही.

प्रामाणिक पणाने जगणे हा एक अती उत्तम गुण आहे. नोकरी करताना कामा बद्द्ल प्रामाणिक राहले तर बाँँस खुश राहतील. त्यांच्या विश्वास वाढेल.

२.जमेल तेवढे दुसऱ्यांना पैसेनी किंवा कष्टांनी मदत करा.

आपल्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही आहेत, तसे दूसरांचा जीवनात पण ते असणारच. आपण जर त्यांच्या दुःखात, पैसेनी किंवा कष्टाने मदत केली तर किती छान होईल.

३.क्रोधाला हतोटीत ठेवा.

क्रोध किंवा राग आपण कंट्रोल मधे ठेवायलाच पाहिजे. हा अवगुण आपल्या षड्रिपु म्हणजे ६ शत्रूत एक आहे. क्रोधाने काही साधू शकत नाही. संत कधीही चिडत नसतो. आपण संत काही होवू शकत नाही. तरीही त्यांच्या मार्गाने जायला हरकत नाही.

४.नेहमी सत्संगतीत वेळ घालवा .

वाईट संगती वाईटच असणार. सत्संगात नक्कीच आनंद मिळणार, हे लक्षात ठेवा.

५.जे मिळालेले आहे त्यात समाधान माना .

हा फार महत्वाचा सल्ला आहे. हाव रोज वाढतच जातो. आज महीना 15000 रु पगार आहे तर 20000 रु पाहिजे वाटतो.20 हजार असेल तर 25000 असे वाढतच जातो. म्हणून जास्त हाव करूनये.

1 BHK असेल तर 2 BHK किंवा बंगला पाहिजे असे वाटते. असेच 2 व्हीलर असेल तर 4 व्हीलर पाहिजे.

मग त्यांच्या साठी कर्ज काढून आयुष्य भर जगणे म्हणजे आनंद न मिळविता दुःखच मिळवणार.

६.चांगले पुस्तक/ग्रंथ वाचा.

पुस्तक चाँगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात. लक्षात ठेवा, चांगले पुस्तक वाचले तरच आनंद मिळतो.

७.रम्य,सुंदर स्थळ पाहा आणि मजा लुटा .

महाबळेश्वर, गोवा,कोकण इत्यादि निसर्गरम्य स्थळ पहाण्यात खूप आनंद मिळतो.

८.चांगले मित्र,मैत्रिणी बरोबर गप्पा गोष्टी करून फ्रेश व्हा .

गप्पा मारणे हे मला मुळीच आवडत ऩाही, तरीही गप्पा गोष्टी करून माणूस फ्रेश होवू शकतो, पण ते मर्यादित असायला हवी आणि दूसरांचे मन न दुखवता आनंद मिऴविणाचे हेतू असायला पाहिजे.

९.छान छान कविता , गोष्टी , शायरी लिहा आणि मीडियावर शेर करा.

मात्रुभारती खूप छान ऍप आहे. चांगले लेख लिहा.

१०.चित्रकलेची आवड असेल तर सुंदर चित्र, कार्टून काढा .चांगले पेंटिंग रंगवा .

कँपुटर वापरून चांगले पेंटिंग करा. पूर्ण झाल्या वर सेल्फी काढून मला पाठवा, तुमचा आनंदित चेहरा पहायला.

११.चांगले गाणे ऐका/म्हणा.

य़ू ट्यूब सारखा फुकट आनंद देणारा चाॅनेल असताना काळजी का करावी? जुने गाणे ऐका, नाटक, सिनेमा जे पाहिजे ते बघा आणि आनंद मिळवा.

१२.मनसोक्त डान्स करा येत असेल तर.

डान्सिंग नी आनंदतर मिळतोच, तब्येत पण तंदरुस्त राहती.

१३. दिनचरी बनवून नेमाने पाळा .

आळस सोडून नियम पाळावे, नियम पाळून शिस्त शिकावी,, आणि शिस्तीने वागून जीवनास मनोहर घाट द्यावा असे श्री समर्थानी 400 वर्षा पूर्वी सांगितलेेले आहेत.

१४.सतत देवाचे नामस्मरण करा.

हे करू नका.

१५.कधीही खोटं बोलू नका.

१६.कधीही,कोणावरही ,कुठलंही कारणाने चिडू नका.

१७.कोणाशीही भांडु नका.

१८.कोणाकडून कश्याचाही अपेक्षा करू नका.

१९.हाव करू नका.

२०.लोभी होऊ नका.

२१.कोणावरही, कश्यावरही अति मोह करू नका.

२२.निष्फळ वाद करून वेळ वाया घालू नका.

२३. मद करू नका.

हा पण मोठा दुर्गुण आहे. ह्याला मारूनच काढा म्हणजे तुम्हाला आनंद नक्कीच मिळेल.

२४.कोणाचाही मत्सर किंवा व्देष करू नका.

२५.' अति सर्वत्र वर्जियेत ' हे लक्षात ठेवून जास्त खाऊ नका,बोलू नका, झोपू नका.

तुम्हाला खूप खूप आनंद मिळू दे असे शुभेच्छा देतो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED