मध्यम वर्गीय कुटुंब आनंदाने कसे जगावे? vinayak mandrawadker द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मध्यम वर्गीय कुटुंब आनंदाने कसे जगावे?

आपल्या भारतात मध्यम वर्गीय कुटुंब ८० टक्के आहेत.१० टक्के खूप श्रीमंत , उरलेले १० टक्के खूप गरीब आहेत. म्हणून मध्यम वर्गीय कुटुंबातील आनंदाबद्दल आपण विचार करणार आहोत.

आपण पहिल्यांदा आनंद म्हणजे काय हे बघू या.समजा मला अत्ता नोकरी पाहिजे कारण नोकरीत पैसा मिळेल, त्या पैसेनी मला जे हवे ते घेवू शकतो. ते वस्तु घेतल्यावर मला आनंद होतो. आनंद मनाला होतो. म्हणजे आनंद हे काही वस्तु नाही, ते फक्त मनाला वाटणारी एक भावना आहे. ते फक्त अनुभवावा लागतो. उदाहरणार्थ कार पाहिजे, ते घेतली कि आनंद होतो. पैसे जास्त नसल्यामुळे कमी किमतीच कार घ्याव लागतो, तेंव्हा मनाला कमी आनंद होतो. तसेच घरच्या बाबतीत सुध्दा.

दूसरा प्रकारचा आनंद पाहूया. मला बि.ई. झाल्यावर नोकरी माझे गाव कलबुर्गी जवळ शहाबाद मधे ए.सि.सि. कंपनीत पाहीजे होत,पण नाही मिळाली.दुःखी झालो. सहा महीने नंतर जेंव्हा नाशिक ला नोकरी मिळाली, आनंदानी गेलो. असे आनंद कमी जास्त प्रमाणात मिळत असतो. आपले सर्व कर्म दुःख किंव्हा सुख/आनंद देत असतात किंव्हा आपण मानून घेत असतो. हे नीट समजून घेणे फार महत्वाचा आहे.

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज (चरिञ आणि वाङ्मय) सांगतात असेः

1. खरा आनंद हा वस्तूंमधे नसून वस्तूच्या पलीकडे आहे.

2. मनुष्य आनंदासाठीं न जगता वस्तूसाठीं जगतो.वस्तु ही सत्य नसल्यामुळें तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. वर दिलेल्या पहली उदाहरणात, माझ्या मुलानी पाच सहा गाड्या बदलली. आनंद मिळाला आणि संपला सुद्दाा..

तसेच दूसरी उदाहरणात, मी वेगळे वेगळे कारणामुळे सात आठ नोकरी बदललो. नोकरी सोडताना दुुःख किंव्हा काळजी, आणि नोकरी धरताना आनंद किंव्हा सुख अनुभवलो. सांगायचा हेतू हेच कि वस्तू किव्हा घटणेवरून मिळालेली आनंद अशाश्वत असतो.

3. एखाद्या आंधळ्या माणसानें साखर समजून जर मीठ खाल्लें तर ते खारट लागल्यावाचून राहणार नाहीं. त्याच प्रमाणें आनंद मिळेल या कल्पनेनें आपण विषयाची संगत धरली, पण त्या पासून दुःखच प्राप्त होणार.

4. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले कीं जीवनात आनंद उत्पन्न होतो. असे कर्म करा की, जे बंधनाला कारण न होता भगवंताकडे नेईल.

5. केंव्हाहि आणि कोठेहि पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचच त्याचप्रमाणें परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचच असे समजावे.

6. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल.

7. दुःख करणे किंव्हा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे, ज्या माणुसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानासुध्दा आनंदात राहू शकेल.

8. रोज अगदी पाचच मिनिटे भगवंताशी अनन्य व्हायला शिका; अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली तर जसा खरा आनंद मिळतो तसेच येथे आहे.

अत्ता आपण व्यवहारात आनंद कसे मिळवायचे हे पाहूया.

1. कधीहि खोटे बोलू नका.

2. निस्वार्थ आणि निरपेक्ष बुद्धीने दूसरांचे काम करा.

3. नेहमी डोक शांत ठेवा.

4. गरीबाना व दुःखी लोकाना मदत करा.

5. होईल तेवढे अन्नदान करा.

6. कोणत्याही कारणाने कोणालाही दुखवूनका.

7.दुसऱ्या ना पैसेनी बुडवूनका.

8. कधीही चिडू नका. कोणत्याही कारणानी कोणावरही रागूनका.

9. जास्त हाव करूनका.

10. लोभी होऊ नका.

11.पैसा आल म्हणून माजू नका.

12. आहे त्या परिस्थितीत समाधान माना.

जिथे षड्रिपु आहेत तिथे समाधान आणि आनंद येणारच नाही. म्हणून त्याना जिंका. असमाधान, अशांती, दुःख, अज्ञान ह्यांच्यातून मुक्त होवून समाधान, शांती, सुख,ज्ञान मिळवून आनंद, परमानंद मिळवा.