देवानी काय दिले आहे? vinayak mandrawadker द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवानी काय दिले आहे?

देवानी काय दिले आहे?
नेहमीच असा विचार करत असतो की देवानी आपल्याला हे दिली नाही, ते दिली नाही . उदाहरणार्थ नोकरी, घर,गाडी, बायको, पैसा वगैरे, वगैरे. असा विचारामुळे खूप माणसे, नेहमीच रडत असताना दिसतात।
'नाही' एक नकारात्मक विचार आहे आणि 'आहेे' हे एक सकारात्मक विचार आहे. आपण नेेेहेमी सकारात्मक विचार करायला पाहिजे, पण करत नाही. जे सकारात्मक विचार करतात तेे कधीच दुःखी होणार नाही. हे आता आपण सविस्तर पाहूया.
रमेश माझा एक चांगला मित्र आहे. तो एक IT कंपनीत प्रोजेक्ट मँनेजर असून पगार वर्षाचे १२ लाख रुपये आहे. तरीही तो म्हणतो की पगार कमी आहे म्हणून दूसरा जाँब शोधत असतो. घरी फक्त चार माणसे. तुम्ही सांगा, एवढे पगार कमी आहे का?
कमी किंवा जास्त, हे दूसर्या चे पगारा बरोबर तुलना केल्यानंतर कळते. रमेश जास्त पगारा बरोबर तुलना केला म्हणून त्याचे १२ लाख कमी वाटले. हे जर कमी पगारा बरोबर केला असता तर हेच १२ लाख जास्त झाले असते. मला २० लाख पगार मिळत नाही म्हणून रडणे बरोबर कि १२ लााख पगार मिळते म्हणून आनंदी राहणे बरोबर ते तुम्हीच सांगा.
अनिरुद्ध देशमुख, आरुंधती सारखी सुंदर, सुशील, सुस्वभावी, समंजस बायको असताना दूसरी बायकोला शोधून लग्न करायला लागला तर, तो कसे सुखी आणि आनंदी राहणार? अनिरुद्ध ला अरुंंधतीत असलेलेे चांगले गुण ओळखून आनंदी राहायचा की नसलेले गुुणाबद्दल दुःख करत राहायचं,
ते तुम्ही सांगा. आपण लग्नानंतर एकमेकांना चांगले ओळखून, तडजोड करून जगणे हेच जीवन आहे. असे मला वाटते.
माझा मित्र सुरेश ट्रेडिंग करत असतो. रोज शेअर मधे उलाढाल चालू असते. आज १०० शेअर घ्यायचे, उद्या विकायचे.असे जास्त पैसे कमी वेळेत कमविण्यासाठी धडपड धडपड करायचे. पण किती? हे लक्षात येतच नाही. एकेदिवशी मार्केट कोसळला आणि पैसे बुडाले की डोळे उघडतात. हाव किती करायचा? स्वतः ला कळायला पाहिजे. पैसे साठी मरमर एका विशिष्ट वयापर्यंत करावे.थोडक्यात संतोषी,समाधानी राहावेे.
मैदासची गोष्टी माहित असेेेलच.तो एक राजा असूनही, देवाला म्हणतो,कुठल्याही वस्तूला त्यांनी हात लावला की ते सोने ह्वायला पाहिजे. देव म्हणतो तथास्तु. सिंहासनाला हात लावला. सोन्याच्या झाला. खांबेला हात लावला, सोन्याच्या झाला. पाणी चा ग्लास सोन्याची झाली. पाणी तोंडाला लागला की सोन्याची झाली.खेळत असलेली मुलगी जवळ आली, हात लावला, ती झाली सोन्याची.मग मैदासचे डोळे उघडले. खूप रडायला लागला. क्षमा मागितली. देवानी मोठ्या मनाने माफ केला. मुलीला जीवंत केला. म्हणून आपण हाव करूनये, कशाचही.
आता आपण मुला बद्दल विचार करूया. चांगले मुले असेल तर प्रश्नच नाही. सुख, शांती, समाधान आपोआपच मिळते. पण, मुल वाईट संगतीने बिघडले तर, आपण त्यांना समजावून त्यांना सुधारणे, हे आपले कर्तव्य आहे.जर ,कितीही प्रयत्न करून ही यशस्वी नाही झलो तर वाईट वाटून घेवू नये.आपण पण आई,वडिलांना सुख,शांती, समाधान दिली नाही,म्हणून हे परत फेड चालू आहे, असे समजून घ्यावी. आपले कर्तव्य न चुकता करावे.
नकारात्मक विचार येवू देवूनका.नेहमी सकारात्मक विचार करा.तसे प्रयत्न तरी करा.यश नक्कीच मिळेल.
योग,व्यायाम करा.हसण्याचा क्लब जोईन करा.चिडूनका.रागवू नका. ओरडू नका.षड्ररिपुना ताब्यात ठेवा. म्हणजेे नक्की यशस्वी व्हाल.
असे मला वाटते.
आता बुद्धी बद्दल विचार करू या. देवानी सर्वांना बुद्धी दिलेला असतो. बुद्धी नसलेले लोक फार कमी असतात. पण बुद्धी वापर करण्याचा काम आपल्याला करावा लागतो.बुद्धीत २ प्रकार आहेत.एक सद्बुद्धी दूसरी दुर्बुद्धी. सद्बुद्धी यायला सत्संग ठेवायला पाहिजे.चांगले ग्रंथ वाचून आचरणात आणावे. वाईट संगत असल की दुर्बुद्धी सुचते.
म्हणून सत्संगातच आणि नामस्मरणात जीवन संपवावे.
श्री राम जयराम जयजय राम