टेन्शन vinayak mandrawadker द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

टेन्शन

टेन्शन
मित्रांनो टेन्शन हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा अर्थ मराठी मधे ताण असे म्हणतात. हे सर्वांना माहिती आहे. तू टेन्शन का देतो, मी टेन्शन घेत नाही, मला टेन्शन येतो इत्यादी वाक्य रोज ऐकू येतात. माझ्या मनात एक विचार आला, खरच टेन्शन खूप त्रास देणारी विषय आहे का? माझे मते नाही. तुम्ही म्हणाल की कसे काय?
त्या अगोदर आपण टेन्शन बद्दल थोडी माहिती करून घेवू. समजा आपण एक दोरी डाव्या हातात धरून उजव्या हाताने ओढले तर दोरी ताणले जाते. दोरीत टेन्शन निर्माण झालेला असतो. जास्त खेचले तर दोरी तुटून जाते. असेच बराच प्रसंगी व्यवहारात बोलण्यात येत की अरे जास्त ताणू नको नाही तर नात तुटून जाईल.
आता आँफीस चा कामामुळे टेन्शन येते. कामात चूक झाले तर टेन्शन, खूप काम आले तर टेन्शन, परीक्षेच्या पेपर कठीण आले तर टेन्शन, रिजल्ट लागणारा दिवशी टेन्शन, पदवी मिळाल्या वर टेन्शन, नोकरी मिळाली तरी टेन्शन, नाही मिळाली तरी टेन्शन, लग्न ठरले तर टेन्शन, लग्न झाल्यावर टेन्शन, बायको गरोदर राहली तरी टेन्शन, नाही राहली तरी टेन्शन.टेन्शन च टेन्शन.
मुल नाही झाले तरी टेन्शन, झाले तरी टेन्शन. मुल झाल्यावर टेन्शन आयुष्यभर राहणार असते. असे आपण जन्मापासून मरेपर्यंत टेंशन चा वातावरणात जगत असतो.हे बरोबर आहे का? कधीतरी विचार केला का?
गम्मत म्हणून सांगतो, आमचे दोन घर आहेत. दूसऱ्या घरात मी येवून जावून असतो. दूसऱ्या घरातून पहिल्या घरात गेल्या बरोबर बायको म्हणती 'टेन्शन' आल. मी म्हणजे तिला टेन्शन येतो. कशाच? स्वयंपाकाचा. काय करायचं काय नाही. कारण मला खायला वेळेवर लागतो.असो.मूळ मुद्यावर जावू.
तुम्हाला सांगतो, मी ७३ वर्षाचा आहे. आत्ता पर्यंत एकदा तरी टेन्शन घेतलेली आठवत नाही. कारण मी माझ्या सगळे प्रश्न सद्गुरू वर सोपवलेली आहे.
तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे?
दोन वाक्य सांगतो.ते अमलात आणायचे प्रयत्न करा.

१.मी कर्ता नाही, तो (गुरु किंवा देव) कर्ता आहे.
२. षड्रिपु ना ( काम,क्रोध, लोभ,मोह,मद,मत्सर) ताब्यात ठेवायला प्रयत्न करा.
१. आपण जन्मल्यापासून मी, माझा हे दोन शब्द आपल्या रक्तात मुरलेले आहेत. प्रत्येक माणूसाला व्यवहारात असेच बोलाव लागतो. मी म्हणजे कोण ह्याचा विश्लेषण , शिकलेले माणसात सुध्दा कमी दिसतो.ह्यलाच आत्मज्ञान म्हणतात.हे ज्ञान वाढवावे.
किती उच्च शिक्षण असले तरी आत्मज्ञान नसेल तर त्या माणसाचा जीवन अर्थहीन असते. त्यांनी सद्गुरू कडून किंवा सद्ग्रंथ वाचून आत्मज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे.
२. षड्रिपु ना ताब्यात कसे आणायचे?
ही गोष्ट सोपी नाही.
काम म्हणजे इच्छा, आपण जे करतो. ते कमी कमी करत जावे. इच्छा केल्या वर ते पूर्ण होईल की नाही हे आपल्याला माहिती नसतो. कर्म करत जावे, पण फळ मात्र ईश्वराच्या हाथात आहे असे ठाम मत असल्याने आपण टेन्शन घेणार नाही.

क्रोध कमी करत करत शांत स्वभावाचे व्हावे. क्रोधाने काही मिळत नाही. उलट क्रोध म्हणजे राग येत नसेल तर डोक शांत राहील आणि ब्लडप्रेशर वाढत नाही.

लोभीपणा चांगले नव्हे. हा गुण सोडायलाच पाहिजे.

कुठल्याही गोष्टीचा मोह अती नसावी. अती सर्वत्र वर्जियेत. हे म्हणच आहे.

मद असलेल्या पूर्वी चे राजे, महाराजे पण हरले होते.आपण कोण? साधे माणूस तरी आहोत.
हे सर्वांना माहिती आहे.

मत्सर करणे वाईट आहे. मित्राकडे खूप पैैैसा येतो, माझ्या कडे येत नाही म्हणूून त्याचा मत्सर करणे चुकीचे आहे.

वरचे सर्व षड्रिपुना ताब्यात ठेवले तर मनाला कुठल्याही टेन्शन राहणार नाही. आपले जीवन सुख,शांती व समाधानाने जगू शकतो.

प्रामाणिक पणेने प्रयत्न करून बघा, टेन्शन कसे पळून जाईल.