आपले कर्माचे फळ येथेच मिळेल vinayak mandrawadker द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आपले कर्माचे फळ येथेच मिळेल

           माझे सत्तर वर्षाचे जीवनात काही असे अनुभव आलेत कि ,त्या अनुभवांना शेर केलो तर , बरेच जणांना उत्साहदायक मार्गदर्शन मिळेल असं मला वाटतो. म्हणून हा एक पहिला प्रयत्न .

           मी एक साधा कारकूनाचा मुलगा. आई, वडिलांच्या पुण्याई मुळे इंजिनीरिंगला सरकारी सीट, माझ्या स्वतःच्या गावात मिळाली, पन्नास वर्षां पूर्वी . पाच वर्षात मेकॅनिकल चा पदवी घेऊन बाहेर पडलो .त्या काळात औद्योगिक मंदी असल्या मुळे नौकरी मिळणे फार अवघड  होता.सहा महिने पर्यंत नौकरी सोडा, मुलाखतीचा सुद्धा चिन्ह दिसेना.कंटाळून बहिणीचे गावाला जाऊन आराम करत असताना, एक दिवस माझा धाकटा भाऊ कलबुर्गीहून येवून सांगतो कि मला ३१ पर्यंत नौकरीला रुजू व्हायचा आहे.जीवनातली पहिली  जबरदस्त आश्चर्य !! मुलाखत न देता अपॉइंटमेंट लेटर येणे हा आई वडिलांच्या चांगले कर्माचे फळ नसेल तर अजून काय असणार?  कारण  माझे कर्माचे अकाउंट सुरूच झालं नव्हतं.त्याकाळी सरकारी अँप्रेन्टिस योजनेत मुलाखत न घेता बी.ई. चा निकालावरून निवड झाली होती , ते पण माझ्या आवडता देव श्रीरामाचा गावी म्हणजे नाशिकला .

दुसरा अनुभव माझ्या मेहुण्याची नौकरी . तो पण साधा,सरळ , मध्यम वर्गीय कुटुंबातला.बी.कॉम. पूर्ण केला होता. त्याचा गाव नांदेडला चांगली नौकरी मिळाली नव्हती म्हणून सोलापुरात एका कंपनीत सर्व्हिस करत होता. मन काही रमेना.त्याला पाहिजे होत बँकेची नौकरी.तो पर्यंत त्याचे वय २८ चा जवळ आली होती.  त्याची आई म्हणजे माझे सासूबाई नांदेड मुनसिपालिटी मध्ये सदस्य होते.त्यांनी ३/४ गरजूवंत महिलांना, निस्वार्थ मनाने शिक्षकांची नौकरी मिळवून दिली होती.ह्या त्यांचा निष्कामकर्माचा फळ , म्हणून त्यांचा मुलाला मुंबईत एका परदेशी बँकेत कारकून म्हणून नौकरी मिळाली. ह्या साठी त्या बँकेत काम करणारा एक दक्षिण भारतीय ऑफिसर नी निस्वार्थपणाने प्रयत्न करून माझा मेहुण्याला नौकरी मिळवून दिली.

मी, एका कंपनीत सर्विस करताना २ फ्रेश इंजिनिअर स ना कामाला लावलो होतो निस्वार्थ मनाने. जेंव्हा माझा मुलगा B.E. झाला, त्याला पहिली सर्विस तसेच मिळाली. आमच्या ओळखीचा माणूस घरी येऊन मुलाचा अर्ज घेवून गेला आणि मुलाला नोकरी मिळाली. Action and reactions are equal and opposite. आपण चांगले काम करा, चांगला होईल , वाईट काम करा वाईट होईल. ह्यात शंकाच नाही.

हे झाले सगळे नोकरी बद्दलचे अनुभव. आत्ता दूसरा प्रकार चा अनुभव ऐका.

नाशिकला HAL मधे नोकरी ला असताना २ वर्ष पूर्ण झाल्यावर मला J.S.O. म्हणून बढती मिळाली. देवानी मोठा क्वार्टर दिली, डिफेन्स कोटात Lambreta स्कूटर साठी नंबर लागला. कर्ज काढल्या मुळे त्या गाडी ला कंपनीच्या GM च्या नावावर hypothicate म्हणजे गिरवी ठेवावा लागते. म्हणजे च कर्ज मिळेल. तसे ₹३५०० कर्ज काढली होती. एक दिवस सकाळी मी माझ्या मित्राला विचारलो, स्कूटर चोरी झाली तर कर्ज कोण भरणार? कारण गाडी तरी GM चा नावावर आहे. बघा, शब्द कसे निघून गेले. संध्याकाळी मी आणि माझी बायको भाजी आणायला मार्केट ला गेलो होतो. स्कूटर ची लाँक खराब झाल्या मुळे, लाँक न करता गेलो.१ तासानंतर परत येवून बघितलं तर काय स्कूटर जागेवर नव्हती. बायको जोरात रडू लागली.मी शांत होतो. इकडे तिकडे चौकशी केल्यावर कळले की २/३ मुल नाशिक चा रस्त्यावर गेले. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि घरी गेलो. दुसऱ्या दिवशी टाऊनशिप आणि कंपनीत हाच किस्सा चर्चेचा झाला होता. सकाळी माझ्या तोंंडातून देवानी वदवून घेतला होता. संध्याकाळी करून दाखवली.

८ दिवसांनी  एक  पोलीस घरी येवून सांगितला की एक स्कूटर सापडली आहे. तुम्ही बघून जा . ती माझी च होती. नंतर पिंपळगाव चा कोर्टात पुरावे दाखवून गाडी ताब्यात घेतली. इन्स्पेक्टर काय म्हंटले तर तुमच्या कष्टाची पैसे होते, म्हणून मिळाली. बहुतेक पेट्रोल संपली म्हणून स्कूटर सोडून गेले असतील.

म्हणून मित्रानो मी सांगतो, चांगले कर्म करा चांगले फळ मिळावा आणि बघा ह्याच डोळीं ह्याच जन्मी सत्कर्माचे फळ.