Nakki jeevan ek motha prashna aahe kay ? books and stories free download online pdf in Marathi

नक्की जीवन एक मोठा प्रश्न आहे काय ?

नक्की जीवन हा एक मोठा प्रश्न आहे का?

जीवन म्हणजे काय, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आपण जन्माला येतो,बालपण खेळण्यात जातो, तारुण्य शिक्षण घेण्यात व मौजमस्ती करण्यात जाते आणी म्हातारपण, आजारपणामुळे रडण्यात जाते असे सर्वांचे अनुभव आहे. पण असे नसून जीवन एक आनंदाने भरलेला, सुख, समाधान, शांती ने पूर आलेला नदीचा प्रवाह आहे. असे जे समजून जगतात ते च खरे ज्ञानी आहेत. हे शक्य आहे का?
हो, शंभर टक्के शक्य आहे. आपण थोडे थोडे विचार करत जावू.
आपण पहिल्यांदा खाली दिलेली तत्व किंवा विचार समजून, त्यांच्या बद्दल ठाम मते तयार करू. ओके?
१. जन्म आणि मरण आपल्या हातात नाही.
२. मनासारखे शिक्षण , आवडलेल्या काँलेजात घेणे आपल्या हातात नाही.
३. खूप सपंत्ती बनवू शकतो का. नाही ना?
४. मनाला आवडलेली मुलीला बायको म्हणून घरात आणू शकतो काय? नाही ना?
५. जग भर हिंडायला आवडते. हिंडू शकतो का? नाही ना?
६. संतती कडून सुख, शांती, समाधान यांची अपेक्षा करतो. ते नक्की मिळेल का? नाहीना?
७. म्हातारपणी आजारी न पडता मरण यावे असे प्रत्येकाला वाटते. असे नक्की होणार का? नाही ना?
असे अजूनही कितीतरी गोष्टी आहेत. मला येवढेच सांगायचे आहे की " आपल्या हातात काहीच नाही ". असे असताना आपण मी, मी का म्हणतो.
देवाने माणसाला मन, बुद्धी आणि अंतःकरण या तीन गोष्टी extra दिलेली आहे, जे मानवाला सोडून जगातील दूसरे कुठल्याही प्राणीत उपलब्ध नाही.
तीन्ही न दिसणारे गोष्टी आहेत.
मन आणि अंतःकरण एकमेकाला जोडलेले आहेत. मन शुद्ध असेल तर अंतःकरण पण शुद्ध असतो. बुद्धी चा वापर करून, मन आणि अंतःकरण शुध्द करावे.
बुद्धी चे दोन प्रकार आहेत.
१. देहबुद्धी , २. आत्मबुध्दी
पहिला बुद्धी चा माणूस मी म्हणजे देहच असे समज असलेला. दूसरा बुध्दी असलेला माणूस, मी म्हणजे आत्मा , असे मत असलेआ.
आपल्याला देहबुद्धी इतके चिकटलेली असते की त्याला आत्मबुध्दीत बदलायला फार कष्ट घ्यावा लागतो. कारण अज्ञानामुळे. म्हणून सत्संगात राहून सद्गुरूंचे बोधवचने ऐकून, आत्मज्ञान मिळवावे.
आत्मज्ञान मिळविल्यानंतर, मी मी म्हणणारा माणूस, सगळे कर्तेपण त्याच्या कडे ( भगवंताकडे ) सोपवितो आणि निश्चिंतपणे जगतो. कोणत्याही दुःख पचवू शकेल. कुठल्याही कर्माचे फळांची अपेक्षा ठेवणार नाही. नेहमी नामस्मरणात तल्लीन होवून आनंदाने जगूशकतो. कोरोना ची सुध्दा भीती वाटणार नाही.
वास्तविक जीवनात घडलेल्या घटणे वरून तरी माणसानी आपले क्षमता ओळखायला हवी.
साधे उदाहरण देतो. माझे मोठे भाऊ खूप हुशार होते.
दहावीत फर्स्ट क्लास मिळविल्यानंतर त्यांना पुढे शिकायची खूप इच्छा होती, पण गरीबी मुळे बाबा त्यांना काँलेजात पाठविले नाही. शिक्षक म्हणून कामाला लावले. भावाची इच्छा म्हणा देवाची मर्जी म्हणा,नोकरी करत करत भावाने Inter,B.A.,M.A. (English), M.A.( Politics),B.Ed.,B.Lib.Sc. इतके पदवी मिळविले. इतकेच नव्हे तर I.A.S.ची लेखी परीक्षेत सुध्दा पास झाले होते. सरकारी नोकरी असल्याने बढती घेत घेत ते प्रिन्सिपॉल होवून निव्रत्त झाले. मला सांगायचे येवढाच की आपल्याला जे पाहिजे ते जेंंव्हा पाहिजे तेंंव्हाच मिळाली पाहिजे म्हणून हट्ट धरून चालत नाही, कारण देणारा, कर्ता तो भगवंत आहे.आपण फक्त कर्म करत जायला पाहिजे.
आता माझी च उदाहरण सांगतो ऐका. B.E. झाल्यावर M.E. करायची इच्छा होती. पण १९६८ मधे H.A.L. नाशिकमध्ये नोकरी मिळाल्याने नोकरी करत गेलो.तेथे ६ वर्ष, नंतर पुण्यात २ वर्ष, डोंबिवलीत १३ वर्षे काढले. १९९० साली साबू सिद्दीकी इंजिनिअरिंग काँलेजात lecturer म्हणून लागलो.१९९३ साली M.E. ला काँलेजनी पूर्ण पगार देवून VJTI मध्ये पाठविले. २५ वर्षानंतर M.E. करण्याची संधी ते पण बिन खर्ची. असे असते भगवंताची इच्छा.
पुढे बघा, M.E. परीक्षेत ६५ टक्के मिळूनही क्लास मिळाला, पास क्लास , 😙 कारण प्रोजेक्ट चा सिनोप्सिस २ वर्षांत द्यायला पाहिजे म्हणे, मी अडीच वर्षांनी दिलो. म्हणून युनिव्हर्सिटी नि फर्स्ट क्लास दिली नाही. त्या काळात असिस्टंट प्रोफेसर साठी B.E. आणि M.E. दोन्हीत 1st क्लास पाहिजे असा नियम होता. माझ्या M.E. दुर्दैवाने पास क्लास मधे होता. ६० वर्षापर्यंत नोकरी करून निव्रत्त झालो, साधा लेक्चरर म्हणून. पण देवाला न्याय द्यायचा होता. डाँनबाँस्को इंजिनिअरिंग काँलेजचे प्रिन्सिपल नी मुलाखतीत मला असिस्टंट प्रोफेसर ची आँफर दिली. तेंंव्हा नियम शिथिल होवून फक्त एकाच पदवीत 1st क्लास पाहिजे म्हणून झाला होता. आहे की नाही देवाची करामत ?
म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला विचलीत न होता जे मिळते त्याच्यात आनंद मानून घेणे.भगवंतास शरण पत्करून जीवन आनंदात घालविलेतर जीवन एक मोठा प्रश्न म्हणून राहणारच नाही.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED