Majhya mitra books and stories free download online pdf in Marathi

माझ्या मित्रा

“माझ्या मित्रा ...

आपल्या मैत्रीचा आतापर्यंत चा प्रवास वाचावा वाटतो तुझ्या समोर

तुझी माझी ओळख इथेच या फेसबुक वर झालेली

रोजच्या जगण्या च्या धडपडीतून थोडे मन रमावे म्हणून फेसबुक जॉईन केले होते मी

मग हळु हळु जाणवत गेले अरेच्या या जगात जे आहे तेच फेसबुक वर आहे

तीच माणसे ..त्यांची तीच प्रवृत्ती ,मतभेद ,हेवे दावे ,मत्सर आणी बरेच काही .....

जे प्रत्यक्ष जगात सहज प्रकट होत नसते ..

शिवाय कोणत्याही स्त्रीला वेगळ्या चष्म्यातून पाहणारे काही महाभाग पुरुष ...!!

अशा या वातावरणात तुझी भेट झाली ..

प्रथम ही भेट साधीच एका “पोस्ट” वर होती

मला नवल वाटत असे तुझे
प्रत्येक पोस्ट वर हा माणूस इतके कसे व्यक्त होत असावा ?

मग कुतुहूल म्हणुन मीच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली

आणी तु स्वीकार केलास तिचा मनापासून ...

नंतर मेसेंजर वर थोड्या गप्पा सुरु झाल्या

एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेणे

अशी हळू हळू पायरी पायरी ने आपली मैत्री वाढू लागली

तुला हळू हळू समजू लागला माझा बिंदास स्वभाव .,

माझे मनमोकळे बोलणे .
जणू आजूबाजूला काही घडतच नाही असे माझे मनमोकळे वागणे !!!

हे सारे एका छोट्या गावात राहणाऱ्या तुला अजब वाटू लागले

आणी मग खरेच तुला माझी काळजी वाटू लागली ..

“नीट रहात्त जा ग बाई मला तुझी खूप काळजी वाट्ते

हे तुझे खऱ्या काळजीचे “बोल ..ऐकून मी तर चकितच ..!!

कारण फेसबुक वर एखाद्या मैत्रिणीला नीट राहा काळजी घे सांगणारा मित्र म्हणजे “विरळाच ना ..!!

आणी मग तेव्हा समजले की तु माझा “खरा “मित्र आहेस

त्यानंतर मी तुझ्यावर एक “फक्कड” शी कविता पण केली होती..

मग त्यानंतर मात्र आपल्यातली केमिस्ट्री अगदी घट्ट झाली ..

फेसबुक वर जरी एखाद्या पोस्ट वरून वगैरे आपले मतभेद झाले

तरी तु पर्सनली मला फोन करून माझी समजूत काढायचास्

“अग असे रागावत जावू नको ना ..
कीती तडतड करत असतेस सदा न कदा “

असे तुझे मला समजावणे ऐकले की मी मग नेहेमी प्रमाणे नॉर्मल ला येत असे

त्यानंतर आपल्या मैत्रीतले रंग हळू हळु आणखी गहीरे होवू लागले !!!

दोन तीन दिवसाआड एकमेकांना फोन केल्या शिवाय आपल्याला चैन पडत नसे

कधी चुकून फोन करायचा राहून गेला ..तर तुला खूप वाईट वाटत असे ..

आणी तु माझ्यावर नाराज व्हायचास

..आणी मग मीही आधी सॉरी म्हणून तुझी समजूत काढत असे

कोणतीही बातमी असो ती पहिल्यांदा तुला मलाच सांगायची असे

आणी मलाही कोणत्याही बाबतीत तुझ्याशी बोलले की बरे वाटत असे

मी माझे काही लेखन अथवा कविता फेसबुक वर लिहिली की
तु त्याचे वाचन आधी

तुझ्या घरच्या लोकांना करून दाखवत असे

खूप अभिमान वाटत असे तुला माझा ..!!!

कित्येकदा काही काही बाबतीत तु मला रागावत सुद्धा असे पण मी गुपचूप तुझे बोलणे ऐकत असे

आणि जरूर असेल तेथे तुझी माफी पण मागत असे .

जेव्हा पहिल्या वेळी एकत्र आपण भेटलो एका ग्रुप मध्ये एका शहरात

तेव्हा .मला पाहून तु थक्क झालास !!!
आपण सर्व एका बागेत गप्पा मारत बसलो होतो

आणी डायरेक्ट सर्वासमोर तु मला म्हणालास “ तुझ्या फोटो पेक्षा तु खुपच सुंदर आहेस ग..”

मला तुझ्या या धिटाईचे खूप कौतुक वाटले !!!

संध्याकाळची उशिरा पर्यंत आपण बागेत बसलो होतो .
गाणी ,गप्पा चेष्टा मस्करी मस्त वेळ चालला होता
माझा आवाज बरा आहे मी पण एक दोन गाणी म्हटली
तुला माझा आवाज खुप आवडला ..फोन वर गोड बोलतेस आणि गातेस आणखी गोड असे तु म्हणालास
तु मुद्दाम तुझ्या पसंतीची एक दोन गाणी माझ्याकडून गाऊन घेतलीस
आपण गप्पा मारत असताना चंद्र उगवला

तेव्हा तु म्हणालास” आज चंद्राकडे कुणी पहायचे नाही बर का ..
ही माझी मैत्रीण तर चंद्रा पेक्षा सुंदर दिसतेय .”!

हे ऐकून तर मला खुपच हसू आले होते .

आपली ओळख पक्की झाली तेव्हाच तुला मी प्रॉमिस केले होते की

मी तुझ्या घरी एकदा तरी येणार आहे असे ..

तुझे घर म्हणजे थोडे आडगावी होते

पण त्या भागात गेल्यावर मी पहिला कार्यक्रम तुझ्या घरी जावून तुला भेटायचा आखला ..

फक्त त्या पुर्वी तुझ्या बायकोला मी आलेले आवडेल ना? हे नक्की विचारले होते

सुदैवाने त्याच दिवशी तुझ्या लग्नाचा वाढदिवस होता ..

मला खूप बरे वाटले ..मस्त पार्टी करावी वाटत होती
पण त्या आडगावी त्या वेळी ते शक्य नव्हते .

मग काय एक मोठ्ठा केक घेवून तुझ्या घरी गेले ..

तुझे घर , त्यातील वातावरण ,तुझी माणसे ., आणी तुझी बायको, सारे मला खुपच भावले ..!!

तुझ्या बायकोने त्या दिवशी खास माझ्या साठी म्हणून आंबरस- पुरणपोळी ..असा खास बेत केला होता

मला खूप आवडले तुझ्या बायकोने केलेले चविष्ट जेवण

मी तारीफ केली तर म्हणलास ....”.पण हापुस आंबे नाही ग मिळाले ..सगळा बाजार पालथा घातला .

त्या लहान गावात बाजारात हापुस आंबे सहजा सहजी मिळणे तसे “दुरापास्त “च होते

मी गमतीने म्हणले “..असेच तुला दर वर्षी हापूस आंबे ना मिळोत

आणी केवळ तो मेनू खाण्या साठी मला वारंवार तुझ्या कडे यायला मिळो..”!!

तुला पण ती आयडिया खूप आवडली ..

मला सर्वात जास्त नवल वाटले की तुझ्या घरची सर्व जण
जणु काही मी फार पूर्वी पासुन त्यांच्या ओळखीची होते

आणि जणु काही मी नेहेमीच तिथे येत असते ..असे वागत होते ..!

खुप .जुनी ओळख असल्या सारखे ....!!!
तुझी गोड मुलगी ,तिच्या हुशारीचे तुला खुप कौतुक होते
जणु तुझ्या काळजाचा तुकडा असलेली ती मला खुप आवडली होती .
तिच्या साठी आणलेली भेट तिला खुप आवडली होती
दिवसभर माझ्या मागे मागे होती ती ..
मग तु म्हणाला होतास तुझ्यामुळे आज बाबाला पण विसरली आहे बघ ती

या आधी तुझ्या मुलाला पण भेटले होते ..
खुप छान करियर होते त्याचे शहरात

त्या भेटीचा वृत्तांत सांगत होते तेव्हा तुझ्या बायकोने सांगितले

की अगदी छोट्या भेटीत पण तुझा मुलगा तिच्या जवळ माझे फार कौतुक करत होता

फार गुणी आणी हुशार आहेत तुझी मुले.!!

त्या वेळेस तु मला एक खास हिरे जडित “पान दान “भेट दिले होतेस .

आणि म्हणाला होतास .

“.काय ग ,, आवडतेय ना ही भेट ..का साडी देवू तुला ?”

आणि माझी पसंती माझ्या डोळ्यात पाहिली होतीस .

तुझ्या गावा जवळ असणारे एक छोटे प्रेक्षणीय स्थळ पाहायला तु हौसेने मला घेऊन गेला होतास

खुप मजा केली आपण सर्वांनी
फोटो पण काढले खुप ....

घरी परतलो तेव्हा परत तुझ्या बायकोने फक्कड चहा केला होता

आणि ..मग आली निरोपाची वेळ ..मला तर वाईट वाटत होतेच

पण तुझ्या घरातील सर्वच अस्वस्थ झाले होते त्या वेळी

आता पुन्हा केव्हा भेट ..घडेल ना ..?

का कोण जाणे तुझ्या पण डोळ्यात पाणी तरळल्या चा भास मला झाला ....!

आमच्या अहो विषयी मला खूप कौतुक असायचे !!

मी नेहेमी त्यांना कोहिनूर हिरा म्हणायचे .
.तुला खूप आवडायचे ते

मग तु पुन्हा एकदा मला सुचना दिल्यास ..

,,.ए नीट वागत जा हं अहोबरोबर

भांडत नको जाऊ नकोस कधी
आणी.. रागाऊ पण नकोस ..त्यांच्यावर ..

अम्क्ष्हे अहो पण हसले होते हे ऐकुन

तेव्हा वाटत असे कीती विचार करतोस ना तु माझा ..!

तु स्वताः तुझ्या घरचे सारे ..यांचे निस्सीम प्रेम पाहून खूप आनंद वाटला ..

आपली मैत्री जमणे ,भेट होणे , तुझ्या घरच्या लोकांनी पण आपल्या नात्याला समजून घेऊन “मान “देणे

असा साराच योगायोग जुळून येणे म्हणजे फार “नशिब ..असते रें

.......आनंदाची आणि समाधानाची गोष्ट म्हणजे आपल्या बाबतीत ते घडले आहे ....!!

असा हा प्रवास आपल्या मैत्रीचा ..माझ्या एका कवितेत लिहिल्या प्रमाणे ...

“दोन..मनांची जवळीक"..ईतकी..कशी झाली..?

.हेच,,खरेतर...उमगत...नसते...!!!

."मागणे" काहीच नसते या "नात्यातुन".दोघास...!!

.."फक्त"चालत रहावासा.वाटतो

.निरंतर.असाच...प्रवास"....”

यानंतर खुप दिवस छान गेले

पण हल्ली का कोण जाणे

का कोण जाणे आपल्या नात्यात आजकाल खुप “दुरावा “येत चालला आहे असे मला वाटते

तुला नाही का वाटत असे ..?

आता तु म्हणशील (नेहेमी प्रमाणे )”काय ग असा विचार करतेस ?”

अग बीजी असतो मी आजकाल ..

तुला माहीत आहे ना कीती जबाबदारी वाढली आहे ऑफिस मध्ये हल्ली ..”

जरा समजून घे ना “राजा “...

तुला माहीत आहे की असे बोलले की मी कायमच निरुत्तर असते तुझ्या पुढे !!!

बिझी तर मी पण खुप असते रें

माझी पण आजकाल कामाची व्याप्ती खुप वाढली आहे

तरी पण आपली “जवळीक” कमी झालीय असे वाट्ते

आत तु म्हणशील.” काय ग हा वेडेपणा ..?

अग रोज तर भेटत असतो ना आपण वाटस अप वर

फेसबुक वर तर जेव्हा जेव्हा असतो तेव्हा असतो ना संपर्कात ..?

आणी रोज तर तुला गुड मॉर्निंग आणी गुड नाईट चा मेसेज फोनवर केल्याशिवाय

माझा दिवच उगवत आणी मावळत नाही .,.”

आणि तु असा विचार का करतेस ..?

हे मात्र अगदी खरे असते .
तुझ्या या म्हणण्याला मला छेद नाही देता येणार

कारण जेव्हा पासून मित्र झालोय ना आपण

एक दिवस ही तुझा मेसेज चुकला नाहीय्ये .

कदाचित मी थोडा आळस किंवा कंटाळा करीत असेन ..

पण तु ..अजिबात नाही ..

या तुझ्या “कनेक्टीव्हिटी”..ला मात्र दाद ही द्यावीच लागेल

गमतीने मी एकदा तुला म्हणले होते सुद्धा

मला “भुपाळी “म्हणुन उठवल्या शिवाय तुझी सकाळ सुरु होत नाही

आणी तु “गुड नाईट “म्हणुन “गाई गाई केल्या शिवाय मी झोपत नाही

तेव्हा तु खुप हसला होतास ..!

तरी पण ..मला सांग कीती दिवस झाले रें आपल्याला फोन वर एकमेकाशी बोलून ?

नाही आठवणार तुला ..पण मला पक्के आठवते आहे

जवळ जवळ दोन महिने होऊन गेले आपण एकमेकाशी बोललेलो नाहीये

माझ्या वाढदिवसाला मी खुप वाट पहिली की तुझा फोन येईल

जवळच्या साऱ्या मित्रांनी मैत्रीणीनी अगदी आवर्जून फोन केला ..

पण तुझा फोन नाही आला ...

आता तु म्हणशील “अग मग तुला बोलायचे होते तर तु फोन करायचा ना

माझ्या परवानगीची गरज काय आहे ...तुला ?”

बरोबर आहे रें

पण मला सांग मीच फोन करून तुला विचारायचे का मला फोन का नाही केलास म्हणुन ?

कीती विचित्र वाटले असते ना ते ?

तुला आठवतेय आपली फेसबुक वर मैत्री झाली ते दिवस ..?

आधी जुजबी ओळख .मग गप्पा .मग “फेसबुक मैत्री “..आणी मग अगदी पक्की मैत्री

आधी म्याडम ..मग अहो ..आणी मग एकेरी बोलावणे

असा घडला होता अगदी पायरी .पायरी ने आपला प्रवास !

सहसा कुणाला फोन नंबर देण्यास तयार नसणारी मी .

तु जेव्हा म्हणालास मला ..की मला तुझ्याशी बोलावे वाटते

तेव्हा मला पण माझ्या मनातले ओळखल्या सारखे झाले होते बघ

आणी जेव्हा आपण फोन वर प्रथम बोललो ना ..

तेव्हा कीती वेळ बोलत होतो आपण ते आपले आपल्यालाच नाही समजले ..

आणी नंतर तु मला म्हणाला होतास” .कीती गोड आहे ग तुझा आवाज .”

आणी बोलताना तु प्रत्येक वाक्यामागे हसत असतेस ना तेव्हा इतके मस्त वाट्ते !!!

हे ऐकुन मला नक्की ..काय वाटले ते शब्दात नाही मांडता येणार ..

मग हळूहळू आपले फोन वरचे बोलणे पण दोन तीन दिवसा आड होऊ लागले

तसे काही खास आपण बोलत नसु .
.असेच इकडचे तिकडचे एकमेकांच्या संसारातले ,,इतकेच

पण तु म्हणायचास तुझ्याशी बोलले की बरे वाट्ते ग

आपल्या दोघातली मैत्रीची बांधिलकी इतकी होती की ..

कित्येकदा मला आठवण येत असे तुझी ..आणी तुला फोन केला की तु म्हणायचास

ए’ अग आत्ता मला तुझीच आठवण आली होती ..

फोन करणार च होतो तुला मी ..”

आणी तु जेव्हा जेव्हा मला फोन करायचास ना तेव्हा माझ्या मनात तुझेच “विचार “असायचे

बारीक सारीक तुझ्या संसारातले ..तुझ्या ऑफिसातले सारे तुला मला फोन करून च सांगायचे असे

मला आठवते मी प्रमोशन परीक्षेला बसले होते ना

तेव्हा खुप बिझी झाले होते माझे दिवस

अभ्यास .संसार ,बँक..

दिवस कुठल्या कुठे पसार व्हायचा ..

फेसबुक वगैरे” उद्योग” तर तेव्हा लांब च ठेवले होते मी

मग तुला फोन करण्याचा विचार तर लांबच राहायचा ..

तेव्हा तु खुप रागावत असायचास
“..काय ग एक आठवडा झाला फोन नाही तुझा

सारखा मीच फोन करायचा का तुला “?

तुला नाही का कधी आठवण येत ?”

माझ्या वर कधी ना रागावणारा तु अशा वेळी मात्र वैतागून जायचास !!

मग तुझी समजुत काढता काढता पुरे होत असे मला ..

मग मात्र पक्के ठरवुन मी आठवणींने तुला फोन करायचे

आणी एक गंमत म्हणजे तुझ्या फोन ची “रिंग टोन “..

सलमानच्या एका हिट पिक्चर चे गाणे होते ते ..

माझे खुप आवडीचे ..अगदी कितीदा ऐकले तरी कंटाळा ना येणारे असे .!!

मग मी म्हणायचे अरे तुला फोन केला की मला दोन आनंद मिळतात

एक ट्यून ऐकायचा, आणी दुसरा तुझ्याशी बोलायचा ..

हे ऐकले की तुला पण खुप मजा वाटत असे !

आता तु म्हणशील मग का नाही केलास फोन ..तुच ?

खरे तर मला तसा “इगो” वगैरे नाही तु आधी का मी आधी असा .

मैत्रीत इगो कधीच नसतो ठेवायचा नाहीतर ती मैत्री .”मैत्री “रहात नाही

पण आता मात्र तुच फोन करावा आणी मी ऐकावे असे वाटते इतके मात्र खरे

एकमेकात जर” सुसंवाद हवा” असेल तर ..

आधी “संवाद” घडायला हवा असे म्हणतात .

आणी आधी “वाद” असेल तरच “संवाद” घडतो ना

मग वाद घालाय साठी आधी आपल्याला फोन वर बोलायला हवे

मग तु माझ्या वर किंवा मी तुझ्या वर रागवायला हवे ..

आणी मगच फुलत जाईल ..पुन्हा नव्याने आपले “संभाषण ..

जणु काही मधल्या काळात काही घडलेच नव्हते ..!!

मग आता विचार कसला करतोस .
.घे ना तो फोन हातात आणी लाव माझा नंबर ..

आणी माझ्या गोड आवाजातले ..
तुला आवडणारे “ हेलो.”.ऐकून कर सुरवात परत आपल्या गप्पांना ..!

आता या पुढे पण दिवसे दिवस आपली मैत्री वाढते आहे ..

प्रार्थनेत “शक्ती “असते म्हणतात !!

मी त्या ईश्वरा कडे प्रार्थना करेन की आपली ही साथ अशीच टिकुन राहु दे .,

आणी तुला पण तुझ्या माणसांची साथ अखंड मिळू दे

कारण मला माहीत आहे तुला माणसे आवडतात .

तुझी मैत्रीण

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED