आभा आणि रोहित...- १

आभा आणि रोहित...- १  

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"पाहिलस का आभा.. तुला कोणाच स्थळ आल आहे?" आभाच्या आईने आभाला निवांत बघून बोलायला चालू केल.

 

"आई..." आभा जोरात ओरडली.

 

"काय झाल आभा.. इतकी का ओरडती आहेस? मी फक्त हे म्हणाले पाहिलस का तुला कोणाच स्थळ आल आहे! त्यात इतक ओरडण्या सारख काय आहे? मी तुला लग्न करायची बळजुबरी थोडी केली आहे?" आईच्या चेहऱ्यावर हसू आल होत!

 

"मी तुला सांगितलाय ना.. लग्न आत्ता नाही! लग्नाच वय तरी झालाय का माझ! मी बरच काय काय ठरवलं आहे! मला माझ्या मनासारखं आयुष्य जगू दे कि.. काही झाल की लग्नाचा विषय काढतेस! मला माझ आयुष्य आहे. म्हणजे लग्न हे फक्त महत्वाच नाही माझ्या आयुष्यात! आणि मला सांग,लग्न हे इतक महत्वाच का आहे?" प्रश्नार्थक मुद्रेनी आभा नी विचारलं..

 

"हाहा..." आई ला तिच हसू आवरता आल नाही.. "तुझ्या प्रश्नाच उत्तर माझ्याकडे नाही.. पण लग्न हा महत्वाचा विषय आहेच! आयुष्य एकट्यानी काढायला अवघड असत! प्रत्येकाला कोणाची साथ ही लागतेच! आम्ही गेल्यावर तुला कोणी हक्काचं हव की नको?"

 

"ओह माय.. तुम्ही नसाल तेव्हा... काहीही तुझ! बर आई... आई आता ब्लॅकमेल नको प्लीज!! कस काय जमत ग तुला.. तुला हव ते मिळत नसेल तर ब्लॅकमेल करायचं...काहीतरी कटकट करत असतेस! अनिवेज..कोणाच स्थळ आलाय सांगून टाक! उगाच माझा आणि तुझा वेळ घालवू नकोस!!"

 

"सांगते आभा.. काय नेहमी घाई असते तुझी?...."

 

"बोल ना पटापट आई... माझ्यासाठी हा महत्वाचा मुद्दाच नाही.. मग मी माझा वेळ इथे कशाला वाया घालवू सांग.. आणि किती वेळ घेतेस एक गोष्ट सांगतांना!"

 

"हो हो.. सांगते! मला तर वाटतंय तुला खूप उत्सुकता आहे कोणाच स्थळ आलंय.. त्या मुलाची सगळी माहिती हवी आहे ना?"

 

"हाहा... तुला वाटतंय तस समज... मला काही प्रॉब्लेम नाही!"

 

"बर बर... आता सांगते, तुला एका मोठ्या घरातून स्थळ आलंय! रीमा काकू आहे न तिनी सांगितलं.. रीमा काकूनी सांगितलं आहे म्हणजे चांगलच असेल!! त्यांचा स्वतःचा बिझिनेस आहे.. आणि बरच मोठ प्रस्थ आहे! मला आणि बाबांना मुलगा आवडला आहे तू भेट आणि नक्की करून टाक! अस स्थळ पुन्हा मिळणे नाही!"

 

"हाहाहा.. काय आई! तुम्ही मुलाला भेटलात सुद्धा? मला न सांगता? कधी गेला होतात? आणि एका भेटीत अस पसंत कस करेन? खायची गोष्ट आहे का? पूर्ण आयुष्य काढायचं मला त्या अनोळखी मुला बरोबर! त्याला भेटेन.. आवडला तर परत भेटेन! एका भेटीत थोडी कळत मुलगा कसा आहे? आणि त्या मुलानी मला होकार दिला नाही तर?" आभा हसत बोलली, "मी काही कोणी स्वप्न सुंदरी नाही... बाकी खूप फेमस इत्यादी पण नाही... मग मला त्या मुलानेच नकार दिला तर?"

 

"हो अग.. रीमा काकू कडे गेलो होतो तेव्हा ते पण आले होते तिच्याकडे काहीतरी कामासाठी.. मग रीमा काकूने ओळख करून दिली...मग बोलण झाल! ठरवून नाही भेटलो.. अचानक भेट झाली आणि आम्हाला दोघांना छान वाटला मुलगा! तू त्याला भेटावस अस रीमा काकू ला पण वाटत आहे. आणि तुला मुलाने नकार दिला तर बघू आपण.... आणि अर्थात, तुला कसलीच बळजुबरी नाही करणार आम्ही.. तू ठरव हव ते.. पण मला आणि बाबांना वाटतंय कि अस स्थळ पुन्हा येणे नाही! मुलगा फारच समजूतदार वाटला.. तुला तो नीट समजून घेईल! आणि त्या घरात तू सुखी राहशील अस आम्हाला वाटत! आम्हाला वाटल म्हणजे तुलाही तसच वाटल पाहिजे अस अजिबात नाही!"

 

"हो हो आई.. मला कळल तुम्हाला मुलगा आवडलाय! आणि तुम्ही मुलाला भेटलात..अचानक आय सी! पण काहीही वागता तुम्ही!! लगेच लग्नाच बोलण सुद्धा केलत म्हणजे... खर सांगू का, काय खर काय खोट नाही कळत मला!! आणि किती करती आहेस त्या मुलाची तरफदारी? तुला माहिती असेलच.. मी माझे निर्णय स्वतः घेते.. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून मी माझे निर्णय बदलत नाही! म्हणजे मला वाटल पाहिजे की मी त्याच्याबरोबर माझ आयुष्य जगू शकेन.." आभा खंबीरपणे म्हणाली...

 

"बर.. तूच घे निर्णय! मी फक्त आम्हला काय वाटतंय ते सांगितलं!! आणि मला आणि तुझ्या बाबांना अस वाटतंय की तू उद्याच भेटावस मुलाला.." आई आभा च्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली.. "उद्या भेटशील रोहित ला?"

 

"लगेच उद्या?" भुवया उंचावत आभा बोलली.. पण आभा नी विचार केला.. लकारात लवकर भेटून घ्याव म्हणजे एकदा का नकार दिला की सारखी कटकट नाही राहणार!! "ठीके ठीके... भेटेन त्याला उद्या.. पण आवडला तरच पुढे जायचं नाहीतर दुसऱ्यांदा भेटणार पण नाही!! आणि घरी बिरी भेटणार नाही! आधी मला त्या मुलाला भेटायचं आहे.. मग बघू पुढे काय करायचं!"

 

"अजून काही? नाही अजून  काहीच नाही. तू भेट..मुलगा बरा वाटला तर पुढच बघू..आणि आवडला नाही तर पुढे जायचा प्रश्नच नाही." आभा ची आई बोलली, "तू ठरव तुला योग्य वाटेल ते आभा! तुला कोणतीच बळजुबरी नाही!!"

 

"तुझ बोलून झाल ना? हो.. मग, शेवटचा निर्णय माझाच असेल.. खूप भारी असेल तो तर भेटू परत..आता मी जाऊ माझी कामं करायला?"

 

"हो हो...कर तुझी कामं... तू उद्या संध्याकाळी ५ला भेटशील रोहित ला हे कळवते त्याच्या आईला!" इतक बोलून आई रोहित च्या आई ला फोन करायला उठली आणि आभा तिच काम करायला लागली..

 

आभा च्या आई नी रोहित च्या आईशी बोलून ५ ची वेळ फायनल केली... दोघ एका चांगल्या हॉटेल मध्ये भेटणार होते! आभा विचारात पडली होती. अस अचानक लग्नासाठी मुलाला भेटण ठरलं काय आणि आपण त्याला भेटलोय सुद्धा.. सगळच अनपेक्षित होत आभा साठी! पण आभाच्या मात्र काही गोष्टी स्पष्ट होत्या.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Rushali

Rushali 20 तास पूर्वी

Anamika Gore

Anamika Gore 2 दिवस पूर्वी

मैत्रीण

मैत्रीण 3 दिवस पूर्वी

Vandana Patil

Vandana Patil 5 दिवस पूर्वी

Sonali Kasar

Sonali Kasar 5 दिवस पूर्वी