आभा आणि रोहित..- ८

आभा आणि रोहित..- ८

 

रोहित ने गाडी चालू केली आणि त्याबरोबर गाणी सुद्धा चालू केली. जुनी गाणी होती. आणि तो आभाशी बोलायला लागला,

 

"छान दिसती आहेस आभा.. आज काहीतरी वेगळ केल आहेस का? नेहमीपेक्षा वेगळी दिसती आहेस. पिवळा रंग उठून दिसतो तुला.."

 

"ओह..थँक्यू..." आभ बोलत होती, "अ.. नाही रे.. काही वेगळ केल नाहीये..मी तशी साधीच राहते. फक्त टिकली लावलीये यामुळे वेगळी वाटत असेन.." आभा हसून बोलली,

 

"ओह..असेल..पण तरीही तू वेगळीच वाटती आहेस आज.." रोहित बोलला.

 

"हो तुला अस वाटत असेल की मी काहीतरी वेगळ केलय.. आज तुझ्या आई बाबांना भेटायचं आहे. पहिल्यांदीच भेटणार..मग थोडी तयार होऊन आले.."

 

"आई बाबांसाठी छान तयार होऊन? बर बर..." रोहित इतक बोलला आणि गप्प झाला. गाणी चालूच होती. मग शांतता भंग करत आभा बोलायला लागली,

 

"अरे वा रोहित.. जुनी गाणी!! बरेच दिवसांनी जुनी गाणी ऐकती आहे.. जुनी गाणी आवडतात तुला?" आभा बोलली.. आभा च बोलण ऐकून रोहित चा मूड बदलला. तो उत्साहात येऊन बोलायला लागला,

 

"हो..मला जुनी गाणी खूप आवडतात. आर.डी.बर्मन माझे आवडते गायक आहेत. त्यांची सगळी गाणी मी एकत्र करून गाडीत एक आणि घरी एक असे २ सेट ठेवले आहेत. गाडीत बसल्या बसल्या आणि घरी निवांत असेन तेव्हा गाणी चालू करतो. मन प्रसन्न होत."

 

"आपली ही आवड जुळते..वॉव! मला पण जुनी गाणी प्रचंड आवडतात. पण मी एकत्र नाही केलीयेत..मूड येईल ते गाण ऑनलाईन ऐकते...

 

"अरे वा.. ही पण आवड कळली तुझी... तुला ही गाणी हवी असतील तर मी तुला गाणी कॉपी करून देतो.. डोंट वरी! खर तर आधी माहिती असत तर आत्ताच दिली असती गाणी... बाय द वे,सिडी का पेन ड्राईव वर देऊ गाणी?" रोहित ने हसत प्रश्न केला..आभा ने त्याच्याकडे पाहिलं..आणि ती सुद्धा हसून बोलली,

 

"दोन्ही वर देशील? पण माझ्याकडे आत्ता पेन ड्राईव नाही... पुढच्यावेळी भेटलो की देते माझी पेन ड्राईव.. तोपर्यंत सिडी वर दे.." आभा बोलली आणि तिच बोलण ऐकून रोहित हसायला लागला..

 

"इतकी फोर्मल का वागतेस आभा... माझ्याकडे पेन ड्राईव आहेत... त्यावर देतो.. आणि मी खूप पेन ड्राईव आणून ठेवलेल्या असतात.. सो आता का, कशाला इत्यादी बोलू नकोस! आणि थँक्यू ची सुद्धा गरज नाही.."

 

रोहित च बोलण ऐकून आभाला खूप हसू आल... "नाही मी दोन्ही म्हणणार नाहीये.. बट ओन्ली फॉर अ चेंज! बर का..आणि भारी!! आता माझ्याकडे सुद्धा मस्त गाणी असतील."

 

"गुड...पण तुला अस वाटत नाही का की आपण सारख तुझ आणि माझ करतोय? किती सारख तुझ आणि माझ करत असतेस.. कंटाळा येत नाही का? आणि काय ठरतंय तुझ माझ्याशी लग्न करण्याबद्दल? म्हणजे घाई नाही..पण काहीतरी विचार केला असशीलच ना?"

 

"हो का...मी सारख तुझ माझ करत असते? सॉरी... आणि तुझ्याशी लग्न करायचे माझे विचार पक्के होतायत. पण मी तुला सांगितलं आहे. थोडा वेळ हवाय मला.. लग्न एकदाच करायचं...मग मनापासून वाटल कीच पुढे जायचं.. आणि आपल घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं एक सोप्प नसत रे रोहित.."

 

"आय नो आभा...मी असच विचारलं... आणि मला माहिती आहे.. जिथे वाढलो त्या घरातून उठून एकदम दुसऱ्या घरात जायचं आणि आपल्या घरासारख वागायचं ही काही सोप्पी गोष्ट नव्हे. मी परवा विचार करत होतो..माझ लग्न झाल म्हणून मला दुसरीकडे जाव लागल तर कस वाटेल? आई बाबांना सोडून लांब.. मला तर नाहीच जमणार... सो मी तुझ्या मनाची घालमेल समजू शकतो आभा.. आणि मी तुला कोणत्याही प्रकारची घाई करणार नाहीये.."

 

"तू इतका विचार करतोस रोहित... गुड टू नो.." आभा समाधानाने हसली आणि बोलली, "बर रोहित, मला एक सांग, मी काय नावाने हाक मारू तुझ्या आई बाबांना?" आभाने हा प्रश्न रोहित ला विचारला आणि मोठा सुस्कारा टाकला.. "हा फार मोठा प्रॉब्लेम असतो.."

 

"हो खरच.. सासू सासऱ्यांना कस बोलावयच.. मोठा प्रश्न असतो. मला पण तोच प्रश्न पडलाय...आय थिंक,आई बाबांना मम्मी, पापा म्हण... कारण माझ्या आई बाबांना तू पण आई बाबा म्हण अस मी सांगणार नाही.. मला अंदाज आहे, तुला ऑकवर्ड होऊ शकत आई बाबा म्हणायला.. सो त्याची तुला जबरदस्ती नाही.....टू बी फ्रॅक..बघ, पटल तर..मी सुद्धा विचार करतो आहे,जर आपल लग्न ठरलं तर तुझ्या आई बाबांना मी काय हाक मारू.."

 

"बरोबर आहे तुझ.. पण मम्मी पापा कस वाटेल? मी आई बाबा म्हणण प्रेफर नाही करणार.. म्हणजे आत्ता तरी अस वाटतंय... पण अहो मम्मी, अहो पापा साऊंडस ग्रेट.. पण तरीही आत्ता ते म्हणेन अशी खात्री नाही.." आभा ने हसून रोहित च्या बोलण्याला दुजोरा दिला..

 

"तुला जे योग्य वाटेल त्या नावाने तू बोला आई बाबांशी.. काही अडचण नाही..."

 

आभाने नुसत हु केल आणि विचार करायला लागली.. 'लग्न म्हणाल की मुलीसाठी किती असंख्य नव्या गोष्टी समोर उभ्या राहतात. त्यातलाच हा एक महत्वाचा मुद्दा...'

 

दोघ बोलत असतांना कधी घरी पोचले हे कळल सुद्धा नाही. आभा आणि रोहित गाडीतून उतरले. आभाने रोहित च घर आधी पाहिलं होत पण आज ती घरात जाणार होती.. घर कसल मोठा मोठा बंगला होता तो...बाजूला असलेली बाग तर एकदम सुंदर होती. तिथे टवटवीत फुले उमलली होती. आणि ती एक मिनिट तिथेच थांबली. तिने वाकून फुलांचा वास घेतला आणि तिथेच थांबली.

 

"काय झाल आभा.. चल की..."

 

"थांब रोहित २ मिनिटे... जरा फुलं पहातीये.. आणि तुमच घर खूपच मोठ आहे. मी लांबून पाहिलं होत पण आज पहिल्यांदीच आत येतीये...आणि पहिल्यांदीच तुझ्या आई बाबांना भेटणार..थोड धडधडतय..पण तुमची बाग सुंदर आहे...फुलांचा वास दरवळतोय.. तो वास नाकात साठवून ठेवत होते. आणि मनाचा ताण हलका करत होते.."

 

"हो... बागेत मस्त फुलं फुलली आहेत... त्यांना कळल असेल, आज आभा येतीये भेटायला...म्हणून खुश होऊन फुलली असतील.." रोहित ने आभाकडे भुवया उंचावून पाहिलं आणि तो बोलला,

 

"हो का बर बर..." आभा हसून बोलली.

 

"आणि आभा.. तू कधीपासून घराच्या आकारावरून विचार करायला लागलीस... मला माहिती आहे ती आभा अशी अजिबात नाहीये..तू माणसांना जपतेस... आणि तू इतकी शूर आहेस मग आई बाबांना घाबरती आहेस.. काय आभा! मी सांगितलं आहे तुला.. फार काही वेगळ वाटणार नाही तुला..एकदम नॉर्मल आहेत दोघे. "

 

आभाने रोहित च बोलण ऐकल आणि ती हसली.. मग मात्र फार विचार न करता ती दारापाशी आली. दार उघडंच होत.  रोहित आणि आभा आत आले आणि रोहित सोफ्यावर पहुडला आणि त्यानी आईला हाक मारली..

 

"आई.. कुठे आहेस? आम्ही आलोय बघ."

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Mate Patil 6 दिवस पूर्वी

Shashi 2 महिना पूर्वी

VaV 3 महिना पूर्वी

Prathamesh 3 महिना पूर्वी

Suvarna Kadam 3 महिना पूर्वी