बकुळीची फुलं ( भाग - 4 ) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बकुळीची फुलं ( भाग - 4 )



" विपिन आता कुठे असेल रे ? " आदितीचं हे वाक्य ऐकताच अनुज भूतकाळाच्या गर्देतुन बाहेर पडला .

" तुला आजही आठवण येते का ग त्याची ? " ,

" हो , मित्र म्हणून .... तू समजतो तसं काही नाहीये , माझं मन त्याच्यात कधी गुंतलच नाही . तो माझ्यासाठी खूप जवळचा मित्र होता त्यापलीकडे काहीच नाही . त्याचा तो हसरा विनोदी स्वभाव आठवला की वाटतं आजही तो आहे आपल्यात . तुला ठाऊक आहे ना अन्या , विपिन कधीच कुणाला sad मूड मध्ये दिसला नाही . कोणी दुःखी असलं की त्याला पोटधरून हसवायचा तो . प्रेम म्हणून नाही पण मित्र म्हणून आजही येते त्याची आठवण .... ",

" हो , पण तू त्याला नकार तरी का दिलास ... ",

" माझं आधीच कुणावर तरी प्रेम होतं , पण त्याला मी कधीच सांगू शकली नाही .... ",

" really , कोण होता तो ..... आम्हाला कधी सांगितलं नाही तू ..... ",

" आता काही अर्थ उरला नाही रे त्या सर्व भावना भूतकाळातच जमा राहिल्या ... life खुप पुढे निघून गेलं . आता माझं लग्न झालं .... आणि ...... ",

" आणि ..... काय ?",

" त्याचही लग्न झालं असावं .... " आदितीला वाटलं " विचारावं का ह्याला , नाही नको " म्हणून तिने तिथेच विषय टाळला . तिचं लक्ष वर आकाशाकडे गेलं , राखंडी ढग दाटून आले होते . सर्वत्र बकुळीचा सुगंध पसरलेला होता .... इवलीस रोपटं होतं हे विपिनने लावलं होतं तेव्हा , आता किती बहरलं ना ! एवढं विशाल झालं ...

आदितीच्या मनात जे विचार घोळत होते तेच विचार अनुजच्या डोक्यात चालले होते .

" आदि , आज आपण विपिनने लावलेल्या बकुळीच्या छायेखाली उभे आहोत ... त्याला तर तिचा सुगंधही घेता आला नाही . ",

" हो ना यार .... म्हणत होता ' मी इथेच पहुडलेला असेल ' आज ह्या बहरलेल्या पुष्पाकडे बघून वाटतं हा बहर म्हणजे विप्याचं खळखळणार हास्य ..... तो इथेच कुठे असावा .... ",

प्रत्येकात एक सुप्त इच्छा दडलेली असते , जगावेगळी आवड असते काहीतरी आगळंवेगळं करण्याची .... ती आवडच त्या व्यक्तीला मग खूप मोठं बनवते . नाव , प्रतिष्ठा सारं काही मिळवून देते . तो निघून गेल्यानंतरही जगाच्या पाठीवर त्याच अस्तित्व कुठेतरी शाबूत असते .

विपिनच अस्तित्व त्याने लावलेल्या बकुळीत का नसावं ?

" खूप जपायचा ग तो बकुळीला , एकदा म्हणाला होता ' अरे बकुळी म्हणजे ना माझं हृदय ..... नाही , हृदयात उमलणार सुहासी पुष्प , नाही माझा श्वास ... यार मी कोणी कवी नाही ना म्हणून मला असं शब्दाशब्दात बकुळीला नाही मांडता येत .... "

अनुजला विपिनचे ते शब्द आठवत होतेे . अचानक किती तरी कालावधी नंतर त्याच्या स्मृतिफलकावर तो हृदयद्राव्य प्रसंग तरळत उभा राहिला .


=========================================================



" शब्दशब्द जपून ठेव हे बकुळीच्या फुलापरी असे म्हणतात , आणि .... तू तुझे ते शब्द जपून ठेवले आहेस .... बकुळीला तू तुझ्या हृदयात उमलणार सुहासी पुष्प म्हण , की तुझा श्वास म्हण , भावना व्यक्त होणं गरजेचं आहे .... ",

" खरयं अनुज , भावना व्यक्त होणं गरजेचं असतं .... आयुष्यात काहीतरी चांगलं केलं असावं मी , तेव्हा कुठे तुझ्यासारखा अर्थबोध समजवून सांगणारा मित्र मिळाला मला . "

प्रेम हे एकतर्फी किंवा मनुष्यालाच मनुष्यावर होत असतं असं नाही . निःस्वार्थ प्रेम पुष्पावर , वृक्षवल्लीवर ही केल्या जातं ... भावनांचं काय त्या शब्दात खिळतातच .

" अनुज तुला काही सांगायचं होतं . ",

" सांग ना मग ..... ",

" तू कुणाला सांगणार नाही ना ? ",

" अरे बिनधास्त बोल .... नाही सांगणार . ",

" माझं ...... आदितीवर प्रेम आहे ..... " हृदयावर कोणी नकळत येऊन घाव घालावा तसं अनुजला झालं . आपण विपिनच्या तोंडून हे काय ऐकतोय मला तर वाटतं आदिती माझ्यावर प्रेम करते . ती मला रिस्पॉन्स ही देते पण कधी व्यक्त होत नाही . आदितीच खरचं विपिनवर प्रेम असेल का ? तसं झालं तर ही कल्पना देखील त्याला असह्य होत होती .

" काय .......??? ",

" हो ...... अनुज . ",

" माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे .... मला आवडते ती , मला तिला हे सांगायच आहे ... पण एक अडचण आहे . " ,

" कोणती ? ",

" ती माझ्यावर प्रेम नाही करत .... तिचा नकार पत्करावा लागला तरी मी तिला येत्या 1 जानेवारीला माझ्या मनातलं बोलून दाखवणार आहे . " ,

अनुजला काय बोलावं कळत नव्हतं .

" अनुज , मी तिच्यावर पहिल्यादा एक कविता लिहिली तुला ऐकवतो .",

" हो , ऐकवं ना ! "

विपिन खिशातून चिट्टी काढून कविता वाचू लागला , "

तू मंद वारा की झुळक त्या वाऱ्याची ,
नकळत माझ्या मनाला स्पर्शून जावी .......

तू सर पावसाची , का मज हवीहवी वाटावी ,
तू गंध परिजातकाचा मला मोहून घ्यायची ........

हसरे टरोपे डोळे तुझे किती लाजवी ,
क्षणक्षणाला भुरळ घालती मला , नयनताराच्या भिजवून राती ....

मी विरंगुळा होतो , कधी तुझा प्रियकर म्हणूनी तर कधी सखा ....
तू सांग कोणते नाव देऊ आपल्या ह्या नात्याला ?? "

अनुज निःशब्द होता ,

" अरे सांग ना , कशी वाटली माझी कविता ..... जमली ना ! " ,

चेहऱ्यावर उसने हास्य आणत "अप्रतिम" बस्स एवढंच बोलला अनुज . विपिनला त्याचा चेहऱ्यावर नैराश्याच वादळ उमटलेल दिसतं नव्हतं . तो आपल्याच धुंदीत बोलत होता .

अनुजला एवढ्यात कॉल आला . तो कॉल कंपनीच्या एका एम्प्लॉयचा होता . आईचा कॉल आहे तिने मला घरी अर्जेन्ट बोलवलं , असं सांगून अनुज तिथून निघून गेला .

उद्या 1 जानेवारी ... ठरल्या प्रमाणे आपण आदितीला सर्वांच्या समोर प्रपोज करायचं असं त्याच्या मनात होतं . त्या रात्री विपिन रात्रभर झोपलाच नाही . काय म्हणेल आदिती ? ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल का उद्या ? उद्या नाही केला तर ..... कधीतरी !
मी शेवटपर्यंत तिच्या होकाराच्या प्रतीक्षेत असेल ... ह्याच विचारात पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला आणि ट्रिंगट्रिंग कांठाळ्या बसवणाऱ्या अलार्मने त्याला लागलीच जाग आली . रात्रभर आदितीचा विचार आणि आताही तो कॉलेजमध्ये आदितीच्या विचारातच घराच्या बाहेर पडला . मालती , निख्या , अनुज .... ह्यांना विपिन ...आदितीला आज प्रपोज करणार असल्याचं माहिती होतं .

ते सारे विपिन कधी येतो त्याचीच वाट बघत बसले होते . विपिन आपल्यावर कधी प्रेम करेल असा विचार देखील आदितीच्या मनात आला नाही . तिला तर ह्याची पूर्वकल्पना देखील नव्हती . विपिन येण्याच्या आधीच निखिल आणि प्रितमच्या बोलण्यावरून तिला समजलं ... हे खरयं का हे जाणून घेण्यासाठी तिने रेवाला विचारलं , तिने ही खरं काय ते सांगून दिलं . झालं विपिनच्या प्लॅनवर पानी फिरलं ..... आदिती रेवाला बजावून गेली ,
" त्याला सांग आल्यावर , तो माझा फक्त मित्र आहे.... आणि मित्रासारखं रहा म्हणावं... "
तावातावाने आदिती तिथून निघून गेली .

विपिन कॉलेजमध्ये आल्यावर त्याला आदिती कुठेच दिसत नव्हती ह्यावरून त्याला कल्पना झालीच ..... ह्यातल्या कोणीतरी तिला सांगितलं असावं ,
" निख्या , तू सांगितलं का आदितीला काही ...... ती कॉलेजमध्ये आली म्हणून तूच वाटेत असताना टेक्स्ट केला होताना ?? गेली कुठे आता आदी .... ",
" ये मी कशाला काही सांगू ..... ",
" मग कोणी काय सांगितलं ...... मालती तू ?? ", मालती काही बोलायचा आतच .... रेवा मध्ये आली ,
" हे बघ माझ्यावर नको रागावू मी काही नाही केलं ..... तिने निख्याचं आणि प्रितमचं बोलणं ऐकलं ..... ह्यांना माहिती नव्हतं , ती ह्यांच्या मागे उभी आहे म्हणून .... मग ती मला येऊन विचारू लागली ...... ",
" आणि तू सांगून दिलं ....... हो ना ! ",
" साल्यानो , तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू रे ..... तिला थांबवलं का नाही कोणी ?",
" अरे यार , रिलॅक्स .... जाईल कुठे ती उद्या कॉलेजमध्येच येईल .... डोन्ट वरी .... चल टपरीवर चहा प्यायला ..... ",
" चाआयला , तुला चहा सुचतो ..... मला व्हिस्की प्यावी वाटते ..... ",
" चला ना मग .... बार वर ..... ",
" ये गप्प बसा रे ..... ",
" का ग रेवडे ..... तुला काही प्रॉब्लेम होतो का ?",
" मला तर दारूची वास देखील सहन होतं नाही ..... ",
" ये देशी ..... चल तिकडे जाऊन बस , म्हणे मला दारूची वास सहन होत नाही .... ",
" चला रे चला .... चहाच्या टपरीवर .... " प्रितमने साऱ्यांना चहा प्यायला टपरीवर नेलं .
गेली आठ दिवस आदिती विपिनसोबत बोलायचं टाळत होती . 10 जानेवारीला विपिनचा वाढदिवस होता . म्हणून त्याने सर्वाना एका हॉटेलमध्ये पार्टीला इन्वाइट केलं होतं . आदितीला ही बोलवलं .

" आदिती , मला माहित्ये तू माझ्यावर खूप रागावली आहेस ना ! .... पण प्लिज आजचा दिवस हा राग बाजूला ठेऊन पार्टीला ये ..... तू आली नाहीस तर मला छान वाटणार नाही . "

आदितीने मानेनेच होकार दर्शविला . त्याचा शब्दाला मान देत ती आणि सर्व ग्रुप ठरल्यावेळेवर रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये जाऊन पोहचले .

आठचे दहा ..... दहाचे बारा वाजलेत पण विपिनचा काही यायचा पत्ता नव्हता .

सर्व वाट बघून बघून कंटाळले ... आम्हाला हॉटेलमध्ये बोलवून कुठे गेला असावा हा

म्हणून प्रितमने शंभरवेळा कॉल लावून बघितला असेल त्याला . पण फोन स्विचऑफ

येत होता .


रात्रीचे बारा वाजले होते ....

अनुज आपल्या कारने सर्वाना घरी ड्रॉप करून देत होता .... सुनसान रस्त्याने अनुजची एकट्याची कार धावत होती .... मुसळधार पाऊस पडत होता .... रस्त्यावरचे खड्डे अनुजला दिसेनासे झाले होते .... पावसामुळे रस्त्यावरचे दिवे बंद झाले होते ..... काहींची उघडझाप चालू होती .... कारच्या फ्रॉन्ट लाईटच्या मंदप्रकाशात अनुज कार चालवत होता .... आजूबाजूला किर्रर्र अंधार , आणि पावसाचा जोर तेवढा कायम होता .

" welcome back ..... everyone ,आप सुन रहे है 93.3 my FM निधी के साथ ... बाहर तेजी से बारिश हो रही है .... आजकल बादल अपना रुख बदल रहे ! इस साल समय से पहिले मुम्बई में बारिश शुरू हो रही है .... और इस बरसात का स्वागत करेंगे हम एक प्यारभरे गाने से .... तो चलिए सुनते है , सुनिधि चौहान की आवाज में Bhage re mann .....


बेहता है मन कहीं , कहाँ जानते नहीं
बेहता हे मन कहीं , कहाँ जानते नहीं
कोई रोकले यहीं ....

भागे रे मन कहीं , आगे रे मन चला जाने किधर जानु ना
भागे रे मन कहीं , आगे रे मन चला जाने किधर जानु ना !!..... "


" अण्या , loudly ..... loudly ..... woofer ऑन कर ना यार ...." मालती ओरडली . कारण तिचं हे फेव्हरेट song होतं ...

अनुज volume वाढवायला गेला एवढ्यात रेडिओ खरखरायला लागला . मागच्या शीट पर्यंत आवाज पोहचत नव्हता . कदाचित पावसामुळे असेल .....

" का रे अण्या तुझा रेडिओ पण ना ! .... ",

" त्याचा रेडिओला काही नाही झालं ...... तू तुझे कान साफ कर .... " निखिल रेवाला चिडवण्याची एक संधी सोडत नव्हता .

" शट्ट यार .... किती मुसळधार पाऊस पडतो आहे , इकडे जवळपास कुणाचं घर आहे का ? " मालती वैतागली होती अश्या अचानक आलेल्या पावसाने .

" हो , माझं घर आहे इथून पुढच्या चौकातच .... अनुज तू कार माझ्या घरी घे ... आज रात्रभर तुम्ही सर्व माझ्या घरी थांबा ... ",

" अरे यार प्रितम .... तुझ्याघरचे रागावतील नाही ना ! आपल्या सोबत ह्या तिघीपण आहेत .... ",

" नाही रागावतील रे , तिघीसाठीच म्हणतोय .... ह्या एका एरियात नाही राहत तिघीपण तीन टोकाला राहतात .... एवढ्या मुसळधार पावसात ह्यांना ड्रॉप करणं शक्य आहे का तुला ? ",

" नाही .... चल तुझ्याचकडे ....",

" हो , आलंय माझं घर .... कार लेफ्टला घे इथून समोरचा रस्ता लागला की राईटने टर्न .... बस्स बस्स थांबव आता , आलं घर ..... "

पावसात सर्व भिजनार होती . अनुजने कार गेटच्या आत घेतली . कारचा डोर उघडून सर्व पावसापासून बचाव करत घराच्या बाल्कनीत पळाली ....

" अरेच्चा ..... लाईट गेली वाटतं .... " एवढा वेळ गप्प बसलेला निखिल पुटपुटला .

" काय झालंय इकडे .... ",

" मूर्खां निख्या , काय व्ह्याचंय इकडे .... मुसळधार पाऊस कोसळतो आहे दिसत नाही का तुला ? ",

"यार .... कार मधून उतरताच तुम्ही दोघे इथे गोंधळ नका घालू शांत रहा जरा ...."

रेवा निखिल आणि अनुजवर चिडली ...

प्रितमने एकदा , दोनदा ..... दरवाजा वाजवला तेव्हा आतून त्याची आई बाहेर आली ...

" काय ग आई , किती उशीर करते ..... ",

" पाऊस बघ किती धो - धो पडतोय ते तुझा आवाज आत येईल तर ना ... अरे ही कोण ? या आत या .... ",

" आई , हे माझे सर्व फ्रेंड्स आहेत .... ही रेवा , ही मालती .... आदिती आणि हा निख्या , अनुज हा नवा आलाय क्लास मध्ये .... हा प्रितम ह्याला तर तू ओळखतेच .... ",

" Hello .... अँटी ....... " साऱ्यांनी एक सूर काढला .

" आई आम्हा सर्वांना जाम भूक लागलीये ..... काही खायचं दे ! ",

" अरे हो काहीतरी बनवते मी , पण तुम्ही सर्व पार्टीला गेले होते ना ! कशी झाली पार्टी ? ",

" कसली पार्टी न कसलं काय ...... अगं विपिन आलाच नाही . ",

मधेच निखिल बोलला ,

" हो ना काकू ..... खूप वाट बघितली आम्ही त्याची ......",

" अरे मग कॉल करायचा होता ..... ",

" शंभरक वेळा कॉल केला असेल , पण नाही रिसिव्ह केला त्याने ... कुठे गेला ना हा विपिन ....",

" असुद्या, महत्वाच्या कामात फसला असेल ..... इकडे आलात ते बर झालं मला तर प्रितमची खूप काळजी वाटतं होती .... बाहेर मुसळधार पाऊस कोसळतो आहे .... ",

" अगं आई , नको ना एवढी काळजी करत जाऊ माझी .... मी काही पावसात वहात नाही जाणार आहे .... बाय द वे , बाबा आणि छोटी कुठे दिसत नाही .... ",

" झोपलेत ते ..... वेळ बघ किती झाला ... बर ऐक तुझ्या मित्रांना घेऊन वर गेस्ट रूम मध्ये जा मी काहीतरी खायचं करून आणते .... ",

" OK mom ..... "

प्रितम सर्वाना घेऊन गेस्ट रूम मध्ये गेला . सर्व फ्रेश होऊन बसलीत . अनुज एकटाच खिडकीतून पाऊस बघत उभा होता .

" एवढ्या काळोखात तुला पाऊस दिसतो तरी कसा ? ",

" अगं रेवा , दिसत नसला तरी फील करता येतो ना ! ",

" ओहहहह ग्रेट फील लव्हर ... ",

" मला पाऊस खूप आवडतो ..... ",

" ...... आणि मला अजिबात आवडत नाही ....",

" दिवसाही रात्र वाटावी असा काळोख आणि ढगांच्या आड लाजून बसलेला सूर्य .... ",

" आग ओकणारा सूर्य तो ..... म्हणे लाजून बसतो ..... तुम्ही कवी लोक ना यार वेडे असता वेडे .... कशालाही कशाची उपमा देत बसता ..... " थोड्या दूर अंतरावर बसलेल्या साऱ्याकडे बघत रेवा बोलली ," guy's ..... ऐकलं का ? " निखिल ओरडला हो .... चालू द्या आम्ही ऐकतोय ....

" वेली झाडांना बिलगतात .... जणू वीज कडकडावी आणि ..... ",

" आणि अश्या पावसात गाड्या ट्राफिक मध्ये फसतात .... घनटोनशे ! ",

" पावसात कॅशिअर पण कधी कवी बनतो ..... , थेंब थेंब सरीने शब्द शब्द भिजवतो ... ",

" थेंब थेंब सरीना काय घेऊन बसलास , त्या सरी न तो पाऊस फक्त इंस्टा fb वॉलची क्रेज वाढवतो .... ",

" गरमा गरम भजी सोबत ..... वाफाळलेल्या चहाची काही औरच मज्जा असते .... ",

" सोसाट्याचा वारा आला आणि हातातली छत्री उडून गेली .... की झाली भिजण्याची सजा .... ",

" सजा काय म्हणतेस पाऊस असा एन्जॉय करायचा असतो .... तुझ्या बाजूला बघ ! "

आदिती खिडकीतून बाहेर हातावर सरी झेलत तो थंड पाण्याचा स्पर्श गालाला लावून घेत होती .

" इट्स सो cold ..... ",

"तुम्ही दोघेही ना पाऊस वेडे आहात ..... ",

" हो की , पाऊस वेडे काय म्हणतेस चक्क मृगजळीत म्हण ..... असं पावसाच्या मागे मागे धावणाऱ्या ह्या दोघांना .... ",

" हो , प्रितम ..... अचूक बोललास ...

ह्यांना खिडकीतूनही पाऊस हवाहवासा वाटतो , कॅफेमध्ये तर पावसात नाचावं वाटतं ...."

" चला आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात .....",

" रेवा , अगं ही गाण्याच्या भेंड्या खेळायची वेळ नाहीये ..... मला विपिनचा विचार येतोय ... कुठे असेल तो ? कॉल पण घेत नाही आहे .... ",

" अनुज अरे आपण किती कॉल केलेत त्याला , उद्या चल त्याच्या घरी .... सल्याला सोडणार नाही मी भेटला तर ..... असं असतं का ? मित्रांचा काही विचार ? आपली काळजी करत असतील एक कॉल करून सांगितलं पाहिजे .... नाही ..... तो कशाला सांगणार .... उद्या कॉलेज मध्ये न चालता आधी त्याच्या घरी चल .... "

रात्री उशिरापर्यंत कुणालाच झोप येत नव्हती .... पहाट झाली .... अनुजने रेवा , आदिती , मालती ह्यांना घरी ड्रॉप करून दिलं ... आणि ते तिघे विपिनच्या घरी गेले .

दोन , तीनदा निखिलने डोर बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता .

प्रितमची नजर दाराच्याकडीकडे गेली ,

" अरे यार शिट्ट ...... लॉक लागलेले आहे ..... म्हणजे घरी कोणीच नाही ..... ", सर्व गेले कुठे असतील ..... आजूबाजूला विचारलं पण कुणालाच माहिती नाही ....

दोन दिवस झाले सर्वाना वाटलं विपिन आज येईल उद्या येईल .... आठ दिवसाने अनुज घरी गेला तरी देखील घराला लॉक लावलेलं होतं . महिना झाला पण विपिन आला नाही . परत अनुजने ठरवलं एकदा घरी जाऊन बघू ....

महिनाभराने प्रितम आणि अनुज विपिनच्या घरी गेले , आज घराची सारी दार सताड उघडी होती . पाहुण्यांची रेलचेल .....

" अन्या , घरी काही प्रोग्राम आहे वाटतो विप्याच्या ..... आणि ह्यांने आपल्याला काही सांगितलं देखील नाही .... त्याच्या बहिणीच लग्न तर .... ",

" गप्प रे ..... आपल्या सोबत गेली एक महिना झाला विपिन बोलला नाही .... आत जाऊन बघू .... " ,

दारातूनच प्रितमला विपिनचे डॅड दिसले .... त्याने बाहेरूनच त्यांना आवाज दिला ,

" अंकल , विपिन घरी आहे का ? " तिथे उपस्थित साऱ्याचा माना प्रितमकडे वळल्या ,

" आम्ही त्याचे मित्र ..... आम्हा दोघांना त्याला भेटायचं आहे .... खूप दिवस झाले तो बोलला देखील नाही आमच्या सोबत , त्याच्याशिवाय क्लासमध्ये लक्ष लागत नाही ... बोलावाना विपिनला ...."

भितीवर लटकवलेल्या फोटोकडे दारातूनच अनुजची नजर गेली .... अनुजच हृदय जोराने धडधडु लागलं .... तो एकदम स्तब्ध झाला .... सुन्न मनाने त्याने त्या फोटोकडे आवासून बघितलं ...

" काय झालं काका ?? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात .... " पायातील शूज बाजूला काढून ठेवत प्रितम आत गेला .

" विपिन , विपिन ..... कुठे आहे तू ? काय यार आम्ही तुझ्या घरी आल्यावर देखील अशी मज्जाक नको करू .... लवकर बाहेर ये हा ...नाहीतर मी येईल तिकडे ... "

आत जात अनुजने प्रितमचा घट्ट हात आवरला , आणि भितीवर टांगलेल्या फोटोकडे नजर फिरवली .... फोटोतही हसतच होता तो त्याची ती करारी मिश्किल नजर उभ्या असलेल्यावर रोखून धरली असावी त्याने , असा बघणाऱ्याला भास व्हायचा .... बकुळीच्या फुलांचा सुकलेला हार त्याच्या फोटोवर झुलत होता .... बाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्याने तो काहीसा हलत होता .

" बेटा , विपिन ...... विपिन आपल्यातुन निघून गेला ..... " त्याच्या डॅडच हे बोलणं ऐकून

प्रितमच्या पायाखालची जमीनच सरकली ....

" त्याला ब्रेन ट्युमर झाला होता ..... वाढदिवसाच्या दिवशी तो हॉटेलमध्ये तुमच्याकडे यायला निघाला तेव्हा अचानक त्याची तब्येत बिघडली .... त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं .... ICU मध्ये एक महिना भरती होता तो ..... ", विपिनचे डॅड जे घडलं ते निर्विकारपणे सांगत होते ...

" एवढं सगळं होऊन तुम्ही आम्हाला , साधं कॉल करून देखील बोलवलं नाही ..... "
अनुज डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता .... प्रितम तर तुटून गेला होता .... सारखा विपिनचा फोटोकडे बघत होता तो .....

" मी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच तुमचे कॉल येत होते तेव्हा तुम्हाला सांगणार होतो , पण विपिनने मला अडवलं म्हणत होता , " माझ्या मित्राना कुणालाच सांगू नका मला काय झालं ते ... आज माझा वाढदिवस आहे आणि ते सर्व खुश आहेत .... ",

किती निःस्वार्थी वृत्तीचा होता विपिन .... " एकटा एक मुलगा होता आमचा , कधीच कशाचं अट्टहास नाही केला त्याने आमच्याकडे .... जाताना एवढंच सांगून गेला तो तुम्हाला ..... मी नसलो तरी मला भेटत रहा .... "

मागे वळून त्याच्या फोटोकडे एक नजर टाकत अनुज आणि प्रितम घराच्या बाहेर पडले ....


====================================================================