Dhukyataln chandan - 12 books and stories free download online pdf in Marathi

धुक्यातलं चांदणं ....... भाग १२

Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली तितक्यात. विवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली.
" काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?",
"पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.",
"असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली. दिवसातून,अधूनमधून तो पूजाला call करत राहिला. एकदाही तिने call उचलला नाही. विवेकचा मूड खराब झाला होता. धड जेवलाही नाही. सुवर्णाला ते कळत होतं. खरंच, विवेकला पूजाची सवय झाली आहे आता. आपण त्यांच्यापासून वेगळं राहिलेलं बरं. पण आपण मैत्री तर ठेवू शकतो ना विवेक बरोबर. Friendship च बरी.


ऑफिस सुटल्यावर सुद्धा, विवेक आणि सुवर्णा तिची बाहेर वाट बघत राहिले. पूजा आलीच नाही. एक तास उलटला तेव्हा सुवर्णानेच विवेकला कसंबसं स्टेशनला आणलं. तरी तो घरी निघायच्या तयारीत नव्हता.
"अरे… असं का करतोस तू … ती आली नसेल आज बँकमधे.",
"मग call का नाही उचलत ?",
"ते मला कसं माहित असेल?.",
"तू लाव ना call मग… ",
"विवेक… माझ्याकडे तिचा नंबर नाही आहे.",
"मग आपण तिच्या घरी जाऊया का बघायला तिला?",
"विवेक !! काय झालंय तुला… एक दिवस तर नाही आली ना ती. एक दिवस तरी आराम करू दे… " तसा विवेक शांत झाला.
"चल… आता घरी जा सरळ… समजलं ना.",
"मी थांबतो थोडावेळ… ",
"कशाला ?",
"असंच… निघतो थोडयावेळाने.",
"OK, ठीक आहे… पण नक्की जा लवकर."म्हणत सुवर्णाने ट्रेन पकडली. विवेक स्टेशनवरच बसून राहिला.


तिकडे पूजाच्या घरी, तिला "बघण्याचा" सोहळा पार पडला. जरा नाखुशीनेच पूजा थांबली होती घरी. सकाळपासून विवेकने १५-१६ call केले होते. एकदाही call उचलला नाही तिने.त्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला पूजा आवडली होती. पुजाकडे सुद्धा स्थळ पसंत होतं. फक्त त्याला ३ वर्षानंतर लग्न करायचे होते, काही कारणास्तव. बाकी सगळे गुण जूळत होते. पूजाला ते सगळं नको होते एवढयात. पाहुणे गेल्यावर तिच्या वडिलांनी आईकडे विषय काढला.
"स्थळ चांगलं आहे. लग्नाला कशाला पाहिजे एवढी वर्ष, ३ वर्षांनी लग्न… मला नाही पटत ते. त्यापेक्षा आपण दुसरं स्थळ शोधू. यावर्षीच लग्न उरकून टाकू.", ते ऐकून पूजा बोलली.
"बाबा !! मला नाही करायचं एवढयात लग्न… तुम्हाला काल बोलले ना मी.",
"गप्प बस… आजकाल जास्त तोंड चालायला लागलं आहे तुझं. तुझ्यात खूप बदल झाला आहे. पहिली कधी तोंड वर करून बोलली नाहीस, आता लगेच उलट उत्तर देतेस. सुट्टीच्या दिवशी बाहेर असतेस हल्ली. बँक मधून सुद्धा उशिरा येतेस आजकाल. तुझ्या त्या मैत्रिणीला भेटलं पाहिजे एकदा. कशी आहे ते बघूया." पूजा गप्प.
" आता काय झालं, गप्प झालीस.तुला सांगतो आता,मला हे आवडत नाही. खूप दिवस बघतो आहे मी तुला. उद्या पासून घरी वेळेवर येत जा. आणि बाहेर फिरणं सोडून दे आता. नाहीतर असं कर, मैत्रीणच सोडून दे ती. काय… कळलं ना." म्हणत पूजाचे वडील उठले आणि बाहेर गेले. पूजा आईकडे बघत राहिली.
" मला वाटते, तू विवेक बरोबर जाणं , आता सोडून दिलं पाहिजेस. नाहीतर अशीच भांडणं होतं राहतील घरात. तुला लग्न नाही करायचं ना एवढयात. ते बघते मी. पण ते सांगतात तास तरी वागशील ना. शहाणी हो गं बाळा आता."पूजाच्या डोक्यावरून हात फिरवला आईने आणि ती आत निघून गेली. पूजा नाराज होती. काय ना…. पहिल्यांदा प्रेम झालं कुणावर तरी आणि लगेच विसरायचं सुद्धा… कसं विसरू विवेकला.


पुढच्या दिवशी सुद्धा तेच झालं. विवेक पूजाला call लावायचा आणि ती कट्ट करायची. शिवाय पूजाने ३ दिवसांची सुट्टी घेतली होती. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर ती विवेकला भेटलीच नाही. ३ दिवस असचं सुरु होते . सुवर्णा काहीच बोलली नाही त्यावर विवेकला. चौथ्या दिवशी, पूजाने call उचलला.
"Hello… बोल.",
"अगं पुजू… आहेस कूठे तू… किती दिवस call करतो आहे तुला. काय झालं… बोलायचे नाही का माझ्याशी ? माझी काही चूक झाली का… ",
"नाही रे विवेक… तब्बेत ठीक नव्हती म्हणून.",
"मग call तरी उचलायचा ना, call का नाही उचलत होतीस ?",
"असंच.",
"सांग तरी.",
"माझ्या घरी आवडत नाही माहित आहे ना तुला.",
"OK , sorry … मग आता तरी बरं वाटते आहे ना तुला… ",
"हो… आता बरी आहे मी.",
"ठीक आहे… संध्याकाळी भेटूया मग. ",
"बघू… खूप काम आहे.",
"मग निघालीस कि call कर.",
"नको… तू नको थांबूस. मला माहित नाही मी कधी निघणार ते. आणि आता खूप काम आहे,नंतर बोलूया… Bye " आणि पूजाने call कट्ट केला. अरे !! काय झालंय हिला… पहिली अशी कधी वागली नाही हि. विवेक विचार करू लागला.

पूजा बोलल्याप्रमाणे,ती संध्याकाळी आलीच नाही. विवेक नाराज झाला,
"चल रे विवेक… अजून किती वेळ थांबणार. तिला नाही भेटायचं असेल. काम असेल काही. " विवेकने मान हलवली.
"ठीक आहे मग,तू जा… ",
"कूठे निघालास ?",
"मी ?, जातो इकडेच.",
"इकडेच कूठे ? का थांबणार आहेस अजून." विवेकचं उत्तर नाही.
"सांगतोस का आता… ",
"मानसीकडे चाललो आहे."सुवर्णाला शॉक बसला.
"काय ?",
"मानसीकडे चाललो आहे."सुवर्णाला राग आला.
"तुला काय वेडं-बिड लागलं आहे का. काय बोलतोस तुला तरी समजते का… ",
"हो. ",
"काय हो… आणि ती सुरतला गेली आहे ना रहायला. तिकडे जाणार का तू आता. ",
"नाही. ती आली आहे मुंबईला.",
"आणि तुला कसं माहित हे.",
"मला भेटली होती ती.",
"अरे !! तुला भेटली होती ती आणि तू मला आता सांगतो आहेस हे…कमाल आहे तुझी, इकडे कशाला आली परत ती.",
"तिचं लग्न आहे इकडे मुंबईत म्हणून आली आहे ती, महिन्याभरासाठी. तीच बोलली भेटायला ये एकदा.",
"तिने बोलावलं आणि तू चाललास.",
"ती माझी Friend होती ना म्हणून. अभिनंदन करायला चाललो आहे. तू येतेस का.?","तूच जा.",
"ठीक आहे. तुही भेटून ये तिला. तुझी सुद्धा मैत्रीण होती ना ती. घर तर माहित आहे तुला.",
"हो माहित आहे घर तिचं मला,पण एक सांगू का विवेक तुला.",
"बोल.",
"आज नको जाऊस.",
"का गं ?",
"पूजा नाही आहे तर तुझा मूड खराब आहे. कामात किती चुका झाल्या तुझ्या, सर तुला नाही बोलले काही,पण मला सांगितलं त्यांनी. असं कधी झालं नव्हतं आधी तुझ्या कडून. जेवताना सुद्धा कूठे लक्ष असते तुझं. धड जेवत नाहीस. त्यात मानसीला भेटायला चालला आहेस. काय चाललंय तुमचं, मला कळत नाही अगदी.",
"काही नाही. तू Tension घेऊ नकोस. चल , मी निघतो. उद्या भेटू ऑफिसला."म्हणत विवेक निघून गेला. सुवर्णा त्याच्याचं विचारात गढून गेली.

=============== क्रमश: ==================

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED