A Strange Thing - The Siren Calls - 12 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (12)

१२. फायनल वर्डीक्ट -

मी अजूनही घुटमळतच होतो.
"काय? झालं ना सगळं?" अचानक मूड बदलत मिश्कीलपणे तो म्हणाला.
"नाही...!"
"बोला! तुझं तर समाधान कधी होतच नाही!" त्यानं मला टोमणा मारला.
"अजून तुम्ही या केस मध्ये मिळवलेली गन दाखवली नाही."
(खरं तर मला लांबवलेली म्हणायचं होतं...)
"आत्ता आमचा राघू बोलला!" म्हणत त्यानं दोन पिस्तूलं काढून माझ्या समोर ठेवली.
त्या मिस्टर वाघच्या विंटेज गन्सच्या आवडीच्या तुलनेत फारशा विशेष नव्हत्या. रेग्युलर होत्या. एक 30 ऑगस्ट 2017 मॅनिफॅक्चरिंग डेट असलेली फिफ्थ जनरेशन ग्लॉक 19 जेन 5 सेमीऑटोमॅटिक पिस्टल व दुसरी 1976 मेड बेरेट्टा 92 सेमीऑटोमॅटिक पिस्टल होती.

(बेरेट्टाचंच रणजितनं वापरलेलं एक मॉडेल '96' त्यानं 'डेथ विल'च्या वेळीही त्याच्या घरी आणलं होतं.)

"दोन कुणाच्या?" मी गोंधळात पडलो.
"एक युसूफची आणि दुसरी अनुषा!" तो हसला.
"अनुषा का? तसंही या काही तितक्या विंटेज गन्स नाहीत तरी त्या तुम्ही का आणल्यात?"
"कारण या माझ्यावर रोखल्या गेल्या होत्या!" त्यानं कठोरपणे उत्तर दिलं,
"या मी कशा राहू देणार होतो?!" त्यानं प्रश्न केला.
हा प्रश्न मी उत्तर देण्यासाठी नव्हता, तर त्याला यातून तो कोणालाच बक्षत नाही हे ठसवण्यासाठी होता.
"गन्स हा माझा विक पॉईंट आहे. त्या विंटेजच असायला पाहिजेत असं नाही. मॉडेल उत्तम असावीत इतकंच!" त्यानं स्पष्ट केलं.
"पण याचा अर्थ तुम्ही त्या चोरल्यात!" मी ठामपणे म्हणालो.
"नाही! युसूफबद्दल म्हणत असशील, तर तो मरेपर्यंत थांबून मग मी त्याची गन घेतली. मेल्यानंतर मृताच्या मालकीचं काही राहत नाही. त्यामुळं मी त्याची पिस्टल चोरली असं होतं नाही. आणि जरी तो जीवंत असता, तरी शेवटी तो क्रिमिनलच! त्याच्याकडं कसली आलीये चोरी!" तो म्हणाला.
"आणि अनुषा? तिला कोणता नियम लावाल?" मी विचारलं.
मी त्याला अजूनही चोर ठरवू पाहत होतो. तो यातून कसा बाहेर पडतो हे मला पाहायचं होतं. पण तो या प्रश्नातही अडकला नाहीच...

"मी तिला तिच्या ग्लॉकची किंमत मनीऑर्डरने पाठवली आहे!" तो सहीसलामत बाहेर पडला.
"मनीऑर्डर का? तुम्ही ऑनलाईन पेमेंट का नाही केलंत?"
मला कळेना असं का...
त्यावर तो म्हणाला,
"तिनं माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला शिक्षा तर मिळायलाच हवी होती! मनी ऑर्डर तिच्या हाती पडेपर्यंत शोधू देत तिला तिची पिस्टल!" तो कुटील हसला.
"तुम्हाला लोकांना त्रास द्यायला का आवडतं?" मला त्याचं असं वागणं आवडलं नव्हतं.
"नाही! मी सगळ्यांशी असा नाही वागत. जे चुका करतात यांच्याशीच मी असा वागतो. गुन्हेगारांना सतवायला मला आवडत!" तो पुन्हा हसला.
"मग मला का सतावता?!" मी रागानं विचारलं.
"याचा विचार तूच कर!" तो डोळे बारीक करून म्हणाला.
आणि माझ्या अंगांगावर भीतीची लहर दवडली आणि असं विचारून आपण चूक केली आहे हे माझ्या लक्षात आलं...

समाप्त!

सामाजिक दुर्भावनांबद्दलची चीड म्हणजे मिस्टर वाघ. पण मिस्टर वाघला वाईटही म्हणता येत नाही, कारण समाजात काही वाईट घडत असले, तर त्याबाबत गप्प बसणेही योग्य नाहीच. हा! पण म्हणून आपणही कायदा हातात घ्यावा असा त्याचा अर्थ नक्कीच होत नाही. यावर उपाय काय; तर एक चांगला, समजूतदार, जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक होणे हाच!
आणि मिस्टर वाघ याचसाठी मला प्रेरणा देतो. चांगल्या - वाईटाचा ऊहापोह करण्याचे मिस्टर वाघ हे एक साधन आहे. आणि म्हणूनच मिस्टर वाघला घेऊन आलो आहे.
असो मागील कथांप्रमाणे मिस्टर वाघचा हा सायकॉलॉजीकल खेळ सुद्धा आपल्या सर्वांच्या पसंतीस पडला असेल अशी अशा करतो...

धन्यवाद!!!

या कथेतील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून कथेचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण अथवा नाट्य, चित्रपट किंवा इतर रूपांतर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical, sound recording and artistic work. The Copyright Act 1957 provides for registration of such works. Although an author’s copyright in a work is recognised even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies of injunction, damages and accounts.







कथेचे नांव - "अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"
लेखक - सूरज काशिनाथ गाताडे
स्क्रिन रायटर्स सोसिएशन मेम्बरशीप नंबर - २१८३१
रा. पेठ वडगांव, ता. हातकणंगले, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६ ११२
ई-मेल आडी - surajgatade26@gmail.com
मोबाईल व व्हॉट्सऍप - 9890137797
फेसबुक - http://www.facebook.com/suraj.gatade.140
इन्स्टाग्राम - http://www.instagram.com/surajgatade26


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED