आभा आणि रोहित..- १२

आभा आणि रोहित..- १२

 

आभा आणि रोहित ने पटापट जेवण आवरले. मग दोघ उठले आणि रोहित आईशी बोलायला लागला,

 

"येतो ग आई आभा ला घरी सोडून.. थोडा उशीर झाला तर लगेच फोन करू नकोस! आम्ही बाहेर गप्पा मारत बसलो तर थोडा उशीर होऊ शकतो. आणि आता मी लहान नाही सो लगेच लगेच फोन करायची सवय बंद कर आता.." रोहित हसला..आणि त्याने आभाकडे पाहिलं..आभाला मात्र ती गोष्ट आवडली नाही. ती लगेच रोहित कडे पाहून बोलली,

 

"रोहित.. काळजी वाटते म्हणून काकू फोन करतात. मला पण माझी आई फोन करते उशीर झाला तर... त्यात काही चुकीच आहे अस मला वाटत नाही.."

 

"बर आभा.." रोहित मग आईकडे पाहून बोलायला लागला, "सॉरी ग आई..करत जा वाटेल तेव्हा फोन..तुला काळजी वाटण साहजिक आहे." त्याच बोलण ऐकून रोहित ची आई हसली,

 

"ठीके...आणि थँक्यू आभा... माझी साईड घेऊन बोललीस. आणि रोहित, मला कळल... तुम्ही दोघ उगाच भांडू नका.. आणि उशीर झाला तर काही हरकत नाही. उद्या रविवार आहे. कसली गडबड नाही. घाई करणार नाही. आणि नाही करणार रोहित तुला फोन.. आणि तू एकटा असलास की फोन करते.. उशीर झाला की चिंता वाटते. हल्ली गर्दी किती वाढलीये..त्यात खड्डे सुद्धा! पण आता तुम्ही दोघ आहात...मग कशाला करू चिंता? आणि नाही पाहत तुझी वाट...गप्पा मारत बसा..काही हरकत नाही. जरा अजून नीट समजून घ्या एकमेकांना... पूर्ण आयुष्य काढायचं आहे एकमेकांबरोबर त्यामुळे स्वभाव कळणे महत्वाचे. स्वभाव पटले की संसार सुखाचा होतो." रोहित ची आई हसली, "पण इतकी गडबड का केलीस रोहित निघायची? थोड्या वेळ थांबून द्यायचं की आभाला..आम्ही पण मारल्या असत्या अजून गप्पा.."

 

"हो हो आई... स्वभाव जुळतात ना तेच पाहतोय.. लवकरच निर्णय सांगू.. नंतर अस वाटायला नको की घाई केली सो जरा जास्ती नीट समजून घेतोय एकमेकांना.. त्यामुळे जरा वेळ घालवायचा आहे सोबत.. आणि आई, आभाला उशीर होईल म्हणून निघतो.... तुम्ही दोघ गप्पा मारायला लागलात की वेळेच भान नसत तुम्हाला.. बाकी काही नाही आई.. मग उगाच तिच्या आई बाबांना काळजी...पहिल्यांदीच आलीये आपल्याकडे आणि जास्ती उशीर नको व्हायला तिला.." रोहित बोलला आणि त्याने आभाकडे हळूच पाहिलं. तिने नजरेतून इशारा केला आणि रोहित गप्प झाला.

 

"हो की.. आभाशी गप्पा मारतांना वेळ अगदी सुंदर गेला.. आणि घडाळ्यात किती वाजलेत हे पहिलच नाही मी. आणि बरोबर आहे.. उगाच आभा ला घरी जायला उशीर नको.." आई हसली, "आभा, आज मस्त वाटल तुला भेटून.. तू तुझा निर्णय योग्य विचार करून घे.. आम्ही दोघे तुझ्या निर्णयाची वाट पाहतो आहोत. आणि हो, तू आमच्या घरी आलीस तर आम्हाला दोघांना खूप आनंद होईल. तुमचा निर्णय होईपर्यंत मध्ये मध्ये येत जा जमेल तेव्हा..छान वाटत तुझ्याशी गप्पा मारून.. तुझे विचार ऐकून..."

 

"हो आ.." आभा बोलतांना मधेच थांबली.. त्यावेळी आभा रोहित च्या आईला आई म्हणून हाक मारणार होती पण तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि बोलली, "काकू.. माझा निर्णय लवकरच सांगेन मी.. आणि मला पण खूप आवडलात तुम्ही दोघे... एकदम फ्रेंडली आहात. काका, तुम्ही तुमच्या नवीन रेसिपी करण चालू ठेवा.. मी पण तुम्हाला जॉईन करेन लवकरच..मला पण मजा येईल..." इतक बोलून आभा गोड हसली..

 

"वा आभा... गोड हसलीस... छान दिसतेस हसलीस की.. आणि नक्की, मी वाट पाहिन तुझी.... यु आर ऑलवेज वेलकम. फक्त एक फोन कर... तू एखादी नवीन रेसिपी पाहिलीस तर ती सांग. आपण दोघे करू.. तुझ्यासाठी नवीन अॅप्रन आणून ठेवतो. आणि येस, तू घरी येण्याची वाट पाहतो आहोत." रोहित चे बाबा बोलले आणि त्यावेळी रोहित च्या आईला राहाववल नाही म्हणून ती सुद्धा बोलायला लागली,

 

"हो हो.. आभा तू खूप गोड दिसतेस हसलीस की... आणि अहो,तुमची हौस पूर्ण करताय ना? उगाच आभा ला कामाला लावायचं नाही..मी आधीच सांगून ठेवते.." आभाने रोहित च्या आईचे बोलणे ऐकले. त्यावेळी आभा हसली आणि त्यावर बोलली,

 

"थँक्यू दोघांना!! आणि नो नो आई.. काही प्रॉब्लेम नाही आई..मला पण आवडत नवीन डिशेस बनवून पाहायला. बाबा आणि मी मस्त काहीतरी खायला करत जाऊ...मला पण मज्जा येईल..तुम्ही आणि रोहित सांगा कसे झालाय आमचा नवीन पदार्थ.." आभा एकदम उत्साहात बोलली पण ती जे बोलली ते अनावधाने बोलून गेली.. तिच बोलण झाल. पण रोहित चे आई आणि बाबा ऐकत होते आणि आभा च बोलण ऐकून ते मात्र आवाक झाले. पण आपण काहीतरी चूकच ऐकल अस रोहित च्या आई आणि बाबांना वाटल म्हणून त्यांनी एकमेकांकडे पाहून नजेरेने इशारे केले....पण आभा च्या लक्षात ही गोष्ट आली नव्हती. रोहित ला कळल होत आभा चुकून काय बोलून गेली. पण त्यावेळी काय बोलाव त्याला सुचेना.. म्हणून तो गप्प राहिला. त्याला ही परिस्थिती कशी हाताळावी हे कळल नाही. दोघांनी ठरवलं होत की लगेच आपला निर्णय घरी सांगयचा नाही. त्यात सुद्धा वेगळीच मजा होती पण आभा मात्र अनवधानाने बोलून गेली. सगळच अनपेक्षित होत. रोहित ला पण काय बोलाव सुचत नव्हत. जरा वेळ शांततेत गेला. रोहित ची आई विचार करत होती. आणि आईने जरा वेळ विचार करून मग मात्र रोहित ची आई बोलायला लागली,

 

"तू आत्ता काय बोललीस आभा? म्हणजे मी काय ऐकल ते नीट कळल नाही. म्हणजे मी नीट ऐकल नाही. माझा गोंधळ झाला..आत्ता तू काही नाही आई.. अस बोललीस का? मला वाटल फक्त मला ऐकू आल पण मी ह्यांच्याशी कन्फर्म केल. त्यानी सुद्धा होकार दिला. पण खात्री मात्र दोघांना नाही... अस वाटतंय, आम्हाला दोघांना तस ऐकू आल चुकून?" रोहित च्या आईने आभा ला प्रश्न केला.. मग मात्र आभा ला जाणवलं की आपण थोड घाई मध्ये आई आणि बाबा बोलून गेलो.. आता काय बोलायचं ह्या विचारात ती पडली. दोघांना आत्ताच सगळ कळल असत तर दोघांचे सगळे प्लान पाण्यात मिलेले असते. तिने एक नजर रोहित कडे पाहिलं. रोहित तिकडे बोलण ऐकत उभा होता तेव्हा तो विचार सुद्धा करत होता. त्याने आभाकडे पाहिलं. आभा हळूच रोहित ला सॉरी म्हणाली. आणि रोहित ने जरा विचार केला आणि त्याने वेळ सावरून घ्यायचं ठरवलं आणि आईला बोलून दिल नाही.... तो लगेच बोलायला लागला,

 

"काही नाही ग आई. तुला भास झाला.. म्हणजे तुम्हाला दोघांना भास झाला असेल. आभा बोललीये ना तुम्हाला.. तिला अजून आई बाबा म्हणणे योग्य नाही वाटत. तिला योग्य वाटल की ती सांगेल काय वाटत ते. उगाच तिला भरीस पडू नकोस.. मी आव्द्लोय..तुम्ही आवडला आहात पण इतक पुरेस नसत.. तिला तिचा निर्णय घेऊ दे... आणि तूच सारखी म्हणतेस ना.. घाई ने निर्णय नको घेऊस.. आणि तूच आभाला हो म्हणायला भरीस पडती आहेस बघ आई.... आमचा निर्णय अजून होतोय.. थोडा अजून वेळ हवाय.. थोड अजून समजून घ्यायचं आहे एकमेकांना..." रोहित आभा कडे पाहून हसला. आभा सुद्धा हसली. मग तो पुढे बोलायला लागला, "आणि हो...मला माहितीये, आभा आवडण्यासारखी आहे.. तुम्हाला ती आवडली आहे. आणि तुमची इच्छा आहे की आभा आपल्या घरी सून म्हणून यावी सो तुम्हाला भास झाला असेल. चल आभा लवकर.. तुझे आई बाबा काळजी करत असतील.. उगाच त्यांची चिंता वाढवायला नको.. आणि आई, आभा परत येईल तेव्हा गप्पा मारा तुम्ही..तिच येण होईलच आता.." रोहित ने कसबस सावरून घेतलं. आणि तो आपण कशी सिच्युएशन सांभाळली ह्या आनंदात आभा कडे पाहून हसला.. ती सुद्धा हसली. आभाने हळूच हुश केल. रोहित चे बाबा सगळा प्रकार लांबून पाहत होते आणि त्यांना जाणवलं दोघ काहीतरी लपवत आहेत. त्यांना जाणवलं की दोघांमध्ये काहीतरी शिजतंय पण ते आत्ता सांगायचं नाहीये. दोघ तेव्हा शांत राहिले. रोहित च्या बाबा आभा आणि रोहितना त्यांची स्पेस मिळावी ह्या मताचे ते होते. पण या वेळी रोहित च्या बाबांना हसू मात्र आल. सो ते फक्त हसले.. रोहित च्या वागण्याच कौतुक सुद्धा वाटल होत त्यांना. पण नंतर ते रोहित च्या आईशी बोलायला लागले,

 

"हो... ना! हल्ली आपल्या दोघांना भास होतात. वय वाढलाय ना.. विसरू नका आपल वय आता वाढतंय.. आणि ठरवू दे की दोघांना.. उगाच घाई नको.. घ्या रे आभा आणि रोहित तुम्ही तुमचा वेळ..आणि जाऊ दे आता दोघांना.. तू जरा घड्याळाकडे लक्ष देत जा.. इतर वेळी घडाळ्याच्या काट्यावर चालणारी तू..आज घड्याळ पाहिलं पण नाहीस का काय?" रोहित च्या बाबांना खुण करून रोहित च्या आईला शांत राहायला सांगितलं. मग तिला सुद्धा जाणवल की आभा आणि रोहित ला स्पेस देण गरजेच आहे. मग मात्र त्या बोलायला लागल्या,

 

"हो हो जावा तुम्ही नीट.. आभा शी गप्पा मारतांना वेळ कसा गेला कळल नाही.. येत जा आभा घरी.. तू आलीस की घर भरल्यासारख वाटत...छान गेली आजची संध्याकाळ तुझ्या बरोबर..एकदम छान आहेस तू... आणि खरच, घड्याळ पाहिलं पण नाही आज.. नाहीतर मी सगळी काम वेळेवरच करते.. तुम्ही निघा आता.. आणि उगाच उशीर नको.. रात्री लोकं कश्याही गाड्या चालवतात.. सो आपण काळजी घेतलेली बरी.."

 

"हो काकू..आणि थँक्यू...आता निघतो..भेटेन लवकरच.." आणि रोहित कडे पाहिलं...आणि हसली..

 

"वा वा.. माझ असण सरळ इग्नोर करताय तुम्ही दोघ... चालेल चालेल.. कोई नाही! आज आभा आकर्षण बिंदू आहे.. आम्हाला कोण पाहणार ना.. काही हरकत नाही.. आणि चल आता आभा.. उगाच रेंगाळत बसू नकोस इथे.." मग रोहित हळू आवाजात बोलला, "आवर आभा..जास्ती गप्पा मारत बसलीस तर आपल सिक्रेट फुटेल.. इतक्यात ओपन नाही करायचं आहे ना? आणि आई बाबा तसे हुशार आहेत. त्यांना लगेच कळेल.. आणि त्यांना कळल की आपल फ्रीडम गेल समज... आणि मला खात्री आहे, जास्ती वेळ थांबशील तर परत काहीतरी बोलून जाशील.. आणि आता जरा फक्त मला वेळ दे..आय नीड टू स्पेंड टाईम विथ यु.."

 

"हो हो रोहित...किती बोलतोस.. तुझ्या बोलण्यावरून कळेल सगळ.." आभा रोहित कडे पाहून हळूच बोलली. "येते मी काका, काकू.. लवकरच होईल पुढची भेट..बाय! आणि गुड नाईट.."

 

"वाट बघतो तुझी... गुड नाईट.. आणि काळजी घे." रोहित चे आई आणि बाबा बोलले

 

मग मात्र आभा आणि रोहित तिथून निघाले.. आणि गाडीत बसले. गाडीत बसल्या बसल्या आभा हसायला लागली..

 

"आज काय वेड्यासारखी वागले..." आणि परत स्वतःशी हसली..

 

रोहित ने एक नजर तिच्याकडे पाहिलं..कपाळाला हात मारून घेतला आणि गाडी चालू केली.

 

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Tejaswini Choudhari 1 महिना पूर्वी

VaV 1 महिना पूर्वी

PALLAVI COPY CENTRE 1 महिना पूर्वी

Next part waiting

Sarika 1 महिना पूर्वी

Rupavli 1 महिना पूर्वी