ना कळले कधी Season 2 - Part 1 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 1

आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख आहे का मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही 'चला हिच्यावर वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही,' मीटिंग इथेच संपली आपापल्या कामाला लागा. all the best! म्हणून तो निघून गेला.आर्या ही बाहेर आली. तिचा तोच उदास चेहरा विक्रांत ने पहिला आत मध्ये काय झालं असेल ही कल्पना आली त्याला. त्याने लगेच आर्याला कॉल करून बोलावले. ऐ बस आर्या, कशी आहेस ? त्याने विचारलं. आर्या ने ह्या प्रश्नावर फक्त त्याच्या कडे एक कटाक्ष टाकला. विक्रांत ला कळून चुकले आपण चुकीचा प्रश्न विचारला. sorry! तो थोडं ओशाळून म्हणाला. its ok ! आर्या म्हणाली. काय झालं आर्या आज सिद्धांत पुन्हा ओरडला? त्याने विचारलं. ते रोजचच झालय आता, आर्या म्हणाली. खर तर आता काय बोलावे हेच विक्रांत ला सुचत नव्हते. पण आर्याची अवस्था ही त्याला बघवत नव्हती. आर्या थोडे patience ठेव सगळं नीट होईल. विक्रांत तिला म्हणला. आता तर मी अपेक्षाच सोडली आहे विक्रांत ! आर्या म्हणाली. हो i know, किती कठीण आहे हा काळ तुझ्या साठी, पण काही option नाही आहे! हे तुला ही चांगलच ठाऊक आहे. देव पण किती अंत पाहतोय नाही का? विक्रांत म्हणाला. माझा तर हल्ली विश्वास च राहिला नाही कशावर, आता मला कळतंय की सिद्धांत बरोबर म्हणत होता देव वगैरे काहीही नसत ! आर्या म्हणाली. आर्या listen,तू hopes अजिबात सोडू नको. सगळं पहिल्यासारख होईन, तो म्हणाला. hope so! आर्या म्हणाली. आणि त्याच बोलणं मनावर घेवू नको ! विक्रांत म्हणाला. hmm, मी निघू माझं बरंच काम pending आहे, सिध्दांत परत चिडेल, त्याला उगाचच त्रास होईल. आर्या म्हणाली. हो निघ, आर्या तू खरच खूप ग्रेट आहेस! तू तुझ्या अश्या परिस्थितीत ही त्याचाच विचार करतीये! मी प्रेम केलंय विक्रांत त्याच्यावर आणि ते ही मनापासून आणि आज मी ह्या ऑफिस मध्ये येत आहे ते केवळ आणि केवळ सिद्धांत साठीच! आर्या म्हणाली. yes i know that! all the best! सगळं नीट होईन तो पुन्हा तेच बोलला. आणि आर्या हसून बाहेर आली. ती विक्रांत ला बोलून आल्याच सिद्धांत ने पाहिलं, आणि त्याने लगेच विक्रांत ला कॉल करून बोलावून घेतल. काय रे इतक्या वेळ काय बोलत होतास तिच्याशी आधिच तीच लक्ष नसत कामात त्यात तू तिचा वेळ घेतला म्हणजे तिला कारणच मिळालं. सिद्धांत त्याला म्हणाला. हे बघ सिद्धांत, मी ही तिला तेच समजावून सांगत होतो सगळ्या गोष्टी चिडून नसतात सांगत विक्रांत त्याला म्हणाला. हा मला टोमणा समजू का मी??सिद्धांत म्हणाला.तुला काय समजायच ते समज, मला काही फरक नाही पडत,विक्रांत म्हणाला. तिला पडला का काही फरक बोलून, कारण मी कितीही बोलून तिला माझं म्हणणं काही कळतच नाही सिद्धांत म्हणाला. पडेल वेळ दे तिलाही थोडा! अरे दोन महिने झाले असच वागणं थोडाही बदलायचा प्रयत्न करू नये माणसाने!सिद्धांत त्याला म्हणाला. तू नको चिडू आता ह्यावरून विक्रांत म्हणाला. आणि नसेल करायचा ना तर सरळ resignation दे म्हणावं! सिद्धांत म्हणाला. अरे काय बोलतोय तू हे direct resignation सिद्धांत तू बोलतोय हे माझा तर अजूनही विश्वास बसत नाही आहे! विक्रांत म्हणाला. अरे का नाही बोलू मला नाही पटत असले लोक तिला समोर पाहिलं ना तरीही आता संताप होतो माझा. फक्त आधीच record चांगला आहे म्हणून ठेवतोय नाहीतर केव्हाच काढून दिल असत. सिद्धांत बोलतच होता. विक्रांत तर त्याच बोलणं ऐकून शांतच बसला अरे बस बस शांत हो ! तो सिद्धांत ला म्हणाला. किती विचित्र आहे हे सगळं आर्या आजही सिद्धांत वर तितकंच प्रेम करते आणि हा मात्र तिचा कीती तिरस्कार करतोय! खर तर मी आर्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो पण खूप कठीण होऊन बसलंय हे प्रकरण आता! तो मनाशीच म्हणाला.
आर्या ऑफिस च काम संपवून घरी आली. तिच्या आई ने तिला फ्रेश व्हायला सांगितले आणि छान गरम गरम चहा दिला, खर तर तिला आता चहा ची चवही लागत नव्हती पण चहा पिऊन बर वाटत होत.आणि ती तशीच बसून भूतकाळात हरवून गेली. सिद्धांत किती उशीर लावला त्याने आपल्या मनातलं सांगायला. आणि तिला तो दिवस आठवून हसायला आलं आणि नकळत डोळ्यांच्या कडा ही पाणावल्या. किती आनंदी होतो तेव्हा आम्ही पण आणि दोघांच्याही घरचे! किती एक्सइटमेंट होती घरच्यांना तेव्हा लग्नाची, engagement ची. तो उत्साहच वेगळा होता. त्याची मुळातच लग्न साधेपणाने करण्याची ईच्छा होती. पण मला मात्र लग्न थाटामाटात करायचे होते सगळी हौस करायची होती. पण सिद्धांत चे विचार काही वेगळेच माझ्या कधी डोक्यातही ही कल्पना नाही आली की लग्न साधेपणाने करून सगळा पैसा NGO मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी द्यावा,सिद्धांत किती विचार करतो खरच सिद्धांत आहेच तसा, पण माझी ईच्छा पूर्ण करणार नाही असं होणं शक्यच नाही!आमचं लग्नाचं रिसेप्शन किती छान सरप्राईज होत ते माझ्या साठी! तिच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकीर उमटली. आणि पुन्हा ती त्याच्या विचारात हरखून गेली.
क्रमशः