ना कळले कधी Season 2 - Part 6 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 6

चल आर्या तू जा फ्रेश हो पटकन मी
सत्यनारायनाची पुजा ठेवली आहे पटकन तयार हो.सिद्धांत ची आई म्हणाली. सिद्धांत पुजेसाठी तयार झाला? तिने आश्चर्यानेच विचारलं. तो मला नाही म्हणू शकतो का आर्या? त्या म्हणाल्या. हा ते ही आहेच. चल तू वेळ नको घालवू पटकन आवरून ये.जा तुझ्या रूम मध्ये. आर्या जायला निघाली, अरे काय मला आता रूम share करायची, मी हा आधी विचारच केला नाही काय किरकिर आहे,तो मनातच विचार करत होता. ती तिच्या bags घेऊन गेली. सिद्धांत काही वर गेला नाही तो आपला खालीच हॉल मध्ये timepass करत बसला होता. सिद्धांत अरे आवर ना तू काय इथे टाईमपास करत बसला आहे आवर पटकन गुरुजी येतीलच. त्याची आई म्हणाली. हो ग ती आहे ना रूम मध्ये येवू दे तिला आवरून, मला वेळ नाही लागणार. आर्या हे बघ आली ती, त्याची आई म्हणाली. सिद्धांत ने तिच्या कडे बघितलं आणि तो बघतच राहिला, सुंदर जरीकाठा ची साडी, त्यावर आंबडा त्यावर गजरा नाकात छोटीशी नथ,आणि कपाळावर चंद्रकोरची टिकली.डोळ्यात घातलेलं रेखीव काजळ आणि चेहऱ्यावर तेच हास्य महाराष्ट्रीयन look मध्ये ती अगदीच शोभून दिसत होती. सिद्धांत ची नजर तिच्यावरून हटलीच नाही.आर्या किती सुंदर दिसतीये माझीच नजर लागेल ! सिद्धांत ची आई म्हणाली. खरच यार साडी मध्ये किती सुंदर दिसतीये ही!सिद्धांत चा मनातच विचार चालू होता. तशी नेहमीच दिसते म्हणा पण आज काकणभर अधिकच. पण मी आज असा का विचार करतोय हिच्या बद्दल? नाही नको इथे थांबायलाच नको मी जातो इथून आणि तो निघून गेला. आर्या ही लगेच पूजेच्या तयारीला लागली.
आई , आयुष तुम्ही इथे ?आर्या म्हणाली. अग सिद्धांत च्या आईचा कॉल आला होता म्हणून आलो.तिची आई म्हणाली.हो आर्या मीच बोलवलं होत अग त्यांना किती दिवसांनी काहीतरी चांगलं घडतंय तर म्हटलं सगळ्यांनी मिळून enjoy करूया. त्याची आई म्हणाली. हो आई खरच ! आर्या म्हणाली. काय यार काय पसारा मांडून ठेवला हिने dressing table वर सतराशे साठ क्रीम्स, कुठले कुठले लोशन आहेत काय माहिती. आर्या नी आल्या आल्या सगळं घरच ताब्यात घेतलं मला तर वाटतय मी च ह्या घरचा पाहुणा आहे. जाऊदे जास्त दिवस नाही, तूच नाही राहणार इथे काही दिवसांनी. तो आरश्यात बघून स्वतःला च बोलत होता. तो खाली आला. आर्याला त्याला तिच्या favorite कुर्ता घातलेला पाहून खूप समाधान वाटलं. मी ready आहे ह करायची सुरवात पूजेला. सिद्धांत म्हणाला. अरे बापरे सिद्धांत तू बरा आहे ना आज चक्क पूजेसाठी घाई करतोय त्याची आई त्याला म्हणाली. आई तुझा प्रॉब्लेम काय आहे कळतच नाही, नाही म्हणालो तर तू ऐकणार आहे का माझं? हल्ली तूझंच ऐकतो मी कारण दुसरा काही option च देत नाही तू मला. तो म्हणाला. त्याचा टोमणा कळाला त्याच्या आईला. बर बर मोठा आलाय माझं ऐकणारा! चल बस आता. त्याची आई म्हणाली. ते दोघेही जण पूजेला बसले. आर्या आज मनातून खूप आनंदी होती कितीतरी दिवसांनी आज सगळं तिच्या मनासारखं घडत होतं. ती अगदी समाधानाने सिद्धांत कडे बघत होती. काय झालं त्याने एक्सप्रेशन नेच विचारलं. काही नाही ती ने ही मानेनेच नकार दिला. एकदाची पूजा संपली. आणि सगळे गप्पा मारत बसले. 'दीदी मस्त दिसतीये' ये फोटो घेऊया'आयुष तिला म्हणाला. आर्या लगेच त्याच्या कडे गेली आणि त्यांच photos session चालू झाल. सिद्धांत च लक्ष तिच्याच कडे होत. तू पण येना सिद्धांत जिजू आयुष ने त्यालाही बोलावलं, तो गेलाही. चला दोघेही पटकन pose द्या. सिद्धांत तस तिच्यापासून थोडस अंतर ठेवूनच उभा होता. हे तिच्या ही लक्षात आलं आणि तिला थोडस वाईट वाटलं पण आपल्या हास्याने तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला. पण सिद्धांत च्या नजरेतून ते काही सुटलं नाही.तो तिच्या जवळ गेला आपला एक हात तिच्या कंबरेवर ठेवून लगेच आयुष ला फोटो ही घायला सांगितला. कडक उन्हाळ्या नंतर जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या स्पर्शाने जशी धरणी प्रफुल्लित होते, तशिच काहीशी अवस्था सिद्धांत च्या स्पर्शाने आर्याची झाली.तिने सिद्धांत कडे पाहिलं तो ही तिच्या कडे पाहून हसला.great ! आयुष च्या आवाजाने दोघेही भानावर आले. सिद्धांत एका रात्रीतून इतका कसा काय बदलू शकतो? पण ठीक आहे न माझ्या साठी चांगलच आहे. ती मनातच विचार करत होती. "आर्या", तिला आतून तिच्या आईचा आवाज आला. आणि ती गेली. इतक्यात आयुष ला पण कुणाचा तरी कॉल आला आणि तो कॅमेरा सिद्धांत च्या हातात टेकवून चालला गेला. सिद्धांत आता एक एक फोटो पाहत होता आर्याचे बरेच फोटो होते त्यामध्ये . ते सगळे पाहत असताना त्याच्या तोंडून त्याच्याही नकळत पणे "just beautiful" असच निघाल. आज का मला ही इतकी सुंदर दिसतीये! का मी रोजच तर बघतो मी हिला पण मग आज का? की माझा दृष्टीकोन बदलतोय आता हिच्या कडे पाहण्याचा? असे बरेच प्रश्न त्याला पडत होते.
क्रमशः