Naa kavle kadhi - 2 - 11 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 11

तिला जाग आली तेव्हाही तो तिच्या जवळच बसून होता तो कामात होता पण तरीही तिच्याच जवळ तिला लग्ना आधीचा सिद्धांत आठवला तो ही असाच बसायचा तिच्या काही झालं की. माणूस मुळात बदलत नसतो त्याचा स्वभाव च आहे हा तो नाही बदलणार ह्याही परिस्थितीत तिला त्याला अस जवळ बघून छान वाटल. त्यात आज त्याने घेतलेली काळजी आणि नकळत पणे 'बायको' असा केलेला उल्लेख तिच्या ओठांवर हसू आणून गेला. सिद्धांत आज अगदी पूर्वीसारखाच वागत होता. तोच तर तिला आवडायचा. आज च त्याच वागणं पाहून तिला तो नव्याने आवडू लागला. मला कितीही हा सिद्धांत हवाहवासा वाटला तरी फार काळ हा असा नाही राहणार थोड्या काळासाठीच हा असा वागतो नंतर पुन्हा चिडचिड आता मला ह्याची सवय झाली आहे.
"आर्या",काही हवं का? आता त्याच तिच्याकडे लक्ष गेलं. तो लगेचच उठून तिच्या जवळ गेला तिच्या1 डोक्याला हात लावून पहिला. thank god आर्या तुझा ताप उतरला एक मोठा सुस्कारा सोडतच तो बोलला. अग किती tension आलं होत मला किती तापली होतीस तू! बर झालं तुझा ताप उतरला. खुप घाबरलो होतो मी तेव्हा माहिती आहे का तुला काही झालं असत म्हणजे? तो बोलतच होता. 'चांगलच झालं असत उलट', आर्या म्हणाली. आर्या अस काहीही नको बोलू ग तो म्हणाला. अरे खरच तुझ्या मागची किती मोठी कटकट गेली असती थोडक्यात सुंठेवाचून खोकला गेला असता.आर्या हसून म्हणाली. तिच्या अश्या बोलण्यावर तो थोडासा ओशाळला. आर्या please नको ना यार अश्या बोलण्याचा त्रास होतो मला. तो म्हणाला. का त्रास होतो?तिने विचारलं. ह्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ही वेळ नाही तू आराम कर. अपेक्षित उत्तर मिळालं ती म्हणाली. तुझ्या कडे कधीच उत्तरे नसतात. let it go !ती म्हणाली. तिने पुन्हा डोळे मिटून घेतले.सिद्धांत च मात्र कामातून लक्ष उडालं का अशी बोलते ही? मान्य आहे बर नाही म्हणून अस टोकाचच बोलायचं! इथे आपण हिची बर होण्याची वाट पहायची आणि तिने अस बोलायचं! पण मला पण का फरक पडतोय ? आधी काहीही नात असलं तरी ह्या वेळी तर माझ्यासाठी ती अनोळखी च आहे. तो विचार करत होता पण त्याला त्यातुन काहीही साध्य झाले नाही.
आर्या ला हळू हळू बर वाटत होतं सिद्धांत ने ही त्याच्या परीने योग्य काळजी घेतली तिला काय हवं नको ते बघू लागला. 2 -3दिवस त्याने घरूनच काम केलं पण जेव्हा आर्या stable झाली तेव्हा मात्र तो ऑफिस ला जायला लागला.पण तयार आर्या ला अजूनही ऑफिस ला येण्याची परमिशन नाही दिली. "सिद्धांत" मी काय म्हणतेय मी माझ्या घरी जाऊ एक दोन दिवस तिने त्याला रात्री विचारलं. आर्या चा हा प्रश्न त्याला थोडा अनपेक्षित च होता. का ग काय झाल? त्याने विचारलं. अरे काही नाही बघ ना तू मला ऑफिस ला ही येऊ देत नाही आहे आणि घरी पण कुणीच नसत तू ही ऑफिस ला जातो आई पण नसते मग मला कंटाळा येतो आणि किती दिवस झाले मी ह्या रूम च्या पण बाहेर नाही गेले कंटाळा आलाय मला तिकडे गेलं तर आयुष असतो घरी आणि थोडा change ही मिळेल. ती म्हणाली. हो बरोबर आहे तू खरच कंटाळली असशील ठीक आहे सकाळी सोडेन मी ऑफिस ला जाताना. तो म्हणाला. त्याला एका दृष्टीने आनंदच झाला होता त्याने आर्याची कितीही काळजी घेतली असली तरीही त्याच्या मते तो हे फक्त माणुसकीच्या नात्याने करत होता आणि आर्या मुळातच त्याला नको असायची आणि आता ती स्वःताहून एकदोन दिवस जायचं म्हणाली तर त्याच्या साठी आनंदाची च गोष्ट होती. म्हणून तो ही आनंदी होता पण दाखवत नव्हता. तो सोफ्यावर झोपणार इतक्यात आर्या त्याला म्हणाली. तिथे नाही इतकं comfortably झोपता येत तू झोप बेड वर, मी झोपते हवं तर तिथे. बरोबर आहे तुझं ती जागा खरच comfortable नाही आहे. तू पण नको झोपू तिथे बेड मोठा आहे we can share! तो म्हणाला. त्याला वाटलं आर्या चे एक्सप्रेशन change होतील ती काहीतरी बोलेल पण ती एकदम तटस्थ होती. जस की तिला काहीही फरक नाही पडला ती चुपचाप बेड वर झोपून गेली. त्याला वाटलं जाउद्या आजारी आहे म्हणून बोलली नसेल काही म्हणून त्याने सोडून दिलं आणि तो ही झोपला.
सकाळी ठरल्याप्रमाणे त्याने तिला सोडलं. आणि डोक्यावरच मोठं ओझं हलकं झाल्यासारखं तो आनंदाने ऑफिस मध्ये गेला. रोज तिला medicines घेतल्या की नाही हे विचारायला फोन करणारा तो , त्याने आज एकही फोन केला नाही. आर्याला अपेक्षा होती की हा एकदा तरी कॉल करेन पण ती वाटच बघत राहिली. ऑफिस मधून निघताना त्याने आपसुचक गाडी आर्याच्या घराजवळ नेली पण त्याने पुन्हा विचार केला नको जायला तील परत वाटेल की मला तिच्या बद्दल काहीतरी वाटतय म्हणूनच मी आलो. आणि असही ती आता बरी आहे आणि घरी आहे म्हंटल्यावर तिची माझ्या पेक्षा जास्त काळजी घेणारे आहेत नकोच जायला म्हणून त्याने पुन्हा turn मारला आणि घरी आला.
आर्या ला कुठेतरी नक्की वाटत होत की कॉल नाही केला तरी हा नक्की भेटल्याशिवाय जाणार नाही ती त्याचीच वाट पाहत होती. काय ग आर्या सिद्धांत आला नाही तुला भेटायला.तिच्या आई ने विचारलं. नाही ग आई कदाचित उशीर झाला असेल त्याला म्हणून नसेल आला. हो हो असच काही तरी झालं असणार नाहीतर तो कसला राहू शकतो तुला भेटल्याशिवाय 100 कॉल केले असतील त्याने दिवसभरातून हो ना? तिच्या आईने विचारलं. ती फक्त हो च म्हणाली काय सांगू आईला की एकही कॉल नाही केला त्याने आणि त्याला यायचं असत तर तो उशीर दिवस रात्र काहीही पाहत नाही. जाऊ दे अज्ञानात शहाणपण असत तेच खर मी खर सांगितलं तर तिलाही उगाचच काळजी लागून राहील. नकोच काही बोलायला. ती आराम करायचा म्हणून निघून गेली.
काय रे आर्या ला भेटुन आला म्हणून उशीर झाला का? सिद्धांत ला तर त्याच्या आई ने दारातच विचारलं. नेहमी नेहमी काय खोट बोलायचं आईसोबत म्हणून त्याने अर्ध सत्य सांगितलं. नाही ग आई नाही जमलं आज तिच्या कडे जायला जायचं होतं पण आता उशीर झाला आराम करत असेल उगाचच disturb नको म्हणून नाही गेलो.तो म्हणाला. हो ते ही आहेच म्हणा. पण आज बर आहे न तिला म्हणजे तुझं बोलणं झालंच असेल मी तिला कॉल करेन म्हंटल आणि राहूनच गेलं.त्यांनी पुन्हा विचारलं. हो आई बर आहे तिला बर संपले का तुझे प्रश्न कारण मला जाम भूक लागलीये तो म्हणाला. हो चल तू जेवून घे आधी. त्यांनी जेवण केलं तो रूम मध्ये आला आज आर्या नसल्या मुळे त्याला खूप रिकामी रिकामी वाटत होती ती रूम. त्याला आर्या च तिथे नसणं ह्या वेळेला त्रास देत होत.
क्रमशः
©Neha R Dhole


इतर रसदार पर्याय