Naa kavle kadhi - 2 - 2 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 2

आजही अस वाटतंय की सगळं कालच घडलंय आर्याचा विचार चालूच होता. नेहमी सारखाच आम्ही weekend ला फिरायला निघालो. आणि तिला सगळं आठवू लागलं. आर्या काहीही असत हा तुझं आता हे काय नविन की bike वरच जायचं! सिद्धांत म्हणाला. अरे माझी ईच्छा होती की मी माझ्या boyfriend च्या मागे अस मस्त bike वर long drive वर जावं पण, आता boyfriend तर नाही पण नावऱ्यासोबत तर जाऊच शकते ना! आर्या म्हणाली. काहीही स्वप्न पहायची का ग तू? सिद्धांत ला तिचं बोलणं ऐकून हसायलाच आलं. तू नेणार आहेस का ते सांग फक्त काय सिद्धांत माझा एवढाही हट्ट पुरवणार नाही तू ती लटक्या रागात म्हणाली. तू काही मागितलं आणि मी नाही म्हणालो अस होईन का आर्या? आणि असंही स्त्री हट्टा पुढे प्रभूरामचंद्रांच काही चाललं नाही तिथे माझ्या सारख्या पामराच काय चालणार चल आज bike ने च जाऊ पण हे बघ आर्या माझी बाईक मी खूप दिवसांपासून चालवली नाही त्यामुळे मला खरच नको वाटतंय ग तो थोडा काळजीनेच म्हणाला.हे बघ हा सिद्धांत आता कारण नको देऊ! काहीही होणार नाही तू असा negative विचार करू नको बरं,आर्या थोडं चिडूनच म्हणाली.बर बर आता तू रागावू नको चल जाऊया!. सिद्धांत you are so sweet!!! ती त्याला म्हणाली बस बस आता इतका लाड नको तो म्हणाला,आणि ते निघाले.
सिद्धांत किती छान वाटतय ना मस्त गाडीवर वा! आर्या म्हणाली. छान काय छान धूळ किती उडतीये सगळे कपडे खराब होतात शी! मला तर वैताग आलाय !अस वाटतय सगळं धुळमय वातावरण झालं! तो म्हणाला. ऐ इतक काही नाही आहे हं! उलट सकाळचं किती फ्रेश वातावरण आहे एकदम मस्त अस ताज ताज वाटतय आर्या म्हणाली. आणि काय ग आर्या आता तुला गाडीवर सकाळी थंडी वाजत नाही का? म्हणजे एरवी तुला गाडीतला ac चालत नाही न! सिद्धांत म्हणाला. आर्या शांतच झाली तिच्या कडे काही बोलण्या सारखेच नव्हते. उद्या फक्त आजारी पडू नको म्हणजे झालं सिद्धांत तिला म्हणाला. नाही रे नाही पडणार आजारी.आणि ते त्यांच्या destination ला पोहचले. 'काय मग आर्या कस वाटतय झालं मनासारखं'! 'खूप मस्त किती दिवसंपासूनची ईच्छा होती आज पूर्ण झाली'. thank you सिद्धांत! ऐ वेडी आहेस का? तू wish करणार आणि मी पूर्ण नाही करणार अस होईन का?फिर उसमे हमारी जान भी क्यू ही ना चली जाये बेगम ! सिद्धांत म्हणाला. ऐ काहीही बोलू नको हा वेड्यासारखं. मला नाही आवडत आर्या थोडीशी चिडूनच म्हणाली. 'अरे आर्या चिल गंमत करतोय मी', सिद्धांत म्हणाला. 'हो पण मला गमतीतही हा विषय नकोय' मी एकदा हे दुःख भोगलेल आहे so please आता ह्या नंतर मी अश्या गोष्टी स्वप्नातही नाही सहन करू शकणार आणि तुझ्या बाबतीत तर नाहीच नाही!आर्या अजूनही चिडलेली च होती. सिद्धांत तिचा चेहरा हातात घेत म्हणाला,का इतकं प्रेम करतेस माझ्यावर? तू आहेस च तसा कुणीही करेन ! आर्या म्हणाली. आणि कुणीही केलेल चालणार आहे तुला? सिद्धांत पुन्हा तिला मिश्कील पणे म्हणाला. तुझ्यावर कुणीही केलं तरी चालेल. पण तू कुणावर केलेलं नाही चालणार हं! आर्या म्हणाली.सिद्धांत च प्रेम मिळवणं फार कठीण गोष्ट आहे आर्या! ते काम फक्त तुलाच जमलं! सिध्दांत म्हणाला. ती अभिमानाने त्याच्या कडे पाहत होती. चल आता मला तर रोजच बघते आज आलोच आहे तर इथलही काही बघून घ्यावं सिद्धांत तिला म्हणाला. काय रे तू पण ना! आर्या हसून लाजली. त्यांनी फिरून सगळा परिसर पालथा घातला जेवण केलं. चल आर्या निघायचं? सिद्धांत तिला म्हणाला. आता कुठे जायच ? आर्या ने विचारलं. हे बघ आधी movie ला जाऊ, डिनर करू आणि मग घरी . वा काय planning आहे ! आर्या त्याच्या planning ला दाद देत म्हणाली कस जमत रे तुला अस सगळं पटापट decisions घायला मला तर सुचतच नाही.बस आर्या आता कौतुक पुरे हा चल आता. आणि ते निघाले. 'सिद्धांत ,मला वाटत ना हा रस्ता कधी संपूच नये असच मस्त आपण bike वर असावं' 'shut up आर्या!मला तर अस झालय केव्हा हा रस्ता संपतोय आणि केव्हा मी ही bike सोडेन'. how un romantic person you are siddhant! आर्या म्हणाली. आर्या i am realistic person! सिद्धांत तिला म्हणाला. काय हा इतक्या movie पाहतो तरीही ह्याला वाटत नाही की आपणही असच bike वर घेऊन फिरावं!आर्या मनातच म्हणाली. हे बघ आर्या movie मध्ये फक्त शॉट घेण्यापुरतच तो हिरो फिरवत असतो बाईक वर नंतर ते ही आपल्या four-wheelers मध्येच जातात.सिद्धांत म्हणाला. कस कळत रे तुला मी मनात काय बोलली ते ?बर ते जाऊ दे आता ह्या नंतर मी नाही म्हणणार तुला bike वर जाण्यासाठी कुठे बस झालं! किती किरकिर !ती थोडस चिडूनच म्हणाली. त्याने डोक्यावर च हेल्मेट काढलं. ऐ हेल्मेट का काढलं ते घाल आधी आर्या म्हणाली. हे बघ आर्या गर्मी होतीये घालणार मी परत थोड्यावेळ थांब. त्याला खूप घाम येत होता आणि अस्वस्थ ही वाटायला लागले मुळात सवय नव्हती म्हणून असा त्याला त्रास होतोय हे पाहून आर्या ला ही वाईट वाटले.'सिद्धांत खरच ह्या नंतर मी तुला कधीच म्हणणार नाही bike वर चल म्हणून'. किती घाम आलाय बघ आपण थांबायचं का कुठे ? तिने विचारलं. नाही नको अग आता जवळ जवळ पोहोचलो च आहे. तो म्हणाला. आणि त्याने लवकर पोहोचण्यासाठी स्पीड वाढवला.सिद्धांत हळू काही घाई नाही आपल्याला. आर्या त्याला ओरडत होती. आर्या किती छान वाटत स्पीड मध्ये जायला मस्त गार हवा लागतीये. हे बघ पुढे घाटाचा रस्ता आहे तू आधी स्पीड कर आर्या म्हणाली. आर्या dont worry काहीही होणार नाही. अरे समोर ट्रक तर बघ ! सिद्धांत side ला घे ब्रेक मार!ती अजूनही ओरडतच होती . आर्या ब्रेकच लागत नाही आहे shut आणि side ला कस घेणार घाटाचा रस्ता आहे. सिद्धांत please काही तरी कर ! ती आता तर रडायलाच लागली इतक्यात तो ट्रक त्यांच्या जवळ त्यांची गाडी आणि ते दोघे बाजूला फेकल्या गेले.
आर्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये च होती. तिला जास्त मार नव्हता लागला किरकोळ मार लागला होता. सिद्धांत कुठे आहे?तिने शुद्धीवर आल्यावर पहिला प्रश्न हाच विचारला. त्यांनतर तिला जे कळाल ते आठवून तीच्या डोळ्यातून ह्या ही क्षणी पाणी आलं.पण तिने त्यांना रोखून ठेवल होत. accident मध्ये त्या च्या डोक्याला खूप मार लागला होता आणि त्यातच तो त्याचा वर्तमान विसरला होता.आणि त्या पैकी एक आर्या होती. इतक्यात तिचा फोन वाजला ती भूतकाळातून बाहेर आली. सिद्धांत च्या आई चा फोन ह्या वेळेला तिला थोडं आश्चर्य च वाटलं.
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED