Naa kavle kadhi - 2 - 5 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 5

अजून कसा आला नाही हा! किती वेळ तिने परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. अरे आता फक्त 9:30 च झाले 10 ला येतो म्हणाला. आज वेळ पण इतका हळूहळू का जात आहे. ती म्हणाली. हे बघ दीदी लवकर उठलं ना की असाच वेळ हळूहळू जातो आणि त्यात वाट पाहिली की जास्तच हळू जातो. आयुष तिला म्हणाला. ऐ सकाळी सकाळी काहीतरी वायफळ बडबड करू नको रे! सकाळी उठून त्याचा विचार तर नसेल बदलला रे? येईल ना नक्की तो? आर्या ने पुन्हा त्याला विचारलं. 'येईन ग, थोडा धीर तर धर'. आयुष तिला समजावत म्हणाला. 'इतके दिवस धरलाच ना रे आता नाही धरल्या जात'. 'त्याने तिला जवळ घेतलं don't worry di! आता होतंय ना सगळं नीट'. hope so !ती म्हणाली. ऐ आता असा चेहरा पाडू नको हा सिद्धांत जिजू केव्हाही येईन, अशी जाणार का त्याच्या समोर? हस बघू. इतक्यात तीच फोन कडे लक्ष गेलं, सिद्धांत चा message address send कर ! तिने आयुष ला दाखवला. आणि ती परत उदास झाली. त्याने तिच्या हातातून मोबाइल घेतला आणि location share केलं. 'बघितल आपण सगळं नीट होण्याच्या गोष्टी करतोय आणि ह्याला तर साधा माझा पत्ता पण माहिती नाही'. ठीक आहे ना, तुलाही माहिती आहे त्याची सध्याची condition कशी आहे ती आणि तरीही तू का मनाला लावून घेतीये. आणि दीदी त्याला काहीही आठवत नसताना सुद्धा तो तुला accept करतोय ही किती चांगली गोष्ट आहे'. हो तेही आहेच. इतक्यात बेल वाजली सिद्धांत आला वाटत! आर्याची कळी एकदम खुलली. आज कितितरी दिवसांनी तिला अस बघून तिची आई ही खूप समाधानी होती. सिद्धांत ने आल्यावर त्यांची जुजबी चौकशी केली. तसही त्याला काही आठवत नसल्यामुळे त्यांच्याशी काय बोलावं हा प्रश्नच होता.त्याची ही परिस्थिती लक्षात आयुष च्याआली आणि त्याने casual discussion सुरू केलं. आणि मग थोडं वातावरण नॉर्मल झालं. आर्या तयार आहे ना? सिद्धांत ने तिला विचारलं. ती तर सकाळ पासूनच तयार आहे आयुष मधेच म्हणाला. तुला प्रत्येक वेळी मधात बोललंच पाहिजे नाही का आयुष? आर्या त्याला रागावून म्हणाली. हो करमत नाही नाहीतर मला आयुष म्हणाला. खूप उद्धट बोलतोय आई हा? ह्याला समजून सांग ह! काय लहान मुलांसारखी आई कडे तक्रार करत असते सतत! तो पुन्हा म्हणाला. अरे काय चाललंय तुमचं काय भांडताय! 'आर्या तू पण, अग सिद्धांत आलाय आपल्याकडे आणि त्याच्या समोर... काय विचार करत असेल तो '? तिची आई त्या दोघांनाही समजावत म्हणाली. 'हाच, सांग ह्याला थोडं नुसता शरीराने वाढला अकलीचा तर अजिबात पत्ता नाही ह्याला'. 'हो तुझी अक्कल ओसांडून वाहतीये ना बस'! मी लहान आहे म्हणून मला काहीही बोलत असते ऐकून घेतो म्हणून नाहीतर...! 'ओहहह ऐकून घेतो तू कधी ऐकलं होतं शेवटचं मला तरी सांग'. सिद्धांत मस्त बाजूला बसून त्यांचं भांडण एन्जॉय करत होता. 'सिद्धांत जिजू ने रे हिला लवकर माझ्या मागची किरकिर तरी बंद होईन'. जाणारच आहे मी, आणि मला मदत माग कॉलेज च्या प्रोजेक्ट साठी वगैरे मग बघते! चल सिद्धांत. आर्या म्हणाली. तिने त्या दोघांचा निरोप घेतला आणि ते दोघेही जण निघाले. कितीतरी दिवसांनी आर्या सिध्दांत च्या सोबत गाडीत जात होती तिने एक छानशी smile दिली. तो ही आज बरा वागत होता त्यामुळे आर्याला आणखीन छान वाटत होत. पण दोघांमध्येही संभाषण मात्र काहीही नव्हतं. sorry हा आमच्या भांडणामुळे बराच वेळ वाया गेला. आर्या काहीतरी सुरवात करायची म्हणून बोलली. मस्त करमणूक होत होती उगाच थांबलात तुम्ही सिद्धांत पुटपुटला. काही म्हणालास का?आर्याने विचारलं. काही नाही अग मी हेच म्हणालो की किती उद्धट सारख बोलत होता ना आयुष? अस बोलतात का मोठया बहिणीशी तो तिच्या कडे बघून म्हणाला. नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय तो तसा अजिबात नाही आहे, हा आता आमची भांडणे होत राहतात पण खूप जीव पण आहे त्याचा माझ्यात माझ्या शिवाय पानही हलत नाही त्याच. आता भांडला पण लगेच कॉल करेन बघ तो.आर्या सिद्धांत ला सांगत होती. अग किती पलटतेस आता तर उद्धट अक्कल नाही आणि काय काय बोलत होती त्याला आणि आता लगेच त्याच कौतुक? सिद्धांत म्हणाला. तू नको लक्ष घालू आमच्यात आमचे चालूच असतात असे भांडणे पण तो वाईट नाही आहे हा! ती म्हणाली. अग मग का भांडली आर्या? तू आणि ते ही निघताना त्याला छान हसून बाय करायचं तर तू भांडून निघाली. तो लहान आहे ना मग ? तू समजून घ्यायला नको. त्याने तिला समजून सांगितले. हो चुकलच माझं, करते मी त्याला कॉल घरी गेल्यावर. ती म्हणाली. तिने सिद्धांत कडे पाहिलं. सिद्धांत अगदी तसाच आहे कणभर सुद्धा बदल झाला नाही त्याच्या मध्ये आजही किती छान पद्धतीने समजून सांगितलं हेच सगळं खूप मिस करत होती मी, पण आजपासून नाही! खूप दिवसांनी मानवरची मरगळ दूर झाल्यासारखं वाटलं तिला. इतक्यात हॉर्न चा आवाज तिच्या कानांवर पडला आणि तिने विचारलं काय झालं? अग उतर घर आलाय! विसरली का हे घर? त्याने विचारलं.' नाही' तिला कळत च नव्हतं की सिद्धांत अचानक इतका कसकाय चांगला वागू शकतो कारण ती त्या सिद्धांत ला ओळखत होती तो कुठलीच गोष्ट लवकर accept करणारा नव्हता. 'अरे यार ,आर्या तू मुळातच अशी आहे का ग?, मला वाटायचं तू ऑफिस मधेच अशी हरवून जाते पण तुझं इथेही हेच'! चल ! 'हो चल'!आणि तिने त्याच्या पाठीमागे घरात प्रवेश केला. Welcome back आर्या! त्याच्या आईने तिचे हसून स्वागत केले.तिने अगदी आनंदाने त्यांना मिठीच मारली.आणि दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.सिद्धांत हे सगळं पाहत होता आणि त्यांची इतकी छान बॉंडिंग बघून त्यालाही अप्रूप वाटलं.
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED