ना कळले कधी Season 2 - Part 8 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 8

तिला कितीतरी वेळ झोप लागत नव्हती. सतत डोक्यात विचार चालू होते. सिद्धांत चा तिला प्रचंड राग येत होता. असा कसा वागू शकतो हा? वाटलं आता सगळं चांगल होईल पण नाही मी उगाचच इतकी अपेक्षा ठेवली. सिद्धांत कधीच नाही सुधारू शकत. पण मला क इतका त्रास द्यायचा जाऊ दे मी पण त्याचा विचार नाही करणार मुळात आता मला ही काही घेणदेण च नाही त्याच्याशी मी लक्ष च नाही देणार त्याच्या कडे त्याला जेव्हा आठवेन तेव्हा आठवेन. ह्याच विचारात तिला खूप उशीरा झोप लागली.
इकडे सिद्धांत ची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याच सारख सारख लक्ष आर्या कडेच जात होतं त्याला ही माहिती होत आर्या ने फक्त डोळे मिटले पण ती अजूनही जागीच आहे. त्याला तिच्या जवळ जाऊन तिची माफीही मागावी वाटत होती पण त्याची तिच्या जवळ जाण्याची हिम्मत च होत नव्हती. नेहमीच अस होत माझं किती रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो मी पण अस काही तरी होऊनच जात. आर्या पण काही कमी नाही. ती उगाचच शब्दाला शब्द वाढवत गेली आणि.... आर्या उगाचच मला cross करत होती तिला काहीही समजत नाही. पण म्हणून मी ही तिच्याशी अस वागावं ? तिला माझ्या मुळे काही त्रास नाही व्हायला हवा. माझा काहीही हक्क नाही आहे तिच्या शी अस वागण्याचा. पण मी तर चूक कबुल करायला तयार आहे, पण ती किती attitude दाखवतीये. आताही जागीच आहे पण मुद्दामून माझ्या कडे पाहणार ही नाही. ठीक आहे उद्या सकाळी बोलतो तिला,असही ऑफिस मध्ये ही असणारच आहे hmm तेच बर होईन तिला तेव्हाच बोलतो.तो पर्यंत तिचा ही राग ही थोडा कमी होईन. पण आज तिला माझ्या मुळे त्रास होतोय त्याच काय? तिचा हात किती त्रास होत असेल? पण ती ही काही कमी नाही माझी मदत पण घेणार नाही.
तो उठला आर्या अजूनही झोपलेली च होती. बघा मी इथे हिच्या काळजीमध्ये अख्खी रात्र जागून काढली आणि ही पहा मस्त झोपलीये. जाऊ दे मी उठेन वाटलं तेव्हा. लगेचच तिलाही जाग आली. तिच्या हाताला तिचाच धक्का लागला आणि तिच्या तोंडातून एकदम "आई ग"निघाल. सिद्धांत तिच्या जवळ आला काय झालं आर्या? दुखतंय का तो म्हणाला. काही नाही तू बाजूला हो!आर्या म्हणाली. आर्या अग सांग न काय झालंय? सिद्धांत म्हणाला. please सिद्धांत मला तुझी sympathy नको आहे. मी माझं बघून घेईन असाही आपला काहीही संबंध नाही तुझेच वाक्य आहेत ना हे ? मग आज का इतका पुळका येतोय तुला,आर्या म्हणाली. तुला माणुसकीच्या नात्याने मदत करायला गेलो तरीही तुझं आपलं वेगळंच तुझ्यासोबत चांगलं वागणं म्हणजे ही चुकीचंच आहे. जाऊदे मला सकाळी सकाळी तुझ्याशी वाद घालण्याची अजिबात ईच्छा नाही आहे. तूला काय हवंय ते कर! आणि तो त्याच आवरायला निघाला.आर्या ने ही ऑफिस ला जाण्यासाठी तिची तयारी करण सुरू केलं. दोघेही आवरून खाली आले. काय ग आर्या काय बर नाही आहे का? चेहरा का उतरलाय तुझा इतका? सिद्धांत च्या आईने तिला विचारलं. काही नाही मी एकदम बरी आहे काल थोडी दगदग झाली म्हणून थकवा जाणवतोय बस बाकी काही नाही.,ती म्हणाली. अग मग आज सुट्टी घे आराम कर ना त्या म्हणाल्या. नाही नको आता ठीक आहे, ती म्हणाली. आर्या तुला आराम करायचा असेल तर कर काहीही माझी हरकत नाही. सिद्धांत म्हणाला. तिने त्याला अजिबात उत्तर दिलं नाही. आणि पाहिलं देखील नाही. सिद्धांत ला चिडण्यासाठी हे पुरेस कारण होत. राग येऊनही त्याने react नाही केलं. दोघेही नाश्ता वगैरे आटपून ऑफिस ला जाण्यासाठी निघाले. अजिबात दोघांनाही एकमेकांसोबत जाण्याची ईच्छा नव्हती.पण तरीही ते निघाले. सिद्धांत ला तिचा राग येत होता. पण तरीही त्याला तिच्या हाताची काळजी वाटत होती. आज बरा असेल का हीचा हात ते व्रण? एकदा त्याने तिच्या हाताकडे पाहिलं, पण तिने full sleeves चा कुर्ता घातला होता म्हणून त्याला तिचा हात बघताच नाही आला. 'किती attitude आहे ह्याच्या मध्ये एकदाही sorry नाही म्हणाला'. आताही त्याला बोलायचं असेल पण कमीपणा कोण घेणार! अगदी असाच होता सुरवातीला, आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !
आर्याला चांगल काही बोललं तरीही वाकड्यातच शिरणार राग तर अगदी नाकावर आहे तिच्या काळजीपोटीच म्हणालो की आज आराम कर पण तिने साधं माझ्या कडे पाहिलं पण नाही इतका कसला आला राग ! काल पर्यंत माझ्या मागे पुढे करत होती पण तिला वास्तवाची जाणीव करून देण ही तितकंच महत्त्वाच होत मी स्वीकारणार नाही म्हंटल्यावर तिनेही बोलणं बंद कराव ? सगळ्यांनी तर मला बरेच दाखले दिले तुझ्या प्रेमाचे हेच का तुझं प्रेम आर्या? अस विचारावं वाटत.पण तुला आता विचाहरूनही काही फायदा ! तुझाही ego काही लहान नाही.
दोघेही ऑफिस मध्ये पोहचले आज कितीतरी दिवसांनी त्यांना एकत्र पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. आर्याला तर आल्यावर तिच्या सगळ्या friends नी congratulations ही केलं. विक्रांत ला ही खूप आनंद झाला तो लगेच सिद्धांत च्या केबिन मध्ये गेला. 'खुप मस्त वाटलं यार आज तुला आणि आर्याला सोबत पाहून' विक्रांत म्हणाला. सिद्धांत ने त्याला फक्त smile दिली. तो काहीही बोलला नाही. अरे काही तर बोल कस वाटतय तुला इतक्या दिवसांनी आर्या सोबत.विक्रांत म्हणाला. ह्याला काय सांगू खूप वाईट वाटतय मला अजिबात तिच्या सोबत राहण्याची ईच्छा नाही पण काय करणार दुसरा option नाही आहे. तो मनातच विचार करत होता. अरे सिद्धांत मी तुझ्याशीच बोलतोय. हो अरे विक्रांत कळतंय मला तुझा आनंद पण सकाळी कामाच्या वेळेस तू काय हा timepass लावला आहे आणि झालं ना आता सगळं नीट ! सिद्धांत त्याला म्हणाला. तुझ्या अश्या बोलण्यावरून तर वाटत नाही आहे की तू आर्याशी नीट वागत असशील ठीक आहे नको सांगू मी बोलून आर्याशी. आणि तो निघाला. आर्या ऑफिस मध्ये सगळ्यांशी हसून खेळून राहत होती तिने सगळं नॉर्मल आहे असेच भासवल. सिद्धांत ने हे पाहिलं होतं. चला आर्या इथे तरी चांगल परफॉर्म करत आहे म्हणजे मला इतकं जड नाही जाणार माझ्या सोबत कशीही वागत असली तरी बाहेर आपला role चांगला प्ले करतीये good आर्या ! तो तिच्या बद्दलच विचार करत होता.
क्रमशः