ना कळले कधी Season 2 - Part 4 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 4

'हे बघ मंदार तू जर ही मस्करी करत असशील तर लगेच थांबव मला अशी चेष्टा आवडत नाही'. एव्हाना मंदार ने सिद्धांत ला सगळी परिस्थिती त्याच्या पद्धतीने सांगितली होती. ' ह्यातला एकूण एक शब्द खरा आहे सिद्धांत' त्याची आई त्याला म्हणाली. त्याने एकदम चमूकन च त्याच्या आई कडे पाहिले.'आणि हे सगळं जर खर आहे तर तुम्ही मला आता सांगताय!' 'आणि तुम्हाला काय वाटतय की मी हे स्विकारेन, अजिबात नाही!'. गंमत वाटतीये का तुम्हाला हे सगळं कुणीही येईल आणि काहीही सांगेन आणि मी लगेच स्वीकारावं. मी त्या मुलीला ऑफिस मध्ये च कसा सहन करतो मला माहिती आहे, आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारायचं, अशक्य!! मला नाही जमणार. 'सिध्दांत आवर स्वतः ला,मान्य आहे तुझी चिडचिड आहे पण आर्या बद्दल नाही ऐकून घेणार मी'. त्याची आई म्हणाली.आणि सिद्धांत मी तुला सगळे reports पण दाखवले मी तरीही तू विश्वास नाही ठेवत आहे कमाल झाली आता. मंदार मी reports च सत्य नाकारत नाही. बरोबरच आहेत ते पण मी आर्याला स्वीकारूही शकत नाही! सॉरी आई मला नाही जमणार हे! तो पुढे म्हणाला. अरे सिद्धांत, ऐक तर हे बघ मंदार प्लीज आता हा विषय इथेच थांबवूया आणि हो मी लगेचच माझ्या वकिलांना बोलून घेतो म्हणजे जी काय divorce ची process असेल ती चालू करू. तिला पण कशाला अडकवुन ठेवायचं. सिद्धांत म्हणाला. सिद्धांत, हे तू बोलतोय! 'आर्याची ही जी आज तू परिस्थिती पाहतोय ना ती केवळ आणि केवळ तुझ्या काळजी मुळे', अरे कित्येक महिने झाले ती हसली देखील नाही. जगणं विसरली आहे ती, 'ती फक्त आणि फक्त तू बरा होणार ह्या आशेवर जगते आहे', 'काय नाही करत ती तुझ्या साठी', वाट्टेल ते करण्यासाठी तयार असते' 'आणि तू चक्क divorce च बोलतो'! 'एकदाही तू तिच्या मनाचा विचार नाही केला तिला काय वाटेल हे ऐकल्यावर'. त्याची आई म्हणाली. आई हे बघ आता तिनेही ऐकट राहण्याची सवय करून घेतलीच आहे ना आणि बघ अशी वाट बघत बसण्यापेक्षा वेगळ होऊन जावं मला तरी असच वाटत, आणि दिसायला सुंदर आहे ती कुणीही क्षणात प्रेमात पडावं अशीच! मिळेल तिला नक्कीच दुसरा कुणी तरी चांगला. हवं तर मी समजवून सांगतो तिला. सिद्धांत म्हणाला.सिद्धांत आवर तू आर्याला ओळखण्यात चूक करतोय . त्याची आई थोडी चिडूनच म्हणाली. शेवटी वळणाच पाणी वळणावर च जात हे काही खोट नाही ! तू पण तेच करतोय जे तुझ्या वडिलांनी केलं. त्या पुढे म्हणाल्या. आता मात्र त्याच्या वडिलांच नाव ऐकून त्याला चेहरा रागाने लाल झाला. हे बघ आई त्या माणसाची आणि माझी बरोबरी करू नको. माझी परिस्थिती वेगळी आहे. परिस्थिती कशीही असली तरी निर्णय तेच आहेत! आणि हे बघ जर तू आर्याला घरात आणलं नाहीस तर मी देखील येणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे. त्याची आई इतकं बोलून शांत झाली. आई अस टोकाच नको बोलू ग! मी नाही राहू शकत तुला सोडून! आणि हा कुठला हट्ट तो पण एका परक्या मुलीसाठी.सिद्धांत म्हणाला. हे बघ माझा निर्णय ठाम आहे. आता तू ठरव तुला काय करायचं ते.त्याची आई म्हणाली. ठीक आहे!ऐ म्हणावं तिला घरी तयार आहे मी, झालं आता तरी हट्ट सोडणार ना? तो त्याच्या आईला म्हणाला. हे बघ सिद्धांत अस उपकार केल्यासारखं नको बोलू मी तिला फक्त घर मिळावं म्हणून नाही बोलवत आहे, तिला सन्मानाने पत्नी म्हणून वागवलं सुद्धा पाहिजे.तरच हो म्हण नाहीतर माझ्या वर उपकार नको करू हो म्हणून. त्याची आई थोडस रागातच बोलली.आई तू उगाचच ताणत हा विषय अस वाटत नाही आहे का तुला या पूर्वी तू कधीही नाही बोलली अशी माझ्याशी. आणि आज लगेच उपकार वगैरे, ठीक आहे सगळं तुझ्या मनासारखं होईन मी देईन तिला नीट वागणूक मग तर झालं. सांग तिला फोन करून ये म्हणावं घरी अगदी आता आली तरीही मला काहीही प्रॉब्लेम नाही.सिद्धांत म्हणाला. मी का करू तू कर, आणि बोलाव काय तू जाऊन घेऊन ये, तू घेतली न आता जबाबदारी.त्याची आई त्याला म्हणाली. बर करतो !तो अगदी अनिच्छेने च म्हणला. आता आपण निघायचं का?घरी गेल्यावर करतो मी फोन.आणि त्यांनी मंदार चा निरोप घेतला. ते दोघही घरी आले.सिद्धांत घरी आल्यापासून फोन करायचं टाळाटाळ च करत होता. झालं का तुझं आर्याशी बोलून ?काय म्हणाली ती? त्याच्या आई ने विचारलं. नाही अग डोक्यातूनच गेल माझ्या करतो आता फोन तिला. त्याला आता कळून चुकलं होत ह्यातून सुटका नाही आई काही आपला पिच्छा सोडणार नाही म्हणून त्याने एकदाचा फोन लावायचा ठरवला.
आर्या घरी आली तिने सगळं तिकडे काय काय घडलं ते तिच्या आईला सांगितलं. तिला मंदार चा प्लॅन ऐकून कुठेतरी आशा निर्माण झाली होती की आता होईन सगळं नीट !आणि इतक्यात तिच्या फोन ची रिंग तिच्या कानांवर पडली. तिने पाहिलं सिद्धांत चा कॉल !!! तिने आश्चर्य चकित होऊन पुन्हा पाहिलं. आणि कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आले. एक वेगळीच चमक. तिने रेसिव्ह केला. हॅलो आर्या, कशी आहेस? समोरचा असा आवाज ऐकून तिला विश्वासच बसत नव्हता चक्क सिद्धांत तिला विचारतोय कशी आहेस तिला अजूनही स्वप्नात असल्यासारखच वाटत होत. आर्या are you there? तो म्हणाला. yes sir! बोला ना. firstly dont call me sir, and second मी आता मंदार कडे जाऊन आलो, त्याने सगळी कल्पना दिली मला की माझ्या आयुष्यात काय घडलंय. बरच सहन कराव लागलं तुला माझ्या मुळे तो बोलतच होता, please सिद्धांत अस नको बोलू! आर्या मधेच म्हणाली. तिला तर आज आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आर्या अग माझं बोलणं तर पूर्ण होवू दे! हे बघ आता पर्यंत जे झालं ते झालं आता उद्या पासून आपण एक नवीन सुरवात करू, उद्या कशाला आजच मी येऊ का तुला आता घ्यायला? सिद्धांत म्हणाला. सिद्धांत खरच तू बोलतोय ह्याच क्षणाची किती वाट पाहिली मी खर तर मला आताच तुझ्याजवळ यावं वाटतय! पण आज नको आता बराच उशीर झाला मी उद्या येते. ती म्हणाली. अग तू नको येऊ मी येतो ना घ्यायला. सांग किती ला येऊ सकाळी? त्याने विचारलं. अम्म्म तू 10-10:30 पर्यंत येऊन जा.मी तयार राहते.आर्या म्हणाली.ok bye good night take care! अस म्हणून त्याने फोन ठेवला. झालं का समाधान बोललो तिच्याशी उद्या जाणार घ्यायला सकाळी. आता जाऊ का मी झोपायला? तो त्याच्या आईला म्हणाला. त्याची आई त्याच्या कडे पाहून समाधानाने हसली. सिद्धांत इतकं ऐकलं आता फक्त एकच ऐकशिल? आता काय?सिद्धांत पुढे तर जस काही मोठं संकटच पडलं असा त्याने चेहरा केला. ऐ इतकं काही मागणार नाही मी किती वाईट एक्सप्रेशन देतोय त्याची आई म्हणाली. हे बघ माझी ईच्छा होती आर्या पुन्हा घरात आली आणि की तुमचं सगळं सुरळीत व्हावं म्हणून एक सत्यनारायणाची पूजा घालावी,आता बघ उद्या आर्या पण येणार आणि तुम्हाला सुट्टी पण आहे तर मग काय म्हणतो. आई तुला माहिती आहे ना माझा नाही विश्वास, मग का हे सगळं? तो म्हणाला. पण माझा आहे न!प्लीज माझ्या साठी हो म्हण. त्याची आई म्हणाली. बर ठीक आहे पण ह्यावेळेसच आणि शेवटचच हा तो म्हणाला. आणि तो तिथून निघून गेला.
आई माझ्या कडून अजून काय काय करून घेणार काय माहिती. माझी अजिबात ईच्छा नसताना तिला कॉल करायला लावला. आई समोर होती म्हणून गोडच बोलावं लागलं तिच्याशी. आता उद्या घ्यायला जायचं काय कटकट आहे. मला तर तिचा आवाजही नकोसा वाटतो उद्या पासून कसा सहन करणार काय माहिती. जाऊद्या आता हा विचार नकोच आता झोपुया! इकडे आर्या च्या आनंदाला तर पारावरच नाही उरलं. सिद्धांत इतक्या लवकर तयार कसा काय झाला म्हणजे त्याने हे सत्य स्वीकारणं फार कठीण होत ग. ती तिच्या आईला म्हणाली. तुझं ना आर्या अवघडच झालं, इतक्या दिवस वाट पाहिली आता तो सगळं स्वीकारून पुढे जायला तयार आहे तर तुझ्या आपल्या रिकाम्या शंका. चल आता हे सगळं सोड आणि आवर तुझं सकाळी येईन तो.तिची आई तिला म्हणाली. तिने तिच्या आईला एक मिठी मारली आणि आवरण्या साठी निघून गेली. कधी एकदा आजची रात्री संपते आणि सकाळ होते आहे असं झालय ! finally उद्या सिद्धांत येणार.....
क्रमशः