ना कळले कधी Season 2 - Part 14 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 14

बर झाल थांबला किती मोठी काळजी मिटली माझी. ती त्याला म्हणाली. आर्या तुझ आपलं काहीतरीच असत रात्री जाऊ नको म्हणे काय झालं गेलो असतो तर उगाच आपल काहीतरी.मी आईला काय सांगितलं असत का गेला सिद्धांत?आणि सकाळी उठून परत जायचंच आहे ना! अरे उद्या असही ऑफिस नाही आहे मग आता जायच काय किंवा उद्या सकाळी काय फरक पडतो. आणि इथे झोपायचं काय तिथे झोपायचं काय सारखच आहे. काही सारख नाही ती माझी रूम आहे ही तुझी आहे किती मोठा फरक आहे हा. अरे एक रात्र काढायची आहे तुला इथे फक्त मी काही settle होअस नाही म्हणत आहे. मग थांबलोय ना आणि हा बेड पण comparatively छोटा आहे माझ्या रूम पेक्षा आणि तुझ्या रूम मध्ये सोफा पण नाही आहे.हे बघ मान्य आहे माझी रूम तुझ्या रूम सारखी नाही आहे पण एक दिवस you can adjust! ok fine झोपायचं!बर AC चा remote कुठे आहे. शोधावा लागेल, ती म्हणाली. हो तुला कधी गरजच पडत नसेल ना आर्या AC ची, last कधी use केला आठवतो का? हे बघ अस काही नाही हा, शोधते मी.असेल मला रोज 332नाही लागत ह्याचा अर्थ असा नाही की कधीच नाही लागत. ती रिमोट शोधत होती. का ऐकतोय मी आर्या च आज इतकं? किती हक्काने थांबवून घेतलं तिने मला. आणि मी ही तिला नाही म्हणू शकलो, आर्या great आहेस यार तू थांबवून दाखवलं अस तर मी कुणाचाही ऐकलं नसत.हे घे रिमोट तिने शेवटी त्याला शोधून दिला. एकही दिवस तू AC शिवाय राहूच शकत नाही न ती त्याला म्हणाली. तू च म्हणाली ना खूप उकडतय आता बाहेर तर घाम फुटत होता तुला उकाड्याने. हे बघ आर्या मला माहिती आहे की तुला AC सहन होत नाही पण थोडस temperature set होऊ दे!तो म्हणाला. ठीक आहे रे, ती म्हणाली.
सिद्धांत डोळे मिटून पडला आर्या ला त्याच्या कडे पाहून फार वाईट वाटलं मी उगाच ह्याला त्याच्या तब्येती वरून बोलली काय वाटलं असेल त्याला! तो ही थोडाच मुद्दामून करत आहे मी नव्हतच बोलायला हवं होतं. पण मी थांब म्हंटल्यावर थांबला हा. सिद्धांत मला आजही नाही म्हणू शकला.ती ने त्याच्या शांत चेहऱ्यावरून एकदा हात फिरवला. आर्या मी जागीच आहे अजून dont dare to touch me! तो म्हणाला. तिने एकदम हात बाजूला केला. तिला हसायला च आलं सिद्धांत कधी बदलणार रे तू! ती मनातच म्हणाली.
आर्या ला मात्र आता झोप लागली. तिचा चेहरा पाहून सिद्धांत च्या मनात आलं किती निरागस आहे ही! तिच्या चेहऱ्यावर आलेली बट त्याने बाजूला केली. हम्म उगाचच त्रास देत होती तिला. तो ती बट मागे करत म्हणाला. बिचारी किती suffer करते आहे माझ्या मुळे. ती झोपेतच होती. तिचा विचार करत करत त्याला ही झोप लागली. आर्या ला जाग आली तेव्हा ती सिद्धांत तिच्या अगदी जवळ झोपलेला होता त्याचा हात ही तिच्या हातात होता. ती थोडास बाजूला सारकण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या हालचालीने त्याला जाग आली. तो पटकन बाजूला होण्याचा प्रयत्न केला पण तिचं earring त्याच्या T-shirt मध्ये अडकलं होत.त्यामुळे त्याला ते जमलं नाही. आर्या काढण्याच्या प्रयत्न करत होती पण तिला जमलं नाही.wait आणि ते अडकलेल earring काढल. अग आता तरी बाजूला हो तो म्हणाला. सिद्धांत तू हात पकडलाय माझा. ती त्याला दाखवत म्हणाली. सॉरी!म्हणत त्याने पटकन सोडला. बापरे किती उशीर झाला तो घड्याळ बघत म्हणाला. फक्त 9 तर वाजलेत कुठे उशीर झाला आणि आज कुठे ऑफिस आहे. काय फक्त 9 वाजले.तुझ्यासोबत राहून माझ्याही सवयी बिघडत आहेत आर्या! सिद्धांत म्हणाला. आज morning walk वगैरे सगळं बोंबलल अस होत बघ ह्या साठी मी नव्हतो थांबत. अरे ठीक आहे ना आता जा ती म्हणाली. 'धन्य आहेस तू! 9 वाजता जा म्हणे morning walk ला'.' बर उठ आता तरी आवर आपण निघू या''कुठे जायच'? आर्या म्हणाली. वर्ल्ड टूर वर निघुया! सिद्धांत म्हणाला. "काय ??"आर्याला काहीही कळत नव्हत तो काय बोलत होता. अग आर्या तुझी झोप अजूनही झाली नाही का अस काय करतेय घरी यायचं नाही का तुला आई वाट बघतेय तुझी. तो म्हणाला. आर्याला जाण्याची ईच्छा च नव्हती. ती जबरदस्ती हो म्हणाली. सगळेजण नाश्ता करत होते तेव्हा सिध्दांत म्हणाला, आर्या रेडी आहेस ना म्हणजे आपण लगेच निघू . अरे काय रे सिद्धांत थांब ना आजच्या दिवस संध्याकाळी ना आर्याची आई त्याला म्हणाली. नाही काकू1 बरेच काम आहेत एकच दिवस मिळतो ते करण्यासाठी तो म्हणाला. नेक्स्ट टाइम नक्की ! बर बर बघ तुला जस जमेल तस. तिची आई म्हणाली. सिद्धांत मी उद्या आलं तर चालेल का? आर्याने थोडस भीतभितच विचारल."का"?तो आणि तिची आई दोघही एकदमच म्हणाले.' तुम्ही अस काय react करताय सहज मला अजून रहा वाटतय इथे बस'. अग पण तू राहिलीच ना इथे आणि हवं तर नंतर पुन्हा ये सिद्धांत तिला म्हणाला. आर्या कस आहे तू कितीही राहिली तरी तुला इथून जावं वाटणारच नाही, पण तिकडे पण गेलंच पाहिजे ना! आणि सिद्धांत म्हणतो तस पुन्हा ये ना! आई तुला अस वाटत की मी इथे राहू नये ती तिच्या आईला म्हणाली. अग बाळा,अस नाही आहे मला तर वाटत की तू इथेच रहावं, पण ते शक्य नाही ना आता. हिला काय झालं, अशी का कारतीये? नक्कीच आर्याच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार .सिद्धांत तिच्या कडे पाहून विचार करत होता. अरे यार हे लोकं काही माझं ऐकणार नाही माझी कितीही ईच्छा नसली तरीही मला जावच लागणार. ती मनातच विचार करत होती. ठीक आहे चालेल मग निघुया सिद्धांत. मग थोड्या वेळाने आर्याही त्याच्या सोबतच निघाली.
क्रमशः
©Neha R Dhole