ना कळले कधी Season 2 - Part 19 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 19



'बर आर्या 'आज जाण्याच्या आधी मला तुझ्याशी काही गोष्टी discuss करायच्या आहेत मीटिंग मधल्या आणि पुढे काय करायचं हेही बोलू '! तू तुझ काम पूर्ण करून घे मी बोलावतो तुला!

ओके, हरकत नाही! आर्या म्हणाली.

आज आर्यावर मी खरच खुप खुश आहे, अगदी माझ्या मनासारखं प्रेझेन्टेशन दिल तिने!काय कॉन्फिडन्स होता तिचा, कुठलाही experience नसताना तिने हे केलं हे खरच कौतुकास्पद आहे. तो मनातच तिचा विचार करत होता, त्याच तिच्या केबिन मधूनही सारख तिच्याच कडे लक्ष जात होतं.
आर्या तिच्या कामात मग्न होती, तितक्यात तिला कॉल आला. सो सॉरी, अरे कामाच्या नादात मी विसरूनच गेले मी एक अर्ध्या तासात पोहचते बाय बाय! तिच काम आटपून ती निघणार सिद्धांत ला बोलायला हवं त्याला सांगून जाते, त्याला काहीतरी discuss करायचं होत त्याला सांगायला हवं आपण उद्या बोलूया आता मला निघायला हवं, मी ही काय मूर्ख आहे सिद्धांत ला आधीच सांगायला हव होत की मला जायचं आहे थोड लवकर. ती त्याला बोलायला गेली पण त्याचा कॉनकॉल चालू होता त्याने तिला खुणेनेच नंतर बोलू सांगितले. आता काय करू मला तर निघायला च हवं! तिने Siddhant, I know that you truly expect me to in office for discussion but i forgot to tell you that today I have an another important work so I m going there and I will be reach directly at home . I’m really sorry. And we will discuss all things about meeting on tomorrow morning bye bye!!!! असा मेसेज पाठवुन दिला. चला आता निघुया. आणि ती ऑफिस मधून निघाली.

वेलकम मिसेस आर्या देसाई, मंदार ने नेहमीप्रमाणे च तिच हसुन स्वागत केल आणि पुढे म्हणाला,and extremely sorry तु कॉल केलास तेव्हा मी एका कॉन्फरन्स साठी गेलेलो म्हणून आज आल्या आल्या आधी तुला बोलावलं.

अरे ठीक आहे मंदार
'Is everything ok, तुझा असा अचानक फोन आला तर मला थोड टेन्शन च आल होत', 'सिद्धांत बरा आहे ना?'

'हो तसा तो बराच आहे पण त्याच्या विषयीच थोडस बोलायच होत'. मी थोडस स्पष्टच बोलते don't take it otherwise, अजून किती दिवस चालणार असच! कधी बरा होणार सिद्धांत? कधी आठवणार त्याला? की कधीच बरा होणार नाही तो?

Ok तर! हा प्रॉब्लेम आहे, तो बरा कधी होईन हे मी अस भाकीत नाही करू शकत आणि अश्या केसेस मध्ये तर मुळीच नाही, मी अशी एक फिक्स डेट, महिना नाही सांगू शकत! होऊ शकत त्याला काही वर्षे लागतील, किंवा काही महिने किंवा अगदी आजही आठवेल! आपले प्रयत्न चालूच ठेवावे लागतील. पण आता तर सगळं नीट झालय ना? त्याने तुला स्वीकारल! आणि सिद्धांत ने अस करण हेच खूप मोठं आहे अग कारण ज्या सिद्धांत ला मी ओळखतो तो अश्या पटकन गोष्टी accept नाही करत अग!

पण त्याने नाईलाज म्हणून accept केल अरे! त्याच्या समोर दुसरा ऑपशनच नव्हता. आर्या ने अखेर त्याला सांगितल.
काय!! आणि तू हे आता सांगतीये! अस कस करू शकतो तो.
हे बघ मुळात तु जसा म्हणतो तसाच आहे तो, रिऍलिटी accept करण फार कठीण आहे त्याच्यासाठी. आणि ह्याचा त्रास होतो त्याला, आणि मी तो नाही बघू शकत. हे बघ त्याला मी आठवेन नाही आठवेन ही वेगळी गोष्ट पण त्याच्यावर अशी जबरदस्तीही नको म्हणजे असे किती दिवस त्याच्या वर नातं लादायचं?

ठीक आहे मी बोलतो त्याच्याशीही ह्या विषयावर पण आता तुला हेच सांगेन ह्या वर वेळ हे एकच सोल्युशन आहे. थोडा वेळ जाऊ दे!

ठीक आहे अजुन काही दिवस वाट पाहिन मी . आता उशीर होतोय निघायला हवं. हो आणि सिध्दांत ला कळता कामा नये की मी इथे येऊन गेले.
Don't worry about that, हा आणि आता नेक्स्ट टाइम आपण सोबतच भेटु.bye!!.........

सिध्दांत ने आर्याच्या एक्स्टेंशन वर कॉल केला. हा, आर्या कम हिअर....
Sir, its Reva, आर्या आता ऑफिस मध्ये नाही आहे, ती निघून गेली.

'काय!!.....कुठे गेली ,काही सांगून गेली का'?

'नाही काही तरी महत्त्वाच काम आहे इतकच बोलली.

ठीक आहे मी बघतो, म्हणून त्याने फोन ठेवला आणि आर्याला फोन लावण्यासाठी हातात घेतला आणि तिचा मेसेज बघितला. अरे इतकं कोणतं महत्वाच काम होत हीच एकदा तरी सांगायचं. मी काही मदत केली असती. पण माझी मदत घ्यायची नसेल ना! इगो तो मोठा आहे ना! आणि त्याने तिला कॉल लावला पण तिचा फोन स्विच ऑफ आला. आणि इकडे सिद्धांत चा राग आणि टेन्शन दोन्हीही वाढलं. काय मूर्ख मुलगी आहे. फोन का बंद ठेवते काय माहिती. मी घरीच निघतो ती घरी डायरेक्ट पोहचते म्हणाली कदाचित पोहचली ही असेन! आणि तो ऑफिस मधून लगेच निघाला.

अरे ही तर अजून घरीही आली नाही! कदाचित आई कडे गेली असेल त्याने आयुष ला फोन लावला. पण ती तिथेही नव्हती. आर्या गेली कुठे? काही प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना?

तिने आपला airplane mode वरचा फोन नॉर्मल mode वर केला आणि कॅब बुक केली. 'चला जास्त उशीर नाही झाला सिद्धांत आला च नसणार अजून नाहीतर त्याने शंभर प्रश्न विचारले असते'. ती घरी पोहोचली तिने बाहेरच गाडी पहिली सिद्धांत ची गाडी आज हा लवकर कसकाय आला? दार पण उघडच, ती आत आली. सिद्धांत हॉल मध्ये च चकरा मारत होता.
Hii, आज लवकर आला का? तिने एकदम casually विचारल.

सिध्दांत एकदम त्या आवाजाने थांबला आणि त्याने समोर बघितलं तर आर्या! तिचा हसरा चेहरा पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. तो तिच्या जवळ आला, आर्या....... त्याच्या मोठया आवाजाने ती थोडी दचकलीच.

काय झालं?? इतका मोठ्याने का बोलतोय?तिने विचारल.

Are you stupid?? अस न सांगता कुठे गेली होती? काय अवस्था झाली होती माझी माहिती आहे का?
'अरे न सांगता कुठे तुला मेसेज केला होता मी'. तिने मोबाईल काढला आणि त्याला मेसेज दाखवला. त्याने हातात घेतला आणि 'ह्याचा कधीही उपयोग होत नाही एकतर उचलायचा नाही किंवा बंद ठेवायचा'. आणि त्याने रागाने जोरात खाली फेकला.

अरे ऐ... काय केलस वेडा आहेस का तू? माझा फोन का फोडला? तीही ओरडून म्हणाली.

हो तुझ्या सोबत राहून एक दिवस नक्की वेड लागणार आहे मला. आज पहिल्यांदा तुझा अभिमान वाटला होता मला इतकं छान प्रेझेन्टेशन दिल वाटलं हिला खरच आपण ओळखण्यात चूक केली पण तू prove करून दिल की तू त्या विश्वासाच्या लायकीचीच नाही.तुला मी बजावून सांगितलं होतं की आज discussion केल्याशिवाय जायचं नाही. पण तुला काय ऑफिस चे काम थोडीच महत्त्वाचे आहेत. एक तर तुला काही सांगायचं नसत आणि तुला काही विचारावं तर आपला फोन बंद.मग काय उपयोग त्या फोन चा. मला किती काळजी वाटत होती माहिती आहे का विचार करून करून वेड लागायचीच वेळ आली होती.

नको करत जाऊ ना मग इतकी काळजी असाही काही च संबंध नाही आपला तूच म्हणतो ना नेहमी. प्रत्येक वेळेस राग करून नसत व्यक्त व्हायचं सिद्धांत. मला ना खर तर कंटाळा आलाय तुझ्या ह्याच स्वभावाचा.

जा मग बिनधास्त जा आपल्या घरी असही इथे आई नाही आहे तुला अजून 2 महिने तरी मी तुला बोलावणार नाही, जा मी नाही अडवणार.

गेलेच असते पण कस आहे न तुझी आई इथे नाही आहे माझी तर आहे न तिला काय सांगू? म्हणून नाही जात कळलं का?.

सांग न भांडली म्हणावं मी, नाही पटत मला त्याच वागणं आले मी!

'मी नाही जाणार' ! 'तू कितीही काहीही म्हणाला तरी', मी नाही जाऊ शकत.

ठीक आहे,' मग रहा इथेच पण मला अजिबात त्रास देऊ नको आणि बोलू तर अजिबात नको' 'spare me'! आणि तो बाहेर निघून गेला.
क्रमशः
©Neha R Dhole.