जालिंदर Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जालिंदर

कथा- जालिंदर
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------
जालिंदर एक मासलेवाईक माणूस, भुरट्या लोकांच्या दुनियेतला एक संधीसाधू . काहीही करून फक्त पैसा कमवायचा", लहानपणा पासून याच गोष्टीचा नाद लागला, त्यात या बेट्याच लक एकदम बेस्ट ,मग काय यान काही करावं , पैसा याच्या खिशात येणार.जणू पैशाला सवय लागली होती .
आकडा लावला, पक्का लागला ,बावन पत्ते याच्या हातात आले की ,पहायचंच काम नाही, कैकाचा निकाल लावुनच गडी क्लबच्या भायर पडणार .
जालिंदरच्या हाग्या नशिबावर सगळी पब्लीक खार खायची ,जाळून खाक व्हायची, तो तो जालिंदरच नशीब खुलायच,
ज्याचे पैसे जायचे तो चरफडत शिव्या द्यायचा
ये जालिंदर,बहोत दलिंदर है साला, सुला देता है हरामी.
इस के नाद को लगना मतलब खुद की..


अशा अवलिया जालिंदरच्या बापाला काही वर्षापूर्वी एका पैसेवल्याने पार नागवले होते, आपल्या गरीब- बापाची दैना त्याच्या जवळ बळ नव्हते , पैसा नव्हता म्हणून झाली, हे त्याच्या मनात पक्के ठसले होते. वाढत्या वयाने जालिंदरला या सगळ्या गोष्टी समजत गेल्या तसा तसा तो बदलत गेला ..
तेव्हापासून त्याच्या डोक्यात राग आणि मनात खुन्नस भरलेली होती . नंबर -टू " दुनियेतील तमाम पब्लिक जालीन्दारच्या निशाण्यावर असायची .
त्यामुळे ..अशा पैसेवल्याची तर..दोस्ती आणि दुष्मनी .दोन्ही त्याचे आवडते छंद झाले होते .


कुणी काय म्हणेल याची त्याला पर्वा नव्हती.. त्याच्या मनात आलेले बिंधास करून मोकळे होणे हे त्याला माहिती होते.
कुणी कधी त्याला म्हणयचे ..
अरे बाबा , उगीच्या उगीच कशाला हे कुटाणे करीत असतो , कधी तुज्यावर बी बाजी उलटली तर कसं रे ?


यावर जालिंदरचे उत्तर ठरलेले - एक सांगू का - अशा बदमाश, लफग्यांना लुटण्यात पाप बीप काय मानत नाही आपण,त्यांना त्यांच्या भाषेत बोलणारा भेटला की मग नीट समजत
अशा लोकांना
तुम फिक्र नको करो मेरी ...आणि मग जालिंदर असे पैसेवाले लोक शोधून त्यांना पार धुवून काढणे ,त्यांना पार जमिनीवर आणणे .हेच उद्योग करू लागला .हाच जणू त्याचा रोजगार झाला .,
रेलवे स्टेशन , बस-stand, शहराचा दुर्लक्षित भाग ..अशाभागात जालिंदरचे राज्य होते ..गावातले संभावित म्हणून वावरणारे ,वर एक बुरखा ,आतून भलताच चेहरा ,
असे ही त्याच्या नजरेस पडायचे ..मग, काय अशी शिकार करण्याची संधी तो सोडीत नसे .


त्याचा गरीब ,सालस बाप साध्या ,भोळ्या स्वभावाने गोत्यात आला, आम्ही काही करू शकलो नव्हतो हेच खरे ..इतक्या वर्षानंतर ही आमच्या मनात ही सल होती.
त्या भोळ्या माणसाचा दोस्त होतो मी, शहरात आला म्हणजे तो माझ्याकडे यायचा .माझ्या पान -टपरीवर बोलत बसायचा. त्याच्या सोबत जालिंदर येत असायचा .आपल्या बापाचा दोस्त आहे हा माणूस ,म्हणून माझ्याशी तो तसा बराच आदबीने बोलायचा .
मला तो .ओ बाबुराव .म्हणयचा , एक मस्त पान देत जावा , मस्त पान खाल्ले की , मोठ्या रुबाबात त्याची मोटार सायकल गडगड आवाज करीत नजरेआड व्हायची .


जालिंदरच्या बापाने गावाकडची शेती करून , शहरातल्या पैसेवाल्या मालकाकडे नौकरी करून ,जे काही पैसे जमले त्यातून त्याने एक जागा विकत घेतली , छोटे घर बांधले , बरीच जागा मोकळी राहिली ,नानातेरच्या काही वर्षात गावाचे रूप बदलून गेले ,बाजूला असलेले जालिंदरचे घर आणि त्याची मोठी मोकळी जागा आता एकदम मोक्यावरची बनली ,मग काय , नेमकी हीच जागा लोकांच्या नजरेत भरली .
आताशा जालिंदरचा बाप लोकांच्या नजरेला खुपू लागला एक दिवस हा साधा सरळ मनाचा माणूस त्याच्या बदमाश मालकाच्या बोलण्याला भुलला ,जाळ्यात अलगद
फसला आणि जागा तर गेलीच , त्याच्या हातून ..त्यातच
गावाकडचा शेती-वाडी घालवून बसला, अचानकच एक दिवस तो गावाकडे गेला तिकडेच , हा गरीब माणूस त्याच्या गावाकडच्या मातीत कसा आणि कधी विरघळून गेला ,तो पुन्हा कधी
नजरेस पडलाच नाही .आपला बाप मेला नाहीये ..त्याला लोकांनी मारून टाकलाय हे कळून जालिंदर भांबावून गेला ,त्याचे घर उघड्यावर आले ..
अशा अडचणीच्या वेळी आम्ही काही लोकांनी घराला सावरण्यासाठी जमेल तशी मदत केली पण आमच्या मर्यादा होत्या , आमचे खिशे तरी कुठे धड होते , फाटक्या माणसांचे खिशे ,तसेच फाटके ..होते .
जालिंदरला याची जाणीव होती, त्यामुळे आपलेपणाने घटकाभर थांबून बोलून, त्याच्या आवडीचं पान खाऊन गडी पुढे निगायचा, हे ठरलेलं.


त्याच्या बेरकी आणि धूर्त -बदमाश स्वभावाला एक दुसरी किनार पण होती , त्याच्या मोहल्ल्यातील गरीब,गरजू , नाडलेल्या लोकांना पैसे देणे, गरज भागविणे हे तो मनापासून करायचा. म्हातार्या ,अनाथ ,बेमार अशा माणसांचा तो आधारवड होता , असा कुणी दिसला ,भेटला की जालिंदर मोठ्या मायेने त्यांना मदत करी ,बाई-माणूस, तरुण पोरी ..त्याच्या भरोश्यावर मोकळेपणाने वावरत असायच्या .
म्हणजे तो दानशूर वगैरे आहे असे अजिबात नव्हते,.त्याचे नेहमीच्या लोकांसाठी , पंटर लोकांसाठी ,आणि पैश्यावर चालणार्या दुनियेतल्या लोकासंठी जालिंदर म्हणजे
दगडी मनाचा, उलट्या काळजचा कसाई होता, एकदम दलींदर- माणूस म्हणा की . त्याच्याकडून ज्याने उसने पैसे नेले त्याने ते दिल्या शब्दाप्रमाणे परत केले पाहिजेत,हा त्याचा नियम, नियम मोडेल त्याला जबर शिक्षा होणार हे पक्के
म्या काय ब्यांक उगडून माज दिवाळ काढायला , पैसा वाटायला नाय बसलो..जो मला बुडवील , मीच त्याला पार बुडवील .वर नायी याचा कधी.
हेच रोजच्या दिवसातले एकमेव ध्येय, पैशातून पैसा कमवायचा .


कधी कधी मूड मध्ये असला की जालिंदर म्हणयचा ..
"पैश्यापुढं कायपण मोठ्ठ नसतंय बाबुराव.
मायला, हे खोटारडे आणि माजुरडे लोक अंधार झाला की पैश्यासाठी भिकारी होतात , माज्यापुढे हात पसरून उभे राहिले की माजा जीव लै खुश होऊन जातो बगा,


अरे बाबा - तुला काही नाही वाटत या सगळ्याच , पण, कधी कधी भीती वाटते आम्हाला ..मी माझ्या मनातले बोलून दाखवत असे
ओ बाबुराव , तुम्ही पानाला चुना लावता , कुणी करता का तक्रार ,? उलट गोडीने खातात की तुम्ही चुना "लावलेलं पान , पण, या जालिंदरला कुणी "चुना लावण्याचा ,विचार जरी केला ,तर
या दलीनदर -जालिंदरशी गाठ आहे, माहिती आहे सगळ्यांना , फिकीर नोट..बाबुराव ...सिकंदर हाय ह्यो जालिंदर .
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल की - कुणा भल्या माणसाला हात लावला या जालिंदरने तर सरळ चपलेन हाणा बाबुराव, फुल्ल परमिशन तुमाला..


मला तर कधी कधी हा जालिंदर म्हणजे रोबिन्हूड वाटायचा ...एकीकडे तो लुटारू आणि दुसरीकडे दयाळू ,कनवाळू , त्याच्या पाप-पुण्याचा हिशेब मी सामन्य तो काय करणार .


त्यादिवशी .सकाळी सकाळी आजूबाजूला एकच गोंधळ उडाला .एकजण माझ्या टपरीवर थांबला आणि म्हणाला ,
बाबुराव .आपल्या .जालिंदरला कुणीतरी उडविण्याचा ट्राय केलाय ..थोडक्यात हुकला डाव ..मरता मरता .वाचलंय आपल माणूस ..चला हॉस्पिटलला जाऊ या ..


तडक हॉस्पिटल गाठले ..एकच गर्दी ..जमा झालेली ..शहरातल्या सगळ्या भागातले लोक तिथे होते ..काय परिस्थिती ..कळात नव्हते ..धोका आहे अजून, काही सांगता येत नाही
..
जमलेल्या लोकांच्या चेह्रेयावर कळणारे ,न कळणारे भाव होते ..आम्ही एक झाडाखाली थांबलो , बाजूला जालिंदरच्या मोह्ल्यातील महिला बसून होत्या , पदराने डोळे पुसित .
एक म्हणाली .. कसा बी असो, काय असो ..आमच्यासाठी तर आमचा पोरगा होता ..ह्यो माणूस ... लई दुवा आहे त्याच्यामागे. काय बी न्हाई होणार लेकराला ..


त्या क्षणी ..मला जाणवले ..इथे ..तर असे ही खूप आहेत ..जे नवस बोलत असतील ..जालिंदर यातून बराच होऊ नये ..त्याच्या देण्यातून कायमची सुटका तरी होईल ..
आणि दुसृकडे ..लेकरू बरे व्हावे असा साकडे घालणारी माणसे पण आहेत ..
देव कुणाचे भले करणार ? ..आमच्या हातात फक्त .वाट पाहणे .....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा - जालिंदर
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२