ना कळले कधी Season 2 - Part 29 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 29

एकदाचा सिद्धांतचा प्रवास सुरु झाला, तसे ऑफिस मधले बरेच जण त्याच्या सोबत होते पण त्याला ह्या वेळी आर्या ची फार आठवण येत होती. आर्या एकटी राहू शकेल न?? आधीच तर ती इतकी घाबरट आहे मी सोडायला नको होतं तिला ऐकटीला किती चेहरा पडला होता तिचा. आर्या काल बरोबर म्हणत होती. आपलं प्रेम म्हणजे बांधून ठेवावं वाटत नाही सोडून जावं वाटत नाही. खरच आहे ते पण मला आर्यला सोडून जाण्याचा इतका का त्रास होत आहे? , ह्या आधीही मी कितीतरी वेळा बाहेर गेलेलो आहे मग ह्या वेळेस माझाही पाय का निघत नव्हता. मला आर्याला सोडून जावं वाटत नव्हतं? इतकं का वाटत तिच्या बद्दल ? मला ती आवडू लागली आहे? नाही नाही काहीही काय ते फक्त आता इतक्या दिवस सोबत राहिलो म्हणून वाटत असेल. हा असच असणार . जाऊ दे मी बुक्स आणलेत ते वाचतो आर्याचा विचार नको करायला. अस म्हणून त्याने सॅक मधून बुक्स काढले.
अरे मी तर फक्त बुक्स घेतले ही डायरी कुणाची आहे?
आर्याचीच असणार ! त्याने ती बघितली. वाचू का आर्याने काय लिहिलं आहे ते? नको अस पर्सनल वाचायला नको. आणि त्याने ती ठेवून दिली. आणि बुक वाचत बसला.

हा व्हिडिओ कॉल का करतोय मला? सिद्धांत न खरच वेड्या सारखाच वागतो कधी कधी आता ह्या वेळेला मी ऑफिस मध्ये आहे हे माहिती नसणार का त्याला? ती ने थोडं बाजूला जाऊनच रिसिव्ह केला.

अरे तू व्हिडिओ कॉल का करतोय?

अग आर्या आधी hii, हॅलो अस म्हणावं हे काय आपलं?

बर चुकलं hiii बोल, कधी पोहचला?

काही नाही ग मी हे विचारण्या साठी कॉल केला होता की माझी गाडी नीट आणली ना म्हणजे ठोकली वगैरे नाही न कुठे?

सिद्धांत, are you serious ? म्हणजे मला तू गाडी बद्दल विचारायला कॉल केला.

of course ! मला फार प्रिय आहे माझी गाडी. तू सांग नीट आहे न तू नीट चालवली न? किती काळजी वाटत होती मला तिला काही झालं असत तर?

तुझी गाडी एकदम नीट आहे हवं तर लंच ब्रेक मध्ये फोटो पाठवते, आणि चुकलंच माझं मी उद्यापासून तुझ्या गाडीला हात च नाही लावणार, माझी आहे न माझ्या कडे ती च घेऊन येईल.ती चिडलीच. अजून काही बोलायच आहे?

नाही बस इतकच विचारायचं होत.

ठीक आहे मग आणि तिने फोन कट केला.

काय विचित्र आहे हा! मला वाटलं मला बोलायच असेल ह्याला पण नाही ह्याला तर गाडीची काळजी. एखादा असता तर तू कशी आहेस काय करतीये ? काही खाल्लं का? पण सिद्धांत ला ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा गाडी महत्वाची ना! disgusting! तिला सिद्धांत चा चांगलाच राग आला.

वा आर्याला पाहून बर वाटल! सवय झाली आहे ना तिची आता. कामाची सुरुवात च होत नाही तिला पाहिल्याशिवाय.आणि आर्या तर खरच बावळट आहे तिला साधं समजू नये का की मी तिलाच बोलायला कॉल केला. कुणी आपली घेतय हे ही कळत नाही तिला. राग तर नाकावर लगेच फोन कट अस करत का कुणी? जाऊ दे मला माझ्या मीटिंग ला सुरवात करायची आहे. तो त्याच्या कामाला लागला.

आर्यच तर आज ऑफिस मध्ये लक्षच लागत नव्हत. तिला सारखी सिद्धांत च्या केबिन कडे पाहून त्याची च आठवण येत होती. ती रिकामी खुर्ची पाहून तर तिला आणखीनच वाईट वाटत होतं. सिद्धांत शिवाय मजाच नाही ऑफिस मध्ये. किती रिकाम रिकाम वाटतय ऑफिस रेवा आणि आशिष पण गेले ते असते तर थोडा तरी वेळ गेला असता . पहिलाच दिवस इतका कठीण जातोय अजून 10 दिवस कसे जातील काय माहिती. पण त्याला काय त्याच तो मस्त मजा करत असेल! माझी काळजीच कुठे आहे त्याला. इतक्यात तिचा। फोन वाजला. अरे पुन्हा व्हिडिओ कॉल......

हा बोल काय म्हणतो,

आर्या ऐक ना आता मीटिंग झाली, आणि फार मस्त झाली माहिती आहे का?आणि त्याने सगळी डिटेल मीटिंग तिला सांगितली. तो फार खुश दिसत होता.

आर्याला ही ऐकून भारी वाटलं. तस सिद्धांत ने मीटिंग हँडल केली म्हंटल्यावर काही प्रश्न च नव्हता म्हणा. अरे पण आता बस झालं मिटिंग च पुढे दुसरं काही बोलणारच नाही आहे का हा? ती मनातच म्हणाली.

आर्या का ग बोअर झाली का? तो म्हणाला.

नाही रे बोल न तू !

चेहरा सांगतोय तुझा तुला कंटाळा आला हे ऐकून, बर ते सगळं सोड, जेवण झालं??

नाही अजून, तूझ???

माझंही बाकी आहे, चल कर तू तुझे काम, जेवण बोलू संध्याकाळी.बाय!!!

बाय!!!!!

मला तर वाटतय न की सुट्टयाच घ्याव्या काही दिवस, कस राहायचं ऑफिस मध्ये एकटीने, घरी एकटीने किती कठीण आहे हे मला नाही जमणार. तिला ऑफिसमध्ये अजिबातच करमत नव्हतं. जबरदस्तीने ती वेळ काढत होती. आणि कसाबसा ऑफिस चा वेळ संपला.

घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तिने आपल आटपून ती तिच्या स्टडी रूम मध्ये गेली. ह्यावेळी तरी तिला पुस्तकांची च सगळ्यात जास्त मदत होणार होती. तिने बघितले टेबलावरचे तिचे पुस्तक आणि डायरी दोन्ही गायब.

कुठे गेले ? मी काल रात्री वाचून इथेच ठेवले होते. बर एखाद्यावेळेस पुस्तक मी बाहेर नेले असतील पण डायरी ती तर मी इथुन बाहेर नेणं शक्यच नाही.

सिद्धांत ला विचारू का? हो कदाचित त्याने कुठे ठेवले असतील तर? हा ! अस म्हणून तिने त्याला कॉल केला.

ohhh आर्याचा कॉल, बोल डियर..... करमत नाही आहे का?

नाही रे, तस काही नाही ऐक न सिद्धांत तिचा आवाज टेन्शन मध्ये च होता.

सिद्धांत ने लगेच ओळखल, काय झालं आर्या इतक्या टेन्शन मध्ये का आहेस ? काही झालं का?

नाही तस काही नाही मला हे सांग तू माझे स्टडी रूम मधले बुक्स पाहिले का ? काल मी तिथेच ठेवले होते.

अच्छा तुझे बुक्स का, ते तर......... तो बोलता बोलता थांबला नको हिला जर कळलं की माझ्या कडे आहे तर पुन्हा किरकिर चालू करेन मला न विचारता नेलेच कसकाय, जाऊ दे हिला नाही सांगत तो मनाशीच म्हणाला.

तू थांबला का बोल न ..

अग असतील न आर्या तिथेच कुठे, बघ तू वाचता वाचता कुठेतरी ठेवून दिल असणार! नीट बघ, आणि काय ग इतके पुस्तकं आहेत तुझ्या कडे तुला नेमके तेच का हवे आहेत.

अरे मुळात प्रश्न पुस्तकांचा नाहींच आहे, ते तर माझ्या कडे सॉफ्ट मध्ये पण आहे पण त्या पुस्तकांन सोबत माझी डायरी पण होती. ती दिसत नाही आहे कुठे. मला ती हवी आहे. and I am sure की,मी ती बाहेर नेली नाही.

एवढं काय आहे त्या डायरी मध्ये ही इतकं टेन्शन घेतीये. आर्या, नाही सापडत तर मला वाटत तू एकदा शोध नाही सापडली तर नवीन घे त्यात काय!

अरे अस कस बोलतो तू, ती डायरी किती महत्त्वाची आहे माझ्या साठी तुला नाही कळणार ! घरातून गोष्टी गायब होतातच कश्या?? तू घेतली का ? तिने हळूच विचारल.

तुला काय म्हणायचं मी चोरली? काहीही काय आरोप लावते ग माझ्यावर मला तर आत्ता कळाल की तुझ्या कडे डायरी पण होती.आणि मला हौस नाही हा अश्या दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायची.

सॉरी, मला वाटलं चुकून तू घेतली असशील. anywayमी शोधते बघते सापडते का!

हा शोध आणि सापडली की कळव मला. आणि दोघांनीही फोन ठेवुन दिला.

बिचारी आर्या, किती भोळी आहे खरच !आता तिने पुढचे दहा दिवस जरी तिने शोधली तरी तिला सापडणार नाही आहे. मला अस खोट नव्हतं बोलायच तिच्याशी पण तिचा रोख पाहून तर वाटत होतं की तिला जर कळल असत की माझ्या कडे आहे तर ती नेक्स्ट फ्लाइट ने इथे आली असती. पण एवढं काय असेल त्या डायरी मध्ये. बघू का??
त्याने हातात घेतली. पण कुणाचं पर्सनल वाचू नये. पण आर्याला कुठे कळणार मी वाचलं ते! हा तिला काय कळणार न की मी वाचली की नाही ते ! आणि आता ही डायरी इथे अशी पडून राहण्या पेक्षा वाचलेली बरी!!! म्हणून त्याने ती डायरी उघडली.

तितक्यात त्याला पुन्हा आर्याचा कॉल आला,

सिद्धांत, मला काय वाटत आपल्या कडे न चोरी च झाली असावी.

काय???? काय चोरी झाली.

हो बघ न, कारण मी सगळं घर शोधलं पण ते पुस्तक आणि डायरी कुठेच नाही आहे आणि घरी कुणीच नव्हतं.

आर्या तू न थोडं जास्तच मनावर घेतलेल दिसतंय त्या डायरीच, अग चोर काही फक्त तुझी डायरी आणि ते दोन पुस्तक चोरायला येणार आहे का? काहीही आपलं.

हो ते ही आहेच म्हणा.

तू एक काम कर आराम कर नाहीतर तू न तिथे थांबूच नको. तू न तुझ्या घरी जा! मला आता पुन्हा कॉल करू नको मला वाचायचं आहे.....

काय तुला वाचायचं आहे तू कधी पासून वाचायला लागला? एक मिनिटं म्हणजे तूच तर नाही नेले न....

अरे यार काय माती खाल्ली मी! अग वाचायचं म्हणजे काही पुस्तकच नसत ग ! माझ्या कडे blue print आहे. ती मला वाचायची आहे.

ओहहह सॉरी सॉरी.....ब्लू प्रिंट च डोक्यात च नाही आलं माझ्या. ठीक आहे तू कर continue . मी तिकडेच जाते at least माझा वेळ तरी जाईल. बाय!!

बाय टेक केअर.... हा ठेवला बाबा एकदाचा हिने फोन. काहीही लॉजिक लावते आर्या म्हणे चोराने नेली असेल. ज्या दिवशी तिला कळेल की डायरी माझ्या कडे आहे त्या दिवशी प्रलय येणार बहुतेक. तो स्वतःशीच म्हणाला. आणि त्याने पहिलं पेज उलटलं.

क्रमशः
©Neha R Dhole