ना कळले कधी Season 2 - Part 35 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 35


आर्या अजूनही जागीच कशी काय? मला वाटलं झोपली असेल. आणि इतक्या रात्री ही कुणाशी बोलतीये ! जाऊ दे कुणाशी पण बोलो ना माझं काय जात असाही तिच्या मित्र मैत्रिणींचा रात्रीच दिवस चालू होतो रात्री जगायचं आणि मग सकाळी उशिरा उठायचं.खर तर त्याला आर्या ला बोलावं वाटलं पण थोड्यावेळापूर्वी झालेलं भांडण त्याला आठवलं आणि त्यानं बोलायच टाळलं. आणि तो झोपला.
कसा आहे सिद्धांत मला सगळ्यांनी 12 ला च विष केलं पण ह्याला साधं लक्षात नाही की आज माझा वाढदिवस आहे मी पण नाही सांगणार! अस जबरदस्तीने कस म्हणायच की विष कर म्हणून.नकोच जाऊ दे पण आज मी सिद्धांत शी ह्या विषयावर डोकच नाही लावणार , कारण मला माझा दिवस खराब नाही करायचा! ती चा मूड सगळयांच्या कॉल्स मुळे नीट झाला होता.आणि तिने सिद्धांत चा विषय डोक्यातून काढला आणि आणि ती ही झोपली.
आज मात्र आर्याने कमालच केली रात्री उशिरा झोपूनन ही ही माझ्या आधी उठून तयार strange! तो त्याच मॉर्निंगवॉक ला निघून गेला. तितक्यात डोअरबेल वाजली आर्याला थोडं नवलच वाटलं सिद्धांत तर आताच गेला मग कोण आलं सिद्धांत च्या तर लक्षात नसेल आलं आणि तो पुन्हा वापस आला. तिने बघितलं आणि ती आनंदाने जोरात ओरडली आई.......!!!!! आज कसकाय अजून तू तर पुढच्या संडे ला येणार होती ना! सिद्धांत च्या आईला समोर बघून तिला शॉक च बसला!

काय आहे न आज माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि तो वर्षातून एकदाच येतो म्हंटल कामापेक्षाही ते महत्वाच आहे! happy birthday dear!!!!!

तिने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली , बापरे आजच मिळालेलं सगळ्यात पहिलं आणि सुंदर गिफ्ट. चला दिवसाची सुरुवात तर खूपच सुंदर झाली.

पहिलं का? सिद्धांत ने नाही दिल अजून काही.

नाही त्याला कुठे लक्षात आहे! त्याने तर साधं विष पण नाही केलं.

त्यांनी डोक्यावर हात च मारला काय करावं ह्या मुलाचं? थांब येऊ दे त्याला चांगलाच कान पकडते त्याचा! असा कसा विसरतो.

नाही हा आई अजिबात नाही त्याला सांगायचं नाही त्याला आठवत नाही मान्य आहे पण तरीही त्याला आज आठवण करून द्यायची नाही हं!

अग पण आर्या मग त्याला कस कळणार?

नाही कळू दे, पण सांगायचं नाही.

बर बाई जशी तुझी इच्छा! तू जस म्हणशील तसच होणार!

गुड......!!!!!

इतक्यात सिद्धांत आला बापरे आई , what a pleasant surprise!!! तू कसकाय आणि अचानक!

काही नाही रे आठवण आली तुम्हा दोघांची मग आले.

नाही हे खरच चांगलं केलं तू ! म्हणजे आम्हाला पण नव्हतं करमत तुझ्या शिवाय. त्याने आर्या कडे पाहिलं ती पण खूप खुश दिसत होती.आणि विशेष म्हणजे ती आज छान तयार झालेली होती त्याला तिला विचाराव वाटलं की इतक्या सकाळी तयार होण्याचं कारण काय पण त्याने ते टाळलं.

त्या तिघांच बोलणं चालूच होत इतक्यात तिथे आयुष आला.

happy birthday diii......!!!!! तो तर तिला पाहून एकदम ओरडलाच! तुला माहिती आहे का ,की मी सकाळ होण्याची किती वाट पाहिली. अस वाटत होतं केव्हा सकाळ होते आणि मी केव्हा तुझ्या कडे येतो.खर तर मला रात्रीच यायचं होत पण मग म्हटलं नको तुझा लग्नानंतर चा पहिला वाढदिवस आहे, नक्कीच जिजू नि काहीतरी surprise प्लॅन केलेलं असणार म्हणुन नाही आलो.

त्याच बोलणं ऐकून सिध्दांत चा चेहरा पाहण्या सारखा झाला होता. अरे बापरे, म्हणजे आर्या चा birthday आहे आज!! आणि मी साधं विष पण नाही केलं. त्याला आज पहिल्यांदा स्वतःचा राग येत होता. अस कस करू शकतो मी! इतक्या दिवसांमध्ये मी आर्या बद्दल इतकही नाही जाणून घेऊ शकलो! काय वाटलं असेल तिला. आता मला रात्रीच्या जगण्याचा सकाळी उठण्याचा सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागतोय. आयुष ला जर कळाल की मी साधं विष पण नाही केलं त्याच्या बहिणीला काय वाटेल त्याला? आर्या च्या आयुष्यात किती चांगले आणि किती प्रेम करणारे लोक आहेत, सगळ्यांना फक्त तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा असतो. आणि ती वेडी फक्त आणि फक्त माझ्या साठी इथे राहते आणि मी तर तिला काहीच देत नाही. शिवाय दुःखाच्या! आज पण मी काय केलं? नकळत का होईना तिला दुखावलच.
ऐ जिजू कसला इतका विचार करतोय इकडे ये केक कटिंग करूया!

चला आजचा पहिला केक...! आणि काय रे ब्लॅक फॉरेस्ट का नाही आणला तुला माहिती आहे न मला तोच आवडतो....!

अग तोच आणणार होतो पण नेमका तो आत्ता नव्हता तिथे ह्या वर्षी धकवून घे ना! आयुष तिला म्हणाला.

चल ठीक आहे म्हणून तिने केक कट केला. सिद्धांत ने तिला भरवला पण त्याने विष नाही केलं.आर्याला थोडं नवलच वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं.

चल गिफ्ट कुठे आहे माझं ??? आर्या त्याला म्हणाली.

सॉरी विसरलो, आणि मी आहे तुझ्या आयुष्यात इतका मोठा तुला अजून काय हवं! आयुष म्हणाला.

हे बघ भाषण नको गिफ्ट काढ पटकन.

काय यार दिदु तू थोडाही दम नाही निघत! घे त्याने तिच्या समोर ठेवलं.

आर्यने पटकन ओपन केलं "डायरी".....

सिद्धांत ने चमकून पाहिलं, आणि मनातच म्हणाला कशाला आणली बाबा ती डायरी आधीच एक डायरी कमी होती का भांडायला!

आर्याने पण सिद्धांत कडे पाहिलं त्याने लगेच नजर वळवली.

आवडली ना.....???

हो प्रश्न आहे का. खूप सुंदर अगदी कामाची गोष्ट दिली.

आयुष ला जाण्याची घाई होती, तो सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. आर्या आणि सिद्धांत आपल्या रूम मध्ये आले.

"आर्या ", त्याने आवाज दिला.

काय?

hapyy birthday!!

thanks......

सॉरी म्हणजे, माझं चुकलं मला माहिती नव्हतं की आज तुझा वाढदिवस आहे आणि ह्या वेळेस खरच माझी चूक आहे.

ठीक आहे नाही आठवत तुला ह्यात तुझी काहीही चूक नाही आर्या म्हणाली.

नाही आर्या नसेल आठवत म्हणून काय झालं पण अग मला कळायला हवं होतं किंवा आधी माहिती काढायला हवी होती. सॉरी.... पुन्हा अस नाही होणार. आणि आज तुला गिफ्ट म्हणून काय मागायचं ते माग.

बघ बर विचार कर आर्या त्याला म्हणाली.

अग खरच तू आज जे मागशील ते तुझ्या समोर असेल तू मागून तर बघ आणि हा सिद्धांत जो बोलतो तो करून दाखवतो बर!

अम्मम्म्म नको जाऊ दे नाही देणार तू मी जे मागितलं ते!

तू मागून तर बघ...

ती त्याच्या जवळ आली त्याच्या डोळ्यांमध्ये बघून म्हणाली फक्त आजच्या दिवसासाठी माझा पूर्वीचा सिद्धांत होशिल?? माझा नवरा सिध्दांत जो हरवला आहे .....!!!

तो म्हणाला बस फक्त एकाच दिवसासाठी.... का आज जर तू कायमचा म्हणाली असती तरीही चाललं असत!

नको अस समोरच्या ची ईच्छा नसताना जबरदस्ती नाही करू . तू फक्त एक दिवसाची ईच्छापूर्ण कर मी त्या आठवणीनं वर आयुष्य काढू शकते . मी पुन्हा काहीही नाही मागणार.

तो तिला आणखीन जवळ ओढीत म्हणाला ठीक आहे केली तुझी ईच्छा पूर्ण खुश....

ती मात्र आता त्याच्या डोळ्यांमध्ये स्वतःला शोधता शोधता हरवून गेली.

आज सिद्धांत तिला त्या सगळ्या जागी घेऊन गेला जिथे ते आधी जात होते त्याने डायरी वाचली म्हणून त्याला ते सगळे ठिकाण माहिती होते. शेवटी ते त्या मंदिरा जवळ आले आणि आणि त्याच टेकडी च्या खाली बसले.

आर्या तुला आठवतंय आपण ह्या आधीही इथे आलेलो. सिद्धांत म्हणाला.

हो कसा विसरेन मी तो दिवस. इथेच तर आपल्या दोघांनाही realize झालं होतं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे ते! ऐ पण एक मिनिट तुला कसकाय आठवलं हे?

तुझ्या डायरी मुळे.. तो जीभ चावत म्हणाला.

हा तू वाचली ना पण काय रे अस पर्सनल वाचू नये न!

मला वाचनाची आवड आहे ग!

कधी पासून सिद्धांत मला तर वाटत की तू फक्त माझी डायरिच वाचतो दुसरं काहीही नाही. या आधीही तू अस केलेलं आहे.

हो पण ह्या वेळेस वाचली ते एका दृष्टीने बरच झालं गरच होती.

म्हणजे मला नाही कळलं??? आर्या गोंधळून म्हणाली.

अग कारण तू काही तुझ्या मनाची अवस्था मला सांगितली नसती आणि आपलं साध्याच रिलेशन पाहता आपल्यात संवाद कधी झालाच नसता . मग तुझ्या मनात नेमकं काय चालल हे मला कधीच कळाल नसत. आर्या मला मनातलं कळत पण तू नेहमीच माझ्या सोबत असतेस अस नाही न!

आर्या काहीही बोलली नाही ती फक्त ऐकत होती.

आर्या तूझ एक चांगलं आहे तू निदान लिहून तरी मोकळी होते माझं तस नाही ग मला मुळात व्यक्तच होता येत नाही.

सिद्धांत माहिती आहे रे मला हे! तुला कधीच व्यक्त होता येत नाही.

तुला माहिती आहे का डायरी वाचून मला एक कळाल की तुझ्या आयुष्यात सध्या जी काही अस्थिरता आहे त्याच कारण मीच आहे.

सिद्धांत पण तू ही ह्या गोष्टी मुद्दामून नाही केल्या!

हो पण काही गोष्टी तर माझ्या हातात होत्या जस की मी फक्त आई साठी तुला घरात आणलं. म्हणजे इथे माझं चुकलंच जर मी तुला ह्याची आधीच कल्पना दिली असती तर..... तुझ्या मनाचा मी थोडाही विचार नाही केला, मी फक्त स्वतःचा च विचार करत होतो. खूप स्वार्थी झालो होतो मी तेव्हा आर्या सॉरी माफ करशील मला?

सिद्धांत काय बोलतोय तू? वेडा आहेस का ? मला तेव्हा वाईट वाटलं पण तुझी परिस्थिती मी समजू शकते.आणि नंतर मी समजावलं स्वतःला.

हो पण त्या वेळी त्रास झालाच न ! आणि आपल्या प्रिय व्यक्ती पासून दूर राहण्याच दुःख काय असत हे मला आता कळाल जेव्हा मी तुझ्या पासून 10 दिवस दूर राहिलो न तेव्हा, खूप कठीण असत अग आपल्या माणसापासून दूर राहणं.आर्या तू इतक्या दिवस कस सहन केल ग? मी तर दहा दिवस पण नाही राहु शकलो.

त्या वेळेस तू सुखरूप आहेस हेच खूप होत माझ्या साठी. आणि एक आशा होती की एक दिवस सगळं नीट होईल.

जिंकलीस तू आज! तुला माहिती आहे का, मी सतत तुझ्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत राहिलो मी न स्वीरकण्या मागेही हेच कारण होत की मला जर सवय झाली तर ......, आणि मला तू समोर नसली की करमत नसायचं तू थोडही इकडे तिकडे गेली की माझा जीव टांगणीला लागायचा! म्हणजे तुला थोडही काही झालं तर मी नाही सहन व्हायचं... सुरवातीला वाटलं की इतके दिवस सोबत राहून सवय झाली असेल म्हणून कदाचित. पण अस नव्हतं जेव्हा मी तुझ्या पासून दूर गेलो तेव्हा कळाल की ती फक्त सवय नव्हती ते प्रेम होतं.आणि मला कुठे तरी ते मनाला पटत नव्हतं म्हणून तर मी तू समोर आली तो कधी तरी रागातून व्यक्त व्हायचा मुळात माझी घुसमट होत होती. माझ्या भावना मलाच कळत नव्हत्या. आणि मग उगाचच चिडचड, भांडण. पण आता नाही आता मला कळून चुकलं की मी ही नाही राहू शकत तुझ्या शिवाय!

सिद्धांत are you serious? म्हणजे मी आज माझा विश्वास च नाही बसत आहे की तू हे बोलतोय!

तू आज काहीही नाही बोलायच,मी बोलणार तू फक्त ऐकायचं,अजून तर पुढचं surprise बाकी आहे.
चल घरी जाऊया!

अरे सिद्धांत ऐक तर!

नाही तू चल.

आर्यकडे आज काहीच पर्याय नव्हता. त्याने घरी आल्यावर आर्याला एक छान साडी गिफ्ट केली. हम्मम so आर्या hope तुला आवडली असेल!

खूप सुंदर आहे! मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की ही तू आणलिये! मी बघू घालून लगेच.

अं ह, wait wait इतकी घाई नको तू शार्प 8 वाजता तयार होऊन मला भेट.

आपल्याला कुठे जायचं आहे का?

ते मला नाही माहिती तू फक्त दिलेल्या वेळेत तयार रहा.

ओके बॉस! ती म्हणाली.

सिद्धांत तिला सांगून निघून गेला. आर्यालातर हे सगळं स्वप्नवत च वाटत होतं. पण आजचा सिद्धांत हा वेगळाच होता हे नक्की! पण पुन्हा तिला लक्षात घेऊन आल हे फक्त एका दिवसासाठीच आहे उद्या पासून पुन्हा जर तो पूर्वीसारखाच वागला तर? नको उद्याचा विचारच करायला नको आता फक्त आजचा क्षण जगून घ्यायचा आणि मनाच्या पेटीत साठवून ठेवायचा अस तिने मनाशीच ठरवलं आणि तिने तयार व्हायला सुरुवात केली.

ब्लू कलर ची ती साडी त्यावर ब्लॅक कलर ची नक्षीदार बॉर्डर तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होती, तिने त्यावर घातलेलं Knotted Blouse त्याने तर तिला एक वेगळाच लुक आला होता. त्यात तिने साडीवर मॅचिंग घातलेले Feather Earrings, one side घेतलेले मोकळे केस आणि तिचा तो बटरफ्लाय चा टॅटू हे सगळं पाहून तर कुणीही तिच्या रूपाच्या प्रेमातच पडलं असत. तशी तिला मेकअप ची आवड आणि आवश्यकता दोन्हीही नव्हती तरीही तिने हलकासा मेकअप केला. आणि ती आपल्या high hill sandels घातल्या. इतक्यात तिथे सिद्धांत आला,
"आर्या", त्याने आर्या कडे पाहिलं आणि त्याची बोलतीच बंद झाली. आर्याने त्याच्या हृदयाचा ठाव तर केव्हाच घेतला होता. आज त्याचा ही लुक black shirt, rolled up sleeves with trim beard आणि चेहऱ्यावर नेहमीचाच attitude पाहून ती ही काही क्षण त्याच्या कडे बघतच राहिली. सिद्धांत तिच्या जवळ आला त्याने फक्त हात समोर केला तिने त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्या मागे काहीही न बोलता चालू लागली. तिला तो टेरेस वर घेऊन आला.
चंद्राचा मंद प्रकाश, लुकलुकणाऱ्या चांदण्या, सगळीकडे लावलेल्या candles, बॅकग्राऊंग ला चालू असलेलं silent music आणि candles and flowers नी decorat केलेला टेबल त्यावर ठेवलेल्या प्लेट्स अँड हॉट ड्रिंक हे सगळं बघून आर्याला तर विश्वास च बसत नव्हता की हे वास्तवात घडतंय. सिद्धांत हे सगळं तू केलय आणि ते ही माझ्या साठी my god......! i can't believe!

समोर जायचं की सगळं इथूनच बघणार आहेस !

ती समोर जाणार तितक्यात तिचा पाय साडी मध्ये अडकला आणि तीचा तोल गेला तीच एक हात सिद्धांत च्या हातात असल्यामुळे त्याने लगेच सावरलं careful damit ! तो म्हणाला. ती त्याचा अत्यंत जवळ होती इतकी की तिच्या हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते. ती ह्या वेळेस त्याच्या डोळ्यांमध्ये हरवून गेली होती. त्याचा हाताचा तो उबदार स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला. त्यालाही ह्या वेळेस तिला अजिबात दूर करावंसं नाही वाटलं. बाहेरच्या हवेने तिचे केस उगाचच उडू लागले त्यातले काही चेहऱ्यावर आले त्याने आपल्या हाताने बाजूला केले आणि चंद्राच्या प्रकाशात तो तीच सौंदर्य न्याहाळू लागला. काही वेळ तसाच गेला आणि दोघेही भानावर आले. सिद्धांत तिला टेबल जवळ घेऊन आला.

ब्लॅक फॉरेस्ट केक! ती जवळ जवळ ओरडलीच! तू आणला

नाही, मी बनवला!तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून त्याला समाधान वाटलं.

मला वाटलं होतं की आधी तुला कुठे तरी रेस्टॉरंट मध्ये घेऊन जावं मग माझ्या लक्षात आलं की आर्याला तर सगळ्यात जास्त माझ्याच हातच आवडत.मग मीच बनवलं.

thank you सिद्धांत! this is amazing! and seriously तुझ्या हातची चव कशालाच नाही.

let's cut the cake ..! तो म्हणाला.

sure !

तिने केक कट केला आणि त्याने भरवला ! तिने त्याला ही भरवला आणि तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले.

ती बाजूला झाली केक फार टेस्टी होता ती उगाचच काहीतरी म्हणायच म्हणून म्हणाली.

no ,what i test now it is sweeter than cake!

त्याच्या ह्या बोलण्यावर ती चक्क लाजली.

सिद्धांत ने डिनर सर्व्ह केला, आर्याने तर सगळं आवडीने खाल्लं. सिद्धांत तू खरच amazing आहेस यार!! मला कधी जमेल हे सगळं.

मी आहे ना तुला काय आवश्यकता तो म्हणाला.

हमम ते ही आहेच, पण कस जमत यार एक आयआयटीयन असून.

आवड महत्त्वाची . तो म्हणाला.

आर्या एक विचारू ? म्हणजे बघ हा रागावणार नसेल तर.

आज तू एक नाही हजार प्रश्न विचार ती म्हणाली.

काल तू नायक पहिला का नाही तुझ्या डोक्यात एका दिवसाचा नवरा ही संकल्पना आली म्हणून विचारल. आणि तो मिश्कील हसला.

"सिद्धांत" काहीही काय रे! तिला ही त्याच्या ह्या प्रश्नावर हसायला आलं.

मला न आर्या खरच तुझं काही कळत नाही ह म्हणजे माणसाने जे मनात असेल ते बोलून टाकावं प्रत्येक वेळेस मला डायरी मिळेलच अस नाही न तो थोडा गंभीर होत म्हणाला.

मनातलं बोलण्याविषयी तू बोलतोय? ती म्हणाली.

हो कारण आज मी बोलणार मनातलं सगळं !

तो तिच्या जवळ आला तिचा हात हातात घेतला तिची heart beats वाढायला लागले कारण सिद्धांत पुढे काय बोलेल हे तिला ठाऊक नव्हतं.

आर्या मी स्वतःला च ओळखलं नाही ग म्हणजे मला तू सुरवाती पासूनच आवडायची पण मी सतत तुला टाळत होतो सतत तुझ्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि मी तितकाच तुझ्या जवळ येत गेलो. लोक चुकीचं म्हणतात की खर प्रेम एकदाच होत! अस नाही आहे आर्या उलट माझं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीवर प्रेम होतं. माझंच बघ ना मी पुन्हा तुझ्याच प्रेमात पडाव. कारण माझं पाहिलेही तुझ्यावरच प्रेम होतं आणि आजही तुझ्यावरच आहे. मला काहीही आठवत नसलं तरीही तू जवळ असली की आपल काहीतरी स्पेशल रिलेशन आहे असा फील येत होता पण नेमकं काय हे कळायला बरेच दिवस लागले. आणि आता मला कळलंय की मी नाही राहू शकत तुझ्याविणा . "i love you Aarya" and I don't want you lose you! and sorry for all my mistakes, i know that मी खूप हर्ट केलंय तुला पण आता नाही आज पासून एक नवीन सुरवात करूया, इतक्या दिवस तुझा एकटीचाच प्रवास चालू होता, now I want to join with you!!! should I????

तिने मानेनेच हो म्हंटल तिलाकाय बोलाव काहीही कळत नव्हतं तिच्या डोळ्यांतून फक्त अश्रू गळत होते तेच त्याच्या हातांवर पडले त्याने हळूच तिचे डोळे पुसले.

सिद्धांत this was the best gift ever ! आज मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात अमूल्य गोष्ट परत मिळाली. आज कित्येक दिवसांची प्रतीक्षा संपली.

त्याने तिच्या हातांवर किस केलं आणि ते दोघही तिथून उठले. तो तिला रूम मध्ये घेऊन आला ती ही खूप छान डेकोरेट केलेली होती. डीम लाईट्स, म्युझिक, फ्लाव्हर्स एकंदरीतच खुप रोमँटिक वातावरण होत.
तो तिच्या जवळ येऊन तिच्या कानात म्हणाला, आवडलं?
खूप! पण तू हे सगळं कधी केलं ?

that doesn't matter! अस म्हणून त्याने तिला आणखीन जवळ ओढलं. तीही त्याच्या जवळ जाऊन सुखावली. त्याने हळूच लाईट्स ऑफ केले.

आज कितीतरी दिवसांनी सकाळ तिला प्रसन्न वाटत होती. तिला उठण्याची अजिबात ईच्छा च होत नव्हती. तरीही सिद्धांतचा हात बाजूला करत ती उठली आणि तिच्या हालचालीमुळे त्यालाही जाग आली आर्याच्या चेहऱ्यावर च हास्य पाहून त्यालाही बर वाटल आणि गेले कित्येक दिवसांच मळभ दूर झाल्यासारखं वाटलं. तो तिच्याच कडे बघत होता.

अरे असा काय बघतोय उठ आज ऑफिस ला नाही जायचं का?

तू म्हणशील तर सुट्टी घेऊ ! तो म्हणाला.

चल, काहीही आपलं!

हो आर्या खरच मला काय वाटतय आता न आपल्याला vacation वर जाण्याची गरज आहे don't you think so?

not a bad idea! पण त्यासाठी आधी ऑफिस ला जावं लागेल. उठ पटकन.

तू ना खरच मूड किलर आहेस ! पण मी बघ हा serious आहे. आज दोघांच्याही सुट्ट्या approve करून घेता की नाही बघ. आर्याने त्याला फक्त हसून हो म्हंटल.

संध्याकाळी तो आर्याला म्हणाला आर्या मेल चेक केला.

"नाही रे" बघते काही urgent होत का?

हो महत्त्वाचच आहे तू चेक कर आधी.
तिने लगेचच पाहिलं.
"काय"????

सिद्धांत काय आहे हे ?

तुला म्हंटल होत ना मी खूप serious आहे.

अरे पण लगेच का?

एकदा डेट बघ नेक्स्ट मंथ ची आहे.

हो रे ते दिसतंय मला, पण.......

पण बिन सोड तुला डेस्टिनेशन कस वाटलं सांग?

बाली !! मस्तच ! आवडलं.

चल मग कर तयारी सुरू! तो तिला म्हणाला.

दोघांही खूप excited होते खूप दिवसांच्या विरहनांतर आता त्यांच नात अधिकच घट्ट झालं होतं. पण तरीही त्यांचं भांडण रुसवे फुगवे, चालूच असायचे त्यातूनच त्यांच प्रेम अधिकच बहरत होत.

------------------समाप्त---------------------

© Neha R Dhole