Satynarayan Pooja books and stories free download online pdf in Marathi

सत्यनारायण पूजा

सत्यनारायण पूजा

हिदू धर्मात या पूजेला खुप महत्व आहे .
नवीन घर नवीन दुकान नवीन जागा या सर्व गोष्टीच्या सुरवातीला ही पूजा केली जाते .
शिवाय काही घरात दरवर्षी प्रथेप्रमाणे श्रावणात अथवा भाद्रपदात ही पूजा केली जाते.
सार्वजनिक गणपती पुढे एक दिवस ही पूजा केली जाते .
लग्नानंतर सत्यनारायण पूजा तसेच गोंधळ घातला जातो .
काही घरात ही पूजा दुपारी केले जाते अथवा काही घरात सूर्यास्ताला केल जाते .

या व्रतात सत्यनारायण हे मुख्य दैवत असून सूर्यादी नवग्रह देवता गणपती, गौरी,वरूण, अष्टदिक्पाल ,लोकपाल इ.परिवार देवता आहेत.

म्हणून या पूजेत मध्यभागी तांदूळाच्या किंवा गव्हांच्या राशीवर उदकयुक्त कलश ठेवून त्यात दुर्वा,पंचपल्लव,सुपारी,सोन्याचे नाणे इ. घालतात व त्याच्यावर पूर्णपात्र ठेवतात.
यासाठी खालील साहित्य आवश्यक असते .

देठासह विड्याची पाने ,सुपाऱ्या ,नारळ ,आंब्याचे डहाळे ,चौरंग

पाट , ताम्हण, तांब्या पळी पंचपात्र , जानवी, घंटा , समई , आरत्या/निरांजने , पाच प्रकारची पाच फळे

तांदूळ, बंदे रुपये ,हळद, कुंकू, गुलाल, पिंजर, अबीर, बुक्का, रांगोळी

.पंचामृत = दुध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून एका वाटीत

नैवेद्यासाठी सुक्या खोबऱ्याच्या वाटीच्या छोटे तुकडे आणि गुळ

अत्तर, उदबत्ती, कपूर, धूप, वाती/फुलवाती, कापसाची वस्त्रे..नानाप्रकारची फुले. त्यात काही लाल रंगाची असावी.

.दुर्वा कमीत कमी ३० व बेल व तुळशी १००० पाने

(दुर्वा ३ पानी किंवा ५ पानी असाव्या.)

रक्तचंदन किंवा चंदन

केळीचे किंवा कर्दळीचे खांब

बाळकृष्णाची किंवा श्रीविष्णूची मूर्ती.

फुलवाती तेलात भिजवून घातलेली निरांजने

पूर्णपात्रात सत्यनारायणाची प्रतिमा किंवा शालिग्रामशिलावा बाळकृष्णाची मूर्ती किंवा नारळ ठेवतात.नंतर सत्यनारायणाची षोडषोपचारे पूजा करतात.सव्वा शेर गव्हाचा किंवा तांदूलाचा रवा तेवढेच तूप ,केळी,दूध,साखर किंवा गूळ घालून शिरा करतात.आणि त्याचा नैवेद्य दाखवितात.

पूजा झाल्यावर व्रतकर्ता कथा श्रवण करतो. त्यानंतर पोथीची पूजा व कथावाचकाची पूजा करून दक्षिणादान देवून पूजा समाप्त करतात.


श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे.
काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण,पूजनकरणे,तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हा सत्यनारायण पूजेचा हेतू असतो.
मनाला उभारी,प्रसन्नता वाटेल,श्रद्धा निर्माण होईल,पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा जागृत होईल असे सत्यनारायण पूजेचे स्वरूप असते
याची कथा मनोभावे ऐकली जाते .
फार वर्षापूर्वीची गोष्ट...
एक साधु नावाचा वाणी होता .
त्याला संतान नव्हते.
त्याला मनोवांच्छीत फळ देणाऱ्या सत्यनारायण व्रताची माहिती मिळाली.
संतान प्राप्तीसाठी त्याने सत्यनारायणाला नवस केला.
यथाकाल मुलगी झाली त्यावेळेस लगेच नवस न फेडता मुलीच्या लग्नात पूजा करू म्हणून तो चाल ढकल करीत राहिला आणि विसरूनच गेला.
काही वर्षांनी मुलीच लग्न झाल.
पण त्याने त्यवेळी सुद्धा नवस फेडीची ही पूजा केली नाही .
काही दिवसानी जावयाला बरोबर घेउन तो व्यापारासाठी परदेशात गेला.
नवस न फेडल्याने सत्यनारायण कोपला.
त्याने साधु वाण्याला 'त्रासात पडशील' असा शाप दिला.
शापाच्या प्रभावाने साधु वाणी जावयासह कैदेत जाउन पडला.
इकडे गावी चोरानी घर साफ केले. साधु वाण्याच्या बायको व मुलीवर भीक मागून दिवस काढण्याची पाळी आली.
एके दिवशी साधु वाण्याची मुलगी भीक मागायला गेली असता तिला एके ठिकाणी सत्यनारायणाची पूजा चाललेली पहायला मिळाली. तिने तेथे थांबून सर्व माहिती घेतली.
ते मनोवांच्छित फळ देणारे 'सत्यानारायण व्रत' असल्याचे तिला समजले.
तिने घरी येवून आईला सांगितले. दोघींनी दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली.
नवरा व जावई सुखरूप परत येऊ दे म्हणून साधु वाण्याच्या बायकोने देवाकडे प्रार्थना केली.
सत्यनारायण संतुष्ट झाला.
त्याने साधु वाण्याला व त्याच्या जावयाला शापमुक्त केले.
राजाच्या स्वप्नात जावून राजाला बंदिवासातील साधु वाणी व त्याच्या जावयाला बंधमुक्त करायला सांगितले. त्याप्रमाणे राजाने साधु वाणी व त्याच्या जावयाला बंधमुक्त करून, यथोचित पाहुणचार करून, दुप्पट द्रव्य देऊन आपल्या घरी जायला सांगितले.

शरण आलेल्या साधु वाण्याला अभय देवून 'तू माझे पूजन करण्याचे टाळीत असल्यामुळे त्रासात पडलास' असे सत्यनारायणाने सांगितले.
नंतर साधु वाण्याला इच्छित वर देवून भगवान अदृश्य झाले.
तेव्हा साधु वाण्याला त्याची नौका धनसंपत्तीने भरलेली दिसली.
खुष होवून सत्यनारायणाची पूजा करून जावयासह साधु वाणी घरी येण्यास निघाला.
सत्यनारायणाच्या पूजेला बसलेल्या साधु वाण्याच्या बायकोला नवरा येत असल्याचे समजताच मुलीला पूजा पूर्ण करण्यास सागून ती पतीभेटीला निघून गेली.
पाठोपाठ मुलगी कलावती कशीबशी पूजा आटपून प्रसाद खाल्ल्याशिवाय नवर्याला बघण्यासाठी धावली.

तेव्हा साधुवाणी किनार्यावर आलेला होता .
पूजा अर्धवट टाकून व प्रसाद खाल्ल्याशिवाय दोघी गेल्या म्हणून सत्यनारायण कोपला.
त्याने कलावतीच्या पतीसह नौका बुडविली.
आपला नवरा मेला समजून कलावती सती जायला निघाली. आकाशवाणीवरून सत्यनारायणाने कलावतीला प्रसाद भक्षण करून यायला सांगितले.
त्याप्रमाणे प्रसाद खाऊन येताच कलावतीचा नवरा व होडी पाण्यावर आली.

त्यानंतर साधुवाण्याच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला ह्या व्रताचे पूजन होऊ लागले.

हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते.
हे व्रत दु:ख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतति देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे आहे.
हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून करतात .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED