सचिनचे बाबा Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सचिनचे बाबा

कथा-

सचिनचे बाबा

----------------------------

रात्रीचे अकरा वाजले रोजच्या नियमाप्रमाणे शोभनाताईंच्या मुलाचा फोन येणार ..

पण आज साडे -अकरा वाजले तरी सचिनचा फोन

नाही , तो कामात असेल म्हणून बोलत नसेल तर स्नेहाने तरी फोन करायचा न ",

त्या स्वतःची समजूत घालीत बसल्या .

पण त्याचा फोनची वाट पाहून ही फोन काही येईना .. असे तर नाही ना की -

आता या पुढे आई-बाबांनी-विशेषता: बाबांनी ,यापुढे आपल्याकडे येउच नये ,

त्यांना न बोलावणे हेच बरे असे तर सचिन -स्नेहाने ठरवले नाही ना ?

या कल्पनेने शोभनाताईंच्या मनात धस्स झाले .

याला कारण सचिनचे बाबा आणि त्यांचे सगळ्या सोबतचे वागणे आणि बोलणे होते .

त्यामुळे मुलगा सचिन ,सुनबाई -स्नेहा खूप दुखावले गेले आहेत ",ही गोष्ट

शोभनाताईंना जाणवली होती आणि त्याचाच त्यांच्या मनाला जास्त त्रास होत होता .

सचिनचे बाबा रिटायर झाले त्यानंतर ..ज्या ज्या वेळी ते सचिनकडे राहायला आले ,

दरवेळी त्यांच्या तर्हेवाईक वागण्याचा सर्वांना खूपच त्रास होतो आहे हे जाणवत गेले .

ऑफिस मध्ये त्यांची हुकुमशाही होती ,त्यांचा दरारा ,धाक ते मोठे -,साहेब असल्यामुळे

आणि अधिकाराच्या -खुर्चीत असल्यामुळे लोकांनी सहन केली असेल कदाचित ,

पण आता रिटायर झाल्यावर त्यांनी बदलयला हवे होते ..ते अजिबात घडले नाही .

त्यांच्यातला साहेब आणि त्यांची साहेबी-खुर्ची "याचा त्यांच्या मनाला काही केल्या विसर पडत नव्हता .

आपण आता फक्त एक सामन्य पेन्शनर आहोत ", हे वास्तव ते स्वीकारण्यास ते तयार नव्हते .

चोवीस तास ते स्वतहाच्या साहेबी -विश्वात असत ,आपल्या बोलण्याने समोर आलेल्या व्यक्तींचा पाणउतारा करणे ,

स्वतःचेच खरे करणे ,आणि मोठमोठ्या आवाजात

बोलून घर डोक्यावर घेणे " स्वतःचे अस्तित्व जाणवून देनायचा हा त्यांचा आवडता कार्यक्रम सुरु असे.

त्यांच्या या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास शोभनाताईंना होऊ लागला .

त्यांच्यात संवाद होतच नसत , बायकोचे काही ऐकणे ,तिला मान-सन्मान द्यायचा असतो " हे त्यांना मंजूर नव्हते .

बायको म्हणजे आपल्या हाताखालाची एक अतिशय सामान्य व्यक्ती

इतकीच किंमत शोभनाताईंना ते देत होते . गावाकडे घरातल्या घरात हे लोकांच्या समोर येत नसायचे .

आणि गावातील लोकांना सचिनचे -बाबा कसे आहेत

याची पूर्ण कल्पना होती . आणि

त्यांच्या दृष्टीने आता सचिनचे बाबा म्हणजे “खुर्ची -सोडलेला माणूस " या पुढे अशा माणसांची किंमत शून्य असते “.

शोभनाताई सगळी काम आटोपून ,आराम करीत पडल्यात , टीव्ही पहात आराम करतांना दिसल्या की ..

यांचे डोके फिरलेच समजा .काही न काही खुसपट काढून

बायकोला सुनावणे सुरु व्हायचे . त्यात मुद्दाम अशावेळी flatचा दरवाजा "हवा आली पाहिजे "म्हणून ते उघडा ठेवीत

आणि मग मोठ्या आवाजात शोभनाताईंशी जुने काही कारण शोधून

वाद घालीत बसत ,सुरुवातीला असे आवाज ऐकून शेजारचे धावत येत,काय झाले ? म्हणत,

पण, नंतर सगळ्यांना माहिती झाले ..सचिनच बाबा ..असेच बोलतात त्याच्या आईशी.

इतक्यावर हे थांबले असते तर ठीक, जसे जसे जसे दिवस जाऊ लागले ..

घरात कामासाठी येणाऱ्या बाईंना ,सोसायटीच्या लोकांना –“ते त्यांच्या हाताखाली काम

करणारे नोकरच आहेत अशा शब्दात बिनधास्त बोलू लागले " .

सोसायटी - ऑफिस मध्ये जाऊन तिथे सगळ्यांशी वाद घालणे ,तुम्ही सगळे कसे अगदी बिनकामाचे ,

लोक आहात ,मी तुमचा साहेब असतो तर ..माझा झटका दिला असता .." असे बोलायचे.

शोभनाताईना सोसायटीच्या ऑफिसमधून फोन यायचा ,

मग त्या खाली येऊन सचिनच्या बाबांना परत घेऊन जायच्या .

दुपारच्या जेवणात काही कमी जास्त झाले तर ..हॉल मध्ये बसल्या बसल्या .जेवणाचे ताट -बाहेर प्यासेज मध्ये भिरकावून द्याचे ..

"शोभनाताई मुकाट्याने मग सगळा

प्यासेज स्वच्छ करीत . त्यावेळी सचिनचे बाबा खुर्चीत बसून ..हातातला पेपर डोळ्यासमोर धरून .बाहेर पहायचे की

बायको नीट-साफ सफाई करते की नाही .

शोभनाताई हे सगळ सहन करीत ,संध्याकाळी घरी आल्यावर .सचिन आणि स्नेहाला त्या दिवसभरातील काही सांगत नसत ..

उगीच घरातील वातावरण बिघडायला नको .

बाप-लेकांचे वाद झाले तर अजून वातावरण बिघडून जाईल.

पण.फ्लोअरवरील शेजारी आणि सोसायटी मधील लोकांनी ..सचिन आणि स्नेहाला ..

त्याच्या आईशी त्याचे बाबा किती विचित्र वागत असतात –बोलत असतात याची कल्पना देत म्हटले .

सचिन हे काही चालत ते बरोबर नाही, रोज काय तमाशा करतात तुझे बाबा .

आम्ही तर पार वैतागून गेलोत .

तुझ्या आईंची कमाल आहे ,इतक सहन कशा करतात .आणि का करतात ?

शोभनाताई आठवणीतून बाहेर आल्या रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते..सचिनचा फोन नाही ..मेसेज नाही .

.काय झाले असेल ? मग रात्रभर त्यांना झोपच आली नाही.

भल्यापहाटे ..रिंग वाजली त्या दचकून जाग्या झाल्या ..त्यांनी फोन कानाला लावला .

पलीकडून सचिनचा आवाज कानावर आला तसे त्यांना बरे वाटले .

त्यांनी बाजूला गाढ झोपेत असलेल्या सचिनच्या बाबाकडे पाहिले , त्या उठून बाहेर येऊन बोलू लागल्या *

"सचिन म्हणत होता -आई ,तू आणि बाबांनी याव असे तर आम्हाला खूप वाटत असते ,

पण बाबांचे चमत्कारिक वागणे ,त्याचा त्रासदायक बोलणे ,हे कुणालाच आवडत नाही .

तुझ्याशी कसे वागतात पाहून आम्हाला त्यांचा राग येतो .तू हे सगळे का सहन करीत असते . नको न असे वागू तू. जरा बोलायचे शिक .

मला भीती वाटते की - लोकांनी त्यांना " वेडा माणूस ठरवू नये " ,इतके वेड्यासारखं वागतात ते दरवेळी .

आई, मला तर वाटते .काही दिवस त्यांना आपण एखाद्या वृद्धाश्रमात ठेवू या ,

म्हणजे तिथल्या लोकांचे पाहून, बाबांना घरची आणि मुख्य म्हणजे तुझी किंमत कळेल .

तू ऐक माझे , आपण हे करून पाहू या ..तुझी साथ हवी अशा नेमक्या वेळी .

काळजी करू नको ..मी या महिना अखेर सुट्टी घेऊन तुला आणि बाबंना घेण्यास येतोय गाडी घेऊन .

शोभनाताईंनी भिंतीवरील कॅलेंडर हातात घेऊन पाहिले .सचिनला येण्यास अजून २०-२५ दिवस ..म्हणजे तब्बल तीन आठवडे होते .

आपण पुन्हा एकदा सचिनच्या घरी राहायला जाणार आहोत , पण, तिथे गेल्यावर

सचिनच्या बाबंना त्यांच्या मुलाने ठरवलेले ऐकून काय वाटेल ?, ते किती आणि कसा गोंधळ घालतील ?

सगळ्या सोसायटी मध्ये पुन्हा त्यांनी केलेला गोंधळ सगळ्यांना पहायला मिळेल . बाप-लेकातील

भांडण आणि वाद घरभर घुमू लागेल .

हे सर्व प्रश्न शोभना ताईंना .भेडसावीत होते .

अशा विचारातच त्यांना झोप लागली ,आणि लगेच दिवस उजाडल्याची चाहूल लागण्यास सुरुवात

झाली , सकाळ झालेली पाहून त्या उठल्या , सकाळची कामे सवयीने उरकून टाकीत ,

त्या खोलीत आल्या ,सचिनचे बाबा अजून झोपले होते .

हे पाहून त्या किचनमध्ये आल्या.चहासाठी सचिनच्या बाबंना आवाज देण्यासाठी

त्या बेडरूम मध्ये आल्या , ते आत नव्हते , बाहेर पेपर वाचीत बसले "हे पाहून शोभनाताईना नवल वाटले .

चहाला उशीर झालाय तरी यांनी मोठ्याने आवाज दिला नाही , काय झाल ?

काही तरी चुकल्या सारखे वाटू लागले . त्या चहा घेऊन बाहेर आल्या , आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या नवर्याने .एक शब्द न बोलता चहा घेऊन संपवला .

हातातला पेपर टेबलवर ठेवून देत ते अंगणात गेले .

.झाडांना पाणी देऊ लागले ..शोभनाताईंना हे खरेच वाटेना . हे काय आक्रीत घडते आहे सकाळपासून.

मी जरा बाहेर जाऊन येतो .. हे वाक्य आपला नवराच बोलतोय ? , बाहेरून आलेल्या बाबांच्या हातात ..भाज्यांची पिशवी , हे सगळ काय घडते आहे ?

आपल्या नवर्यात एकाएकी चमत्कारिक बदल ? या माणसात असा बदल घडणे अशक्य आहे .

दो-चार दिवस झाले तरी .सचिनच्या बाबांच्या वागण्यात नव्याने झालेला बदल अजून टिकून होता ..पश्चताप वगरे तर नाही न झाला या माणसाला ?

नव्याचे नऊ दिवस " म्हणयचे .मग पुन्हा आहेच पहिले पाढे पंच्चावन्न "..

पण तसे काही झाले नाही .. आक्रस्ताळी माणूस एकदम नरम कसा काय झाला ?..शोभनाताईंना नवल वाटत होते .

सचिन नक्कीच सुखावेल हा बदल पाहून .

तीन आठवड्या नंतर ठरल्या प्रमाणे ..सचिन..आला ..

घरात आल्यावर त्याला जाणवले आपल्या घरात एक वेगळीच शांतता वाटते आहे ..

एरव्ही त्याच्यात आणि बाबा मध्ये बोलणे माफक असायचे . आई मात्र खूप

टेन्शन फ्री दिसत होती . आवाजात मोकळेपणा जाणवत होता.

तो म्हणाला -

आई, काय ठरवलंय तू ? मी ठरवलंय तसे करायचे आहे एक प्रयोग म्हणून .तू तुझा विचार बदलू नकोस

आणि बाबांना तर मुळीच घाबरू नको , किती आरडा ओरडा करू दे,

या वेळी मी हा प्रयोग करणार म्हणजे करणार , त्यांना काही दिवस आपल्या माणसातून राहू दे दूर ,

जमिनीवर पाय लागले ना की येतील ताळ्यावर .

मला त्यांच्याशी असे वागण्यात आनंद नाहीये , पण मुद्दाम वागणाऱ्या बाबांना आपण जाणीव करून दिली पाहिजे

तू खंबीर राहा .सगळ ठीक होईल. यांचा वेडेपणा कमी होण्यासाठी हा उपाय करू या.

सचिनचा हात हातात घेत- त्या म्हणाल्या – सचिन बेटा – मागच्या वेळी तू फोन करतांना नेहमीप्रमाणे स्पीकरवर होता , तुझे हळू आवाजातले बोलणे मला ऐकू येत नाही ,

त्यादिवशी तू वृद्धाश्रमाची कल्पना बोलून दाखवली , मी पण काही न बोलता .एक प्रकारे

मूक संमतीच दिली तुला त्या दिवशी.

आपला कॉल चालू असतांना , तुझे बाबा झोपले आहेत हे पाहून ,आपण मोकळे पणाने बोलत होतो . पण ,

सचिन मला दाट शंकाच नाही तर ,पक्की खात्री आहे की.. त्या दिवशी रात्री तुझ्या बाबांनी आपले सगळे बोलणे ऐकले आहे,

ते काहीच बोलले नाहीत ,एरव्ही उठून माझ्याशी भांडले असते , घर डोक्यावर घेतले असते .

पण, आपण जागे आहोत “, हे त्यांनी अजिबात जाणवू दिले नाही .

आणि दुसरे दिवसा पासून त्यांच्या वागण्यात ,बोलण्यात कमालीचा फरक पडलाय ,असे जाणवले ,

आणि मग शोभनाताईंनी सचिनला त्याच्या बाबांच्या वागण्यातला फरक डिटेल मध्ये सांगितला

मग त्या सचिनला म्हणाल्या ..

तू ठरवले तसे करण्याची काही गरज नाही आता .

त्यांना वृद्धाश्रमची गरजच नाही ,उलट त्यांना त्यांचे घरच त्यांना हवेहवेसे वाटते आहे .

कारण आतां तुझ्या बाबांना एक नवे वेड लागलय -

.” पण वेगळ वेड आहे हे .वाईट माणूस न राहता त्यांना चांगला माणूस होण्याचे वेड,

लागलय .या वेडेपणाचे झटके सुरु झालेत .गेल्या काही दिवसापासून मी हे पाहते आहे

आईच्या या बोलण्याने सचिनला आनंद झाला तो म्हणाला ,

आई , आपण पण यापुढे त्यांना त्यांच्या जुन्या वागण्याची अजिबात आठवण करून द्यायची नाही .

त्यांच्या नव्या स्वरूपाचे आपण सगळे मिळून आनंदाने स्वागत करू या .

स्नेहाला सुद्धा नव्या रूपातील बाबांचे घरात असणे खूप आवडणारे असेल.

माझ्या बाबांचे - हे असे वेडेपण " आपण आनंदाने सहन करू या.

मग सगळेजण नक्कीच म्हणतील – यार , बडे अच्छे है ..सचिनचे –बाबा .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा –

सचिनचे बाबा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

मो-९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------