The Infinite Loop of Love - 1 Shubham S Rokade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

The Infinite Loop of Love - 1

I love you .... प्रीती

रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली .
" मी काय म्हणतेय ....
रवीने मोबाईल काढला . त्याच्या मित्राचा मेसेज होता .
' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला.
" I love you too ....
" मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...
तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then "
" मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला . त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा हा तिसरा वाद होता . तो तिच्यावरती प्रेम करायचा . अगदी मनापासून . दोघांनीही त्यांच्या पुढच्या आयुष्याची स्वप्ने रंगवली होती . लग्न , मूले , घर संसार . पण अजून त्याला थोडा कालावधी होता . प्रीतीने अचानकच का विषय काढला हे त्याला समजत नव्हतं . अजून वर्ष होतं डीग्री कम्प्लीट व्हायला . डिग्री झाल्यावरती लग्नाचं नक्कीच होतं....

" डिग्री झाल्यावरतीही करायचंच आहे , आणि आताही करायचंच आहे ......" प्रीती अजून जोराने ओरडत म्हणाली , " तू करणार आहेस की नाही....? त्यावेळीच शेजारच्या रूम मध्ये होम थियटरवरती जुनं ' क्या हुवा तेरा वादा ' गाणं लागलं होतं ...

" Shit यार ..... प्रीती तिसऱ्यांदा वाद घालतेय तू या विषयावरती...... " रवि चिढून म्हणाला . त्याच वेळी स्टडी रूम मधील खिडकी वाऱ्याने जोरात आदळली . रवीने स्टडी रूम मध्ये जात खिडकी लावली . त्याच्यापाठोपाठ प्रीतीही रूममध्ये आली

" मी वाद घालतेय , मी......? " प्रीती कपाटातल्या वह्या खोलीत इकडे तिकडे फेकत म्हणाली .

" प्रीती माझी प्रोजेक्ट बुक आहे तिथं , ते फेकू नकोस..... " रवी अधिकच ओरडत म्हणाला . त्याच वेळी रवीचा फोन वाजला त्याच्या प्रोजेक्ट गाइडीचा फोन होता . एक मिनिट थांबा जरा सरांचा फोन आहे...

" प्रोजेक्ट बुक महत्त्वाचं आहे , तुझं फोनवरती बोलणं महत्वाचं आहे आणि मी बोलते ते नाही .... " प्रीतीने ते प्रोजेक्ट बुक घेत फाडून टाकले . रवीने फोन बाजूला ठेवत रागाच्या भरात तिच्या गालावर चापट मारली....

" काय लावलय लग्न लग्न आं .... करायचं तर आहेच ना... मी काही कुठे पळून चाललोय का .... " तो रागारागात बोलून गेला . तो फोन उचलला गेला पण तो पर्यंत फोन बंद झाला होता . प्रीतीच्या डोळ्यात खळकन पाणी आले . ती रडू लागली . डोळ्यातून टपकणाऱ्या आसवांमुळे समोरचे सारे काही धुसर झालं होतं . ती खाली बसून ओक्साबोक्शी रडत होती . रवीला आता अधिकच वाईट वाटू लागलं . तेव्हाच दारावर ती थाप पडली . दोघांनी पिझ्झा मागवला होता . पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा देऊन गेला. तो तिला मिठीत घेऊन शांत करू लागला .

" का ...? का..... ? तू सारखा सारखा लग्नाचा विषय काढतेस , सांग बर मला..... " तो शांतपणे तिला म्हणाला .

प्रीती रडत रडत हुंदके देत म्हणाली ...
" कारण मी pregnant आहे रवि , मी pregnant आहे ...

" काय ....? कसं शक्य आहे हे .....? " रवी आश्चर्य करीत म्हणाला....

" मला वाटलंच होतं तू अशी रिएक्शन देशील म्हणून ......" ती रडत रडत त्याला मारत बोलू लागली...... " मला माहित होतं , मला माहित होतं ......"
ती त्याला बराच वेळ मारत राहिली . रवी काही न समजून तसाच बसून राहिला .

" मी घरी चाललेय . मला कोणा पुरुषाची गरज नाही . मी माझी माझी काळजी घेऊ शकते ....." तिने तिची बॅग भरायला सुरुवात केली .

" प्रीती ऐक ना , माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता . गडबडीत तसं बोलून गेलो..... आपण पिझ्झा खात शांतपणे बोलू ना...."

" कसा नव्हता , हां , कसा नव्हता अर्थ , करताना मज्जा येते . जबाबदारी घ्यायची वेळ आली की कसं शक्य आहे .....? मला काय माहित कसं झालं ते . आपण प्रिकॉशन तर घ्यायचो ना ... झालं ते झालं... मी जबाबदारी स्वीकारली आहे . मला कोणाच्या आधाराची गरज नाही.....

" पण प्रीती आपल्याकडे अजूनही ऑप्शन्स आहेत की......

" ऑप्शन्स म्हणजे..... सरळ सरळ अबॉर्शन का म्हणत नाहीस . मला एक मिनिट थांबायचं नाही इथे . प्रीती रागाने निघून गेली . रवीने हरप्रकारे तिला थांबवण्याचा प्रयत्न केला . पण शेवटी ती निघून गेली .

जेव्हा कॉलेज लाइफला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचं प्रेम होतं . डिग्रीलाही दोघांनी एकाच ठिकाणी ऍडमिशन घेतले . ते प्रेम वाढतच गेलं . दीड वर्ष झाला ते दोघेही एकत्र राहत होते. दोघांचेही एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. पण एवढा मोठं भांडण त्यांच्या कधीच झालं नव्हतं . रवीने कधीच प्रीतीवरती हात उगारला नव्हता , ना कधी आवाज चढवुन बोलला होता . वादा वादी व्हायची पण इतक्या टोकाची कधीच नाही .... रवीला अपराधीपणा वाटू लागला त्याची रिॲक्शन चुकीची होती . ज्यावेळी तिला सपोर्ट करायची गरज होती त्यावेळी तो भलतच बोलून गेला होता . तो तसं का बोलला असेल याचाच विचार करत बसला . त्याला स्वतःचाच राग येऊ लागला .

प्रीती जाऊन आता बघत बराच वेळ झाला होता . तो लगेच निघाला , पण त्याला तिच्या घरी पोहचायला उशीर झाला होता . ज्यावेळी तो तिच्या घरी पोहोचला होता त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता . का ? कसा ? कशामुळे ? या गोष्टी तर होत्याच . पण नाकात कापूस घातलेल्या मृत प्रीतीला बघून त्याच्या पोटात खड्डाच पडला . सारे जग त्याच्या भोवती फिरू लागलो . तो चक्कर येऊन खाली पडला . पण खाली जमीन नव्हतीच . अमर्याद खोल असलेल्या पाताळात तो कोसळत चालला होता . आणि तो अचानक थांबला .
त्याने डोळे उघडले समोर प्रीती जिवंत होती . ते त्या दोघांच्या एकत्र राहत असलेल्या खोलीत होते .